भेळ रेसिपी मराठी Bhel recipe in Marathi

भेळ रेसिपी मराठी Bhel recipe in Marathi  भेळ ही रेसिपी महाराष्ट्रातील एक शाकाहारी खाद्यपदार्थ आहे. भेळचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे ओली भेळ आणि दुसरी सुकी भेळ.
सुक्या भेळपेक्षा ओली भेळ खूप खायला चविष्ट लागते. तसेच भेळ ही पाणीपुरीच्या प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध असते. भेळ बनवण्यासाठी मुरमुरे कांदा आलू चिंचेची चटणी पुदिन्याचे पाणी पापडी, चाट मसाला इत्यादी घटक मिक्स करून वेळ तयार केली जाते खायला अप्रतिम लागते. तर चला मग झेड या रेसिपी विषयी सविस्तर माहिती पाहूया.

Bhel recipe

भेळ रेसिपी मराठी Bhel recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

भारतामध्ये सर्वच राज्यातील रस्त्यावर जागोजागी आपल्याला भेलपुरी चाटच्या गाड्या दिसतात. चाट ही आपल्या देशातील खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. चाट हे उत्तर प्रदेशातील मुख्य डिश आहे.
भेळ रेसिपी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. भेळ बनवण्याच्या मुख्य दोन प्रकार आहेत. भेळ तिच्या चटपटीतपणामुळे खूपच प्रसिद्ध झाली. तसे भेट तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत जसे मखाना भेळ, पाणीपुरी भेळ, राजस्थानी भेळ, चायनीज भेळ, आजकाल बाहेर किंवा रेस्टॉरंटमध्ये देखील भेळ विकत मिळते. आपल्याला जर स्वतः आपल्या घरी भेट तयार करायची असेल तर त्यासाठी कोणकोणती सामग्री लागते. व हॉटेल किंवा बाहेर मिळणाऱ्या भेल सारखी चटपटीत भेल कशी तयार करायची बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो तर चला मग जाणून घेऊया रेसिपी तयार करण्यासाठी सामग्री व कृती.

ही रेसिपी किती व्यक्ती करता बनणार आहे ?
भेळ ही रेसिपी आपण 5 व्यक्तींकरता बनणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

भेळ रेसिपी पूर्वतयारी करता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

तयार करण्याकरता लागणारा वेळ :

भेळ तयार करताना आपल्याला सर्व घटक मिक्स करून घ्यावे लागतात त्याकरता आपल्याला 5 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

मेड रेसिपी पूर्ण करण्याकरता एकूण वेळ आपल्याला 15 मिनिटे लागतो.

सामग्री :

1) तीन कप मुरमुरे
2) एक टोमॅटो बारीक चिरलेला
3) मोठा कांदा बारीक चिरलेला
4) एक उकडलेला बटाटा
5) हिरवी कोथिंबीर पुदिना चटणी
6) लसणाची लाल चटणी
7) पाणीपुरीच्या पापडी, शेव
8) अर्धा चमचा तिखट मसाला
9) पाव चमचा काळे मीठ
10) अर्धा कप बारीक शेव
11) पाव कप मसाला शेंगदाणे
12) बारीक चिरलेली कोथिंबीर
13) एक चमचा चाट मसाला
14) एक चमचा लिंबाचा रस

भेळ बनवण्याची पाककृती :

  • मासवडी रेसिपी मराठी
  • सर्वप्रथम भेळ बनवण्यासाठी आपल्याला मुरमुरे व्यवस्थित करून. कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. हे मुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे त्याचा रंग बदलू नये.
  • मुरमुरे कुरकुरीत झाले की, एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावे. त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटा आणि लिंबाचा रस टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे.
  • नंतर मसाला शेंगदाणे व इतर घटक सुद्धा घालावे, त्यामध्ये चाट मसाला, काळे मीठ आणि पापडी पुऱ्या चुरून घालाव्यात.
  • नंतर आपल्या आवडीनुसार लागेल तेवढ्यात चटण्या, मिरची पावडर, चिंच खजुराची चटणी व्यवस्थित एकत्र करून घालावी.
  • नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून फरसाण आणि लिंबू पिळून चटपटीत हेल एका प्लेटमध्ये सर्व करण्याकरिता द्यावी.

पोषक घटक :

भेळ एक पोषक पदार्थ आहे जो नाश्त्याच्या स्वरूपात खाल्ला जातो. त्यामध्ये मुरमुरे, पुदिना, कोथिंबीर कांदा, टोमॅटो, आलू हे सर्व घटक घातले जातात. त्यामुळे ती एक पौष्टिक नाश्ता बनतो.
भेळमध्ये कॅल्शियम, ग्लुकोज, कार्बोहायड्रेट, फायबर विटामिन ई, प्रोटीन असे अनेक घटक भेलमध्ये असतात.

फायदे :

भेलमध्ये पुदिन्याचे पाणी वापरतो पुदिनामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे भेळ खाल्ल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते.

कुरमुऱ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे पटकन आपल्याला एनर्जी मिळते. जी आपल्या शरीराला ऊर्जा देतात.

कुरमुऱ्यामध्ये डायटरी फायबर असते, हे डायटरी फायबर आपल्या पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतात.

भेळमध्ये असणारे कॅल्शियम आणि पोटॅशियम मुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते.

तोटे :

भेळ खाणे तसे फायद्याचेच आहे, परंतु भेळ मध्ये असणारे घटक कधी कधी आपल्याला हानी पोहोचू शकतात जसे की, त्यामध्ये वापरण्यात येणारी चिंचेचे पाणी, मसाला.

चिंचेचे पाणी असल्यामुळे आपल्याला खोकला किंवा सर्दी होऊ शकते.

अतिरिक्त भेल खाल्ल्यामुळे मळमळ सारखा त्रास होऊ शकतो.

तर मित्रांनो तुम्हाला भेळ रेसिपी विषयी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment