बेसन लाडू कशी बनवायचे मराठी Besan Ladoo Recipe in Marathi

By Wiki Mitra

Published On:

Follow Us
Besan Ladoo

बेसन लाडू कशी बनवायचे मराठी Besan Ladoo Recipe in Marathi  हिंदू धर्मामध्ये कोणताही धार्मिक सण असो, त्यामध्ये आपण गोडधोड पदार्थ करीत असतो. त्यामध्ये उत्तम असा गोड पदार्थाचा मेनू म्हटला तर बेसनाचा लाडू हे तर आपण दिवाळी, दसरा, गणपती पूजा किंवा मग इतरही कोणता कार्यक्रम असला तर करतोच ; परंतु बऱ्याच जणांना ही रेसिपी कशी बनवायची याविषयी माहिती नसते, त्यामुळे बेसन लाडू बनवत असताना त्यांच्यामध्ये चुका होतात.
ही चण्याचे पीठ तूप आणि साखर घालून बनवलेली पारंपारिक भारतीय गोड रेसिपी आहे. ही रेसिपी पिढ्यानपिढ्या पारंपारिक पाककृतीपैकीच एक आहे असे मानले जाते.

Besan Ladoo

बेसन लाडू कशी बनवायचे मराठी Besan Ladoo Recipe in Marathi

लाडूचे प्रकार :

लाडूचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात जसे की, रवा लाडू, रवा नारळाचे लाडू, नाचणीचे लाडू, तिळाचे लाडू, सुख्या मेवाचे लाडू, मोतीचूरचे लाडू, बुंदीचे लाडू इ.

तयारीसाठी लागणारा वेळ :

बेसनाचे लाडू बनवण्याकरिता आपल्याला तयारीसाठी लागणारा वेळ हा 15 मिनिटे असतो.

कुकिंग टाईम :

बेसन लाडू बनवत असताना बेसन भाजण्यासाठी आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

बेसनाचे लाडू तयारीसाठी लागणारा वेळ 15 मिनिटे आणि बेसनाचे लाडू कुकिंग करिता 10 मिनिटे असा एकूण 25 मिनिटे एवढा वेळ आपल्याला लागेल.

वाढीव :

खालील सामग्री लक्षात घेता, त्यामध्ये मध्यम आकाराचे लाडूचे 10 नग तयार होतील.

बेसनाचे लाडूकरिता लागणारी सामग्री :

1) 5 कप बेसन (थोडे जाडसर)
2) 50gm तूप
3) वेलची पावडर
4) सुखा मेवा (तुमच्या आवडीनुसार)
5) चार कप बारीक केलेली साखर.

पाककृती :

  • सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाच चमचे तूप घाला, गरम झाले की त्यामध्ये चार कप बेसन घाला.
  • हे बेसन पीठ आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. लाडुचे बेसन मंद आचेवर भाजत असताना आपल्याला त्यामध्ये सतत ढवळत राहावे लागेल, नाहीतर बेसन कढईमध्ये जळून जाईल.
  • हे बेसन पीठ आपल्याला जोपर्यंत वास येत नाही किंवा त्याचा रंग लालसर होत नाही तोपर्यंत भाजायचे आहे.
  • जर तुम्हाला यामध्ये तूप वापरायचे नसेल तर तुम्ही डालडा देखील वापरू शकता.
  • येथे तुम्हाला हे बेसन मध्यम आचेवर दहा मिनिटे भाजून घ्यायचे आहेत. दहा मिनिटे पूर्ण झाल्यानंतर या बेसनाला छान असा लालसर रंग आलेला असेल, तसेच त्याचा सुगंधही आपल्याला यायला सुरुवात झाली असेल.
  • यामध्ये सुरुवातीला आपण पाच चमचे तूप घातले होते परंतु भाजतानाही आपण यामध्ये आणखीन दोन चमचे तूप वापरू शकता. आता गॅस बंद करून घ्या.
  • आता त्यामध्ये वेलची पूड घालून तुमच्या आवडीची ड्राय फ्रुट्स टाका. हे मिश्रण पुन्हा चांगले मिसळून घ्या थोडे थंड होण्यासाठी बेसन बाजूला ठेवून घ्या.
  • हे बेसन बाजूला ठेवलेले अति थंड ही होऊ द्यायचे नाहीत. थोडासा थंड झालं की, त्यामध्ये 5 कप साखर घाला. बेसन पेक्षा साखर थोडी जास्त घातली तर लाडू आणखीन गोड बनतील. बेसनामध्ये साखर घालत असताना बेसन थोडेसे गरमच असायला हवे जेणेकरून आपल्याला लाडू बांधायला सोपे जाईल. कारण गरम बेसनामध्ये साखर लवकर
  • इथे आपण बेसन तूप लावून भाजलेले थोडे थंड केले जाते. ते पूर्णपणे थंड होऊ देऊ नका. ते थोडे गरम असावे. जेणेकरून लाडू लाटणे सोपे होईल.
  • भाजलेल्या बेसनामध्ये वेलची पूड, साखर व सुकामेवा घातल्यानंतर हे मिश्रण चांगले मिसळणे घ्या आता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार आहे.
  • आता हातामध्ये पिठाचा गोळा घेऊन मध्यम आकाराचा लाडू तयार करून घ्या. आणि त्यामध्ये एक मनुका सजावटीसाठी तुम्ही घालू शकता. हे लाडू दिसायला आणि खायला खरोखरच छान लागतात.
  • सर्व मिश्रित पिठांचे दहा लाडू बांधून तयार आहेत. आता हे डिशमध्ये ठेवून इतरांना खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • अशा अगदी सोप्या सरळ पद्धतीने तुम्ही हे बेसन लाडू बनवू शकता.
  • बेसन लाडूतील पोषक घटक :
    बेसनामध्ये फॉलिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. जे लाल रक्तपेशी व पांढरे रक्त पेशी वाढवण्यासाठी गुणकारी असते. तसेच आपण त्यामध्ये सुकामेवा घातलेला आहे, त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण भरपूर असते.

फायदे :

बेसनाचे लाडू खाणे तसे शरीरासाठी गुणकारीच आहेत. बेसनामधील पोषक घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.

ज्यामुळे शरीरातील ग्लुकोज लाल रक्तपेशी व पांढऱ्या रक्तपेशी यांचे संतुलन राहते.

कॉम्प्लेक्स कर्बोदकांमधे भरपूर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले बेसन मधुमेह रोगी देखील खाऊ शकतात.

तोटे :

बेसनामध्ये फायबरचे प्रमाण असल्यामुळे अति सेवन केले असता आपल्याला पोट दुखीचा त्रास होण्याची भीती असते. तसेच त्यामध्ये जास्त प्रमाणात साखर असल्यामुळे मधुमेह रोगींसाठी देखील ते हानिकारक ठरू शकते.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व ही रेसिपी इतरांना शेअर करा.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment