ॲपल ज्यूस मराठी Apple juice in Marathi ॲपल ज्यूस हे आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असते. रोज एक एप्पल खाणे किंवा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणे आपल्यासाठी खूपच आवश्यक असते. कारण त्यापासून अनेक प्रकारच्या आजारापासून आपले संरक्षण होते. सफरचंदाचा ज्यूस आपण नियमित घ्यायलाच पाहिजे. जर तुम्हाला डॉक्टरांपासून दुरी बनवून ठेवायची असेल तुम्ही रोज सफरचंदाचा ज्यूस किंवा एक सफरचंद तरी खाल्ले पाहिजे. सफरचंदाचा ज्यूस पिण्यासाठी अत्यंत पौष्टिक व चविष्ट असून तो आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सफरचंदाचा ज्यूस कोणीही पिऊ शकते.
तर चला मग जाणून घेऊया सफरचंदाचा ज्यूस तयार करण्याची रेसिपी.
ॲपल ज्यूस मराठी Apple juice in Marathi
रेसिपी प्रकार :
जूस तयार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आपण पाहतो की, संत्र्याचा ज्यूस, मोसंबी ज्यूस, पायनॅपल ज्यूस, डाळिंब ज्यूस, एप्पल ज्यूस अशा विविध पद्धती आहेत. कोणत्याही फळांचा ज्यूस घेणे आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो. आपण येथे ॲपल ज्यूस विषयी बोलणार आहोत. अॅपल, ज्यूस तयार करण्यासाठी अत्यंत सोपी वचविष्ट असते. ॲपल ज्यूस दररोज पिल्यामुळे पचनक्रिया सुधारते यामुळे आपली पचन संस्था देखील निरोगी राहते. ॲपल ज्यूस आपल्या पचन संस्थेसंबंधी असणाऱ्या समस्या दूर ठेवण्यास मदत करते. वेळोवेळी आपले शरीर डिटॉक्स केले गेले पाहिजे. ॲपल ज्यूस पिल्यामुळे शरीरातील हानिकारक व विषारी टाकाऊ पदार्थ बाहेर काढते म्हणून सफरचंदाचा रस डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. ॲपल ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला अॅपल, साखर, काळे मीठ व पाणी एवढेच साहित्य लागते. तर चला मग जाणून घेऊया आपण ज्यूस तयार करण्याची पाककृती व लागणारे साहित्य.
ही रेसिपी किती व्यक्तीने करतो तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण 4 व्यक्तींकरता तयार करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 5 मिनिटे वेळ लागतो.
तयार करण्याचा वेळ :
ॲपल ज्यूस तयार करण्याकरता आपल्याला 5 मिनिटे वेळ लागतो.
एकूण वेळ :
ॲपल ज्यूस तयार करण्याकरता आपल्याला एकूण वेळ 10 मिनिटे तयार लागतो.
साहित्य :
1) 4 सफरचंद
2) 1 कप साखर
3) दोन चमचे काळे मीठ
4) एक ग्लास पाणी
ॲपल ज्यूस बनवण्याची पाककृती :
- कॉर्न पकोडे मराठी
- सफरचंदाचा ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सफरचंद स्वच्छ धुऊन घ्यावे लागतील.
- सफरचंद छान धुतल्यानंतर त्याची साल काढून सफरचंदाचे लहान लहान तुकडे तयार करून घ्या.
- आता सफरचंदाचे तुकडे मिक्सिंग जारमध्ये घेऊन त्यामध्ये साखर, पाणी आणि काळे मीठ घालून घ्या.
- आता ते छान बारीक करून घ्या. नंतर सफरचंदाचा रस्सा थोडे आणखीन पाणी घालू शकता.
- आता हा रस तुम्ही चाळणीने गाळून घ्या यासाठी आपण चाळणी घेऊन त्याखाली स्वच्छ भांडे ठेवूया.
- नंतर हा रस एका चाळीतून स्वच्छ गाळला जाईल.
- चाळीत उरलेला चमचा च्या मदतीने बाहेर काढून घ्या आता सफरचंदाचा रस तयार आहे. तुम्ही हा रस ग्लासमध्ये घेऊन येऊ शकता.
सफरचंदामधील पोषक घटक :
सफरचंदामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक अशी पोषक घटक असतात. सफरचंदामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, जीवनसत्वे, खनिजे, विटामिन सी, विटामिन के, अँटी-ऑक्सिडेंट, कार्बोहायड्रेट्स, विटामिन बी सारखे पोषक घटक असतात.
फायदे :
ॲपल ज्यूस पिल्याचे आपल्याला अनेक फायदे होतात. ॲपल ज्यूस पिल्यामुळे आपल्या हृदयाशी संबंधित सर्व समस्यांना आराम मिळतो.
ॲपल ज्यूसमुळे आपले यकृत स्वच्छ राहते, तसेच कोलेस्ट्रॉल देखील कमी होते. हाडे मजबूत होतात.
सफरचंदाचा रस यकृत स्वच्छ ठेवतो.
आपण दररोज एक ॲपल खाणे किंवा त्याची ज्यूस पिणे फायदेशीर असते.
ॲपल ज्यूस दररोज पिल्यामुळे कर्करोगासारखे आजार देखील आपल्याला टाळता येऊ शकतात.
ॲपल ज्यूस पिल्यामुळे डोळ्याच्या समस्या दूर होतात. पचनक्रिया सुरळीत चालतात.
तोटे :
ॲपल ज्यूस पिणे फायद्याचे असते परंतु बऱ्याचदा ते घेण्याचे नियम आपल्याला माहिती नसते, त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो म्हणून ॲपल ज्यूस कसे घ्यावे? किती प्रमाणात घ्यावे? याची माहिती जाणून घेतल्याशिवाय ते घेऊ नये.
तर मित्रांनो, तुम्हाला ॲपल ज्यूस रेसिपी विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.