Elephant Information In Marathi आपण सर्व महाराष्ट्रात राहतो, लहानपणापासूनच आपण गणेशोत्सव साजरा करत आलो आहोत. गणेशोत्सवामध्ये आपण गणपतीची पूजा करतो गणपतीला आपण गजानन ही म्हणतो. गजानन म्हणजे गजमुख, गज म्हणजे हत्ती त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये पहिल्यापासूनच हत्तीला खूप महत्त्वाचे स्थान आहे.
हत्ती विषयी संपूर्ण माहिती Elephant Information In Marathi
भारतामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे प्रत्यक्षपणे हत्तीची पूजा केली जाते. आपल्याला हत्ती या प्राण्याची थोडीफार कल्पना असली तरी आपण आज हत्तीची रचना कशी असते याचा अभ्यास करूयात.
त्याच बरोबर हत्तीचा नैसर्गिक अधिवास, त्याची जीवनशैली व त्याचे मनुष्य बरोबर असलेले नाते व हत्तीची सध्याची परिस्थिती याचा अभ्यास करूयात.
हत्तीची रचना-
हत्तीला इंग्रजीमध्ये एलिफंट असे म्हणतात. पण एलिफंट हा मूळ लॅटिन भाषेतील एलिफस या शब्दातून आलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून वर्गीकरण केले तर हत्ती हा प्राणी गटात मोडतो त्याचबरोबर तो पाठीचा कणा असलेला प्राणी उपवर्गात मोडतो. हत्ती हा सस्तन प्राणी आहे .सर्वात मोठा अस्तित्वात असणारा प्राणी म्हणजे हत्ती होय.
हत्तीचे तीन प्रमुख प्रजाती आहेत आफ्रिकन जंगलातील हत्ती ,आफ्रिकन झुडूपातील हत्ती,आणि आशियाई हत्ती .त्यातील काही हत्तींच्या प्रजाती लोप पावत आहेत.
त्यामधील सरळ हस्तिदंताच्या हत्ती व मैमथ हत्ती हे लोप पावत आहेत.
आफ्रिकन हत्ती आणि आशियाई हत्ती मध्ये खूप फरक दिसून येतो. आफ्रिकन हत्तीचे कान मोठे असून पाठही अंतर्वक्र असते तसेच आशियाई हत्तीचे कान लहान असून पाठ बहिर्वक्र असते .
आफ्रिकन नर हत्ती 304 ते 337 सेंटिमीटर उंच असून आफ्रिकन मादा ही 247 ते 275 सेंटिमीटर उंच असते . आशियाई हत्ती प्रकारातील नर हा 289 सेंटिमीटर उंच असून आशियाई मादा हत्तीही 252 सेंटिमीटर उंच असते. हत्तीचे डोके हे अतिशय लवचिक असून लवचिक डोक्यामुळे हत्ती मध्ये हस्तिदंत यामुळे बसलेल्या धक्क्याचा कोणताही परिणाम हत्तीवर होत नाही.
हत्तीच्या डोक्याच्या कवटीमध्ये हवेची पोकळी असते. यामुळे त्याच्या डोक्याला लवचिकता आलेली असते. हत्तीचे कान हे सुपासारखे असून यामध्ये असंख्य रक्तवाहिन्या पसरलेल्या असतात. या रक्तवाहिन्यांमधून अनावश्यक उष्णताही वातावरणात फेकली जात असते. त्यामुळे हत्तीच्या शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. हत्तीचे कान हे अगदी कमी वारंवारतेची ध्वनी ऐकू शकतात.
आता आपण हत्तीच्या सोंडेबद्दल माहिती घेऊयात. हत्तीची सोंड म्हणजे नाक आणि वरचे ओठ यांचे एकत्रीकरण असते. हत्तीच्या सोंडेमुळे हत्ती हा सर्वात वेगळा प्राणी बनला आहे. तसेच त्याच्या मध्ये एकही हाडं असून अगदी कमी प्रमाणात मेद आहे. हत्तीची सोंड डोक्याच्या कवटीला जोडली गेलेली पहावयास मिळते. हत्तीची सोंड ही घनेंद्रिय असून त्याचा उपयोग श्वास घेण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी, व कोणत्याही गोष्टीचे आकलन करण्यासाठी तसेच आवाज निर्माण करण्यासाठी केला जातो.
सोंडेमध्ये जोरदार पकड करण्याची ताकत असते, पिळणे, व गुंडाळी करण्याची देखील क्षमता असते. हत्तीला 26 दात असून त्याचे दोन हस्तिदंत सूळ्यासारखे बाहेर दिसून येतात. हस्तिदंतासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणात आफ्रिका आणि आशिया खंडात शिकार केली जाते.
हत्तीची त्वचा ही राखाडी असून ती खूप टणक असते व त्वचेची जाडी 2.5 सेंटिमीटर असते. हत्तीच्या पिल्लाचे केस लालसर असून मुख्यतः डोके आणि पाठीवर हे केस असतात. मोठ्या हत्तीचे केस गडद रंगाचे असून नंतर विरळ होत जातात.
आशियाई हत्तींची त्वचा ही मोठ्या प्रमाणात केसांनी भरलेली असते या केसांचा उपयोग शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी केला जातो. आपण अनेक चित्रांमध्ये पाहिलेले असेल की हत्ती हे चिखलामध्ये लोळतात कारण ते शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी चिखलामध्ये लोळतात .चिखल हत्तीसाठी सन स्क्रीन लोशन प्रमाणे काम करतो .तसेच हत्तींचे अतिनील किरणांपासून संरक्षण केले जाते. चिखल हे हत्तींसाठी खूप महत्त्वाचे असते. चिखल स्नान केले नाही तर त्यांची त्वचा खूप मोठ्या प्रमाणात खराब होऊ शकते. त्वचा जळणे, कीटकांपासून होणारा त्रास आणि आद्रता याची कमतरता इत्यादि अडचणी जाणवू शकतात.
हत्तीचा अधिवास-
हत्ती हे झुडूपाळ जंगलं, वाळवंट व तसेच तलावांचा किनारी आणि समुद्रसपाटीपासून उंच डोंगराळ भागात पहावयास मिळतात. हत्ती हे मोठ्या प्रमाणात वाळवंटी आफ्रिका खंड, दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया या ठिकाणी आढळतात. हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे व तो पाण्याच्या शेजारील प्रदेशातच वावर करतो.
हत्ती झाडांची पाने, फळे, फांद्या आणि मुळे खातो तसेच तो एका दिवसाला दीडशे 150 किलो अन्न आणि 40 लिटर पाणी पितो.
हत्तीच्या जाती-
1.आफ्रिकन हत्ती- आफ्रिकन हत्ती अनेक प्रकारे आशियाई हत्ती पेक्षा वेगळे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे मोठे कान .आफ्रिकन हत्ती आशियाई हत्ती पेक्षा मोठे असतात. आफ्रिकन हत्तींच्या त्वचेवर नर आणि मादी या दोन्हींमध्ये हस्तिदंत दात आणि केस कमी असतात. साधारणपणे असे मानले जाते की या प्रजातीचे नाव जॅर्जेस क्युव्हीयर यांनी 1825 मध्ये ठेवले होते.
2.आशियाई हत्ती- हा आशिया खंडातील जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी आहे .राष्ट्रीय उद्यानांमध्ये पर्यटक आणि राईडसची वाहतूक करण्यासाठी देखील यांचा वापर केला जातो. आशियाई हत्ती त्यांच्या आफ्रिकन सवंगड्यांनी पेक्षा आकाराने लहान असतात. त्यांचे डोके त्यांच्या शरीराचा सर्वोच्च भाग असतो. त्यांची पाठ उंच किंवा सपाट असते त्यांचे कानही अफ्रिकन हत्ती पेक्षा लहान असतात. त्यांच्या शेपटीत वीस जोड्या आणि चौतीस हाडे असतात. आशियाई हत्तीच्या इतर तीन उपप्रजाती म्हणजे सुमात्रन हत्ती, श्रीलंकन हत्ती आणि बोनिर्यो हत्ती.
3.भारतीय हत्ती- आशियाई हत्ती च्या चार उपप्रजाती पैकी ही एक प्रजाती असून ही उपप्रजाती वियतनाम, थायलँड ,नेपाळ, म्यानमार, मलेशिया, लाओस, चीन, कंबोडिया, भूतान, पाकिस्तान ,बांगलादेश ,येथे आढळते. भारतीय हत्ती झाडाझुडपांच्या जंगलांत राहत असून इतरत्रही आढळतात. ते भटक्या स्वभावाचे असून जास्त दिवस एका ठिकाणी राहू शकत नाही. ते जंगलात राहू शकतात परंतु मोकळ्या ठिकाणी आणि गवताळ ठिकाणी जाणे पसंत करतात. भारतीय हत्ती आशियाई हत्तींची उपप्रजाती असल्याने त्यांच्यात फारसा फरक नाही.
हत्तीचा मानवी जातीशी असलेला संबंध-
हत्तीला कामगार प्राणी देखील म्हणटले जाते,कारण हती हा माणसांच्या बऱ्याच कामांमध्ये मदत करतो.लाकूड वाहतूक करणे,रस्त्यानं मधून किंवा पाण्यात अवजड वस्तूंची वाहतूक करणे,राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना पाठीवर बसून फिरवले जाते, अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये पालखी सोहळ्यांमध्ये हत्तींचा उपयोग केला जातो इत्यादी .बरीच कामे हत्तींकडून केली जातात.
त्याचबरोबर हस्तिदंत, हत्तीच्या मांसा साठी सुद्धा हत्तीची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. हत्तीच्या हस्तिदंत याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अनधिकृतपणे व्यवसाय देखील केला जातो.
हत्तींची घटत चाललेली संख्या- सण 1979 मध्ये 1.3 दशलक्ष इतकी हत्तींची संख्या होती. पण सन 1989 पर्यंत ती 74 टक्क्यांनी घटली. सन 2000 आशिया खंडात 13000 ते 16500 हत्ती हे कामासाठी वापरण्यात आले होते. भारतामध्ये कामगार हत्तींची संख्या हे संशयित रित्या फक्त मोठ्या प्रमाणात त्रास देण्यासाठीच पकडले जायचे असे सरकारच्या निदर्शनास आले .
त्यामुळे प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा 1960 च्या अंतर्गत हत्तींना संरक्षण देण्यात आले .भारत सरकार किंवा कोणत्याही देशाचे सरकार प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी निरनिराळे कायदे बनवत आहे .त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाने ही कोणत्याही प्राण्याची क्रूरतेने शिकार किंवा त्यांना त्रास देऊ नये.
हत्तीबद्दल मजेदार माहिती –
- हत्तींच्या मेंदूचे वजन हे 4.5 ते 5.5 किलो असते तसेच हृदय हे 21 किलोग्राम पर्यंत असते.
- हत्ती दिवसातून तीन ते चार तास झोप घेतात आणि एका दिवसात दहा ते वीस किलोमीटरचा प्रवास करतात.
- हत्तीच्या सोंडेत वेगवेगळे स्नायू असतात .
- हत्ती सौम्य प्रकाश सात पाहू शकतो पण अगदी प्रखर प्रकाशात हत्ती पाहू शकत नाही.