हार्मोनियम वाद्याची संपूर्ण माहिती Harmonium Instrument Information In Marathi

Harmonium Instrument Information In Marathi संगीतामध्ये सूर लावण्यासाठी तबला, पेटी, बासरी, घुंगरू इ. चा उपयोग करत असतो. अशा प्रकारचे अनेक वाद्य आहेत. जी बसून वाजवू शकतात. हार्मोनियममध्ये महत्त्वाचे दोन घटक असतात. ते म्हणजे स्वराची पत्ती व हवेचा भाता. आवाज निघतो तो पत्तीतून पत्तीत भरल्या जाणाऱ्या हवेला नियंत्रित करण्याचे काम भाता करतो. प्रत्येक स्वरासाठी एक लांबट चौकट दिलेली असते आणि चौकटीच्या खाचेत पट्टी खाली वर होऊन त्यातून स्वर निघत असतो.

Harmonium Instrument Information In Marathi हार्मोनियम वाद्याची संपूर्ण माहिती Harmonium Instrument Information In Marathi

हार्मोनियम वाद्याची संपूर्ण माहिती Harmonium Instrument Information In Marathi

हार्मोनियम याला संवादिनी असे भारतीय नाव आहे. हार्मोनियम हे मूळ पाश्चात्त्य वाद्यांचे एक प्रकार आहे. या वाद्याचा शोध 1770 च्या जवळपास ऑर्गन या रीडवाल्या वाद्यांमध्ये नवीन प्रयोग करून झाली. यामध्ये मोडतात. 3 स्वरांचा मेळ जो पाश्चात्त्य संगीतामध्ये वापरला जातो. तो साध्य करण्याचे एक उद्दिष्ट आहे. 1840 मध्ये अलेक्झांडर दिबेन या फ्रान्स व्यक्तीने स्वर पट्ट्या असणारे व हलक्या वाचनाचे वाद्य शोधून काढले ज्याला आज आपण हार्मोनियम असे म्हणतो.

हार्मोनियमचा इतिहास तसेच त्याची जडणघडण कशी झाली आणि भारतामध्ये हार्मोनियमचे स्थान कोठे आहे. याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुम्हालाही जर हार्मोनियम शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा हार्मोनियम शिकू शकता. आजकाल ऑनलाईन क्लासेस सुद्धा उपलब्ध आहेत. तेथे तुम्ही हार्मोनियम शिकू शकता.

वाद्यहार्मोनियम
शोध1770
उपयोगसंगीत, किर्तन, भजन.

हार्मोनियमचा इतिहास :

हार्मोनियम म्हणजेच बाजाची पेटी आहे. याचा शोध पॅरिस या देशांमध्ये अलेक्झांडर यांनी लावला. 1770 मध्ये हार्मोनियमचा शोध लागला. भारतात हे वाद्य युरोपीय लोकांनी अठराशे नंतर आणखी तसेच हाताने किंवा पायाने भात्याद्वारे हवा भरून पितळी कंपन तयार करणाऱ्या शिट्ट्यांच्या मार्फत सुरेल ध्वनी निर्माण होतो. यामध्ये डावीकडील बाजूकडून सुरुवात केल्यास पहिला दुसरा व नंतर तिसरा अशा काड्या पट्ट्यांची तीन समूह असतात.

भारतीय संगीतामध्ये हार्मोनियमच्या गायकाला साथ देण्यासाठी किंवा एकल वादनासाठी याचा उपयोग केला जातो. कीर्तने, संगीत इत्यादी ठिकाणी हार्मोनियम वापरला जातो.

हार्मोनियम म्हणजे काय?

हार्मोनियम हा एक स्वरांच्या मिश्रणाने साधला जाणारा संवाद आहे. याला सोप्या शब्दांमध्ये स्वर मिश्रण असे म्हटले जाते. एकमेकांना अनुकूल असणाऱ्या स्वरांच्या संवादामुळे भारतीय संगीतकारांनी या वाद्याचे नाव संवादिनी असे सुद्धा ठेवले आहे. हार्मोनियम विदेशातून आलेले हे पहिलेच वाद्य नाही तर यापूर्वी व्हायोलिन हे वाद्य सुद्धा विदेशातून भारतात आले होते. हार्मोनियम या वाद्यांमध्ये मूलभूत असे बदल झालेले आहेत.

हार्मोनियम बंगालच्या कारागिरांनी बनवलेल्या हात पेटीमुळे तयार झाले आहे. 1875 मध्ये कलकत्त्याच्या द्वारकानाथ घोष यांनी सर्वप्रथम भारतीय संगीताला. उपयुक्त हार्मोनियमची निर्मिती केली होती. द्वारकादास या त्यांच्या फॉर्मने आधुनिक हातपेटीची सुद्धा भारतामध्ये निर्मिती केली होती आणि विक्री केली होती. त्यानंतर टी. एस. रामचंद्र अँड कंपनीने महाराष्ट्रामध्ये यांची निर्मिती सुरू केली व त्या पाठोपाठ गुजरातमध्ये सुद्धा अहमदाबाद येथे गणपतराव बर्वे यांनी हार्मोनियम तयार केले होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपामधून ऑर्गनची आयात जेव्हा बंद झाली तेव्हा भावनगरमध्ये आणि पालीटाणामध्ये पेट्यांसहित ध्वनीपट्ट्यांची निर्मिती सुरू झाली आणि त्यानंतर दर्जेदार हार्मोनियम महाराष्ट्र, गुजरात, बंगाल तसेच पंजाब या राज्यांमध्ये बनवले जाऊ लागले. झिलू सुतार आणि रामचंद्र बोदलीकर यांनी बेळगावमध्ये सर्वोत्कृष्ट दर्जाचे हार्मोनियम तयार केले. हुदलीकर यांचा 22 श्रुतीयुक्त हार्मोनियम बनविण्यात खूप मोठे योगदान आहे.

हार्मोनियम या वाद्याची जडणघडण :

हार्मोनियम हे एक पाश्चात्य सुरसंगीत वाद्य आहे तसेच बऱ्याचदा ते हिंदुस्तानी संगीतासाठी सुद्धा वापरण्यात आलेले आहे; परंतु आधी भारतीय संगीतामध्ये याचा उपयोग होईल, हे आपण विचार सुद्धा केला नसेल परंतु उस्ताद अब्दुल करीम खा यांचे शिष्य बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी यांनी गंधार ठेवून हार्मोनियम बनवून ते हिंदुस्थानी गायकीला योग्य बनवले व पुढे त्याचा उपयोग सुर संगीतामध्ये केला जाऊ लागला. आचरकर यांनी श्रुती हार्मोनियम बनवले आणि त्यांचेच चिरंजीव बाग आचरेकर. यांनी 22 श्रुतींची मेलोडीयम बनवले आहे.

बेळगावचे हरी गोरे यांनी पितळेचा रस तयार करून रेड्स बनविण्याचा एक कारखाना सुरू केलेला आहे. त्यांनी स्वदेशी चळवळीला प्राधान्य देऊन संपूर्ण भारतीय बनावटीचे हार्मोनियम तयार केले आहेत. त्यांचे हार्मोनियम कलकत्ता दिले आणि इतर संगीत पेठांमध्ये सुद्धा वापरले जातात. त्यामुळे त्यांच्या हार्मोनियमला खूप मोठी मागणी होती. हे वाद्य संगीत स्वर पेट्यांसहित तयार केलेले आहेत. म्हैसूरच्या महाराजांनी त्यांचा या कार्याबद्दल गौरव सुद्धा केला होता.

भारतीय संगीतामध्ये हार्मोनियमचे स्थान :

हार्मोनियम हे एक भारतीय संगीताचा अविभाज्य घटक आहे तसेच हे माध्यम विदेशातून भारतामध्ये आलेले आहे. शास्त्रीय संगीताप्रमाणेच अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा हे वाद्य वापरण्यात आलेले आहे. या वाद्याचा शोध पॅरिस शहरांमध्ये अलेक्झांडर यांनी 1770 मध्ये लावला होता. भारतात हे वाद्य 800 नंतर युरोपीय लोकांनी आणले होते.

हिंदुस्तानी संगीतासाठी सुद्धा या वाद्याचा प्रथमच उपयोग मराठी संगीत नाटकाच्या माध्यमातून सुरू झाला होता. तो म्हणजे 1882 मध्ये संगीत शाकुंतल या पहिल्या संगीत नाटकाने ऑर्गनचा उपयोग केला होता.

त्यानंतर संगीत नाटक त्यातल्या संगीतासाठी सुद्धा हार्मोनियमचा वापर करण्यात आला होता. मराठी संगीत, नाटक यांनी शास्त्रीय संगीतातल्या बंदीशाहींच्या पदांसाठीचा उपयोग केला आहे आणि त्यातूनच हार्मोनियमचे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. नाट्य संगीताच्या माध्यमातूनच एका स्वतंत्र स्वर वाद्याची देणगी भारतीय संगीताला मिळालेली आहे.

यालाच भारतीय नाव संवादिनी असे आहे. संवादिनी हे संगीत साथीचे वाद्य म्हणून 1900 शतकाच्या आरंभापासूनच सर्व मान्य झालेले वाद्य आहे. सर्व घ्याल गायकांनी या वाद्याला अगदी स्वखुशीने अंगीकारले होते. ज्यांचे गायन श्रुतीयुक्त असे त्यांनीही हार्मोनियमची साथ घेतली. गायकांचे कणसूर म्हणजेच सामावून घेऊन त्यांना जोरकस पणा देण्याचे काम हार्मोनियमने केले आहे. बेळगावचे हार्मोनियम वादक रामभाऊ विजापूर यांनी 1945 मध्ये हैदराबाद आकाशवाणीवर स्वतंत्र वादनाचा सर्वात पहिला कार्यक्रम केला.

निजाम सरकारचे कायदे कानून इतर परगण्यांपेक्षा वेगळे असल्याने हे शक्य झाले. परंतु इतर कोठेही आकाशवाणीवर हार्मोनियमला मान्यता नव्हतीस पुण्याचे हार्मोनियम वादक बेळगावचे विठ्ठलराव कोरगावकर यांच्या सारख्यांनी स्वतंत्र वादनाच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे जोर लावला आणि काही वर्षानंतर म्हणजेच वीस वर्षानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. 1972 मध्ये हार्मोनियमला आकाशवाणीची मान्यता सुद्धा मिळाली. त्यानंतर बऱ्याच वादकांची स्वतंत्र वादनाचे कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध केंद्रावरून प्रसारित करण्यात आले.

FAQ

हार्मोनियम ची किती प्रकार आहेत?

हार्मोनियमचे दोन प्रकार आहेत.

हार्मोनियमचा शोध कोणी लावला?

अलेक्झांडर डिबेन

हार्मोनियमचे भारतीय नाव काय आहे?

संवादिनी.

हार्मोनियम चा उपयोग कोठे होतो?

हार्मोनियमचा उपयोग संगीत, भजन, कीर्तन यामध्ये केला जातो.

हार्मोनियम हे वाद्य भारतात कधी आले?

हार्मोनियम हे भारतामध्ये 19 व्या शतकात फ्रेंच मिशनर्‍यांनी आणले.

Leave a Comment