शिरा रेसिपी मराठी Shira Recipe In Marathi शिरा हा एक गोड पदार्थ आहे, जो खायाला एकदम स्वादिष्ट आहे. दिवाळी तसेच इतर सणाला शिरा हा मिष्ठान्न म्हणून वापरला जातो. विविध ठिकाणी शिरा वेग वेगळ्या प्रकारे बनवला जातो. रव्याच्या शिऱ्या पासून धार्मिक कामात जसे गणपती, देवी, दिवाळी, दसरा सणाला लाडू बनवले जातात. हेच लाडू प्रसादाच्या स्वरूपात वाटतात. उपवासासाठी रताळू पासून शिरा बनवला जातो.
हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट शिरा खायाला मिळतो. मोठ्या शहरात शिरा सहज मिळून जातो. परंतु ग्रामीण तसेच काही शहरी भागात शिरा मिळत नाही, काही लोकांना शिरा खूप आवळतो. पण त्यांना शिऱ्याची रेसिपी माहीत नाही, आणि काही लोक बाहेर जाऊन खाऊ शकत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. अतिशय सोप्या पद्धतीने हॉटेल सारखा स्वादिष्ट शिरा कसा बनवतात यांची रेसिपी, आता आपण शिरा रेसिपी पाहणार आहोत.
शिरा रेसिपी मराठी Shira Recipe In Marathi
शिऱ्याचे प्रकार :
शिरा हा एक स्वादिष्ट मिष्ठान्न आहे. शिरा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. जसे रव्याचा शिरा, मूंग डाळ शिरा, उपवासासाठी रताळू शिरा, आणि यामध्ये तिखट उपमा बनवला जातो. जो शिऱ्याचा एक प्रकार आहे, असे अनेक शिऱ्याचे प्रकार आहेत. जे खायाला स्वादिष्ट आणि चवदार आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
शिरा ही रेसिपी आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
शिराच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :
शिरा तयार करण्यासाठी आधी पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर शिरा बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
शिरा कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
शिरा तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर त्याला कुकिंग करावे लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.
शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 1 पाव रवा.
2) 1 पाव साखर.
3) 100 ग्रॅम तूप.
4) 10 ते 12 काजू व बदाम.
5) थोडा मनुका.
6) 1 चम्मच इलायची पावडर.
7) थोडे पाणी.
8) 50 ग्रॅम खोबरे खिश.
पाककृती :
- व्हेज सँडविच रेसिपी मराठी
- सर्वात प्रथम इलायची पावडर थोडी साखर टाकून मिक्सर मधून बारीक करून घ्या.
- नंतर काजू व बदामचे छोटे छोटे तुकडे तयार करा आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
- नंतर एक खोल तळाचा पॅन किंवा कढई घ्या. गॅस चालू करून त्यात 2 चम्मच तूप टाकून गरम करा.
- तेल गरम झाले की, त्यात काजू व बदाम मध्यम आसेवरती भाजून घ्या, थोडे लालसर झाले की, एका प्लेटमध्ये काढून द्या.
- नंतर यामध्ये अजून थोडे तूप टाका आणि गरम करा. तूप गरम झाल्यावर यामध्ये रवा टाका.
- व्यवस्थित भाजून घ्या, रवा वारंवार परतवत रहा, म्हणजे चांगला भाजला जाईल. मध्यम आसेवरती 5 ते 6 मिनिट भाजून घ्या.
- दुसऱ्या बाजूने दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवा, पाण्याला पूर्ण उकळी येऊ द्या.
- रवा थोडा लालसर झाला की, त्यामध्ये आवश्यक तेवढे गरम पाणी हळूहळू टाका आणि ढवळत रहा.
- रवा सर्व पाणी शोषून घेऊन आणि धेकुळ नसलेले मिश्रण तयार होणार.
- आता यामध्ये साखर टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. साखर आणि रवा पूर्ण एकजीव होणार.
- नंतर 2 मिनिट गॅसवरती रवा होऊ द्या, नंतर यामध्ये भाजलेले काजू बदामचे तुकडे, मनुका, इलायची पावडर व खोबरकिस टाका.
- रव्यामध्ये खोबरेकिस व्यवस्थित मिस्क करून घ्या. सर्वकाही चांगले एकत्र केले आहे, याची खात्री करून घ्यावी.
- आता गॅस बंद करून शिऱ्यावर झाकण ठेऊन 5 मिनिट तसेच राहू द्या. आपण यामध्ये खाण्याचा कलर टाकून, कलरफुल शिरा सुध्दा तयार करून शकतो.
- आता आपला एकदम स्वादिष्ट व गोड शिरा खाण्यासाठी तयार आहे. एका छोट्या प्लेटमध्ये घेऊन, आपण शिरा खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
शिऱ्यामध्ये असणारे घटक :
शिरा तयार करण्यासाठी आपण विविध पौष्टिक घटक असणारे पदार्थ वापरतो. जसे तूप, काजू, बदाम, मनुका, यामध्ये विविध घटक असतात. यामध्ये कॅलरीज, चरबी, सोडियम, कर्बोदके, फायबर, शुगर, कॅल्शियम, लोह, प्रथिने, सतुप्त चरबी हे सर्व घटक आपल्याला शरीसाठी खूप महत्वाचे आहेत.
फायदे :
शिऱ्यामध्ये असणारे घटक चरबी व सतुप्त चरबी, कॅलरीज आपल्या शरीराची वाढ करतात, आणि शरीरावर चरबीचे प्रमाण वाढवतात.
यातील कॅल्शियम, सोडियम, फायबर, लोह आपले हाड मजबूत ठेवतात.
शिऱ्यामध्ये असणारे विविध घटक आपल्या शारीरिक थकवा, तसेच इतर आजार होऊ देत नाही, हे आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.
तोटे :
शिरा हा एक गोड व तेलकट पदार्थ आहे, आपण जर जास्त प्रमाणात शिरा सेवन केला तर आपल्याला मळ-मळ किंवा उलटी होऊ शकते.
यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.
म्हणून आपण योग्य प्रमाणात शिरा सेवन केला पाहिजे. ज्यामुळे आपल्याला काही नुकसान होणार नाही.
तर मित्रांनो, तुम्हाला शिरा रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.