व्हेज सँडविच रेसिपी मराठी Veg Sandwich Recipe in Marathi

व्हेज सँडविच रेसिपी मराठी Veg Sandwich Recipe in Marathi  सकाळी सकाळी बऱ्याच लोकांना ऑफिसला जाण्यापूर्वी नाश्ता करण्याची सवय असते.  काहींना तर व्हेज सँडविच फारच आवडते तर काहींना नॉनव्हेज सँडविच आवडते.  परंतु जो नाश्ता लवकरात लवकर होईल अशा नाश्त्यांना खूपच प्राधान्य असते.  आज आम्ही तुम्हाला अशाच एका ब्रेकफास्ट विषयी माहिती सांगणार आहोत.  जो केवळ दहा ते पंधरा मिनिटात तयार होईल.  तसेच ही रेसिपी बनवण्याकरता लागणारा वेळ कमी व टेस्टी अशी रेसिपी आहे.  तुम्ही जर एकदा ही रेसिपी बनवून पाहिली तर तुम्हाला नेहमीच करून खावीशी वाटेल एवढीच चटपटीत अशी व्हेज सँडविच तयार होईल.  तर चला मग जाणून घेऊया सँडविच या रेसिपी विषयी माहिती.

Veg Sandwich

व्हेज सँडविच रेसिपी मराठी Veg Sandwich Recipe in Marathi

सँडविच रेसिपी प्रकार  :

धावपळीच्या जीवनात पटापट कामे उरकून नाश्ता करून ऑफिसला जाण्याची घाई असते. त्यामुळे आपण लवकरात लवकर होईल अशा नाश्त्याची तयारी करून ब्रेकफास्ट करून ऑफिसला जातो.  आम्ही तुमच्याकरिता खास ब्रेकफास्ट सँडविच रेसिपी घेऊन आलो आहोत.  सँडविच रेसिपी चे अनेक प्रकार आहेत.  बॉम्बे सँडविच, चीज सँडविच, व्हेजिटेबल सँडविच, अंडा सँडविच, व्हेज मेयोनीज सँडविच,  चॉकलेट चीज सँडविच, टोमॅटो सँडविच पालक सँडविच  व मशरूम सँडविच इत्यादी प्रकारांमध्ये आपण सँडविच बनवू शकतो.

ही रेसिपी आपण चार जणांंकरिता बनवणार आहोत.

पूर्व तयारी करता लागणारा वेळ  :

सँडविच पूर्वतयारी करण्याकरता आपल्याला 5 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम  :

सँडविच कुकिंग करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम  :

सँडविच बनवण्याकरता आपल्याला एकूण 15 मिनिटे एवढा वेळ लागेल.

व्हेज सँडविच साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे  :

1) 8 ब्रेड स्लाईसेस

2)  दोन उकडलेले बटाटे

3)  एक कांदा

4) एक टोमॅटो

5) एक हिरवी ढोबळी मिरची

6) अर्धा चमचा जिरे

7) पाव चमचा गरम मसाला

8) अर्धा चमचा धने पावडर

9) एक चमचा चिरलेली कोथिंबीर

10)  एक चमचा तेल

11) बटर

12) चवीनुसार मीठ

सँडविच बनवण्याची पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला उकडलेल्या बटाट्याची सालं काढून त्याला मॅच करून घ्यायचे आहे किंवा मग छोटे तुकडे करूनही तुम्ही वापरू शकता.
  • नंतर कांदा टोमॅटो ढोबळी मिरची बारीक चिरून घ्या.
  • नंतर कढईमध्ये तेल टाकून गरम करण्यासाठी ठेवा गरम झाले की त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची, कांदा घालून तीन ते चार मिनिटं फ्राय होऊ द्या.
  • कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि त्यावर थोडे मीठ घाला म्हणजे टोमॅटो लवकर शिजतील त्यानंतर त्यामध्ये धने पावडर घाला.
  • हे मिश्रण चांगले कर आपले की त्यामध्ये आपण मॅच केलेला बटाटा घालून घ्या.  आणि हे मिश्रण चांगले परतून घ्या सर्वात शेवटी कोथिंबीर घाला.
  • नंतर नॉनस्टिक पॅनवर बटर घालून ब्रेडचे स्लाइड्स भाजून घ्या.  स्लाइड्स भाजून झाली की त्यावर बटाट्या मिश्रण घालून दुसरा ब्रेड स्लाईस वर बंद करून ठेवा.
  • तुम्ही हे सँडविच टोस्टर किंवा सँडविच मेकर मध्येही बनवू शकता.
  • टोस्ट झाल्यावर टोमॅटो सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.   अशाप्रकारे तुमचे गरमागरम सँडविच तयार आहे.
  • अंडा सँडविच रेसिपी  :

अंडा सँडविच मुळे आपलं पोट भरलेलं राहते. त्यामुळे अंडा सँडविच अगदी डिनर डिश सारखच आहे.  तसेच अंडा सँडविच खूपच पौष्टिक आहे. ही रेसिपी थोडी शी तिखट आणि मसालेदार बनवली तर आणखीनच चटपटीत होईल.  तर चला मग पाहूया त्यासाठी लागणारी सामग्री.

अंडा सँडविच लागणारे साहित्य  :

1)  उकडलेली चार अंडी

2)  आठ ब्रेड स्लाईस

3)  एक कांदा

4)  एक टोमॅटो

5)  एक चमचा बटर

6) एक चमचा टोमॅटो सॉस

7) एक चमचा चिली सॉस

8) अर्धा चमचा काळी मिरी

9) अर्धा चमचा तिखट

10) मीठ चवीनुसार

पाककृती  :

  • सर्वप्रथम आपल्याला अंडी उकडून ती सोलून घ्यायची आहे.  आता चाकूने त्याचे गोल गोल तुकडे करून घ्या.  त्याच पद्धतीने टोमॅटो आणि कांद्याचे ही गोल गोल तुकडे करून घ्यायचे आहेत.
  • नंतर ब्रेड स्लाइट्स वर बटर, टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि थोडीशी हिरवी मिरची पेस्ट लावा.  तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही हे ब्रेड स्लाईस गरम करून घेऊ शकता.  नंतर त्यावर अंड्याचे स्लाईस टोमॅटो कांदा सजवून घ्या.
  • नंतर त्यावर दुसरी ब्रॅड स्लाईस ठेवून बंद करा अशाच पद्धतीने सर्व सँडविच बनवा.
  • अशाप्रकारे तुमचं अंडरस्टॅंडविच बनवून तयार आहे.  हे सँडविच तुम्ही टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी सोबत खाऊ शकता.

पोषक घटक  :

प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन अ, विटामिन डी, विटामिन ई आणि विटामिन के ही जीवनसत्वे असतात.  जे घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.  त्याने शरीराचे पोषण होते असेच घटक सँडविच मध्ये उपलब्ध आहेत म्हणून सँडविच खाणे तसे फायद्याचे आहे.

सँडविच खाण्याचे फायदे  :

सँडविच हे वेगवेगळ्या प्रकारात बनवले जाते त्यामुळे सँडविच कोणत्या प्रकारचे खाल्ले त्यावर त्याचं फायदा अवलंबून आहे.

सँडविचमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि इतर पौष्टिक घटक असतात.  जे चवीसोबतच आपल्या शरीरासाठी ही आरोग्यदायी असतात.

तुम्ही सँडविचमध्ये केलेल्या फळभाज्यांचा उपयोग नेहमीच आपल्या शरीराला होतो.  आपल्या शरीराला त्यामुळे प्रथिने, ऊर्जा मिळते.

तोटे  :

सँडविच जर जास्त प्रमाणात खाल्ले तर आपल्याला ऍसिडिटी तसेच पोटदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे सँडविच खाताना, ते आपण प्रमाणातच खाल्ले पाहिजे.

तर मित्रांनो, सँडविच रेसिपी ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment