भगर मराठी Bhagar Recipe In Marathi

भगर मराठी Bhagar Recipe In Marathi  भगर ही वरी तांदूळ, शेंगदाणे आणि बटाटे पासून बनवली जाते. हा एक स्वादिष्ट आणि चवदार पदार्थ आहे, विविध ठिकाणी भगर वेग-वेगळ्या प्रकारे बनवली जाते. भगरचा उपयोग उपवासासाठी फराळ म्हणून केला जातो, भगर हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. भगर भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ आहे. हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामध्ये अनेक प्रकारचे घटक आहेत. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट भगर खायाला मिळते, काही लोकांना भगर खूप आवडते. पण त्याचा परिसरात चवदार भगर मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि तिखट भगर कशी बनवतात यांची रेसिपी. आता आपण भगर रेसिपी पाहणार आहोत.

Bhagar Recipe

भगर मराठी Bhagar Recipe In Marathi

भगरचे प्रकार :

भगर हा एक पौष्टिक आणि चवदार पदार्थ आहे, विविध ठिकाणी भगर वेग-वेगळ्या प्रकारे बनवली जाते. जसे भगर, आलू भगर, शेंगदाणे भगर, भगर वडे, मसाला भगर, हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
भगर रेसिपी ही आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

भगरच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

भगर तयार करण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर ही रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

भगर रेसिपी कुकिंग करण्यासाठी आपल्याला 25 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

भगर बनवण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 45 मिनिट वेळ लागतो.

भगरसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) अर्धा पाव भगर/वरी तांदूळ.
2) 1 वाटी शेंगदाणे.
3) 3 ते 4 हिरवी मिरची.
4) थोडा कढीपत्ता.
5) 2 आलू/बटाटे.
6) तेल, मीठ.
7) जिरे.

पाककृती :

  • मसाला पापड मराठी
  • भगर बनवताना सर्वात प्रथम वरीचे तांदूळ चांगले नीसुन घ्या, आणि एका प्लेटमध्ये काढा.
  • नंतर गॅस चालू करून, त्यावर एक खोल तळाचा पॅन ठेवून गरम करा.
  • पॅन गरम झाला की, यामध्ये वरीचे तांदूळ टाकून चांगले भाजून घ्या, आणि सतत परतवत रहा.
  • तांदूळ चांगले भाजून घ्या, यामुळे आपली भगर चांगली बनते, भाजून झाले की खाली काढून घ्या.
  • आता बटाटेची साल काढून बारीक कापून घ्या, याबरोबर हिरवी मिरची पण कापा आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
  • नंतर शेंगदाणे भाजून, त्याचे मिक्सर मधून बारीक कुट तयार करून घ्या.
  • आता एक कढई घ्या, त्यामध्ये आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा, तेल गरम झाले की, यामध्ये थोडे जिरे टाका.
  • जिरे चांगले तळ-तळीत होऊ द्या. नंतर यामध्ये बारीक हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाका.
  • आणि परतवत रहा, मिरची 1 मिनिट चांगली होय द्या, नंतर यामध्ये बारीक केलेले बटाटे टाका.
  • बटाटे तेलात चांगले 5 मिनिट शिजू द्या, बटाटे थोडे नरम होतील, बटाटे चांगले झाले की, यामध्ये बारीक शेंगदाणे कूट टाका, आणि चांगले मिक्स करून घ्या.
  • एका बाजूने गॅसवर एका भांड्यात गरम पाणी ठेवा, त्याला चांगली उकडी येऊ द्या.
  • शेंगदाणे कूट तेलात चांगले झाले की, यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी आणि चवीनुसार थोडे मीठ टाका.
  • आणि चांगले मिक्स करून घ्या, या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्या.
  • पाण्याला उकळी आली की, नंतर यामध्ये भाजलेले तांदूळ टाका आणि मिक्स करून घ्या.
  • यावर झाकण ठेऊन भगर 10 मिनिट चांगली शिजू द्या. भगर चांगली शिजली की, गॅस बंद करा, आणि खाली काढून घ्या.
  • आता आपली गरमा-गरम आणि स्वादिष्ट भगर खाण्यासाठी तयार आहे. आपण लिंबू आणि एका प्लेटमध्ये भगर घेऊन खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

भगरमध्ये असणारे घटक :

भगर हा एक पौष्टिक पदार्थ आहे. यामध्ये वेग-वेगळे पदार्थ वापरले जातात. यामुळे यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात. जसे फॅट, चरबी, व्हिटॅमिन, शुगर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, कर्बोदके, फायबर हे सर्व घटक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

भगरचा उपयोग उपवास असला की जास्त केला जातो, यामध्ये असणारे घटक फायबर, प्रथिने, कर्बोदके व शुगर हे घटक आपल्याला भूक लागू देत नाही.

यामध्ये असणारे व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॅट, हे घटक आपले शरीर निरोगी ठेवतात व आपल्या मासपेशीत वाढ करतात.

भगरमध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

भगर जास्त प्रमाणात सेवन केली तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

भगर हा तेलकट पदार्थ आहे, यामुळे आपल्याला मळ-मळ किंवा उलटी होऊ शकते.

म्हणून भगर आपण योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला भगर रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment