बिस्कीट केक मराठी Biscuit Cake Recipe In Marathi

बिस्कीट केक मराठी Biscuit Cake Recipe In Marathi  बिस्कीट केक हा बिस्कीट आणि काजू, बदाम पासून तयार केला जातो. बिस्कीट केक ही सर्वात सोपी रेसिपी आहे, जे आपण कमी साहित्यमध्ये घरीच लवकर बनवू शकतो. हा खायाला स्वादिष्ट आणि गोड केक आहे, हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. भारतात विविध ठिकाणी बिस्कीट केक वेग-वेगळा फ्लेवर टाकून वेग-वेगळा बनवला जातो. आपण हॉटेल किंवा बेकरीवर पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि गोड केक खायाला मिळते.

काही लोकांना बिस्कीट केक खूप आवडते, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट केक मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने स्वादिष्ट बिस्कीट केक कसा बनवतात याची रेसिपी, आता आपण बिस्कीट केक रेसिपी पाहणार आहोत.

Biscuit Cake Recipe In Marathi

बिस्कीट केक मराठी Biscuit Cake Recipe In Marathi

बिस्कीट केकचे प्रकार :

बिस्कीट केक हा एक गोड आणि चवदार पदार्थ आहे, बिस्कीट केक आपण वेग वेगळ्या प्रकारे बनवू शकतो. जसे बिस्कीट केक, बिस्कीट मैदा केक, चॉकलेट केक, व्हॅनिला केक, हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
बिस्कीट केक ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

बिस्कीट केकच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

बिस्कीट केक तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर आपण लवकर केक बनवू शकतो, यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

बिस्कीट केक कुकिंग करण्यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

बिस्कीट केक बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर कुकिंग करावे लागते. यासाठी आपल्याला टोटल टाईम 40 मिनिट वेळ लागतो.

बिस्कीट केकसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 4 पुडे पारले जी बिस्कीट.
2) 1 चमच बेकिंग सोडा.
3) 2 ते 3 चमचे तूप.
4) 3 चमचे चाॅकलेट पावडर.
5) थोडे दूध.
6) 1 वाटी काजू, बदाम, पिस्ता तुकडे.
7) 1 चमच वेलची पावडर.
8) 4 चमचे पिठी साखर.

पाककृती :

  • सर्वात प्रथम पारले बिस्कीट पुड्यातून बाहेर काढा, आणि त्याचे लहान तुकडे तयार करा.
  • नंतर मिक्सर मधून बिस्कीटची बारीक पावडर तयार करुन घ्या, बिस्कीट जाड राहायला नको.
  • आता मिक्सरच्या भांड्यात बारीक बिस्कीट पावडर, आवश्यक तेवढी पिठी साखर, आणि बेकिंग सोडा टाकून चांगले मिसळून घ्या.
  • नंतर हे सर्व एका मोठ्या प्लेटमध्ये काढा, त्यामध्ये थोडे तूप, चाॅकलेटे पावडर आणि वेलची पावडर टाका, आणि मिक्स करून घ्या.
  • नंतर यामध्ये थोडे-थोडे दूध टाकून केकचे मिश्रण तयार करा, मिश्रण थोडे पातळ असेल पाहिजे.
  • यांमध्ये काजू, बदाम, पिस्ताचे तुकडे टाकून, मिश्रण पूर्ण एकजीव तयार करा, यामुळे आपला केक चांगला तयार होणार.
  • नंतर गॅस वरती कुकुर ठेऊन गरम करा, कुकरची वरची शिट्टी काढून टाका, आणि कुकरमध्ये एक स्टँड ठेवा.
  • नंतर एक खोल तळाचा गोल डबा घ्या, त्याला आतून थोडे तेल लावा, नंतर यामध्ये केकचे मिश्रण व्यवस्थित टाकून टॅप करा.
  • नंतर हा डबा कुकरमधील स्टँडवर ठेऊन, केकवर थोडे काजू, बदामचे तुकडे टाका.
  • नंतर व्यवस्थित झाकण बंद करून, गॅस मध्यम आसेवर ठेऊन केक 20 ते 25 मिनिट चांगला होऊ द्या.
  • 25 मिनिट नंतर झाकण उघडून पाहा, केक चांगला फुगला असेल, चाकूने केक चांगला झाला की, नाही तपासून घ्या.
  • केक चांगला झाला असेल तर गॅस बंद करा, आणि कुकर खाली काढून, त्यातून व्यवस्थित केक बाहेर काढून.
  • केक हलक्या हाताने एका प्लेटमध्ये काढा, आता आपला स्वादिष्ट चवदार बिस्कीट केक खाण्यासाठी तयार आहे. एका प्लेटमध्ये घेऊन आपण केक खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

बिस्कीट केकमध्ये असणारे घटक :

बिस्कीट केक हा एक स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे. यामध्ये विविध प्रकारचे पौष्टिक घटक आहेत. जसे कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम, व्हिटॅमिन, प्रथिने, चरबी, फॉस्फरस, लोह, शुगर, हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

बिस्कीट केक सेवन केल्याने आपल्या कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन सारखे घटक मिळतात, यामुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

यामध्ये असणारे चरबी, आणि फॅट आपल्या शरीरावर मासपेशी व चरबी वाढवतात.

बिस्कीट केकमधील सर्व घटक, आपल्या खूप फायद्याचे आहेत,

तोटे :

बिस्कीट केक आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला उलटी किंवा पोटदूखी होऊ शकते.

यामध्ये असणारे पौष्टिक घटक, आपल्या शरीरात जास्त झाले तर, आपण आजारी पडू शकतो.

म्हणून बिस्कीट केक आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला बिस्कीट केक रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment