उपीट रेसिपी मराठी Upit Recipe in Marathi

उपीट रेसिपी मराठी Upit Recipe in Marathi  उपीट रेसिपी उपम्याचा प्रकार आहे. ही रेसिपी नाश्त्यामध्ये करण्याकरिता अत्यंत झटपट रेसिपी आहे. तसेच दररोजच्या नाष्ट्यांमध्ये आपल्याला वेगवेगळे पदार्थ तयार करायचे असतात. रोज एकच एक पदार्थ खाऊन कंटाळा येतो, म्हणून तुमच्याकरिता खास उपीट ही रेसिपी घेऊन आलो आहोत. ही खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तर चला मग या रेसिपी विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

 Upit Recipe

उपीट रेसिपी मराठी Upit Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

रव्यापासून तयार केलेले पदार्थ पौष्टिक असतात तसेच ते आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असतात कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिजे, प्रोटीन असतात. जे आपण सकाळच्या नाश्त्यांमध्ये खाल्ल्यामुळे आपल्याला दिवसभरचा थकवा जाणवत नाही. सकाळच्या नाश्त्यामध्ये शिरा, उपमा, पोहे, ढोकळा व डोसे इत्यादी पदार्थ आपण बनवत असतो परंतु उपीट ही रेसिपी तुम्ही कधी करून बघितली नसेल, तर ही रेसिपी अत्यंत सोपी व कमी साहित्यात तयार होते. रेसिपी तयार करण्याकरता कमी वेळही लागतो. ही रेसिपी रव्यापासून तयार केली जाते. ही रेसिपी उपमा या रेसिपीशी साम्य दाखवते. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरिता तयार होणार आहे ?
ही रेसिपी आपण तीन व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

या रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला किमान पाच मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

ही रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

उपीट ही रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला एकूण वेळ 15 मिनिटे एवढा लागतो.

उपीट ही रेसिपी तयार करण्याकरता लागणारे साहित्य :

1) एक वाटी रवा
2) एक चमचा तूप
3) शेंगदाणे
4) एक चमचा तेल
5) पाव चमचा मोहरी
6) पाव चमचा जिरे
7) चिमूटभर हिंग
8) बारीक चिरलेला एक मोठा कांदा
9) दोन हिरव्या मिरच्या
10) पाच ते सहा कढीपत्त्याची पाने
11) दोन वाट्या पाणी
12) चवीनुसार मीठ
13) एक चमचा साखर
14) बारीक चिरलेली कोथिंबीर

उपीट रेसिपी तयार करण्याची पाककृती :

  • कॉर्न पकोडे मराठी
  • उपीट रेसिपी तयार करण्याकरता सर्वप्रथम गॅसवर एक पॅन गरम करा. त्यामध्ये तूप घाला व रवा छान भाजून घ्या. तूप नसल्यास तुम्ही तेलही घालू शकता.
  • रवा छान सात-आठ मिनिटे भाजून घ्यावा. त्याला जास्त लाल होऊ देऊ नये. रवा भाजताना मंद आचेवर भाजून घ्या.
  • नॉनस्टिक पॅनमध्ये रवा भाजू नका कारण रवा भाजतांना तो सतत परतवत राहावा लागतो. त्यामुळे नॉनस्टिक पॅन खराब होऊ शकतो.
  • रवा भाजल्यानंतर पॅन खाली घ्या. व त्यातील रवा एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्या.
  • नंतर त्यामध्ये थोडे तेल घालून शेंगदाणे लालसर होईपर्यंत तळून घ्या. शेंगदाणे देखील दुसऱ्या भांड्यात काढून घ्या.
  • नंतर त्या तेलामध्ये मोहरी, जिरे टाका व छान तडतडू द्या. जिरे छान तडतडले की त्यामध्ये हिंग, कांदा घालून मिक्स करा व नंतर हिरवी मिरची व कढीपत्ता घाला.
  • हे मिश्रण छान पाच ते सहा मिनिटे होऊ द्या कांदा छान सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या.
  • आता भाजलेला रवा या मिश्रणामध्ये घालून त्यामध्ये गरम पाणी, मीठ आणि साखर घाला.
  • हे मिश्रण छान मिसळून घ्या, नंतर गॅस कमी करा.  तुम्ही तुमच्या चवीनुसार पाण्याचे प्रमाण बदलू शकता. नंतर दोन ते तीन मिनिटे मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजू द्या.
  • नंतर यावर कोथिंबीर घालून मिक्स करा. आता ही रेसिपी तयार आहे. सर्व्ह करताना वरून शेंगदाणे किंवा ताजे किसलेले खोबरे आणि कोथिंबीर तुम्ही घालू शकता.

पोषक घटक :

आपण अनेक रव्यापासून बनवलेले पदार्थ खात असतो ; परंतु यामध्ये कोणते पौष्टिक तत्त्व असते, हे आपल्याला माहिती नसतात. रवा किंवा सुजी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. तसेच त्यापासून तयार झालेले पदार्थ देखील पौष्टिक असतात. त्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम फायबर, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, ऊर्जा, कार्बोहायड्रेट, तसेच विटामिन बी सिक्स विटामिन बी 12 आणि व्हिटॅमिन ए डी असते जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.

फायदे :

उपीट ही रेसिपी मधुमेह रोगींसाठी उत्तम आहार आहे.
यामध्ये शुगर वाढण्याचा धोका नसतो, मैद्यामध्ये मात्र शुगर वाढण्याचा धोका जास्त असतो.

रवा रक्तातील शुगर शोषण्यासाठी वेळ घेतो, त्यामुळे शुगर लेवल कमी जास्त होण्याचाही धोका नसतो.

उपीट रेसिपीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. वजन वाढत नाही.

आहारात रव्याचे पदार्थाचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह कार्य सुरळीत चालते. हार्ट अटॅकचा धोका देखील टळतो.

उपीट रेसिपी खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते व ऊर्जा निर्माण होते.

तोटे :

उपीट रेसिपी रव्यापासून तयार केली जाते. रव्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे अति प्रमाणात आपण ही रेसिपी सेवन केली तर पोटदुखी किंवा मळमळचा त्रास आपल्याला होऊ शकतो.

ही रेसिपी आपण प्रमाणातच सेवन करायला पाहिजे अन्यथा आपल्याला हानी होऊ शकते.

तर मित्रांनो, तुम्हाला उपीट या रेसिपीविषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment