छोले रेसिपी मराठी Chole Recipe In Marathi छोले हा चणे पासून तयार केलेला एक मसालेदार पदार्थ आहे. जो सर्वात जास्त पंजाब राज्यात लोकप्रिय आहे. विविध प्रकारचे साहित्य वापरून छोले तयार केले जातात. हे खायाला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार असतात. इतर राज्यात सुध्दा छोले बनवले जातात, हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. मोठ-मोठ्या शहरात जसे पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी छोले सकाळी नास्ता म्हणून वापरले जातात.
छोले ग्रामीण व काही शहरी भागात खूप कमी प्रमाणात मिळतात, हे मसालेदार असल्यामुळे सर्वाना आवडतात. काही लोकांना मसाला छोले खूप आवडतात, पण त्याचा परिसरात मसालेदार छोले मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने हॉटेल सारखे स्वादिष्ट मसाला छोले रेसिपी कशी बनवतात याची माहिती.
छोले रेसिपी मराठी Chole Recipe In Marathi
छोलेचे प्रकार :
छोले मसालेदार पदार्थ आहे, विविध ठिकाणी छोले वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. यामध्ये मसाला छोले, छोले भटुरे, पिंडी छोले, अमृतसरी छोले असे अनेक प्रकार यामध्ये आहेत. हे सर्व प्रकार खायाला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
छोले ही रेसिपी आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
छोलेच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :
छोले तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. सर्व साहित्य एकत्र करावे लागते, यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
छोले कुकिंग करण्यासाठी आपल्याला 35 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
छोले तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर कुकिंग करावे लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 1 तास 5 मिनिट वेळ लागतो.
छोले बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 4 वाट्या चणे/ छोले.
2) 2 मध्यम कांदे.
3) 2 टोमॅटो.
4) 2 चमचे लसण-अद्रक पेस्ट.
5) 2 चमचे धनिया पावडर.
6) 2 चमचे मिरची पावडर.
7) 1 चमच हळद.
8) 1 चिमूट कस्तुरी मेथी.
9) 4 ते 5 तमालपत्र.
10) 1 चमच सुहाना व गरम मसाला.
11) 4 चमचे सुहाना ग्रेव्ही.
12) तेल.
13) मीठ.
14) कोथिंबीर.
पाककृती :
- छोले बनवण्या अगोदर 7 ते 8 तास छोले भिजू घाला. छोले चांगले भिजण्यासाठी भरपुर पाणी टाकून झाकून ठेवा.
- 7 ते 8 तासानंतर छोले स्वच्छ धुऊन घ्या. नंतर गॅस चालू करून, प्रेशर कुकरमध्ये उकडून घ्या.
- चणे जास्त मऊ होयाला नको, 2 ते 3 शिट्या झाले की गॅस बंद करा, आणि छोले बाहेर काढा.
- प्रेशर कुकर उघडा आणि तपासा, छोले मऊ शिजले की नाही. थोडे कडक असतील तर त्यांना पुन्हा 1 ते 2 शिट्या होऊ द्या .
- नंतर कांदा आणि टोमॅटो बारीक कापून यांचा पेस्ट तयार करा, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
- गॅस चालू करून एक खोल तळाचा पॅन गॅस वरती ठेवा, त्यामध्ये आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
- तेल गरम झाले की, प्रथम त्यामध्ये, तमालपत्र टाका, आणि थोडे होऊ द्या.
- नंतर यामध्ये लसन-अद्रक पेस्ट टाका, आणि थोडा वेळ परतवत रहा.
- लसन पेस्ट थोडा लालसर झाला की, त्यामध्ये कांदा पेस्ट टाका, आणि कांदा तपकीरी होये पर्यत परतवत रहा.
- कांदा पेस्ट झाला की, टोमॅटो पेस्ट टाका आणि व्यवस्थित मिश्रण करून घ्या, आणि 2 मिनिट टोमॅटो पेस्ट होऊ द्या.
- टोमॅटो थोडे मऊ झाले की, यामध्ये थोडी हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करा.
- नंतर यामध्ये थोडी कस्तुरी मेथी, चवीनुसार थोडे मीठ आणि मसाला व ग्रेव्ही टाकून व्यवस्थित मिश्रण तयार करा.
- गॅस मध्यम आसेवर करा, आवश्यकता असल्यास थोडे पाणी टाका, आणि मसाला थोडा वेळ होऊ द्या.
- मसाला पूर्ण झाला की, थोडे बुडबुडे येणार व मसल्यातून तेल बाहेर येणार आणि एक स्वादिष्ट सुगंध बाहेर येणार.
- तेव्हा आपला मसाला झाला समजावे, नंतर यामध्ये उकडलेले छोटे टाका, आणि पूर्ण मिक्स करून घ्या,
- यामध्ये ग्रेव्ही करण्यासाठी थोडे पाणी टाकून, एकदा उकडी आली की, 10 मिनिट मध्यम आसेवर वरती शिजू द्या.
- 10 मिनिट नंतर यामध्ये थोडी बारीक कोथिंबीर टाका, आवश्यक असल्यास थोडे मीठ टाका.
- आता आपले एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार छोले खाण्यासाठी तयार आहेत.
- एका प्लेटमध्ये घेऊन, सोबत थोडा कांदा आणि लिंबू घेऊन आपल छोले खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
छोलेमध्ये असणारे घटक :
छोले बनवण्यासाठी आपण छोले, मसाले आणि भाजीपाला वापरतो, यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, लोह, चरबी, फॅट, करबोदके, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कार्बोहायड्रेट असे घटक आहेत. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
छोले खाल्ल्याने आपल्याला व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रथिने कर्बोदके असे पौष्टिक घटक मिळतात. हे सर्व घटक आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.
यामधील लोह, चरबी, फॅट आपल्याला शरीरावरील मासपेशी व चरबी वाढवतात. यातील सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.
तोटे :
छोले हे एक जड अन्न आहे, आपण छोले जास्त प्रमाणात सेवन केले तर आपल्याला पोटदुखी होय शकते.
यामध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर, आपण आजारी पडू शकतो.
म्हणून आपण छोले योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला छोले रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.