चहा मसाला मराठी Chaha Masala Recipe In Marathi चहा मसाला हा जायफळ, मिरे, दालचिनी, आणि वेलची पासून बनवला जातो. या मसाल्यापासून एकदम स्वादिष्ट आणि चवदार चहा बनतो. मसाला चहामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आहेत, जे आपल्या शरीरातील आजार दूर करतात, हे घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत. चहा मसाला हा एक प्रसिध्द आणि लोकप्रिय पदार्थ आहे. याचा उपयोग सकाळी चहामध्ये टाकून केला जातो. भारतात सर्व ठिकाणी चहा सर्वाना खूप जास्त आवडतो.
आपण हॉटेल किंवा चहा सेंटर वरती पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि गोड चहा प्यायला मिळतो. काही लोकांना मसाला चहा खूप आवडते, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट आणि गोड मसाला चहा मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट चहा मसाला कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण चहा मसाला रेसिपी पाहणार आहोत.
चहा मसाला मराठी Chaha Masala Recipe In Marathi
चहा मसाल्याचे प्रकार :
चहा मसाला हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट मसाला आहे. विविध ठिकाणी चहा मसाला हा वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. यांचे कोणतेच वेगळे प्रकार पडत नाही, आपण यामध्ये वेग-वेगळे साहित्य वापरून चवदार चहा मसाला तयार करू शकतो.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
चहा मसाला रेसिपी ही आपण 7 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
चहा मसाल्याच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
चहा मसाला तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर आपण लवकर मसाला बनवू शकतो, यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
चहा मसाला कुकिंग करण्याचे काम नाही, मसाला व्यवस्थित बारीक करून मिसळून घ्यावा लागतो, यासाठी आपल्याला 5 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
चहा मसाला बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर चांगला मिसळावा लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 15 मिनिट वेळ लागतो.
चहा मसाल्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 2 जायफळ.
2) 7 ते 8 दालचिनीच्या काड्या.
3) 5 ते 6 तुकडे सुंठ.
4) 10 ते 12 काळीमिरी.
5) 12 हिरवी वेलची.
पाककृती :
- सर्वात प्रथम जायफळ, दालचिनी काड्या थोड्या बारीक करून घ्या, आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
- नंतर सुंठ थोडे बारीक करून घ्या, आणि काळेमिरे चांगले निसुन घ्या.
- नंतर हे सर्व साहित्य काळे मिरे, जायफळ, दालचिनी काड्या, हिरवी वेलची आणि सुंठ एका भांड्यात काढा.
- नंतर सर्व मसाला मिक्सर मधून बारीक करून घ्या, याची एकदम बारीक पावडर तयार करुन घ्या.
- आता आपला चहा मसाला तयार आहे, आपण एका छोट्या हवा बंद डब्यात हा मसाला ठेऊ शकतो, म्हणजे हा जास्त काळ टिकून राहणार.
- आता गॅसवरती एक लहान खोल भांडे ठेवा, त्यामध्ये 2 कप पाणी टाका, आणि चांगली उकडी येऊ द्या.
- नंतर यामध्ये चहा मसाला टाका, चहा मसाला थोडा वेळ उकळू द्या म्हणजे मसाल्यातील सर्व अर्ख चहा मध्ये येणार.
- आता यामध्ये 3 चमचे साखर आणि 1 चमच चहा पत्ती टाका, साखर विरघळली की यामध्ये थोडे दूध टाका.
- आणि चांगली उकळी आली की, गॅस बंद करून चहा खाली काढून घ्या.
- आता आपला चहा मसाल्याचा स्वादिष्ट आणि चवदार चहा पिण्यासाठी तयार आहे. आपण एका छोट्या कपात घेऊन मसाला चहा पिण्याचा आनंद घेऊ शकतो.
चहा मसाल्यामध्ये असणारे घटक :
चहा मसाला हा एक पौष्टिक पदार्थ आहे, जो वेग-वेगळ्या साहित्य पासून बनवला जातो. यामुळे यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात. जसे फॅट, कॅलरी, व्हिटॅमिन, चरबी, कर्बोदके आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात, हे घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
चहा मसाल्याच्या चहा पिल्याणे आपल्याला फॅट, चरबी, शुगर सारखे घटक मिळतात.
यामुळे आपल्याला शारीरिक थकवा येत नाही, आणि आपले शरीर निरोगी राहते.
मसाला चहामध्ये वेलची टाकल्यास आपल्याला चांगला फायदा होतो. यामुळे आपली पचनशक्ती सुधारते आणि अँसिडीटीचा त्रास होत नाही.
मसाला चहामुळे आपल्याला डोकेदुखी, सर्दी, खोकला, ताप अशा आजारापासून लवकर आराम पडतो.
तोटे :
मसाला चहा आपण जास्त प्रमाणात घेतला तर, आपल्याला मळ-मळ किंवा उलटी होय शकते.
हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामध्ये अनेक घटक आहेत, जे आपल्या शरीरात जास्त झाले तर आपण आजारी पडू शकतो.
म्हणून मसाला चहा आपण योग्य प्रमाणात घेतला पाहिजे ज्यामुळे, आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला चहा मसाला रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.