गूळ पोळी रेसिपी मराठी Gul poli Recipe in Marathi गूळ पोळीची रेसिपी पुरणपोळीला ऑप्शनल आहे. तसेच ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी असून ती मकर संक्रांती या सणाला खास करून बनवली जाते. पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. यामध्ये गूळ आणि तीळ हे मुख्य पदार्थ असतात. ही रेसिपी हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी मदत करते तसेच ही पोळी कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागते. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.
गूळ पोळी रेसिपी मराठी Gul poli Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
गुळ पोळी आणि पुरणपोळी ही रेसिपी जवळजवळ सारखीच असते फक्त पुरणपोळीमध्ये हरभऱ्याच्या डाळीचे पुरण तयार केले जाते, तर गुळ पोळीमध्ये गुळाचे सारण भरल्या जाते. गूळपोळी चवीला अतिशय स्वादिष्ट व कुरकुरीत लागते. गुळपोळी ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. ही गूळपोळी ग्रामीण तसेच शहरी भागातही बनवली जाते. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरिता तयार होणार आहे?
ही रेसिपी पाच व्यक्तींकरता तयार होणार आहे.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
गुळपोळी या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 35 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
गुळ पोळी रेसिपी कुकिंग करण्याकरिता आपल्याला 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
गूळ पोळी तयार करण्याकरता आपल्याला एकूण वेळ हा एक तास लागतो.
गूळ पोळी रेसिपीसाठी लागणारे साहित्य :
गुळपोळी तयार करण्याकरिता आपल्याला कव्हरिंग तसेच सारण तयार करावे लागते.
कव्हरिंगसाठी लागणारे साहित्य :
1) 2 वाटी गव्हाचे पीठ
2) 1 वाटी मैदा
3) चिमूटभर मीठ
4) आवश्यकतेनुसार पाणी
5) तेल
स्टफिंगसाठी लागणारे साहित्य :
1) पाव वाटी तीळ
2) दोन चमचे बेसन
3) एक वाटी चिक्कीचा गुळ
4) पाव वाटी भाजलेले शेंगदाणे पावडर
5) अर्धा चमचा वेलची पावडर
पाककृती :
- सर्वप्रथम एका ताटामध्ये गव्हाचे पीठ मैदा एकत्र करून घ्यावा. त्यामध्ये दोन चमचे बेसन घालू शकता. चिमूटभर मीठ घालून हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या.
- एका वेळी थोडे पाणी घालून त्याचे पीठ बनवा. एका वेळी जास्त पाणी घालू नका.
- पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नसावे. त्यात मध्यम सुसंगतता असावी.
- जर तुम्हाला पाण्याची दूध वापरायचे असेल तर पीठ मळण्यासाठी तुम्ही दूध देखील वापरू शकता.
- पीठ मळून झाले की, पुन्हा एक चमचा तेल घालून छान बोलून घ्या पीठ एका भांड्यात काढून घ्या.
- अशा प्रकारे पीठ मळून झाले की, ते अर्धा तास ठेवून द्यायचे आहे. तोपर्यंत स्टफिंग तयार करून घ्यायची आहे.
स्टफिंगची पाककृती :
- मध्यम आचेवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये तेल घालून शेंगदाणे व तीळ ते मध्यम आचेवर पाच ते सहा मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
- नंतर त्याला मिक्सरच्या भांड्यात टाका व जाडसर पावडर करून घ्या. तिळाची पावडर जास्त बारीक करून घेऊ नका.
- नंतर त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून बेसन घाला. बेसन छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. नंतर गॅस बंद करा. चिक्कीचा गूळ एका भांड्यात घ्या.
- भाजलेले बेसन भाजलेले शेंगदाणे गुळ भाजलेली तीळ पूड वेलची पावडर घाला. तुम्हाला हवे असेल तर त्यामध्ये जायफळ पावडर देखील वापरू शकता.
- आता हे सर्व मिश्रण हाताने छान मिक्स करून घ्या.
- मिश्रण एकदा मिक्स झाले की, एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून ते मिश्रण मिक्स करून घ्या.
- गुळपोळी बनवण्याची पाककृती :
- मळलेले पीठ पुन्हा एकदा मळून घ्या. तसेच त्याचा छोटा गोळा बनवून त्याची पारी तयार करून घ्या.
- नंतर त्यामध्ये तयार केलेल्या सारणाचा छोटा गोळा करून भरून घ्या. तुम्ही पोळी तयार करण्याकरिता पीठ, मैदा किंवा तेलाचा वापर तुम्ही करू शकता.
- गॅसवर एक पॅन गरम करण्याकरता ठेवा. पॅन गरम झाला की त्यावर तीन लाटलेली पोळी टाकावी.
- पोळी छान परतून घ्या. त्यावर थोडं तूप लावून पुन्हा पलटून घ्या दुसरी बाजूला ही तूप लावून छान परतून घ्या.
- गुळपोळी भाजत असताना मंद आचेवर भाजून घ्यावी. आपण तेलाचाही वापर करू शकतो. अशाप्रकारे सर्व पोळ्या तयार करून घ्या. गुळपोळी खाण्यासाठी कुरकुरीत व चविष्ट लागते.
- तुम्ही ही पोळी दूध किंवा तुपा सोबत खाऊ शकता.
पोषक घटक :
गुळपोळीमध्ये प्रथिने, प्रोटीन, लोह, कॅल्शियम स्निग्ध पदार्थ, चरबी इत्यादी पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.
फायदे :
गुळपोळी उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये खाणे अत्यंत चांगले आहे. ही पोळी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचे तापमान संतुलित राहते व बाहेरील होणाऱ्या इन्फेक्शन पासून देखील आपले संरक्षण होते. रोगप्रतिकार क्षमता देखील वाढते.
गुळापासून तयार करण्यात आलेली गुळाची पोळी आरोग्यासाठी चांगली असते. गुळामध्ये आयर्न मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे गुळपोळी खाल्याने आयर्नची कमतरता भासत नाही.
गुळपोळी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार होते. तसेच आपल्या शरीरातील थकवा नाहीसा होतो. फ्रेश वाटते म्हणून गुळपोळीचा वापर आपल्या जेवणामध्ये करायला पाहिजे.
तोटे :
गुळ पोळी खाण्याचे तसे कोणतेही तोटे नाहीत परंतु गुळपोळी खात असताना आपण योग्य प्रमाणात खाल्ली पाहिजे अन्यथा आपल्याला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
तर मित्रांनो, तुम्हाला गुळपोळी या रेसिपी विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा