फिश करी रेसिपी मराठी Fish Curry Recipe in Marathi

फिश करी रेसिपी मराठी Fish Curry Recipe in Marathi नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना रोजच साधं जेवण खाऊन बऱ्याचदा कंटाळा येतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी काही वेगळं नॉनव्हेज खाण्याची त्यांची इच्छा होते. त्यावेळी मटन, चिकन, बिर्याणी, फिश फ्राय, अंडाकरी, फिश करी अशा रेसिपींची त्यांना आठवण होते. बऱ्याचदा हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये त्यांची खाण्याची इच्छा होते परंतु
हॉटेल किंवा रेस्टॉरंट मधील महागडे रेट पाहून स्वतः घरी आणून करण्याची इच्छा होते म्हणून अशा लोकांकरिता फिश करी ही रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत. अगदी हॉटेल रेस्टॉरंट सारखी चविष्ट व मसालेदार फिश करी विषयी माहिती पाहणार आहोत.
ही रेसिपी चवीला छान लागते नॉनव्हेज खाणाऱ्यांची इच्छा देखील पूर्ण होते.

Fish Curry

फिश करी रेसिपी मराठी Fish Curry Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

फिश करी करण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे मासे वापरू शकता. हॉटेल सारखी फिश करी घरच्या घरी बनवून आपल्या कुटुंबासोबत तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता. फिश करी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही बरेच लोक खाणे पसंत करतात. फिश करी करण्याची वेगवेगळी पद्धत असते. मालवण फिश करी, फिश फ्राय, कोळंबी, सुरमई फिश करी अशा विविध रेसिपीज आहेत.
तर चला मग आज जाणून घेऊया फिश करी रेसिपी विषयी सविस्तर माहिती व त्याकरता लागणारे साहित्य.

फिश करी रेसिपी किती व्यक्तींकरता बनणार आहे ?
फिश करी ही रेसिपी आपण 5 व्यक्तींकरता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

फिशकरीच्या पूर्वतयारी करता आपल्याला लागणारा वेळ हा 15 मिनिटे एवढा आहे.

कुकिंग टाईम :

फिश करी कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

फिश करी रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 35 मिनिटे एवढा वेळ लागतो.

फिश करी साठी लागणारे साहित्य :

ही रेसिपी बनवण्याकरता आपण एक किलो फिशचा वापर केला आहे.

मॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य :

1) 2 चमचा मीठ
2) दोन चमचे लाल तिखट
3) अर्धा चमचा हळद
4) एक चमचा गरम मसाला

फिश करी तयार करण्याकरता साहित्य :

1) एक मोठा कांदा उभा चिरलेला
2) एक टोमॅटो
3) दोन चमचे लसणाची पेस्ट
4) एक चमचा धने
5) तीन सुक्या लाल मिरच्या
6) कोथिंबीर
7) दोन चमचे लाल तिखट
8) एक चमचा फिश करी मसाला
9) एक चमचा जिरे पावडर
10) अर्धा चमचा हळद
11) चवीनुसार मीठ
12) फोडणी करता तेल.

फिशकरी बनवण्याची पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला फिशला कणिक लावून स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. आता मॅरीनेट करण्यासाठी सगळी साहित्य एकत्र मिक्स करून अर्धा तास झाकून ठेवायचे आहे.
  • तोपर्यंत आपल्याला फिश करी तयार करण्यासाठी वाटण तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, लसूणची पेस्ट तयार करून घ्यायची आहे.
  • आता आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये सहा ते सात चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. त्यामध्ये फिश थोडी फ्राय करून घ्या.
  • नंतर त्याच तेलात कांदा लसूण पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे आहे.
  • कांदा लसूण पेस्ट छान परतून झाली की, त्यामध्ये सगळे सुके मसाले घालून पुन्हा आपल्याला परतून घ्यायचा आहे.
  • आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घ्या.
  • नंतर उकळी आली की त्यामध्ये फ्राय केलेली फिश घाला.
  • नंतर मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटं शिजू द्या.
  • नंतर फिश तयार करण्याकरता कोथिंबीरने गार्निश करा.

अशाप्रकारे गरमागरम चटपटीत फिश करी तयार आहे.

पोषक घटक :

फिश आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा तरी फिश खाल्ली पाहिजे. त्यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, सोडियम लोह, मॅग्नेशियम, आयोडीन आणि क्लोरीन तसेच खनिजे व थायमिन, रिबोफ्लेविन यांसारखी जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात.

फायदे :

फिश खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. मास्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

फिश म्हणजेच विटामिन डीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. तसेच फिश मध्ये अमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात. जे आपल्या मेंदूच्या व संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

आपल्याला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर आपल्या सांध्यात जुना त्रास असेल किंवा आपल्याला वेदना होत असतील तर फिश नियमित खाल्ल्यामुळे वेदना व सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

फिश खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते व डोळ्यांची तेजी वाढते.

तुम्हाला जर झोप लागत नसेल किंवा त्रास होत असेल तर फिश खाल्ल्यामुळे तुम्हाला झोपेसाठी नक्कीच मदत होईल.

फिश खाण्याचे तोटे :

आपण जर अति प्रमाणात फिशचे सेवन केले तर ते आपल्यासाठी हानिकारक आहे म्हणून आपण वाजवी प्रमाणातच माशाचे सेवन केले पाहिजे.

फिशमध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल असते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती वाटते.

एखाद्याला जुना आजार असेल आणि त्याने अतिरिक्त फिशचे सेवन केले तर ते आजार पुन्हा नव्याने उमवू शकतात.

तर मित्रांनो, तुम्हाला फिश करी ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment