खरवस रेसिपी मराठी Kharvas Recipe in Marathi

खरवस रेसिपी मराठी Kharvas Recipe in Marathi  खरवस हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. जे कच्च्या म्हशीच्या दुधापासून बनवले जाते. म्हणजेच नुकत्याच पिल्लाला जन्म दिलेला म्हशी किंवा गाईच्या दुधापासून खरवस रेसिपी बनवण्यात येते. खरवस हे महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचे आकडेवेगळे वैशिष्ट्य आहे. जेव्हा गाय किंवा महेश वासराला जन्म देते तेव्हा सुरुवातीची तीन ते चार दिवस गाईला किंवा म्हशीला जे दूध येते ते खूपच घट्ट असते. त्या दुधामध्ये विविध रोगांशी सामना करण्याची शक्ती असते. म्हणजे त्यामध्ये पोषक घटक असतात. तर चला मग आपण याच दुधापासून तयार होणारी खरवस ही रेसिपी पाहूया

Kharvas Recipe

खरवस रेसिपी मराठी Kharvas Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

खरवस ही रेसिपी महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीशी निगडित आहे. खरवस तयार करण्याची आपापली वेगळी पद्धत आहे. तसेच त्यामध्ये घातले जाणारे घटक देखील वेगवेगळे असतात. त्यामध्ये बदाम, इलायची, जायफळ व साखर इत्यादी घटक टाकले जातात. बिल्लाला जन्म दिलेला गाई किंवा म्हशीच्या पहिल्या तीन ते चार दिवसापासून मिळणाऱ्या घट्ट दुधामध्ये थोडे साधे दूध घालून त्यापासून खरवस तयार केले जाते. ही रेसिपी बरेच लोकांना आवडते म्हणून आज काल खरवसच्या वड्या पाडून देखील बाजारात विक्रीसाठी येतात. बाजारातील खरवस विकत आणून खाल्ल्यापेक्षा आपण जर घरच्या घरीच खरवस रेसिपी बनवली तर…. घरच्यांनाही आनंद वाटेल. तर चला मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती जणांंकरता बनणार आहे ?
ही रेसिपी आपण पाच जणांकरिता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करताना लागणारा वेळ :

खरवस रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 5 मिनिट एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

खरवस ही रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला तीन कुकिंग करावी लागते आणि कुकिंग साठी आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

खरवस रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

साहित्य

1) नुकत्याच पिल्लांना जन्म दिलेल्या गाई किंवा
म्हशीचे एक लिटर दूध
2) 2 वाटी साखर
3) दोन ते तीन काडी केशर
4) अर्धा चमचा वेलची पूड
5) कुकर व कुकरच्या आतील डबे
6) साधे दूध अर्धा लिटर

खरवस तयार करण्याकरता लागणारी पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला केशर कोमट दूध करून त्यामध्ये भिजू घालून ठेवायचे आहे.
  • चीक आणि दूध एकत्र करून त्यात साखर घालावी. साखर विरघळेपर्यंत ढवळत रहा. आपल्याला जर गोड खरवस आवडत असेल तर त्यामध्ये आणखीन साखर घाला.
  • नंतर त्या मिश्रणामध्ये केशर आणि वेलदोड्याची पूड घालून घ्या.
  • तयार झालेले मिश्रण आता कुकरच्या डब्यामध्ये आपण ज्याप्रमाणे भात शिजवतो त्याप्रमाणे दोन डब्यामध्ये भरून घ्यावे.
  • कुकरच्या डब्यामध्ये तळाशी दीड इंच पाणी ठेवून त्यामध्ये हे डबे अलगद पकडीच्या सहाय्याने ठेवावे.
    नंतर त्यावर एक झाकण ठेवावे.
  • नंतर त्यावर दुसरा डबा ठेवून पुन्हा त्यावर एक झाकण ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्याव्यात.
  • कुकर लावल्यानंतर गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे. पाच ते आठ मिनिटं कुकरचे प्रेशर गेल्यानंतर झाकण काढून दोन्ही डबे बाहेर काढून घ्या.
  • खरवस थंड होईपर्यंत हवेवर उघडाच राहू द्या. आपल्याला पाहिजे त्या आकारांमध्ये त्याच्या वड्या पाडून घ्या. कोमटसर झाला की, तो खायला छान लागतो. परंतु फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्ल्यास आणखीन स्वादिष्ट लागतो.
  • खरवस फ्रिजमध्ये आठ दिवस सहज राहू शकतो.
    अशाप्रकारे गरमागरम खरवस रेसिपी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरी करू शकता.

खरवस मधील पोषक घटक :

खरवस यामध्ये खूप पोषक घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.
त्यामध्ये प्रथिने, चरबी, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, ग्लुकोज, विटामिन बी कॉम्प्लेक्स, जास्त आणि सेलेनियम यांसारख्या विविध खनिजांचा स्त्रोत असतो. तसेच नियासिन, रिबोफ्लेविन, थायमिन इत्यादी जीवनसत्त्वे आढळून येतात. खरवस खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

फायदे :

खरवस खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते तसेच आपले आरोग्य देखील निरोगी राहते.

खरवस खाल्ल्यामुळे आपण आजारांपासून दूर राहता, पोट भरल्यासारखे वाटते. शरीराला एनर्जी मिळते त्यामुळे थकवा निघून जातो.

खरवस खाल्ल्यामुळे भुकेवर नियंत्रण राहते. वजन कमी होण्यास मदत होते.

तोटे :

खरवसमध्ये कॅलरी व शुगरचे प्रमाण जास्त असल्यामुळे हृदयरोग, मधुमेह किंवा इतर काही त्रास असतील त्यांनी खरवस खाणे टाळावे अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो.

ज्यांना दुधाचे एलर्जी आहे, त्यांनी देखील खरवस खाणे टाळावे.

तर मित्रांनो, तुम्हाला खरवस रेसिपी विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा तसेच ही रेसिपी घरी करून बघायला विसरू नका.

Leave a Comment