मुंगूस प्राण्याची संपूर्ण माहिती Mongoose Information In Marathi

Mongoose Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण मुंगूस या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. या लेखात आपण मुंगूस या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे, मुंगूस कुठे राहतात, ते वास्तव्य कसे करतात, त्यांचे प्रकार किती आहेत?

Mongoose Information In Marathi

मुंगूस प्राण्याची संपूर्ण माहिती Mongoose Information In Marathi

आज आपण अशा प्राण्यांची माहिती पाहणार आहोत जो मूळचा आफ्रिका खंडातील आणि नंतर युरोप आशिया खंडात स्थायिक झालेला साधारण राखाडी भुरकट रंगाचा लाल डोळ्याचा आणि झुबकेदार शेपूट असणारा आपल्या भारतात सर्वत्र आढळणारी जात म्हणजे “मुंगूस” या प्राण्याची माहिती पाहणार आहोत.

हा एक सस्तन प्राणी आहे. मुंगसाचा समावेश स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गातील मांसाहारी गणाच्या हर्पेस्टिडी कुलात होतो. आफ्रिकेत, आशियात आणि यूरोपात मिळून त्यांच्या ३३ जाती आढळतात. त्यांपैकी बऱ्याच जाती आफ्रिकेत आढळतात. भारतात त्यांच्या सहा जाती असून त्यांपैकी सर्वत्र आढळणाऱ्या मुंगसाचे शास्त्रीय नाव “हर्पिस्टिस एडवर्डसी” आहे.

मुंगूसांचा अधिवास दक्षिण, आशिया आणि आफ्रिका आहे.मुंगूस हे जगभरात सगलीकडे पहावयास मिळतात.गोलाकार कान, गंधयुक्त गुदद्वारासंबंधीचा ग्रंथी आणि इतर प्राण्यांमधील मुंगूसमधील काही फरकांमुळे हे कुटुंब व्हिव्हरिड कुटुंबापासून वेगळे होते.

हर्पेस्टिडे कुटुंबातील हे प्राणी जास्त करून छोटे छोटे प्राणी मारून त्यावर आपली उपजीविका करतात; तर बहुतेक सर्वच सिव्हेट्स् शाकाहरी आहेत. मुंगूसांच्या दाताच्या विशेषत्वाने तीक्ष्ण सुळे व दाढा यांच्या रचनेवरून देखील आपल्याला ती शाकाहारापेक्षा मांसाहार जास्त पसंत करतात हे दिसून येईल. मांजरे अथवा सिव्हेट्स्प्रमाणे मुंगूसे लपूनछपून मागच्या बाजूने आपल्या भक्ष्यावर हल्ला न करता सरळ उघडपणे पुढून हल्ला चढवितात.

वर्णन

भारतातील मुंगसाच्या शरीराची लांबी 34 ते 45 सेंटिमीटर असते शेवटी जवळ जवळ शरीरा एवढीच लांब असते. शरीराचा रंग पिवळसर तपकिरी असून पोटाकडचा रंग फिकट असतो. अंगावर केस असतात. याचे केस कबरे असून त्यांचा रंग पिवळसर तपकिरी असतो.

मुंगुस खवळले म्हणजे त्याचे केस उभे राहतात. ज्या अवस्थेत ते असेल त्यापेक्षा आकाराने मोठे दिसते. तोंड निमुळते , कान लहान आणि पाय आखूड असतात. दात आणि पंजे अतिशय तीक्ष्ण असतात. नर हा मादीपेक्षा मोठा असतो .मुंगूस या प्राण्याच्या शरीराची लांबी 70 सेमी पर्यंत असते.शेपटीची लांबी 35 सेमी पर्यंत असते. प्रौढ नराचे वजन एक किलोग्राम पर्यंत असते. नर मादीपेक्षा लक्षणीय मोठे असतात, ज्यांचे वजन 650 ग्रॅमपेक्षा जास्त नसते.

मुंगूसांचा अधिवास

मुंगूसांचा अधिवास दक्षिण, आशिया आणि आफ्रिका आहे.

हे प्राणी दक्षिण आफ्रिका, नामिबिया, लेसोथो, दक्षिण आफ्रिकेच्या उत्तरेकडील प्रांत आणि दक्षिण अंगोलामध्ये आढळताय.या प्रदेशांच्या जवळजवळ कोणत्याही प्रदेशात हे प्राणी दिसून येतात. ते जंगले, झुडूप आणि अर्ध-वाळवंटातही राहू शकतात. या प्राण्यांना ओले आणि कोरडे दोन्ही हवामान चांगले सहन होते.. राखाडी मुंगूसाचा सर्वात पसंतीचा प्रदेश म्हणजे नद्यांचे किनारे आणि डोंगर उतार, दाट झुडुपे.

भारतीय तपकिरी मुंगूस प्रामुख्याने पश्चिम आशिया आणि भारतीय उपखंडात आढळतो, हा तपकिरी मुंगूस सामान्यतः खुल्या जंगलात, मैदानात आणि लागवडीच्या शेतात आढळतो.

मुंगूस प्राण्याचे अन्न

दक्षिण आफ्रिकन मुंगूसाचा आहार कीटक आणि अर्कनिड्स तसेच लहान उंदीर आहे. कधीकधी, हा शिकारी पक्षी, सरपटणारे प्राणी आणि उभयचरांवर हल्ला करू शकतो.

लहान सस्तन प्राणी, उंदिर, पक्षी व त्यांची अंडी ,साप ,विंचू बेडूक व कीटक हे मुंगूसाचे  प्रमुख भक्ष आहेत. अंड्याला भोक पाडून ते अंड्यातील बलक शोषून घेते ते कधीकधी कंदमुळे व फळे ही खातात .ते जरी शाकाहारी अन्न घेत असते तरी मांसाहारी आहेत. माणसाचे तुकडे करण्यासाठी आणि खाण्यासाठी त्यांचे दात तीक्ष्ण असतात.

शिकार करताना, राखाडी मुंगूस हल्ला करून शिकार करण्याच्या प्रतीक्षेत असतो आणि डोक्याच्या भागात फेकून आणि मानेला चावून मारतो. हे किडे आपल्या पंजेने पकडून खातात आणि तोंडात आणतात. दैनंदिन प्राणी म्हणून, तो सूर्यास्तानंतर शिकार करणे पूर्णपणे थांबवतो.मुंगूसाचा बहुतेक वेळ हा अन्नाच्या शोधात असतो.

याव्यतिरिक्त, या प्राण्यांच्या आहारात कीटक आणि अळ्या यांचा समावेश होतो. वेगळे मुंगूस प्रजातीपाणवठ्याजवळ राहणारे क्रस्टेशियन्स जसे की खेकडे आणि मोलस्क खातात.

काही प्रजाती सर्वभक्षी आहेत आणि प्राण्यांच्या अन्नाव्यतिरिक्त, वनस्पती, फळे, बेरी, नट आणि विविध बिया खातात.

वीण हंगाम

मुंगूसाच्या विणीचा ठराविक कालावधी नसतो. प्रजनन हंगाम ऑगस्ट ते डिसेंबर या काळात असतो मादीला प्रत्येक खेपेला दोन किंवा तीन पिल्ले होतात. माझी झुळपाखाली किंवा इतर झाडांच्या खोडात मादि पिलाला जन्म देते. प्राण्यांचा गर्भावस्थेचा कालावधी निश्चित नसतो. पिलांचे संगोपन मादी करते. साधारणपणे सात महिन्यात त्यांची पूर्ण वाढ होते व पिल्ले स्वतंत्रपणे जगू शकतात.

बाळाच्या जन्मासाठी, मादी नैसर्गिक आश्रयस्थानांमध्ये गुहेची व्यवस्था करते.

तरुण मुंगूस चार महिन्यांनंतर पूर्णपणे स्वतंत्र होतात.

मुंगूसाचे प्रकार

आपल्या भारतात सर्वत्र आढळणारी जात म्हणजे, *देशी मुंगूस* हा मुंगूस त्याच्या शेवटी सकट साधारण तीन फूट लांब असतो. देशी मुंगूस मानवी वस्त्यांच्या जवळ राहतो. भुरकट काळसर रंगाचा मुंगूस म्हणजे *रान मुंगूस* रान मुंगूस त्याच्या शेपटीमुळे ओळखता येते.

तो मध्य भारत आणि जास्त दक्षिण भारतातल्या जंगलांमध्ये आढळून येतो. देशी मुंगुसा च्या अर्ध्या आकाराचे *धाकले मुंगूस* जे आपल्या उत्तर भारतात आढळते. ही जात ब्रह्मदेश ,मलेशिया अफगाणिस्तानच्या मोठ्या पट्ट्यात सहज मिळते.

याच्या उलट सर्वात मोठे असलेले मुंगूस म्हणजे *थोरले मुंगूस* हे आपल्या देशाच्या फक्त दक्षिण भागात डोंगराळ भागात मिळते हे मुंगूस तीन साडेतीन फूट लांब  एवढे वाढणारे सर्वात मोठे आहे.

थोरल्या मुंगुसाला त्याच्या कानापासून मानेवर गेलेल्या काळ्या चट्ट्यामुळे  ओळखता येते. सावळे मुंगुस हे दक्षिण पट्ट्यात श्रीलंकेमध्ये मिळते. पान मुंगूस हे दक्षिणी डोंगर रांगा आणि श्रीलंकेत पाहायला मिळते. त्याला ओळखण्याची खूण

म्हणजे त्याच्या शेपटी वर केस नसतातआणि थोरल्या  मुंगूसाच्या  अगदी उलट त्याच्या तोंडापासून कानाखालून मानेपर्यंत पांढरा पट्टा दिसतो.

महाराष्ट्रात मुंगूसांच्या दोन जाती दिसून येतात. त्यांची सविस्तर माहिती आता आपण पाहू.

सामान्य मुंगूस

(कॉमन मुंगूस) सामान्य मुंगूस भारतात उत्तरेस हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेस थेट कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळून येते. मुंगूस हा प्राणी केवळ दाट जंगलातच आढळून येत नाही तर, तो उघडी माळराने, खुरट्या झुडूपांची जंगले तसेच लागवडीखाली असणारे प्रदेश अशा सर्व ठिकाणी आढळतो. पूर्ण वाढलेल्या मुंगूसाची शेपटीसकट लांबी साधारणपणे ९० सें.मी. पर्यंत असते. नुसते शेपूट जवळजवळ ४५ सें.मी. लांब असते. वजन सरासरी १॥ कि.ग्रॅ. पर्यंत असते.

नराचे वजन साधारणतः मादीपेक्षा जास्त भरते. याचा रंग साधारणतः पिवळसर राखाडी असतो. त्याचा प्रत्येक केस पाहिला असता त्यावर काळसर व राखाडी अशा रंगाचे पट्टे असलेले दिसून येतात. त्यामुळे एकंदरीत त्याचा रंग वाटलेले काळे मिरी व मीठ यांच्या मिश्रणासारखा दिसतो. शेपटीचे टोक पांढरट किंवा लालसर पिवळट असते. महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशातील जंगलात आढळून येणारी मुंगूसे उन्हापासून संरक्षण म्हणून मोठीमोठी बिळे खोदून त्यात राहतात. तसेच ती खडकाकपारीचा किंवा मोठमोठ्या झाडांच्या बुंध्यांचा देखील रहावयास उपयोग करतात.

शेतीच्या अथवा लागवडीच्या भागांतील मुंगूसे कुंपणाचा अथवा बांधाचा उपयोग रहावयास करतात.ही मुंगूसे दिवसा अथवा रात्री केव्हाही भक्ष्य शोधावयास बाहेर पडतात. सामान्य मुंगूसे बहुधा जोडीने अथवा कुटुंबासकट शिकारीसाठी बाहेर पडताना दिसून येतात.

उंदीर, घुशी, साप, पाली, बेडूक, गोम, विंचू, कीटक इ. जे मिळेल त्यावर ताव मारतात. केंव्हा केव्हा पक्ष्यांची अंडी देखील मिळाल्यास फस्त करतात, कधीकधी झाडपाल्याची मुळे, फळे असा शाकाहारही करतात. कधीकधी इतर मोठ्या प्राण्यांनी मारलेल्या शिकारीवर देखील जमल्यास हात मारतात.

गावाकडील मनुष्यवस्तीच्या आसपास वावरणारी मुंगूसे केंव्हा केव्हा पाळीव कोंबड्या, कबुतरे ठार मारतात.महाराष्ट्रातील त्या जातीची मुंगूसे वर्षभरात केव्हाही प्रसवताना दिसून येतात.

साधारणतः एक मादी वर्षभरात तीन वेळा तरी पिले प्रसवते. गर्भधारणेचा काल साधारणतः ६० दिवस म्हणजे दोन महिने असलेला दिसून येतो. ही मुंगूसे पाळल्यास लवकरच माणसाळतात..

रुडी मुंगूस

महाराष्ट्रात सापडणारी मुंगूसांची दुसरी जात जास्त करून दाट जंगलांमध्ये सापडते. त्याला इंग्रजीमध्ये ‘रुडी मुंगूस’ असे नाव आहे. ही मुंगूसे दिसावयाला अगदी सामान्य मुंगूसाप्रमाणेच असतात परंतु यांच्या शेपटीचे टोक मात्र सामान्य मुंगूसाप्रमाणे पांढरट किंवा पिवळट लालसर नसून ते काळे असते.

या फरकावरुन ती सहज ओळख येतात. त्याचे खाणे पिणे व रहाण्याच्या इतर सवयी बऱ्याचशा सामान्य मुंगूसासारख्याच असतात. परंतु या जातीची मुंगसे विशेषकरुन जंगलात राहणे पसंत करीत असल्यामुळे सहसा ती गावाच्या आसपास आढळून येत नाहीत.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment