कांदा लसूण मसाला मराठी Kanda Lasun Masala Recipe In Marathi

कांदा लसूण मसाला मराठी Kanda Lasun Masala Recipe In Marathi  कांदा लसूण मसाला हा कांदा, लसूण व इतर साहित्य एकत्र करून बनवला जातो. हा एक गरम मसाल्याचा प्रकार आहे. यांचा उपयोग विविध प्रकारच्या भाज्या आणि खिचडीमध्ये चवदार बनवण्यासाठी केला जातो. हा मसाला महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. हा शुध्द शाकाहारी मसाला आहे, जो सर्वाना आवडतो. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल कांदा लसूण मसाल्याची रेसिपी किती स्वादिष्ट आणि चवदार मिळते.

काही भागात कांदा लसूण मसाला मिळत नाही, काही लोकांना कांदा लसूण मसाला खूप आवडतो, पण त्याचा परिसरात चवदार मसाला मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या पद्धतीने कांदा लसूण मसाला कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण कांदा लसूण मसाला रेसिपी पाहणार आहेस.

Kanda Lasun Masala

कांदा लसूण मसाला मराठी Kanda Lasun Masala Recipe In Marathi

कांदा लसूण मसाल्याचे प्रकार :

कांदा लसूण मसाला हा एक पौष्टिक पदार्थ आहे. ज्यामुळे सर्व रेसिप्या चवदार बनतात. यांचे विविध प्रकार पडतात, जसे कांदा लसूण मसाला, महाराजा मसाला, सुहाना मसाला, ग्रेव्ही मसाला, खान्देशी मसाला, गरम मसाला हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आणि चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
कांदा लसूण मसाला ही रेसिपी आपण 8 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

कांदा लसूण मसाल्याच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर मसाला बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

कांदा लसूण मसाला कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर कुकिंग करावे लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.

कांदा लसूण मसाल्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 वाटी मिरची पावडर.
2) 1 वाटी तीळ.
3) 4 ते 5 मोठे कांदे.
4) अर्धी वाटी लसूण पाकळ्या.
5) 1 वाटी खोबरे.
6) 4 चमचे जिरे.
7) 4 बदाम फुल.
8) 3 ते 4 दालचिनी तुकडे.
9) 2 चमचे काळे मिरे.
10) 3 ते 4 तमालपत्र.
11) 1 चिमूट हिंग.
12) 1 चमच हळद.
13) अर्धी वाटी कोथिंबीर.
14) थोडे तेल.
15) 3 ते 4 मसाला वेलदोडे.
16) मीठ.

पाककृती :

  • सर्वात प्रथम मसाला तयार करण्यापूर्वी लसूण, कोथिंबीर, आणि कांदा उभा चिरून अगोदरच्या दिवशी उन्हात वाळू घाला, नंतर त्याचा उपयोग करा.
  • पहिले सर्व साहित्य जिरे, तीळ, आणि इतर सर्व साहित्य चांगले नीसून घ्या.
  • नंतर गॅस चालू करून, गॅस वरती पॅन ठेऊन त्यात थोडे तेल टाकून गरम करा.
  • पहिले यामध्ये लसूणच्या पाकळ्या भाजून घ्या, नंतर यामध्ये खोबरे भाजून घ्या, खोबरे थोडे लालसर झाले की काढून घ्या.
  • नंतर थोडे तेल टाकून जिरे भाजून घ्या, जिरे झाले की, तीळ भाजा तीळ चांगले होऊ द्या. नंतर खाकी काढून थंड होऊ द्या.
  • नंतर थोडे तेल टाकून पुन्हा गरम करा, आणि मसाल्याचे सर्व साहित्य जसे तमालपत्र, दालचिनी, तमालपत्र, मिरे, वेलदोडे, बदामफुल वेग-वेगळे करून व्यवस्थित भाजून घ्या.
  • पूर्ण भाजून झाले की, सर्व साहित्य ऐका प्लेटमध्ये काढून घ्या, आणि यावर थोडी हळद आणि थोडा हिंग टाका.
  • नंतर मिक्सर मध्ये एक-एक करून खोबरे, तीळ बारीक करून घ्या.
  • नंतर वेलदोडे, दालचिनी, तमालपत्र, मिरे, बदाम फुल सर्व साहित्य एकत्र करून मिक्सर मधून बारीक पावडर तयार करा.
  • नंतर उन्हात वाळलेले कांदा, लसूण आणि कोथींबीर घ्या, मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या.
  • सर्व बारीक केलेले साहित्य, मसाले आणि तीळ, खोबरे, व बारीक लसूण,कांदा सर्व एका प्लेटमध्ये मिक्स करा.
  • नंतर त्यावर मिरची पावडर, चवीनुसार थोडे मीठ, आणि थोडे गरम तेल टाका आणि पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरवून घ्या.
  • म्हणजे सर्व मसाला पूर्ण एकजीव होणार, नंतर हा मसाला एका हवाबंद भरणीत काढून घ्या.

आता आपला स्वादिष्ट आणि चवदार कांदा लसूण मसाला खाण्यासाठी तयार आहे, आपण भाजीत टाकून मसालेदार भाजी बनवू शकतो.

कांदा लसूण मसाल्यामध्ये असणारे घटक :

कांदा लसूण मसाला हा विविध प्रकारचे साहित्य एकत्र करून बनवला जातो. यामुळे यामध्ये विविध घटक असतात, जसे कॅल्शियम, प्रथिने, कर्बोदके, व्हिटॅमिन, लोह, फॉस्फरस, मॅग्निशियॅम हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

कांदा लसूण मसाला सेवन केल्याने आपल्याला कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात, ज्यामुळे आपली हाड मजबूत राहतात.

यामध्ये असणारे व्हिटॅमिन, लोह, कर्बोदके, हे आपले शरीर निरोगी ठेवतात.

कांदा लसूण मसाल्यातील सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

कांदा लसूण मसाला हा एक गरम मसाला आहे, हा आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे पौष्टिक घटक, आपल्या शरीरात झाले तर आपण आजारी पडू शकतो.

म्हणून कांदा लसूण मसाला आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला कांदा लसूण मसाला रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment