धपाटे रेसिपी मराठी Dhapate Recipe in Marathi

धपाटे रेसिपी मराठी Dhapate Recipe in Marathi धपाटे ही रेसिपी आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे.   धपाटे ही रेसिपी विदर्भ व मराठवाड्यातील पारंपारिक एक पदार्थ आहे.  जो सर्वांच्याच घरोघरी केला जातो व आवडीने खाल्ला जातो.  धपाटे असे नाव पडले मागे त्याचं कारण असं आहे की, धपाटे करताना धपधप असा आवाज येतो, त्यामुळे त्याचे नाव धपाटे असे पडले असावे.

धपाटे हे थालीपीठ प्रमाणेच असते.  परंतु थालीपीठाला जरा नाजूक साजूक पद्धती वापरली जाते.  परंतु धपाटे करत असताना, मराठवाडी माणसासारखे साधे सोपे ओबडधोबड असेच धपाटे असतात.  या धपाट्यांना मसाला भाकरी असे सुद्धा म्हटले जाते.  यामध्ये ज्वारीची पीठ वापरले जाते.

Dhapate

धपाटे रेसिपी मराठी Dhapate Recipe in Marathi

रेसिपी प्रकार  :

धपाटे हा रेसिपी प्रकार विदर्भ व मराठवाड्यातील एक प्रसिद्ध असा अन्नपदार्थ आहे.  हा पदार्थ दही, दाण्याची चटणी, ताक, तिळाची चटणी जवसची चटणी याच्यासोबत खाल्ले जाते.  धपाटे ही थालीपीठाप्रमाणेच थापून घ्यावे लागतात परंतु दोघांची प्रक्रिया ही वेगवेगळी असते.  धपाट्यांमध्ये अनेक प्रकारचे मसाले व विविध भाज्यांचे मिश्रण देखील असते.  धपाटे करण्याच्या विविध पद्धती व प्रकार आहेत.  त्यामध्ये मेथी धपाटे, पालक धपाटे, साधी धपाटे, मसाला धपाटे इत्यादी.

तर चला मग जाणून घेऊया धपाटे तयार करण्यासाठी लागणारी सामग्री.

ही रेसिपी आपण किती जणांकरिता करणार आहोत?

ही रेसिपी आपण 3 जणांंकरिता करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

धपाटे करण्याकरता त्याची पूर्वतयारी करावी लागते त्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

धपाटे छान असे परतून घ्यावे लागतात त्यामुळे ते परतून घेण्यासाठी आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम  :

धपाटे रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.

साहित्य  :

1)  तीन वाट्या ज्वारीचे पीठ

2)  एक वाटी कणिक

3)  अर्धी वाटी डाळीचे पीठ किंवा बेसन

4) दोन ते तीन चमचे तिखट

5) पाव चमचा हळद

6)  हिंग

7) चवीनुसार मीठ

8) दोन चमचे जिरे

9) दोन वाट्या आंबट दही

10) थोडे दूध

11) अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

12)  तेल

13) तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कांदा किसून देखील घालू शकता.

धपाटे बनवण्याची पाककृती  :

  • हाका नूडल्स रेसिपी मराठी
  • एका प्लेटमध्ये  ज्वारीचे पीठ कणिकच पीठ आणि बेसन एकत्रित करून घ्या.
  • नंतर त्यामध्ये तिखट मीठ हिंग हळद जिरं घालून घ्या व सर्व व्यवस्थित मिसळून घ्या.
  • नंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि दही घालून ज्याप्रमाणे भाकरीला पीठ भिजवतो तसं सैलसर बनवून घ्या.
  • तसेच आपल्याला हवे असेल तर त्यामध्ये थोडं दूध घाला व दह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो.
  • नंतर पोळपाटावर किंवा परातीत भाकरी थांबतो तसेच हे धपाटे थापून घ्यायचे आहेत.
  • धपाटे थापण्याच्या अगोदर एक तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे.
  • तवा तापल्यानंतर त्यावर छापलेला धपाटा एका बाजूने टाकून द्यायचा आहे नंतर तव्यावर तेल किंवा तूप लावून लाल रंग होईपर्यंत दोन्ही बाजूंनी खमंग असे धपाटे भाजून घ्यायचे आहे.
  • जर धपाट्यामध्ये तुम्ही कांदा घातला असेल तर तो कांदा किसूनच घालावा.  कांद्याने जर त्याला पाणी सुटलं असेल तर आणखीन पीठ घालून ज्याप्रमाणे आपण वरील धपाटे केले, तशाच प्रकारचे करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपले खमंग व गरमागरम चविष्ट असे धपाटे तयार आहेत.  हे धपाटे तुम्ही दही, लोणचं दाण्याची चटणी, ताज लोणी, तिळाची चटणी, दह्याची चटणी याच्यासोबत खाऊ शकता.  असे तयार केलेले धपाटे तुम्ही प्रवासांमध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये देखील खाऊ शकता.

पोषक घटक  :

धपाट्यामध्ये आपण ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ व बेसन, दही, हिंग, हळद, जिरे या सर्वांचा उपयोग केलेला आहे.  त्यामुळे यामध्ये पोषक घटकांची निर्मिती होते तसेच हे पोषक घटक आपल्या आरोग्यासाठी खूपच हिताचे असतात.  धपाट्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, लोह, फॉस्फरस, कॅलरीज, कर्बोदके, खनिजे, कोलेस्ट्रॉल  व विटामिन ए, बी, सी इत्यादी पोषक घटक असतात.

फायदे  :

धपाटे खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये भरपूर अशी ऊर्जा निर्माण होते आणि धकाधकीचा थकवा त्वरित निघून जातो.  धपाट्यामध्ये घातलेले दही देखील आपल्या शरीराला उत्तेजित करते.

धपाटे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात पेशी कार्यरत होऊन संरक्षण यंत्रणा वाढते व संसर्गजन्य आजारांचा देखील आपल्यावर परिणाम होत नाही.

धपाट्यांमध्ये असलेले ज्वारीचे पीठ आपले पचनक्रिया सुधारते व त्यामध्ये पोषक तत्त्वामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहते.

आपण जर धपाट्यांसोबत दही खाल्ले तर ते अन्न सहज पचन होते.  तेलकट, मसालेदार व चमचमीत पदार्थांसोबत दही खाणे खूप फायदेशीर असते.

तोटे  :

धपाटे खाणे आरोग्यासाठी चांगलेच आहे परंतु त्याचे प्रमाण जर वाढवले तर त्यापासून मिळणाऱ्या पौष्टिक घटकांचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढते व प्रत्येक अति प्रमाणात मिळणारी गोष्ट ही शरीरासाठी हानिकारक असते.

म्हणून आपण हे धपाटे खाताना प्रमाणातच खायला पाहिजे.  नाहीतर आपल्याला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला धपाटे रेसिपी विषयी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.  ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा व ती कशी झाली ते आम्हाला नक्की कळवा.

Leave a Comment