साबुदाणा खिचडी मराठी Sabudana Khichdi Recipe In Marathi

साबुदाणा खिचडी मराठी Sabudana Khichdi Recipe In Marathi  साबुदाणा खिचडी ही साबुदाणा, आलू आणि शेंगदाणे पासून तयार केलेला एक पदार्थ आहे. जो खायाला एकदम स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे. उपवासासाठी फराळ म्हणून साबुदाणा खिचडीचा वापर केला जातो. हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे, जो सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. साबुदाणा खिचडीला उसळ म्हणून सुध्दा ओळखले जाते. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट साबुदाणा खिचडी मिळते.

मोठ्या शहरात साबुदाणा खिचडी लवकर मिळते. पण काही ग्रामीण आणि शहरी भागात स्वादिष्ट साबुदाणा खिचडी मिळत नाही. काही लोकांना साबुदाणा खिचडी खूप आवडते, पण त्याचा परिसरात साबुदाणा खिचडी मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहिती नाही, अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने हॉटेल सारखी स्वादिष्ट साबुदाणा खिचडी कशी बनवतात यांची रेसिपी. आता आपण साबुदाणा खिचडी रेसिपी पाहणार आहोत.

Sabudana Khichdi

साबुदाणा खिचडी मराठी Sabudana Khichdi Recipe In Marathi

साबुदाणा खिचडीचे प्रकार :

साबुदाणा खिचडी खायाला स्वादिष्ट पदार्थ आहे. साबुदाणा खिचडीचे अनेक प्रकार पडतात. जसे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाणा मसाला खिचडी हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
साबुदाणा खिचडी ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

साबुदाणा खिचडीच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. सर्व साहित्य एकत्र केलं की आपण लवकर खिचडी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

साबुदाणा खिचडी कुकिंग करण्यासाठी आपल्याला 25 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

साबुदाणा खिचडी करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 45 मिनिट वेळ लागतो.

साबुदाणा खिचडीसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 250 ग्रॅम साबुदाणा.
2) 4 ते 5 बटाटे/ आलू.
3) 100 ग्रॅम शेंगदाणे.
4) 5 ते 6 हिरवी मिरची.
5) कोथिंबीर.
6) तेल.
7) 1 लिंबू.

पाककृती :

  • मटकी उसळ मराठी
  • सर्वात प्रथम साबुदाणा पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. नंतर साबुदाणा 3 ते 4 तास भिजू घाला.
  • नंतर आलू, मिरची, कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्या, आणि मिरची व कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
  • एका भांड्यात बटाटे/आलू गॅस गॅस वरती उकडू घाला, बटाटे थोडे नरम झाले की सोलून घ्या.
  • नंतर बटाटे बारीक कापून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
  • आता गॅस चालू करून, गॅस वरती एक खोल तळाची कढई किंवा पॅन ठेवा, आणि गरम करा.
  • त्यामध्ये शेंगदाणे टाकून, व्यवस्थित भाजून घ्या. शेंगदाणे तपकिरी होईपर्यत भाजून घ्या,
  • आणि थंड झाल्यावर मिक्सर मधून मध्यम बारीक करून घ्या. व नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
  • 3 ते 4 तास नंतर साबुदाणा भिजला की नाही तपासा, आणि नंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून मोकळा करा.
  • आता गॅस वरती एक खोल तळाचा पॅन ठेवा, आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
  • तेल गरम झाले की, प्रथम त्यामध्ये हिरव्या मिरच्या घाला, आणि काही सेकंद परतवत रहा.
  • हिरवी मिरची झाली की, यात उकडलेला बारीक बटाटा घालून 2 मिनिट परतावे.
  • नंतर यामध्ये मोकळा केलेला साबुदाणा टाकून चांगले मिक्स करा, आणि वारंवार परतवत रहा.
  • जेव्हा साबुदाणा थोडा मळकट होणार, तेव्हा तो झाला समजावा, साबुदाणा जास्त वेळ शिजवू नका,
  • नाहीतर त्याचे ढेकुल तयार होणार, नंतर यामध्ये आपण बारीक केलेले शेंगदाणे टाका.
  • आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा, 5 मिनिट झाकण ठेऊन, मध्यम आसेवर होऊ द्या.
  • नंतर यामध्ये थोडी बारीक कोथिंबीर टाका, आता आपली स्वादिष्ट साबुदाणा खिचडी खाण्यासाठी तयार आहे.
  • आपण साबुदाणा खिचडीवर थोडे लिंबू घेऊन, आणि सोबत थोडे दही घेऊन, खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

साबुदाणा खिचडीमध्ये असणारे घटक :

साबुदाणा खिचडी हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक आहार आहे. यामध्ये विविध घटक आहेत, जसे व्हिटॅमिन, प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, फॅट, चरबी, व्हिटॅमिन ए हे सर्व घटक आपल्याला शरीरासाठी खूप महत्वाचे घटक आहेत.

फायदे :

साबुदाणा खिचडी खाल्ल्याने आपल्याला फॅट, चरबी, प्रथिने असे पौष्टिक घटक मिळतात. यामुळे आपल्या शरीरावर चरबी आणि मासपेशी वाढतात.

यामध्ये असणारे व्हिटॅमिन, लोह, फॉस्फरस व कॅल्शियम हे आपला शारीरिक थकवा दूर करतात.

यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

साबुदाणा खिचडीमध्ये शेंगदाणे वापरले जातात. आपण हे जास्त प्रमाणात सेवन केली तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

साबुदाणा खिचडी तेलकट पदार्थ आहे. यामुळे आपल्याला मळ-मळ आणि उलटी होऊ शकते.

म्हणून आपण हे योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला साबुदाणा खिचडी रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

No schema found.

Leave a Comment