पालक पुरी रेसिपी मराठी Palak puri Recipe in Marathi

पालक पुरी रेसिपी मराठी Palak puri Recipe in Marathi  पालक ही भाजी पौष्टिक भाजीमध्ये ओळखली जाते.  पालक भाजी नियमित खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात.  पालकमध्ये सर्वच प्रकारचे पोषक तत्व असतात, जे आपल्या आरोग्यासाठी पोषक असतात.

पालकाची भाजी जास्त करून थंडीच्या दिवसांमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते.  पावसाळ्यामध्ये त्या भाजीला माती किंवा किटाणू लागलेले असतात.

पालक ही भाजी आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असते.   तर आज आपण पालकपासून पालक पुरी कशी बनवायची ही रेसिपी पाहूया.

Palak puri

पालक पुरी रेसिपी मराठी Palak puri Recipe in Marathi

रेसिपी प्रकार  :

पालक भाजी पासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकतो.  जसे की पालक पनीर, दाल पालक, पालक पराठे, आलू पालक, पालक पुरी, पालक डोसा, पालक सूप, पालक घावन व पालक खिचडी इत्यादी रेसिपीज तयार केले जातात.  यामुळे आपल्या आरोग्य देखील चांगले राहते व आपले रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.  तर आज आपण पालक पुरी ही रेसिपी पाहणार आहोत.

जाणून घेऊया पालक पुरी साठी लागणारे साहित्य पाककृती.

ही रेसिपी आपण किती जणांसाठी बनवणार आहोत?

ही रेसिपी आपण पाच जणांंकरिता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ  :

पालक पुरी रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला पूर्वतयारी करावी लागते त्या पूर्वतयारीकरिता 15 मिनिटे एवढा वेळ आपल्याला लागतो.

कुकिंग टाईम  :

सर्व पालक पुरी आपल्याला तळून घ्यावी लागतात पालक पुरी कुकिंग करण्याकरता 10 मिनिटे एवढा वेळ आपल्याला लागतो.

टोटल टाईम :

पालक पुरी ही रेसिपी करण्याकरता आपल्याला एकूण 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.

पालक पुरीसाठी लागणारी सामग्री खालील प्रमाणे  :

1) पालक 2 जुळी

2)  2 वाटी गव्हाचे पीठ

3) तूप किंवा तेल तीन चमचे

4) आलं लसूण पेस्ट एक चमचा

5) हिरव्या मिरचीची पेस्ट एक चमचा

6) जिरेपूड एक चमचा

7) घट्ट दही एक वाटी

8) मीठ चवीनुसार

9) तळण्याकरता तेल

पाककृती :

  • सर्वप्रथम पालकाची पाने स्वच्छ धुऊन घ्या आणि नंतर मिक्सरमधून पालकांच्या पानांची पेस्ट बनवून घ्या.
  • आता एका बाऊलमध्ये गव्हाचं पीठ,  जिरेपूड, एक चमचा तूप दही आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट व स्वादानुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकत्रित चांगले मिसळून घ्या.
  • नंतर त्यामध्ये पालकाची पेस्ट घाला व नरम अशी कणिक मळून घ्या.  कणिक मळून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून पुऱ्या लाटून घ्याव्यात.
  • आता गॅस वरती कढई ठेवा त्यामध्ये तेल टाकून तेल गरम करण्याकरता ठेवा.  तेल गरम झाले की त्यामध्ये एक एक करून सर्व पुऱ्या तळून घ्या.
  • पुऱ्या तळत असताना जास्त कडक होऊ देऊ नका.
  • अशाप्रकारे गरमागरम पालक पुरी रेसिपी तयार आहे.  आता या पुऱ्या आपण मिरचीचा ठेचा, दही, लोणचे, आलूची चटणी यांच्यासोबत सर्व्ह करू शकता.

पालक पुरीतील पोषक घटक  :

पालक हे शरीरासाठी आवश्यक आहे.  त्यामुळे आपण पालक पुरी रेसिपी केली तर त्यामध्ये व्हिटॅमिन के, फायबर, प्रथिने, फॉस्फरस थायमिन लोह कॅल्शियम मॅग्नेशियम व कर्बोदके असतात.  तसेच बांधकाम मध्ये अल्फा-लिपोईक ऍसिड नावाचे अँटिऑक्सिडंट असतात.

फायदे :

पालक फायबर आणि पाण्याने भरलेले असते, त्यामुळे फायबर पचन तंत्र व्यवस्थित ठेवण्याचे कार्य करते.  तसेच पालक खाल्ल्याने अपचन, गॅसेस यांसारख्या समस्या दूर होतात.  पालक पोटाच्या कॅन्सरपासून वाचवते.

पालक खाल्ल्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर राहण्यासाठी देखील मदत होते.  डॉक्टर देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला बऱ्याचदा देतात.

पालक खाल्ल्यामुळे आपले वजन देखील नियंत्रणात राहते.  पालक खाणे आरोग्यासाठी हिताचे असून तुम्ही जर पालकाचे नियमित सेवन करत असाल तर वजन संतुलित राहते.

पालक खाल्ल्यामुळे कॅन्सर सारख्या रोग्यालाही आराम मिळतो.  पालकमध्ये बीटा कॅरोटीन आणि विटामिन सी असते.  हे दोघेही पोषक तत्वे शरीरात होत असलेल्या कॅन्सरच्या पेशंटला नष्ट करतात.

शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी किंवा हाडांच्या आरोग्यासाठी पालक आणि उपयुक्त आहे.  पालक शरीरातील हाडांपासून ते त्याच्या विकासापर्यंत मदत करते.  पालकांमध्ये कॅल्शियम असते आणि जे हाडांच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण असते.

तोटे   :

पालकांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते, तसेच कॅल्शियमचे सेवन मोठ्या प्रमाणात केल्यास आपल्याला हृदयविकार होऊ शकतो.

तसेच त्यामध्ये फायबरचे प्रमाण सुद्धा असते, फायबरचे प्रमाण जास्त झाल्यास पोट फुगणे, पोटात पेटके येऊ शकतात.

पालक पुरी तळलेली असते, त्यामुळे कोलेस्ट्रॉलची भीती वाटते.

आहारात पालकाचे प्रमाण जास्त झाल्यास त्यातील उलट्या जुलाब होऊ शकतो.  आपण पालक पुरी ही मर्यादितच खायला पाहिजे.

तर मित्रांनो, तुम्हाला पालक पुरी ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment