अननस ज्यूस मराठी Pineapple juice Recipe in Marathi

अननस ज्यूस मराठी Pineapple juice Recipe in Marathi  अननस हे फळ असे आहे, जे प्रत्येकाला खायला आवडते. उन्हाळा किंवा पावसाळ्यामध्ये हे फळ आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अननस हे पोषक तत्त्वांनी भरलेले असते. त्यामुळे अननस खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. अननसामध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असते. तसेच त्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता देखील वाढते. या फळाचे सेवन करायलाच पाहिजे.
हे फळ थंड प्रभावाचे असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाणे फायद्याचे ठरते. उन्हाळ्याच्या दिवसात या फळाचे सेवन केले किंवा त्याचा ज्यूस जर पिला तर आपल्या शरीराला गर्मीपासून थंडावा मिळतो. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

Pineapple juice

अननस ज्यूस मराठी Pineapple juice Recipe in Marathi

अननस ज्यूस रेसिपी प्रकार :

अननस ज्यूस तयार करण्यासाठी अत्यंत सोपे असून आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. तसेच त्यामध्ये अननस, मीठ, साखर, बर्फ यांचा वापर करून हे ज्यूस तयार केले जाते. ज्याप्रमाणे आपण ऑरेंज ज्यूस, ॲपल ज्यूस, कोकोनट ज्यूस, डाळिंब ज्यूस तयार करतो. त्याचाच एक प्रकार म्हणजे पायनॅपल ज्यूस आहे. हे ज्यूस पिण्यासाठी अत्यंत पौष्टिक असून चवदार लागते. तसेच आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे सर्वच पोषक घटक त्यामध्ये असतात. तर चला मग बघूया त्यासाठी लागणारे सामग्री व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण 3 व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 7 मिनिटे एवढा वेळ लागतो.

तयार करण्याकरता लागणारा वेळ :

पायनॅपल ज्यूस तयार करण्यासाठी आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

एकूण वेळ :

पायनॅपल ज्यूस तयार करण्यासाठी एकूण 17 मिनिटे एवढा वेळ लागतो.

अननस ज्यूस बनवण्यासाठी साहित्य :

1) 2 चमचे
2) साखर
3) 1 टीस्पून काळे मीठ
4) 1 ग्लास पाणी
5) अननस

अननसाचा ज्यूस पाककृती :

  • मलाई कोफ्ता रेसिपी मराठी
  • सर्वप्रथम छान सोडून घ्यावे, नंतर ते स्वच्छ धुऊन घ्यावे त्यानंतर अननसाचे छोटे-छोटे तुकडे करून घ्यावे.
  • त्यानंतर मिक्सिंग जारमध्ये तयार केलेले सर्व अननसाचे तुकडे टाकून घ्या.
  • नंतर त्यामध्ये साखर काळ मीठ आणि थोडं पाणी घालून बारीक करून घ्या.
  • नंतर उरलेले पाणी ज्यूसमध्ये टाकून मिक्सरमध्ये छान मिक्स करून हे मिश्रण फिल्टर करून घ्या.
  • रस गाळून घेण्यासाठी प्रथम एका चाळणीमध्ये तयार केलेले मिश्रण घेऊन स्वच्छ भांडे त्याखाली ठेवून रस गाळून घ्या.
  • आता यातून रस भांड्यात जाईल व चाळणीच्या वर मोठे तुकडे येतील, त्यानंतर पुन्हा हे तुकडे बारीक करून चाळणीतून पुन्हा गाळून घ्यावे.
  • अशा प्रकारे पायनॅपल ज्यूस तयार आहे. आता तुम्ही ग्लासमध्ये भरून सर्व्ह करू शकता.
  • ग्लासमध्ये ज्यूस ओतल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन छोटे बर्फाचे तुकडे घाला तसेच अननसाचेही तुम्ही छोटे तुकडे घालून त्यामध्ये घालू शकता.
  • यामुळे दिसायला आकर्षक दिसते व पिण्यासाठी थंड देखील असते.

पोषक घटक :

पायनॅपल ज्यूस सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामध्ये इतर पौष्टिक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. जसे की, त्यामध्ये बिटा-केरोटीन, विटामिन ए, विटामिन सी, पोटॅशियम, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम व मॅग्नेशियम असते.

फायदे :

पायनॅपल ज्यूस संधीवातासाठी फायदेशीर ठरतो एखाद्याला जर संधिवाताचा त्रास होत असेल तर त्यांनी नियमित पायनॅपल ज्यूसचे सेवन केल्यास हा त्रास कमी होतो.

कारण त्यामधील विटामिन ए आणि विटा केरोटीन हे सांधेदुखीवर औषधी म्हणून काम करतात. आपल्याला आराम मिळतो. तसेच सूज व त्रास देखील कमी होतो.

अननसाचा ज्यूस पिल्यामुळे दात व हाडे देखील मजबूत होतात. तसेच त्यामधील कॅल्शियम मॅग्नेशियम चे प्रमाण असल्यामुळे दात व हाडे दुखीवर आराम मिळतो तसेच शरीरावर आलेली सूज कमी होते.

पायनॅपल ज्यूस हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम औषधी आहे. कारण या ज्यूस मध्ये अँटिऑक्सिडंट तसेच विटामिन सी भरपूर प्रमाणात असतात. जे हृदय संबंधित आजारापासून आपले संरक्षण करतात.

रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते व हृदयविकाराचा धोका कमी होतो.

तोटे :

ज्यूस पिण्याचे तसे आपल्या शरीराला फायदे असतात. परंतु अतिरिक्त ज्यूसचे सेवन केल्यामुळे आपले ब्लड शुगर लेवल अचानक वाढते. तसेच डोकेदुखी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून ज्यूसचे योग्य प्रमाणात सेवन करावे.

तर मित्रांनो, पायनॅपल ज्यूस रेसिपी विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment