पत्ता कोबी रेसिपी मराठी Patta kobi Recipe in Marathi

पत्ता कोबी रेसिपी मराठी Patta kobi Recipe in Marathi  आपल्याला दररोज टिफिनमध्ये नेण्यासाठी नवनवीन भाज्या तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. तसेच टिफिन मध्ये कोणत्या भाज्या दररोज न्यायाव्यात हे देखील आपल्याला कळत नाही. तर आम्ही खास तुमच्याकरिता सुकी पत्ता कोबी भाजी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी अगदी कमी वेळात व चटपटीत तयार होते. आपल्या शरीरासाठी भाजीपाला तसेच फळभाज्या देखील पोषक असतात. त्या खाण्यासाठी चविष्ट लागतात परंतु त्यापेक्षाही आरोग्यासाठी हिताच्या आहेत. तर आज आपण अशाच एका भाजीबद्दल म्हणजे कोबी या भाजी बद्दल बोलणार आहोत. कोबी पासून वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस बनवल्या जातात. तसेच तिचा वापर देखील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. कोबी ही चविष्ट तर आहेच; परंतु आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास देखील मदत करते. तर चला मग आज आपण या रेसिपी विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Patta kobi Recipe in Marathi

पत्ता कोबी रेसिपी मराठी Patta kobi Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

कोबी ही रेसिपी विविध पद्धतीने केली जाते. कोरडी तसेच रस्त्याची देखील ही भाजी केली जाते. परंतु कोबी या भाजीचा उपयोग बऱ्याच रेसिपीमध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. कोबी ही रेसिपी जगभरात वापरली जाणारी फळभाजी आहे. कोबी पासून व्हेज मंचुरियन, व्हेज पुलाव, खिचडी, बेसन कोबी, मुगडाळ कोबी, सलाद, चणाडाळ कोबी इत्यादी पद्धतींमध्ये कोबी वापरली जाते. तर चला मग या रेसिपीसाठी लागणारी साहित्य व पाककृती जाणून घेऊया.

ही रेसिपी किती व्यक्ती करता तयार करणार आहोत?
ही रेसिपी आपण 5 व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला किमान 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

ही रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला एकूण वेळ हा 20 मिनिटे लागतो.

कोबी रेसिपी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :

1) एक पाव कोबी
2) दोन चमचे तेल
3) पाच सहा कढीपत्त्याची पाने
4) एक चमचा लसूण पेस्ट
5) पाच बारीक चिरलेल्या मिरच्या
6) बारीक चिरलेला कोथिंबीर
7) पाव चमचा हिंग
8) पाव चमचा हळद
9) पाव चमचा धने पावडर
10) पाव चमचा जिरे
11) अर्धी वाटी ताजी ओले वाटाणे
12) अर्धी वाटी मूग डाळ भिजवलेली
13) अर्धी वाटी बारीक केलेले टोमॅटो
14) मीठ

पाककृती :

 • कोबीच्या वरचे पाने काढून कोबी बारीक चिरून घ्यावी. नंतर ती पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. किंवा मग गॅस वरती पूर्ण गोबी पाण्याने बुडवून मोठ्या आचेवर उकळीसाठी ठेवावे.
 • पाण्याला उकळी आली असता गॅस बंद करून घ्यावा. व चाळणीने पाणी काढून घ्यावे. यामुळे कोबीवरील केलेली फवारणी किंवा तिचा उग्र वास निघून जातो.
 • नंतर फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे. तेल गरम झाले की, त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, हिंग, हळद व लसूण पेस्ट बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून छान परतून घ्याव्यात.
 • नंतर धने पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीत टाकून छान परतून घ्या. तसेच यानंतर धुऊन घेतलेली मुगाची डाळ चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यावी.
 • मुगाची डाळ अर्धी शिजली की, वरून बारीक चिरलेला टोमॅटो घालावा.
 • नंतर मध्यम आचेवर हे सर्व साहित्य एक मिनिट छान शिजू द्यावे. व नंतर वरून पुरते मीठ टाकावे.
 • नंतर कोबी टाकून चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
 • आता ही कोबी मध्यम आचेवर शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यावी.
 • तीन-चार मिनिटांनी झाकण काढून पुन्हा कोबी चमच्याने या सहाय्याने खाली वर करून घ्यावी.
 • कोबीचे झाकण बाजूला केल्यानंतर तुम्हाला कोबीचा छान सुगंध वास येईल. त्याचबरोबर या शिजलेल्या कोबीचा कलर देखील मनमोहक झालेला दिसेल.
 • आता गॅस बंद करून गरमागरम चटकदार कोबी भाजी तयार आहे. तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये किंवा मग घरी जेवणामध्ये खाऊ शकता.
 • ही सुकी कोबीची भाजी आपण पोळी, भाकरी, तंदुरी रोटी पराठ्यासोबत खाऊ शकतो.
 • बिस्कीट केक मराठी

पोषक तत्वे :

कोबी ही एक पोषक तत्व असणारी फळभाजी आहे. त्यामध्ये प्रथिने, ऊर्जा, कार्बोहायड्रेट, फायबर, साखर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, तांबे, मॅग्नीज, सेलेनियम व विटामिन सी इत्यादी पोषक घटक आहेत.

फायदे :

कोबी खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. कोबी खाणे कधीही आपल्या हिताचे आहे. कोबीमध्ये फायबर असल्यामुळे आपल्याला लगेच भूक लागत नाही. तसेच उच्च जीवनसत्व असल्याने ती आरोग्यवर्धक आहे.

कोबी भाजीचे सेवन केल्यामुळे मज्जा तंतू आणि मेंदूचे काम सुरळीत चालते. तसेच कॅन्सरचा धोका ही टळतो.

कोबी भाजी खाल्ल्यामुळे कफ होण्यापासून बचाव होतो. कोबी खाल्ल्यामुळे नियमित पोट साफ राहते तसेच पचन तंत्र देखील चांगले राहते.

कोबी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते व अनेक आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते.

कोबी खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन हार्ट अटॅकचा धोका देखील कमी होतो. कोबीमध्ये फायबर असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाहित राहतात.

तोटे :

कोबी या भाजीचे अतिरिक्त सेवन केले तर गॅसची समस्या उद्भवू शकते. तसेच पोटदुखीचा त्रासही आपल्याला जाणवू शकतो.

ज्या व्यक्तींना हायपोथायरॉईडची समस्या आहे. अशा लोकांनी कोबीचे सेवन करणे टाळावे.

तर मित्रांनो, तुम्हाला कोबी ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा तसेच ही रेसिपी तयार करा व तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.

Leave a Comment