अख्खा मसूर रेसिपी मराठी | akkha masoor recipe in marathi

By Wiki Mitra

Published On:

Follow Us

अख्खा मसूर रेसिपी मराठी | akkha masoor recipe in marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आणि भगिनींनो आज आपण अशीच एक हॉटेल style रेसिपी पाहणार आहोत.ही रेसिपी अगदी सोपी व झटपट होणारी आहे.

अख्खा मसूर रेसिपी साहित्य ( akkha masoor recipe ingredients ):

  • अर्धी वाटी अख्खा मसूर
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
  • 3 ते 4 लसुन पाकळया
  • आल्याचा तुकडा
  • 1/2 चमचा जिरे
  • 3 चमचे खोब्र( किसलेलं)
  • 2 ते 3 चमचे तेल
  • 1/2 चमचा मोहरी
  • 1 कांदा बारीक (चिरलेला)
  • 1/4 चमचा हळद
  • 1 चमचा लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • पाणी

अख्खा मसूर रेसिपी कृती ( akkha masoor recipe steps ) :

मसूर रात्रभर भीजत घालावे व ,सकाळी पाण्याने स्वच्छ धुवुन घ्यावे आणि कुकर मध्ये पाणी घालून 3 ते 4 शिटया काढून शिजवुन घ्या.

आता मिक्सर च्या भांडयामध्ये चिरलेली कोथिंबीर,लसुन,आलं,खोब्रा किसलेलं,जिरे घालावे आणि बारीक मसाला वाटुन घ्यावा.

मिसळपाव रेसिपी मराठी | misal pav recipe in marathi येथे वाचा

आता एका कढईत तेल गरम करावे ,त्यात मोहरी घालावी आणि छान तडतडू दया. आता त्यात कांदा घालावा आणि छान सोनेरी होइपर्यंत परतून घ्यावा.

आता त्यात वाटलेला मसाला घालावा आणि तो छान परतुन घ्यावा. मसाला छान परतुन झाला की त्यात हळद, लालतिखट घालावे आणि व्यवस्थित एकत्र एकजीव करुन घ्यावे.

आता इच्छेप्रमाणे आपल्याला भाजी किती घट हवी त्यानुसार पाणी घालावे आणि चवीनुसार मीठ घालावे. आणि एक उकळी येईपर्यंत शिजवुन घ्यावे. अख्खा मसूर ची भाजी तयार आहे.

बारीक चिरलेली कोथिंबीर गारनिशिंग ला घालावी. गरमागरम पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment