Bear Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण अस्वल या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. या लेखात आपण अस्वल या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
अस्वल प्राण्याची संपूर्ण माहिती Bear Information In Marathi
जसे, अस्वल कुठे राहतात, ते वास्तव्य कसे करतात, त्यांचे प्रकार किती आहेत? आपण लहान असताना अस्वलाचा खेळ पाहिला असेल. अस्वलाचे वैज्ञानिक नाव उर्सीडे आहे. हा एक सस्तन प्राणी आहे. अस्वलाच्या आठ प्रजाती आहेत. मुस्टेलॉइड व पिनीपेड हे त्यांचे सर्वात जवळचे नातेवाईक मानले जातात.
अस्वल हा आशिया युरोप उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडांमध्ये आढळतो. हे मुख्यतः उपोष्ण कटिबंधीय हवामान उत्तर अमेरिका आशिया युरोप इत्यादी देशांमध्ये आढळतात. अस्वल हा खूप शांत प्राणी आहे परंतु जंगली अस्वल हे माणसांसाठी सुद्धा धोकादायक ठरू शकते. अस्वल हे जंगलात राहणारे मांसभक्षक प्राणी असून अस्वलांना मासे खायला खूप आवडतात .त्यामुळे ते नदीकाठी किंवा तलावात जवळच राहतात. अस्वल हे ताशी 40 मीटर पडू शकते.
अस्वलाचे वर्णन
अस्वल हे काळा किंवा तपकिरी रंगाचे असतात. तर पांढऱ्या रंगाचे लांब तोंड, खालचा ओठ लांब ,नाकपुड्या पुढे आलेल्या,तसेच चार पाय असतात पण ते पुढच्या दोन पायांचा उपयोग हाता सारखा करतात. ते पाठीमागच्या पायावर उभे राहू शकतात .त्यांची नखे ही खूप भयानक असतात .
पांढऱ्या रंगाची नखे असतात बहुतेक काळ्या रंगाच्या अस्वलाच्या छातीवर V आकाराची चट असते. भारतामध्ये अस्वल हिमालय पर्वतामध्ये आढळतात. त्यांची उंची 70 ते 90 सेंटिमीटर असते तर लांबी 1.8 मीटर असते. त्यांचे वजन 100 ते 120 किलो असून ते 25 ते 30 वर्ष जगतात. तर प्राणिसंग्रहा मध्ये ते ५० वर्षे जगते.अस्वलाला जास्तीत जास्त 42 जात असतात. अस्वल झाडावर सुद्धा चढू शकतात. अस्वल पाण्यामध्ये काही तासांपासून ते एक दिवसांपर्यंत राहू शकतो.
अस्वलाची वैशिष्ट्ये
इतिहासपूर्व काळापासून माणसाने अस्वलाचे मांस, हाडे ,चामडी आणि चरबी मिळवण्यासाठी त्यांची हत्या केली. अस्वल हे चिडखोर प्राणी आहे. त्यामुळे तो धोकादायक असतो. आपल्या पंचाच्या एका फटक्यात तो एखाद्या व्यक्तीला ठार मारू शकतो. अस्वलाचे नाक खूप तीक्ष्ण असते व त्याचे खाद्य शोधायला ते नाकावर अवलंबून असते.
भारतातील तपकिरी अस्वल जवळ जवळ एक ते दीड किलोमीटर वास घेऊ शकतात. अस्वलाचा खेळ हा भारतातून दहा वर्षापूर्वी हद्दपार करण्यात आला आहे .याचा खेळ करणारी दरवेशी जमात आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. भारतात अस्वलाच्या खेळाच्या नावाखाली त्यांचा प्रचंड छळ केला जात होता.
ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर सरकारने या विरुद्ध कारवाई करून आंतरराष्ट्रीय संवर्धन परिषदेत आवाज उठवण्यात आला. त्यामुळे भारतात 2009 साली अस्वलांचा शेवटचा खेळ झाला आहे.प्राचीन काळापासून अस्वलाची नखे आणि सुळे या पासून दागिने तयार केली जात होती. अस्वलाच्या केसांचा उपयोग फर कोट तयार करण्यासाठी केला जातो. अस्वल हा प्राणी जागतिक वन्य आणि जीव निधी या जगन्मान्य संस्थेचे बोधचिन्ह आहे.
संतती
अस्वले कळपाने न राहता एकटी राहतात. त्यांच्या समागमाचा काळ उन्हाळा असतो. ७ ते ९ महिन्याच्या गर्भवती नंतर डिसेंबर-जानेवारीत मादीला एक किंवा दोन पिल्ले होतात. ती दोन तीन महिन्यांची झाल्यावर आईच्या पाठीवर बसून बाहेर जाऊ शकतात .अस्वलाची ची पिल्ले तीन वर्षांपर्यंत तिच्या सोबत असतात. व ती पिलांचे रक्षण करते .या जातीत नर व मादी सारखेच असतात.
अस्वलाचा आहार
अस्वलाचा आहार हा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांवर अवलंबून असतो. ते ज्या भागामध्ये राहतात त्या भागांमध्ये कशा प्रकारचा आहार उपलब्ध आहेत त्यावर त्यांचे आहाराची सवय असते. अस्वल हा प्राणी शाकाहारी तसेच मांसाहारी सुद्धा आहे. अस्वल हे फळे ,मुळे ,किडे व मासे खातात. उत्तरेकडील ध्रुवीय अस्वल प्रामुख्याने समुद्रातील पाणी खातो. तर चीनमधील तांडा जातीचे अस्वल बांबू खातो. भारतातील अस्वल हे प्रामुख्याने वाळवे, मुंग्या व इतर किडे खातात. अस्वल एका भोजनाच्या वेळी दहा ते पंधरा हजार वाळव्या खाऊ शकते. अस्वलाला मधमाशांच्या पोळ्यातील मध खाण्यास जास्त आवडते. अस्वल शिकार करताना समोर आलेल्या प्राण्याला आधी खुप गुदगुल्या करून हैराण करतो आणि मग आपल्या नखांनी फाडून खातो.
अस्वलं कुठे राहतात
अस्वल हे शक्यतो जंगलामध्ये, पर्वत आणि गवताळ प्रदेशामध्ये राहतात. तपकिरी अस्वल हे वायव्य किंवा उत्तर अमेरिका, वायव्य आफ्रिका, युरोप ,आशिया या देशांमध्ये आढळतात. अमेरिकन ब्लॅक अस्वल हे फ्लोरिडा, उत्तर कॅनडा ,तसेच अलास्का या देशांमध्ये आढळतात. ध्रुवीय अस्वल हे बर्फाळ प्रदेशात मध्ये आढळतात. आशियाटिक अस्वल हे अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, भारत ,कोलंबिया, चीन ,इराण, कोरिया ,मलेशिया, रशिया, म्यानमार ,पाकिस्तान आणि तैबाण या देशांमध्ये आढळतात. स्लोथ अस्वल हे भारत ,भूतान ,श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश मध्ये आढळतात.
अस्वलाचे प्रकार
जगभरामध्ये अस्वलाच्या वेगवेगळ्या जाती पसरल्या आहेत. परंतु आर्कटिक च्या बर्फाळ प्रदेशांमध्ये तसेच अमेरिकेच्या वेदांत जंगलांमध्ये जास्त प्रमाणात अस्वल आढळतात. अस्वलाच्या एकूण आठ जाती आहेत त्या खालील प्रमाणे.
१) ध्रुवीय अस्वल
हे अस्वल बर्फाळ प्रदेशात मध्ये आढळते. खास करून ते आर्कटिक प्रदेशांमध्ये महासागराच्या सभोवताली आढळतात. नर अस्वलाचे वजन 500 ते 550 किलो इतके असते. आणि मादी अस्वल हे नर अस्वला पेक्षा आकाराने लहान असतात .त्यांचे वजन 250 ते 300 किलो असते. या अस्वलाला लातिन मध्ये ‘sea bear ‘ असे म्हणतात. ध्रुवीय अस्वल हे विश्रांती न घेता 160 किलोमीटर पोहोचू शकतात. ध्रुवीय अस्वल पाण्यामध्ये आठ फूट लांब झेप घेऊ शकतो.
२) तपकिरी अस्वल
अस्वल है अलास्का, युरोप, वॉशिंग्टन, रशिया आणि भारत या देशांमध्ये आढळतात. ही अस्वलं तपकिरी आणि काळ्या रंगाचे असतात. यांचा आहार त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर अवलंबून असतो .कारण ज्या ठिकाणी जसा आहार मिळेल तसे त्यांचे शरीर बनते. हे अस्वल सर्वभक्षक असतात.
३) अमेरिकन ब्लॅक अस्वल
अमेरिकन ब्लॅक अस्वल हे फ्लोरिडा, उत्तर कॅनडा, तसेच अलास्का या देशांमध्ये आढळतात. हे अस्वल काळ्या रंगाचे असते. त्याचबरोबर कॅनडा आणि ब्रिटिश कोलंबिया मध्ये या जातीचे अस्वल पांढरा रंगाचे असते .या अस्वलांचे वजन 270 ते 280 किलो इतके असते. हे अस्वल जंगलामध्ये पंचवीस वर्षे जगू शकतात .अमेरिकन अस्वल हे रात्रीचे जास्त क्रियाशील असतात.
४) अँडीयन अस्वल
हे अस्वल फक्त अमेरिकेतील पर्वतांमध्ये आढळतात. शक्यतो हे अस्वल काळ्या रंगाचे असते. कोठे कोठे या अस्वलाचा रंग गडद तपकिरी किंवा लालसर असतो.नर अस्वलाचे वजन 100 ते 200 किलो असते आणि मादी अस्वलाचे वजन 40 ते 80 किलो असते. या अस्वलाचा चेहरा दुसऱ्या अस्वलाच्या तुलनेने लहान आणि रुंद असतो.
५) आशियाटिक ब्लॅक
या अस्वलाला काळ्या रंगाचा लांब फर असतो आणि या अस्वलाच्या छातीवर पांढऱ्या रंगाची V आकाराची छटा असते. आशियाटिक अस्वल हे अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश ,भारत ,कोलंबिया, चीन ,इराण ,कोरिया, मलेशिया, रशिया, म्यानमार ,पाकिस्तान आणि तालिबान या देशांमध्ये आढळतात .यावरून असे समजते की हे अस्वल जगभरामध्ये पसरलेले आहे.
६) सूर्य अस्वल
सूर्य अस्वलांचे पायांचे पंजे दुसऱ्या जातीच्या अस्वलापेक्षा मोठे असतात आणि त्यांचे जीभही लांब असते. हे अस्वल आकाराने दुसऱ्या जातीच्या अस्वलं पेक्षा लहान असतात. या अस्वलाची लांबी 120 ते 150 सेंटिमीटर असते. नर अस्वलाचे वजन 25 ते 65 किलो असते. तर मादी अस्वलाचे वजन 25 ते 50 किलो असते. या अस्वलाचे फर लहान असते आणि ते काळा किंवा गडद तपकिरी रंगाचे असते. हे अस्वल कोलंबिया, मलेशिया, म्यानमार, भारत, चीन, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांमध्ये आढळतात. त्यांची ८ ते १० इंच लांब असणारे जीभ त्यांना मधमाशांच्या पोळ्यातील मध खाण्यासाठी उपयुक्त असते. या अस्वलांना ‘हनी बियर ‘असेही म्हणतात.
७) स्लोथ अस्वल
स्लोथ अस्वलाचे वैज्ञानिक नाव मेलुरस युरेनस असे आहे .या अस्वलाच्या दोन उपप्रजाती आहेत त्या म्हणजे इंडियन स्लोथ अस्वल आणि श्रीलंका स्लोथ अस्वल. या अस्वलाची शरीराची लांबी 140 ते 190 सेंटिमीटर असते. मादी अस्वलाचे वजन 50 ते 90 किलो इतके असते तर नर अस्वलाचे वजन 75 ते 135 किलो असते .या अस्वलाला लांब झटकेदार काळे केस असतात. तसेच छातीवर पांढऱ्या रंगाची U आकाराची छटा असते. या जातीची अस्वले भारत,भूतान श्रीलंका ,नेपाळ आणि बांगलादेश मध्ये आढळतात.
८) पांडा अस्वल
पांडा अस्वल हे आहार म्हणून बांबू खातात. त्यांना रोज 20 किलोपर्यंत आहार लागतो. या अस्वलाची लांबी 1.5 मीटर असते. नर अस्वलाचे वजन 110 ते 115 किलो असते आणि मादी अस्वलाचे वजन 95 ते 100 किलो असते .पांडा अस्वल हे काळा आणि पांढरा रंगाचे असते. चार पाय आणि पायाचे वरील शरीर काळ्या रंगाचे असते आणि चेहरा आणि उरलेला भाग पांढऱ्या रंगाचा असतो. तसेच त्यांच्या डोळ्याभोवती काळा रंगाचा गोल असतो.
अस्वल प्राण्याविषयी काही तथ्य
- अस्वलाचे रुदय एका मिनिटांमध्ये 40 वेळा धडकते.
- अस्वलाला संस्कृत मध्ये रिक्ष म्हणतात ज्यावरुन अस्वल हा शब्द आला आहे अस्वलाला इंग्रजीत bear म्हणतात पर्शियन भाषेत अस्वला साठी खुर्स हा शब्द आहे.
- अस्वलांचा अधिवास नष्ट होण्यापासून संरक्षण करण्यासाठी जगाच्या अनेक भागात कायदे केले गेले आहेत.
- अस्वलाच्या पिलाला शावक म्हणतात.
- अस्वल शेतात शिरतात आणि ऊस खातात.
- कोरडया हंगामात तो मुख्यतः हा कीटक खातो.
- अस्वल त्यांच्या वक्र नखे मुंगी आणि दीमक किडे खोदण्यास सक्षम आहे .
- अस्वल हा सर्वभक्षी प्राणी आहे.