टोमॅटो सूप रेसिपी मराठी Tomato Soup Recipe in Marathi चवीला आंबट गोड असणारे असे सूप प्रत्येकाच्या तोंडाला चटका लावून जाते. आपण आहारात दररोज टोमॅटो सूप घेतला पाहिजे. यामुळे आपली रोग प्रतिकार क्षमता देखील चांगली राहते व इतर बिमारी पासून आपण दूर राहतो. टोमॅटो ही नेहमीच स्वादिष्ट व पौष्टिक फळ भाजी आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि सोडियम, जस्त, सल्फर, पोटॅशियम यासारखी खनिज आढळून येतात, जी शरीरासाठी अत्यावश्यक असतात. तुम्ही देखील घरच्या घरी टोमॅटो सूप बनवून बघा व ही रेसिपी कशी झाली ते आम्हाला नक्की कळवा.
टोमॅटो सूप रेसिपी मराठी Tomato Soup Recipe in Marathi
टोमॅटो सूप प्रकार :
टोमॅटो सूप हे आपल्या दररोजच्या जेवणात वापरले तरी देखील आरोग्यासाठी पोषकच आहे. टोमॅटो सूपचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तसेच टोमॅटोची भाजी देखील लोक आवडीने खातात. टोमॅटोची चटणी, टोमॅटो सूप टोमॅटो सार, टोमॅटो सॉस इत्यादी. तर आज आपण अशी शक्तीवर्धक व पौष्टिक अशा टोमॅटो सूप रेसिपी विषयी माहिती पाहणार आहोत. तुम्ही अगदी सोप्या व सरळ पद्धतीने झटपट टोमॅटो सूप रेसिपी आपल्या घरी करू शकता. तर चला मग जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर माहिती.
पूर्व तयारी करता लागणारा वेळ :
टोमॅटो सूप करण्याकरता आपल्याला पूर्वतयारी करावी लागते आणि ही पूर्वतयारी करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
टोमॅटो सूप बनवण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढे लागतो.
टोटल टाईम :
टोमॅटो सूप रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला एकूण 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.
ही रेसिपी किती जणांकरिता आहे ?
ही रेसिपी आपण 6 जणांंकरिता करणार आहोत.
टोमॅटो सूप बनवण्यासाठी लागणारी सामग्री :
1) 500 ग्रॅम टोमॅटो प्युरी
2) एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
3) दोन लसणाच्या पाकळ्या किसलेल्या
4) एक मोठा चमचा लोणी
5) पाव कप जाड साय
6) काळीमिरी पावडर
7) चवीनुसार मीठ
8) 2 चमचे तेल
टोमॅटो सूप बनवण्याची पाककृती :
- सर्वप्रथम एक पॅन घेऊन त्यामध्ये लोणी व तेल गरम करण्यास एकत्र टाकावे.
- तेल गरम झाले की, त्यामध्ये कांदा घालावा त्यावर थोडेसे मीठ टाका नंतर कांदा पूर्ण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. कांदा कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे परतुन घ्यावा.
- कांदा परतून झाल्यानंतर किसलेला लसूण त्यामध्ये घालावा. नंतर ते परतून झाले की, किसलेले टोमॅटो किंवा तयार असलेली टोमॅटोची प्युरी त्यामध्ये घालावी.
- हे मिश्रण मध्यम आचेवर शिजवावे टोमॅटो चमच्याच्या मागील भागाने हलवून चांगले मिश्रण करून घ्यावे.
- टोमॅटो प्युरी टाकली असेल तर ती चमच्याने हलवत रहा व दहा मिनिटं ती शिजवून घ्या.
- नंतर गॅस मंद करा व टोमॅटो प्युरी एका दुसऱ्या पॅनमध्ये काढून घ्या. आता तुम्हाला टोमॅटो सूप पातळ पाहिजे असेल तर त्यामध्ये पाणी टाका किंवा घट्ट ठेवायचे असेल तर पाणी टाकू नका.
- गॅस मंदच ठेवा व त्यामध्ये मलाई घालून चांगले ढवळून घ्या.
- आता त्यामध्ये काळी मिरी मीठ घाला, तुम्ही तुमच्या गरजेनुसार सूपची चव जुळवून घेऊ शकता.
- हे सुख सजवण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा किंवा कोथिंबीरचाही उपयोग करू शकता.
- अशाप्रकारे गरमागरम टोमॅटो सूप तयार आहे.
टोमॅटो सूप मधील पोषक घटक :
टोमॅटोची चव प्रत्येकाला माहीतच आहे. आंबट चवीचे हे टोमॅटो सायट्रिक ऍसिड मुळे आंबट असतात. त्याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन व्हिटॅमिन फायबर मिनरल्स यांची मात्रा भरपूर प्रमाणात असते.
तसेच विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई आणि विटामिन के, मोठ्या प्रमाणात असते. टोमॅटो मध्ये कॅल्शियम, आयर्न, कॉपर, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस यांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये असणारे सर्व विटामिन्स आरोग्यासाठी खूपच पोषक मानली जातात. व ही सर्वच खनिजे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत.
फायदे :
टोमॅटो सूपचे फायदे पुढील प्रमाणे :
टोमॅटो सूप दिल्याने आपले शरीर आतून उबदार राहते तसेच वजनही कमी करण्यास मदत करते.
टोमॅटो सूप हृदय निरोगी ठेवण्याचे काम करते.
टोमॅटो सूप मधील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते. टोमॅटोमध्ये कॅल्शियम असल्यामुळे शरीरातील हाडे देखील मजबूत होतात.
टोमॅटो मधील लायकोपिन शरीरासाठी खूपच आरोग्यदायी आहे. यामुळेच कच्च्या टोमॅटोना लाल रंग येतो.
टोमॅटोमध्ये करबूदकाचे प्रमाण खूपच कमी असतील त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल, हृदय विकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो हा फारच गुणकारी आहे.
टोमॅटोमधील अँटिऑक्साइड हे गुण कॅन्सर व हृदयरोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करतात.
तोटे :
टोमॅटोचे जास्त सेवन केल्यामुळे ऍसिडिटी होऊ शकते तसेच तीन पेक्षा जास्त टोमॅटोचे सेवन केल्याने आपल्या पोटात दुखणे व गॅसेसचा देखील त्रास होऊ शकतो.
त्यामुळे टोमॅटोचा आपल्या जेवणामध्ये प्रमाणातच
उपयोग केला पाहिजे.
तर मित्रांनो, तुम्हाला टोमॅटो सूप ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
No schema found.