कोशिंबीर मराठी Koshimbir Recipe In Marathi

By Wiki Mitra

Published On:

Follow Us
Koshimbir Recipe

कोशिंबीर मराठी Koshimbir Recipe In Marathi कोशिंबीर ही काकडी पासून तयार केलेला एक पदार्थ आहे, जो खायाला एकदम स्वादिष्ट आणि चवदार आहे. यांचा उपयोग जेवण करताना साईड डिश म्हणून केला जातो. हा शुध्द शाकाहारी आणि लोकप्रिय पदार्थ आहे. कोशिंबीर ही आपण वेग-वेगळ्या प्रकारे बनवू शकतो, जसे गाजर, टोमॅटो, मुका हा एक पौष्टिक पदार्थ आहे. याला सलाद म्हणून सुध्दा ओळखले जाते. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलो की, आपल्याला जेवणासोबत स्वादिष्ट कोशिंबीर खायाला मिळते.

कोशिंबीर रेसिपीला कुकिंग करण्याचे काम नाही, सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केले की, ही रेसिपी बनते. काही लोकांना कोशिंबीर खूप आवडते, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट कोशिंबीर मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने स्वादिष्ट कोशिंबीर कशी बनवतात याची रेसिपी. आता आपण कोशिंबीर रेसिपी पाहणार आहोत.

Koshimbir Recipe

कोशिंबीर मराठी Koshimbir Recipe In Marathi

कोशिंबीरचे प्रकार :

कोशिंबीर खायाला एकदम स्वादिष्ट आणि चवदार आहे, कोशिंबीर वेग-वेगळ्या प्रकारे बनवली जाते. जसे काकडी कोशिंबीर, गाजर कोशिंबीर, टोमॅटो कोशिंबीर, मुळा कोशिंबीर, हरभरा डाळ कोशिंबीर हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
कोशिंबीर ही रेसिपी आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

कोशिंबीरच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

कोशिंबीर बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

कोशिंबीर ही रेसिपी कुकिंग करण्याचे काम नाही, यामध्ये सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करावे लागते. यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

कोशिंबीर बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते आणि नंतर व्यवस्थित मिश्रण करावी लागते. यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

कोशिंबीरसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 4 ते 5 मध्यम ताज्या काकड्या.
2) 2 कांदे.
3) अर्धी वाटी शेंगदाणे.
4) 1 वाटी दही.
5) 2 चमचे जीरा पावडर.
6) थोडी कोथिंबीर.
7) मीठ.
8) साखर.

पाककृती :

  • कोबीच्या भनोळ्यांची रेसिपी
  • सर्वात प्रथम काकडी आणि कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्या आणि काकडी व कोथिंबीर बारीक चिरून घ्या,
  • नंतर शेंगदाणे भाजून मिक्सर मधून बारीक करून घ्या आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
  • नंतर कांदा बारीक चिरून घ्या आणि दही व्यवस्थित मिश्रण करून एकजीव तयार करा. नंतर मिक्स करण्यासाठी एक खोल भांडे घ्या.
  • या भांड्यात बारीक काकडी, कांदा, कोथिंबीर, जीरा पावडर, बारीक शेंगदाणे, टाकून चांगले मिक्स करा.
  • नंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर टाका. याचबरोबर दही टाकून पूर्ण मिश्रण तयार करा.
  • सर्व साहित्य एकजीव झाले पाहिजे, आता आपली स्वादिष्ट आणि चवदार कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे.
  • आपण थोडा वेळ कोशिंबीर फ्रिजमध्ये ठेऊन थंड झाली की, जेवणाबरोबर खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

कोशिंबीरमध्ये असणारे घटक :

कोशिंबीर बनवण्यासाठी भाजीपाला लागतो, त्यामुळे यामध्ये विविध घटक असतात. जसे कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, लोह, फॅट, चरबी, शुगर हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

कोशिंबीर खाल्ल्याने आपल्याला व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॉस्फरस यासारखे पौष्टिक घटक मिळतात. यामुळे आपले डोळेआणि त्वचा चांगली राहते.

यामध्ये असणारे प्रथिने, चरबी असे घटक आपल्याला निरोगी ठेवतात व आपल्या शरीरावर मासपेशी वाढवतात.

कोशिंबीर हा पौष्टिक आहार आहे, यातील सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

कोशिंबीर आपण जास्त प्रमाणात सेवन केली तर, आपल्याला पोटदुखी आणि मळ मळ होऊ शकते.

यामध्ये सर्व भाजीपाला हा कच्चा वापरला जातो, यामुळे आपण आजारी पडू शकतो.

म्हणून कोशिंबीर आपण योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला कोशिंबीर रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment