काळा मसाला मराठी Kala Masala Recipe In Marathi काळा मसाला हा वेग-वेगळे साहित्य वापरून तयार केला जातो. याचा उपयोग मसालेदार रेसिपी बनवण्यासाठी केला जातो. यामुळे स्वादिष्ट आणि चवदार भाजी बनते. काळा मसाला खान्देशमध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो. आमटी किंवा सांबरमध्ये सुध्दा काळा मसाला वापरला जातो. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल काळा मसाल्याचे स्वादिष्ट पदार्थ आणि भाजी खायाला मिळते.
काही लोकांना काळा मसाला वापरून तयार केलेली रेसिपी खूप आवडते, परंतु काही भागात काळा मसाला मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने काळा मसाला कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण काळा मसला रेसिपी पाहणार आहोत.
काळा मसाला मराठी Kala Masala Recipe In Marathi
काळा मसाल्याचे प्रकार :
काळा मसाला टाकून रेसिपी बनवली जाते. यामुळे रेसिपी एकदम स्वादिष्ट तयार होते. काळा मसाल्याचे अनेक प्रकार आहेत, जसे काळा मसाला, गरम मसाला, महाराजा मसाला, खान्देशी मसाला, गोडा मसाला हे सर्व मसाले एकदम चवदार आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
काळा मसाला ही रेसिपी आपण 10 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
काळा मसालाच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :
काळा मसाला तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर काळा मसाला तयार करू शकतो, यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
काळा मसाला कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
काळा मसाला बनवण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर कुकिंग करावा लागते. यासाठी आपल्याला टोटल टाईम 40 मिनिट वेळ लागतो.
काळा मसाल्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 2 वाटी धणे.
2) 3 ते 4 काड्या कलमी/दालचिनी.
3) 1 वाटी तीळ.
4) 3 चमचे दगडी फुल.
5) 2 चमचे बदाम फुल.
6) 2 चमचे लवंग.
7) 2 ते 3 चमचे काळे मिरे.
8) 1 वाटी सुके खोबरे.
9) 6 ते 7 तमाल पत्रे.
10) थोडा हिंग.
पाककृती :
- कोशिंबीर मराठी
- सर्वात प्रथम आपण मसाल्यासाठी आणलेले जिरे, मिरे, तीळ, लवंग सर्व साहित्य व्यवस्थित निसून घ्या.
- नंतर खोबऱ्याचे बारीक तुकडे तयार करा, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
- आता गॅस चालू करून, गॅस वरती एक खोल तळाचा पॅन किंवा कढई ठेऊन गरम करा.
- गॅस मध्यम आसेवर ठेवा, पॅन गरम झाला की, यामध्ये आपण कोरडे मसाले भाजून घेऊया.
- प्रथम यामध्ये तीळ भाजून घ्यावे, तीळ मध्यम भाजून घ्या. नंतर यामध्ये सुके खोबरे आणि जिरे भाजून घ्या.
- नंतर एका प्लेटमध्ये काढा, यातील कोणतेच साहित्य जळायेला नको, नाहीत आपला मसाला चांगला होणार नाही.
- नंतर पॅनमध्ये थोडे तेल टाकून गरम करा, आणि धने भाजून घ्या, धने भाजून झाले की बाहेर काढा.
- नंतर पॅनमध्ये थोडे तेल टाकून, सर्व खडा मसाला जसे बदाम फुल, दालचिनी, मिरे, लवण, कलमी हे सर्व व्यवस्थित भाजून घ्या.
- भाजून झाले की थोडा वेळ सर्व साहित्य थंड होऊ द्या. नंतर मसाला तयार करण्यासाठी मिक्सर घ्या.
- मिक्सरच्या भांड्यात प्रथम सर्व खडे मसाले टाकून, त्याची बारीक पावडर तयार करा, आणि एका प्लेटमध्ये काढा.
- नंतर खोबरे, तीळ, जिरे हे सुध्दा मिक्सर मधून बारीक करून घ्या, आणि बाहेर काढा.
- आता सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकून, एकदा परत फिरवून घ्या. म्हणजे सर्व मसाला चांगला मिक्स होणार.
- मसाल्याचा एक छान सुंगध येणार, आता आपला काळा मसाला रेसिपीमध्ये टाकण्यासाठी तयार आहे.
- ज्यामुळे आपल्याला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार रेसिपी खायाला मिळेल.
काळा मसाल्यामध्ये असणारे घटक :
काळा मसाला तयार करण्यासाठी वेग-वेगळे साहित्य वापरावे लागते. यामध्ये विविध घटक आढळून येतात. जसे कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, व्हिटॅमिन, लोह, फॅट हे सर्व घटक आपल्याला शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
फायदे :
काळा मसाला आपण रेसिपीमध्ये टाकला की, आपल्याला चवदार आणि स्वादिष्ट रेसिपी खायाला मिळते.
यामध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.
काळा मसाल्यातिल प्रथिने, व्हिटॅमिन आपले शरीर निरोगी ठेवते.
तोटे :
काळा मसाला हा एक गरम पदार्थ आहे. जो आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर आपल्या पोटदुखी होऊ शकते.
यामुळे आपले पोट गरम जळू शकते, आणि आपण आजारी पडू शकतो.
म्हणून आपण काळा मसाला योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला काळा मसाला रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.