कोकोनट बर्फी रेसिपी मराठी Coconut Barfi Recipe in Marathi

कोकोनट बर्फी रेसिपी मराठी Coconut Barfi Recipe in Marathi कोकोनट बर्फी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व फायदेशीर असते. त्यामध्ये व्हिटॅमिन फायबर कॅल्शियम मिनरल्स अशा प्रकारचे पौष्टिक घटक असतात. ओल्या खोबऱ्या शिवाय नारळ पाणी देखील आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते. हिंदू धर्मामध्ये सणासुदीला गोड पदार्थ तयार केले जातात. तसेच देवाला देखील त्याच पदार्थांची नैवेद्य दाखवले जाते. कोकोनट बर्फी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट तसेच तयार करण्यासाठी हे सोपी आहे. तुम्ही जर ही रेसिपी तयार करणार असाल तर खास तुमच्या ही रेसिपी माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. रेसिपी तयार करून बघा व आम्हाला कळवा. तर चला मग या रेसिपी विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Coconut Barfi Recipe

कोकोनट बर्फी रेसिपी मराठी Coconut Barfi Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

कोकोनट बर्फी ही रेसिपी अत्यंत चविष्ट व पौष्टिक आहे. तसेच बर्फी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला माहीतच आहे. जसे बेसन बर्फी, काजू बर्फी, खोबरा बर्फी, खवा बर्फी, रवा बर्फी, मैदा बर्फी व मावा बर्फी इत्यादी सर्वच बर्फी तयार करत असताना वेगवेगळ्या पदार्थांचा किंवा फेवरचा उपयोग केला जातो. व बर्फी रेसिपी तयार केली जाते. मिठाई अनेक प्रकारे केली जाते. मिठाई आज काल बाजारांमध्ये रेडीमेड विकत मिळतात. परंतु आपण आपल्या स्वतःच्या हाताने घरी रेसिपी केली तर ती खाण्याचा आनंदच वेगळा असतो. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी साठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही किती व्यक्तींकरता तयार होणार आहे?
ही रेसिपी आपण 10 व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

पूर्वतयारी करताना लागणारा वेळ :

नारळ बर्फी रेसिपी तयार करण्याकरिता आपल्याला पूर्वतयारी करावी लागते त्याकरता आपल्याला किमान 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे वेळ लागतो.

टोटल टाईम :

कोकोनट बर्फी रेसिपी पूर्ण तयार होण्यासाठी आपल्याला एकूण 30 एवढा वेळ लागतो.

साहित्य :

1) 250 ग्रॅम खवा
2) 250 ग्रॅम साखर
3) खवलेला नारळ दोन वाटी
4) कोको पावडर दोन चमचे
5) अर्धा चमचा स्ट्रॉबेरी इसेन्स
6) एक छोटा चमचा वेलची पूड
7) एक चमचा तूप चांदीचा वर्थ

ओल्या नारळाची बर्फी बनवण्याची पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला कढाई मध्ये तूप घालून खवा परतून घ्यायचा आहे त्यानंतर खव्यामध्ये खोलेले खोबरे कीस घालून घ्यायचे आहे.
  • तोपर्यंत दुसऱ्या भांड्यामध्ये साखरेचा पाक बनवून घ्या.
  • नंतर या साखरेच्या पाकामध्ये खवा आणि नारळाची मिश्रण टाकून घ्या.
  • नंतर साखरेचा पाक खवा व नारळाचे मिश्रण एकजीव करून घ्या.
  • तयार झालेल्या मिश्रणाचे समान तीन भाग करून घ्या.
  • एका भागामध्ये कोको पावडर दुसऱ्या भागामध्ये स्ट्रॉबेरी इसेन्स आणि तिसरा भाग पांढराच ठेवा.
  • नंतर ताटाला तुपाचा हात लावून कोकोचे मिश्रण थापून घ्या त्यावर पांढरा भाग कापून घ्या तसेच सर्वात वर स्ट्रॉबेरी चे मिश्रण थापून घ्या.
  • नंतर त्यावर चांदीचा वर्ख लावावा. व हे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
  • नंतर त्याच्या चाकूच्या सहाय्याने वड्या कापून घ्याव्यात अशा प्रकारे ओल्या नारळापासून तुम्ही बर्फी तयार करू शकता.
  • मॅगी रेसिपी मराठी

पोषक घटक :

ओले नारळ खाणे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. कारण त्यामध्ये बरेच पोषक घटक खनिजे जीवनसत्त्वे असतात. जसे, लोह, मॅग्नेशियम, सेलेनियम, कॉपर तसेच अँटिऑक्सिडंट असे उपयोगी घटक त्यामध्ये असतात.

फायदे :

ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक आढळतात. त्यामुळे नारळाचे किस किंवा खोबरे खाणे अत्यंत पौष्टिक आहेत. ओल्या नारळाचे खोबरे खाल्ल्यामुळे आपला चेहऱ्याची त्वचा टवटवीत होते.

वजन कमी करण्यासाठी देखील नारळ उपयुक्त ठरते, नारळाचे दूध हे भुकेवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते. ओले खोबरे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार क्षमता देखील वाढते.

जर नियमित पोटाचा त्रास असेल किंवा पोट साफ होत नसेल तर ओले खोबरे खाल्ल्यामुळे ही समस्या दूर होते.

तोटे :

ओल्या नारळाचे सेवन कमी प्रमाणातच केले पाहिजे कारण ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु कोणत्याही फळाचे अतिरिक्त सेवन आपल्याला हानी पोहोचू शकते.

नारळाची जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे पोटदुखी निर्माण होऊ शकते. तसेच पोटामध्ये गॅसेस निर्माण होऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला ओल्या खोबऱ्याची बर्फी ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment