वस्तू आणि सेवा कर विषयी संपूर्ण माहिती Goods And Service Tax (GST) Information In Marathi

Goods And Service Tax (GST) Information In Marathi जीएसटी GST म्हणजेच गुड अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू आणि सेवा कर होय. संपूर्ण देशामध्ये एक समान अप्रत्यक्ष कर पद्धती लागू करण्यासाठी म्हणजेच वस्तू व सेवा कर प्रणालींचा अवलंब करण्यासाठी संघराज्य व राज्य शासनाने निर्णय एकमताने घेतला. वस्तू व सेवा करांच्या अंमलबजावणी करतात. राज्यघटनेमध्ये सुद्धा बदल करण्याची गरज भासली, त्यानुसार बदल करण्याची विधेयक लोकसभेत मांडण्यात आले व लोकसभेने राज्यघटना 122 वी सुधारणा विधेयक 2014 दिनांक 6 मे 2015 रोजी संबंध केले. लोकसभेने मंजूर केलेली विधेयक संमती करता राज्यसभेकडे पाठवण्यात आले.

Goods And Service Tax (GST) Information In Marathi

वस्तू आणि सेवा कर विषयी संपूर्ण माहिती Goods And Service Tax (GST) Information In Marathi

राज्यसभेने काही बदलाफेक वस्तू व सेवा कर विधेयक 2014 3 ऑगस्ट 2016 रोजी मंजूर केले व त्या बदलांसह विधायक लोकसभेकडे पाठवले तसेच त्यामधील बदलाचा विधेयक लोकसभेकडे पाठवल्यानंतर राज्यसभेने सुचवलेले बदल लोकसभेने दिनांक 8 ऑगस्ट 2016 रोजी स्वीकृत करून संविधान सुधारणा विधेयक संबंध करण्यात आले व वस्तु सेवा कर म्हणजेच जीएसटी ही भारतामध्ये 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आले.

देशभरात एक समान कर प्रणाली असावी हा या मागचा उद्देश होता. त्यानुसार संघराज्य आणि राज्य सरकार द्वारे लागू असलेले पूर्वीचे अनेक अप्रत्यक्ष कर रद्द करण्यात आले आणि देशांमध्ये जीएसटी लागू करण्यात आला. वस्तू व सेवा कर लागू करण्यासाठी राज्यघटनेमध्ये 122 वी घटनादुरुस्ती करून नवीन कायदे सुद्धा करण्यात आले.

जीएसटी GST म्हणजे काय?

जीएसटी हा एक गंतव्य आधारित बहुस्तरीय मूल्यवर्धनाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वसमावेशक आकारला जाणारा कर आहे. देशामध्ये अनेक अप्रत्यक्ष करांची जागा घेतल्यानंतर भारत सरकारचा वन नेशन वन टॅक्स हा अजेंडा साध्य करण्यामध्ये यश आले. भारताच्या देशांतर्गत सीमित वापरासाठी विकल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांवर हा कर आकारला जातो. जगभरातील बहुसंख्य राष्ट्रांनी सुद्धा संबंधित कष्टमयझेशन सह लागू केलेला हा कर भारताची अप्रत्यक्ष कर रचना सुलभ करण्यात यशस्वी ठरले.

जीएसटी अंतर्गत उत्पादित वस्तू आणि सेवांच्या अंतिम बाजारभावावर आकारला जाणारा कर आहे. ज्यामुळे कमाल किरकोळ किंमत प्रतिबिंबित होते. ग्राहकांना त्यांच्या अंतिम किमतीमध्ये समावेश म्हणून वस्तू व सेवांच्या खरेदीवर हा कर भरावा लागतो, त्यामुळे विक्रेत्याने गोळा केलेले व नंतर सरकारला देणे आवश्यक असते. अशा प्रकारे अप्रत्यक्ष घटना सुचित करते.

विविध वस्तू आणि सेवांवरील जीएसटी दर देशांमध्ये एक समान लागू होतात. वस्तू आणि सेवा कर भरण्यासाठी वेगवेगळ्या स्लॅब दरानुसार वर्गीकृत केलेले आहेत तसेच आरामाच्या वस्तूंचे उच्च लॅब अंतर्गत वर्गीकरण केले जात असताना, गरजा कमी आणि शून्य स्लॅपग्राममध्ये समाविष्ट केले आहेत. भारतातील रहिवाशांमध्ये संपत्तीचे समान वितरण सुचित करणे हे या वर्गीकरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

जीएसटी अंमलबजावणीनंतर जमा केलेल्या करांची यादी :

जीएसटी या कराचे मुख्य उद्दिष्ट हे अप्रत्यक्ष कर रचना म्हणून चांगली सेवा कर, लागून सर्व समावेशक प्रस्तावनेसह सरकारने आकारले जाणारे सर्व अप्रत्यक्ष कर, एकाच छत्रछायेखाली ठेवले आहेत. अशा प्रकारे वस्तूंच्या आयातीवर आकारले जाणारे सीमा शुल्क वगळता व कर सेवा करणे अनेक अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे तसेच या प्रस्तावाने त्यांच्या मागील अप्रत्यक्ष करण संरचनेच्या अंमलबजावणी आणि संकलन प्रक्रियेतील अकार्यक्षमतेच्या मर्यादांवर मात करण्यासाठी सुद्धा मदत झाली आहे.

वस्तू आणि सेवा कर द्वारे समाविष्ट केलेल्या अप्रत्यक्ष करांची यादी पुढील प्रमाणे आहे.

केंद्र सरकारने लागु केलेले अप्रत्यक्ष कर, सेवा कर, केंद्रीय विक्रीकर उत्पादन शुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क, काउंटर वेलिंग ड्युटी विशेष अतिरिक्त सीमा शुल्क, राज्य सरकारने लादलेले अप्रत्यक्ष कर, प्रवेश कर, लक्झरी टॅक्स, करमणूक कर, जाहिरातींवर कर, खरेदी कर, लॉटरी जुगार व बॅटिंग यावर कर.

जीएसटी नियमांचे प्रकार :

जीएसटीमध्ये कोणत्या प्रकारच्या व्यवहारांचा समावेश आहे तसेच त्यानुसार चार विभागांमध्ये याची विभागणी केली जाऊ शकते. व्यवसायाने त्याचे जीएसटी दायित्व निश्चित करण्यापूर्वी जीएसटी प्रकार जाणून घ्या.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर : आंतरराज्य व्यवहारांवर केंद्र सरकार द्वारे हे कर लादले जातात.

राज्य वस्तू आणि सेवा कर : हे कर राज्य सरकार वस्तू आणि सेवांच्या परिपूर्ण पुरवठ्यावर आकारले जातात.

केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर : हे अंदमान आणि निकोबार बेटांसारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये वस्तू व सेवांवर देण्यात केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे आकारले जातात.

जीएसटी चे फायदे/ उद्दिष्टे :

जीएसटीचे फायदे पुढील प्रमाणे आहे.

संपूर्ण भारतात कर दर एक समान करणे : जीएसटीचा सर्वप्रथम फायदा म्हणजे संपूर्ण देशात अप्रत्यक्ष कराच्या दरांमध्ये समानता असणे हे केवळ त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. जीएसटीचे संपूर्ण देशामध्ये असलेले दर हे समान राहतील. यापूर्वी राज्यांमध्ये विक्री कर किंवा मूल्यवर्धित कराचे वेगवेगळे दर आपण पाहिले आहेत. वन नेशन वन मार्केट हे याचे ब्रीद वाक्य आहे जीएसटीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे एकल कर रचना होय.

करांचा कॅस्केडींग प्रभाव काढून : टाकण्यासाठी : करांचा कॅस्केडींग प्रवाह म्हणजेच घरावर कर आकारणी होय जीएसटी केवळ निव्वळ मूल्यवर्धित भागांसाठी कर आकारला जातो आणि मूल्याच्या पूर्ण भागासाठी नाही कारण करता त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळते. करांचा हा प्रभाव काढून टाकल्यामुळे वस्तू व सेवांच्या किमती कमी होईल ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांसाठी जीएसटी शेवटी भरला जाईल.

एक राष्ट्र एक कर : जीएसटीने पूर्वी आकारण्यात आलेल्या अनेक अप्रत्यक्षकरांची जागा आता घेतली आहे. वन नेशन वन टॅक्स या मूळ उद्देशाने हे धोरण सुरू करण्यात आले आहे आणि प्रत्येक राज्य याचे अनुसरून करेल. सेवा उत्पादनासाठी निश्चित कर प्रदान करण्यासाठी हे सादर केले आहे. कर आणि अनुपालनाचे व्यवस्थापन करणे सुद्धा सोपे जाते.

भारतातील अप्रत्यक्ष कर जमा करणे : कर व सेवांवर केंद्रीयकृत व एकत्रित कर प्रणाली तयार करण्यासाठी जीएसटी भारतामध्ये लागू करण्यात आला आहे, त्याच्या कायद्यांतर प्रशासन योग्य करण्यासाठी बहुसंख्य कर एकामध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आले आहे.

कर चोरीला आला बसतो : भारतात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक कर चुकवेगिरीचे प्रमाण खूप जास्त वाढले होते. आता मात्र, जीएसटी (GST) लागू झाला आहे, तो पासून कर चुकवेगिरीचे प्रमाण खूप कमी झाले आहे तसेच केंद्रीयकृत कर ठेवणे प्रणाली तयार करण्यासाठी जीएसटी लागू करण्यात आला आहे. आता मात्र जीएसटी लागू झाल्यामुळे भारत सरकारच्या खजिन्यांमध्ये करायची रक्कम योग्यरीत्या जमा होते.

FAQ

जीएसटी भारतात केव्हा लागू झाला?

1 जुलै 2017 पासून

जीएसटी (GST) लॉंग फॉर्म काय आहे?

Good and Service Tax.

IGST कोण गोळा करते?

संघराज्य सरकार.

आयकर हा कोणता कर आहे?

प्रत्यक्ष कर.

भारतात किती प्रकारचे कर आहेत?

भारतात दोन प्रकारचे कर आहेत प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर.

Leave a Comment