पंजाब राज्याची संपूर्ण माहिती Punjab Information In Marathi

Punjab Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या पोस्ट मध्ये पंजाब या राज्याची माहिती पाहणार आहोत.

Punjab Information In Marathi

पंजाब राज्याची संपूर्ण माहिती Punjab Information In Marathi

पंजाब हे भारताच्या वायव्येकडील एक महत्त्वाचे राज्य आहे. पंजाब या राज्याची राजधानी चंदीगड असून या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 50,362 चौरस किमी इतके आहे.राज्यात सर्वात मोठे शहर लुधियाना हे आहे. पंजाब हे राज्य पाकिस्तान सीमेलगत आहे.

पंजाब पाच नद्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे.

एकेकाळी सिंधू आणि सतलज यांदरम्यानचा झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या पाच नद्यांच्या खोर्‍यांनी व्यापलेला डोंगररांगापासून हिमालयपायथ्याच्या शिवालिक श्रेणीपर्यंत विस्तारलेला, असा मूळचा पंजाब होता.

पंजाब राज्याची स्थापना

पंजाब राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 या दिवशी करण्यात आली.पंजाब हे भारताच्या वायव्येकडील एक महत्वाचे राज्य आहे. पंजाब पाच नद्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंजाबी भाषकांचे एक स्वतंत्र राज्य असावे

अशी मागणी अकाली दल नेता मास्टर तारासिंग यांनी केली होती. 1966 च्या के. टी. शाह आयोगाच्या शिफारशीनुसार हिंदी भाषिक प्रदेश हरयाणा व पंजाबी भाषिक प्रदेश पंजाबची निर्मिती करण्यात आली.

तसेच या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी म्हणून ‘चंदीगड या नियोजित शहराचा विकास व चंदीगडला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.

इतिहास

प्राचीन सिंध प्रदेशाचा पंजाब एक भाग आहे. नंतरच्या काळात मौर्य, बॅक्ट्रीयानस, ग्रीक, शक, कुशान व गुप्त इत्यादींचे राज्य होते. मध्ययुगीन पंजाबमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य राहिले आहे.

गझनवीच्या पाठोपाठ घोरी, खिलजी, तुघलक, लोधी आणि मोगल आले. 15 व 16 व्या शतकात गुरुनानक यांच्या शिकवणीतून पंजाबच्या इतिहासाला भक्‍तीमार्गाकडे वळण मिळाले.

धर्म आणि समाजातील वाईट गोष्टी हटविण्याकडे त्यांचा कल होता. गुरुगोविंदसिंह यांनी शिखांचे दहावे गुरू म्हणून खालसा पंथाची स्थापना करून कित्येक शतकापासून चालत आलेल्या जुलुमशाही व गुलामगिरीला आव्हान दिले आणि सर्वधर्मसमभाव व देशप्रेमावर आधारित नव्या पंजाबची स्थापना केली.

रणजित सिंगांच्या काळात नंदनवन असलेले पंजाब दुफळी व ब्रिटीशांच्या कारस्थानामुळे दोन लढायांनंतर 1849 मध्ये ब्रिटीश साम्राज्यात सामील झाले. महात्मा गांधींच्या लढ्यापूर्वी ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढ्याला पंजाबात सुरूवात झाली.

अनुशासन आणि स्वराज्य या तत्वांवर नामधारी संप्रदायाने हा लढा सुरु केला. त्यानंतर लाला लाजपतराय यांनी स्वातंत्र्य संग्रामात मुख्य भूमिका बजावली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत पंजाबचा मोठा पुढाकार होता.

भूवर्णन

पंजाब राज्याच्या पश्चिमेला पाकिस्तानी पंजाब, उत्तरेला जम्मू आणि काश्मीर , ईशान्येला हिमाचल प्रदेश, दक्षिण आणि आग्नेयेला हरियाणा व चंदीगडचा केंद्रशासित प्रदेश आणि नैऋत्येला राजस्थान आहे. चं

दीगड हा केंद्रशासित प्रदेश पंजाबची राजधानी आहे आणि हरियाणा राज्याचीही राजधानी आहे.  अमृतसर, लुधियाना, जालंधर, पटियाला आणि भटिंडा ही पंजाबमधील प्रमुख शहरे आहेत .

राजस्थान राज्याची

पंजाब राज्याच्या ईशान्य सीमेवरील गुरदासपूर, रूपार व होशियारपूर जिल्ह्यांच्या पूर्व सीमांवर शिवालिक डोंगरांच्या रांगा आहेत. पश्चिम सीमेवर उत्तरेस रावी आणि नैर्ऋत्येस सतलज असून ही पाकिस्तानबरोबरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे.

भूरूपदृष्ट्या पंजाबचे दोन भाग पडतात. पहिला भाग ईशान्य ग्हणजे सीमेवरील उच्च प्रदेश. या भागात उंची ३६५ मी. पासून ६१० मी. पर्यंत वाढत जाते व रूपारच्या पूर्वेस हरयाणामध्ये ही उंची १,५०० मी. पर्यंत वाढते.

याच्या दुसऱ्या भागात उच्च प्रदेशाच्या नैर्ऋत्येस व पश्चिमेस दुआबांनी बनलेले मैदान असून त्याची उंची २१० ते ३६५ मी. पर्यंत आहे. उत्तरेस सतलज व रावी यांमधील बडी दोआब (दुआब) चा थोडा भाग या मैदानात येतो, त्याची उंची २०० ते ३०० मी. पर्यंत आहे तर त्याच्या आग्नेयीस ‘बीस्त’ रा बिआस आणि सतलज यांमधील संपूर्ण त्रिकोणी दुआब आहे. हा दुआब बडी दुआबपेक्षा थोडासा उंच आहे. पंजाबमध्येही अन्य प्रदेशांप्रमाणे नवीन व जुन्या गाळाचे प्रदेश आहेत.

नद्यांकाठच्या प्रदेशांस ‘बेत’ म्हणतात व ते सिल्टयुक्त असून जास्त सुपीक असतात. सतलजच्या बेतची रुंदी १० ते २० किमी. आहे. काही वेळा क्षार साचून हे भाग नापीक बनतात. उच्च भागातील दुआबाच्या मध्यभागी जुन्या गाळाचे वाळयुक्त प्रदेश आहेत. त्यांस ‘बार’ म्हणतात.

नद्या

झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या पाच नद्यांचा प्रदेश तो पंजाब, हे नाव आज समर्पक राहिलेले नाही. सध्या रावी केवळ सीमेवरून, बिआस केवळ ११२ किमी. व सतलज सु. ७७५ किमी. या राज्यातून वाहतात. बिआस गुरदासपूरजवळ हिमाचल प्रदेशातून प्रवेशते व दक्षिणेस वाहते.

बिआस व सतलज यांचा संगम माखूरजवळ होतो. सतलज हीच पंजाबची खरी महत्त्वाची नदी होय. ती हिमाचल प्रदेशातून भाक्राजवळ पंजाबमध्ये प्रवेशते व रूपारपर्यंत दक्षिणेस वाहते, तेथे अचानक १० अंशांनी वळून पश्चिमेस वाहते.

बिआसच्या संगमानंतर फिरोझपूरच्या उत्तरेस ती पंजाब-पाकिस्तानच्या सीमेवरून फाझिलूकापर्यंत व पुढे पाकिस्तानमधून वाहते. सतलजवर जलंदर जिल्ह्यात पूर्व सीमेवर भाक्रा व नानगल येथे होन घरणे बांधलेली आहेत. भाक्रा धरणामुळे १७२ चौ. किमी. क्षेत्रफळाचा विस्तीर्ण ‘गुरू गोविंदसागर’ जलाशय निर्माण झाला आहे व तो मुख्यतः हिमाचल प्रदेशात पसरला आहे.

राजकीय स्थान

प्रशासनाच्या सोयीसाठी १९६६ पूर्वी राज्याचे अंबाला, जलंदर व पतियाळा असे तीन शासकीय विभाग पाडले होते पण नंतर त्याचे दोन विभाग करण्यात आले असून १२ जिल्ह्यांत प्रशासनव्यवस्था विभागली गेली आहे.

स्थानिक प्रशासन व्यवस्थेसाठी १०४ नगरपालिका व ११६ समूहविकास गट असून ९,३३१ ग्रामपंचायती आहेत. पंजाब राज्याने त्रिसूत्री पद्धतीची पंचायती व पंचायत समित्या ग्रामीण विकासामध्ये महत्त्वाचे कार्य करीत आहेत.

पंजाब मध्ये 22 जिल्हे असून 23 वा जिल्हा मालेरकोटला आहे हा नवनिर्मिती जिल्हा आहे. अमृतसर जिल्हा, भटिंडा जिल्हा, फिरोजपूर जिल्हा, फरीदकोट जिल्हा, फतेहगढ साहिब जिल्हा, गुरुदासपूर जिल्हा, पठाणकोट जिल्हा, होशियारपूर जिल्हा, जालंधर जिल्हा, कपूरथळा जिल्हा, लुधियाना जिल्हा, मानसा जिल्हा, मोगा जिल्हा, मुक्तसर जिल्हा, शहीद भगतसिंगनगर जिल्हा, पटियाला जिल्हा, रुपनगर जिल्हा, संगरूर जिल्हा, तरन तारण साहिब जिल्हा, बर्नाळा जिल्हा, मोहाली जिल्हा, फाजिल्का जिल्हा.

हवामान

राज्याचे हवामान खंडीय स्वरूपाचे आहे.

पंजाबी या राज्याचे तापमान उन्हाळ्यात 34.5° से. व हिवाळ्यात 11.8° से. असते. उन्हाळ्यात दुपारी तपमान 41° से. पर्यंत वाढते. ऑक्टोबरपासून तपमान कमी होत असून फेब्रुवारी पर्यंत 20° से. पेक्षा कमी असते. जानेवारीमध्ये 11.8° ते 14.2° से. च्या दरम्यान आढळते. संपूर्ण राज्यात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तपमान जवळजवळ सारखेच असते.

पंजाबमध्ये आग्नेय मान्सून अथवा बंगालवरून येणाऱ्या मान्सून शाखेमुळे जुलै-सप्टेंबर या काळात पाऊस पडतो, तर जानेवारी-फेब्रुवारी या काळात पश्चिमेकडून येणाऱ्या आवर्तापासूनही अल्पवृष्टी होते.

ईशान्येकडील उच्छ प्रदेशात वार्षिक सरासरी पाऊस 75 सेंमी. पर्यंत पडतो व तो नैर्ऋत्येस 30 सेंमी. पर्यंत कमी होतो. वार्षिक जलवायूचा विचार करता नोव्हेंबर ते मार्च थंड व उत्साही हवा, एप्रिल ते जून कडक उन्हाळा, जुलै से सप्टेंबर पावसाळा असे हवामान आढळते. ऑक्टोबर महिन्यात हवामान बदलते असते.

मृदा व खनिजे

पंजाबच्या मृदा मुख्यतः जलोढीय स्वरूपाच्या आहेत. त्यांपैकी सखल नदीकाठच्या मृदांस ‘खादर’, तर उंच प्रदेशातील मृदांस ‘बांगर’ म्हणतात. वाळवंटाच्या आग्नेय भागात पॅडॉक प्रकारच्या क्षारयुक्त भुऱ्या पिंगट मातीचे आवरण काही प्रदेशात आहे.

काही भागांत गाळाच्या थरांची जाडी ४,५०० मी. पेक्षाही जास्त आढळते. खनिज संपत्तीच्या दृष्टीने पंजाब हे महत्त्वाचे राज्य नाही. तेल संशोधनाचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.

भाषा

राज्यातील बहुसंख्य लोकांची भाषा पंजाबी ही इंडो – आर्यन भाषासमूहातील एक भाषा आहे. मझी, दोआबी, मलवी आणि पत्यावली या पंजाबीच्या बोली प्रचलित आहेत. पंजाबीशिवाय पश्चिमी हिंदी व पहाडी भाषाही काही भागांत बोलल्या जातात.

पंजाबीची गुरुमुखी ही लिपी शीख गुरूंनी निश्चित केली आहे [ गुरुमुखी लिपि]. तिच्याखेरीज देवनागरी व फार्सी लिप्यांतही पंजाबी पुस्तके छापली जातात. या भाषेचा पहिला कवी फरीद शकरगंज हा बाराव्या शतकात जन्मलेला एक सूफी पंथी होता.

गुरू नानकाने हिंदीमिश्रित पंजाबीत भक्तिमार्गी रचना करून गुरुसाहित्याची परंपरा सुरू केली. सूफी व हिंदू भक्तकवींनीही पंजाबीत काव्ये लिहिली.

लोकसंख्या

लोकसंख्याशास्त्र

राज्यातील शीख लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60 टक्क्यांहून अधिक आहे. राज्याची लोकसंख्या असलेल्या इतर काही समुदायांमध्ये हिंदू, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर आहेत. जाट शीख हे राज्याच्या शीख समुदायाचा अविभाज्य भाग आहेत. 2011 मध्ये पंजाबची लोकसंख्या 2,77,43,338 होती. शहरी लोकसंख्या 37.49%आहे.

राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 20 टक्के लोक भारतातील इतर राज्यांतून स्थलांतरित झाले आहेत. लिंग गुणोत्तर प्रमाण 1000 पुरुषांमागे 893 स्त्रिया असे आहे. येथील लिंग गुणोत्तरामध्ये सातत्याने घट होत आहे. गेल्या 20 वर्षात लिंग गुणोत्तरात मोठी घट झाल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. साक्षरता दर 82.20% आहे.

पोशाख

स्त्रिया सलवार-खमीज व डोक्यावर चुनडी ओढतात. घेरदार घागरा, चोळी व ओढणी हाही त्यांचा एक आवडीचा पोशाख आहे. डोके, नाक, कान, गळा, दंड, मनगटे, बोटे व पाय यांचे एकूण जवळजवळ पन्नास अलंकारांचे प्रकार पंजाबी स्त्रियांच्या अंगावर दिसतात. पायांचे दागिने चांदीचे व बाकीचे सोन्याचे व जडावाचे असतात.

पुरुषांची वेशभूषा शहरात जरी आधुनिक असली, तरी शीख पुरुष ‘केश-कंगवा-कंगन-कछ-कृपण’ ही पंथ-चिन्हे ‘पंचककार’ ग्रामीण भागांप्रमाणे नागरी जीवनातही धारण करतात. ग्रामीण भागांत पुरुष लुंगी किंवा चुरूत पैजामा, कुडता आणि डोक्याला पटका बांधतात. शीख लडीदार पगडी घालतात.

पंजाब राज्याचे अन्न

त्यांच्या आहारात गव्हाचा आटा, चणे व इतर डाळी, भाज्या, दूधदुभते, फळफळावळ व प्रसंगी मांस-मासे हे पदार्थ असतात.

वनस्पती व प्राणी

पंजाब हे अल्प जंगल असणारे राज्य असून केवळ ४.२% (२,११,१२८ हे.) भूमी जंगलव्याप्त आहे. रुक्ष हवामान व दीर्घकालीन मानववस्ती यांमुळे जंगले कमी आढळतात. एकेकाळी उत्तरेकडील सर्व भागांत रावीपर्यंत दाट जंगल असावे.

आजही गुरदासपूर, होशियारपूर व रूपार या जिल्ह्यांतच राज्यातील ६०% पेक्षा जास्त वनस्पती आहे. ४० सेंमी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात कोरडे पानगळी व उष्ण जलवायू काटेरी जंगल आढळते. गुरदासपूरमध्ये उपोष्ण कटिबंधीय जंगल आहे.

किकर व बाभूळ ही झाडे सर्वत्र आहेत. दक्षिणेकडील प्रदेशात जाल, जुंद व कोपर ही झाडे आहेत. एकूण वनसंपत्ती नगण्यच आहे. वन्य प्राणी विशेष उल्लेखनीय नाहीत. रानमांजर व क्कचित अस्वले आढळतात. तरस, कोल्हा, लांडगा हे प्राणी तुरळक आहेत.

नीलगाय, चिंकारा, हरिण, रानडुक्कर, ससा, सायाळ इ. प्राणीही आढळतात. मोर, तितर, रानकोंबडे (पारधपक्षी) व इतर पशुपक्षी आढळतात. नद्या कालवे आणि जलाशय मिळून ८,७०० हेक्टरमध्ये मासेमारी करता येते. हेक्टरी सरासरी ६६० किग्रॅ. माशांचे उत्पादन होते. मासेमारी विकासाची राज्यव्यापी योजना सुरू केलेली आहे.

पंजाब राज्यातील खेळ

क्रीडा क्षेत्रातील पंजाबची कामगिरी उल्लेखनीय आहे. हॉकी, फुटबॉल, व्हॉलिबॉल व मैदानी खेळ यांत पंजाबी खेळाडू नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करतात. ‘लीडर्स क्लब’ जलंदर व ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ हे प्रसिद्ध संघ आहेत.

मिल्खासिंग हा धावपटू, ध्यानचंद हा हॉकीपटू, प्रवीणकुमार, जोगिंदरसिंग हे मैदानी खेळाडू विख्यात आहेत. पतियाळा येथे राष्ट्रीय क्रीडाशिक्षणसंस्थाही आहे. हॉकी व मैदानी कसरती खेळ यांत पंजाबी लोक भारतात अग्रेसर आहेत.

प्रेक्षणीय स्थळे : सुवर्णमंदिराचे स्थान अमृतसर, अत्याधुनिक स्थापत्याची राजधानी व गुलाबपुष्पांची नगरी चंडीगढ आणि सतलजवरील प्रचंड धरणांचे भाक्रा-नानगल तसेच भतिंडा, जलंदर, सरहिंद, कर्तारपूर ही प्रेक्षणीय शहरे आहेत.

डेरा बाबा नानक शहर गुरू नानकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वसवले आहे. अचलेश्वर ह्या गावात शिवपार्वतीचे प्रचंड मंदिर असून तेथे उ. भारतातील एकमेव कार्तिकेयाची मूर्ती आहे.

शेती

खते, बियाणे व सुधारित शेतीपद्धती यांचा अवलंब पंजाबइतका अन्य कोणत्याही राज्यात आढळत नाही.

पंजाब मधील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. पंजाब हे कृषीप्रधान राज्य आहे.  येथे सर्वाधिक गव्हाची पेरणी केली जाते.  इतर मुख्य पिकांमध्ये भात, कापूस, ऊस, बाजरी, मका,हरभरा आणि फळे यांचा समावेश होतो. प्रमुख उद्योगांमध्ये कापड आणि पीठ यांचा समावेश होतो.

उद्योगधंदे

पंजाब मुख्यतः लघुउद्योगांचे राज्य आहे.राज्यात उद्योगांचा विकास वेगाने व्हावा म्हणून नवी २९ केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. पंजाब राज्य उद्योग विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून ते उद्योगांस मदत करते.

सांप्रत सायकली, छोटी यंत्रे, खेळांचे सामान, लोकरी कपडे या परंपरागत वस्तूंबरोबरच विद्युत्‌घट, ट्रॅक्टर, दूरचित्रवाणी संच, कातडी वस्तू, सिमेंटच्या पूर्वरचित वस्तू, सिमेंट नळ, कृषिअवजारे व त्यांचे सुटे भाग, विरंजके व साबण, स्कूटर आणि अत्युच्च कंप्रता ग्राहक निर्माण होतात. १९७६ साली ३०० कोटी रु. भांडवल गुंतवणुकीसाठी विविध कंपन्यांस परवानगी देण्यात आली.

वरील नवीन उद्योगांशिवाय लोकरी कापड उद्योग म्हत्त्वाचा असून देशातील ९०% लोकरी कापडाचे उत्पादन या राज्यात होते. रेशीम व कृत्रिम रेशीम, खत, साखर व सिमेंट हे उद्योग महत्त्वाचे आहेत. सार्वजनिक क्षेत्रात, एफ् सीआय् चा खतकारखाना नानगल येथे असून काही औषधी कारखानेही आहेत.

नवीन उद्योगांशिवाय लोकरी कापड उद्योग म्हत्त्वाचा असून देशातील ९०% लोकरी कापडाचे उत्पादन या राज्यात होते. रेशीम व कृत्रिम रेशीम, खत, साखर व सिमेंट हे उद्योग महत्त्वाचे आहेत. सार्वजनिक क्षेत्रात, एफ् सीआय् चा खतकारखाना नानगल येथे असून काही औषधी कारखानेही आहेत.

राज्यातील प्रमुख औद्योगिक प्रदेशांपैकी एक बडी दुआबात अमृतसर शहराच्या परिसरात व दुसरा बीस्त दुआबातील जलंदर, लुधियाना, नवाशहर, होशियारपूर या भागांत आहे.

जलंदर हे क्रीडासाहित्याचे मोठे केंद्र आहे. क्रीडासाहित्य बनविण्याचे येथे १२५ लघुउद्योग असून त्यांत २,८०० वर कामगार आहेत. होशियारपूरला टर्पेंटाइन, रॉझिन, व्हार्निश यांचे उद्योग आहेत. लुधियाना हे लोकरी कपड्यांचे देशातील प्रमुख केंद्र असून शहरात १,६०० पेक्षा जास्त लघुउद्योग केंद्रे आहेत.

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment