Cat Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण मांजर या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. या लेखात आपण मांजर या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे, मांजर कुठे राहतात, ते वास्तव्य कसे करतात, त्यांचे प्रकार किती आहेत?
मांजर प्राण्याची संपूर्ण माहिती Cat Information In Marathi
आज आपण जिला वाघाची मावशी असे म्हणतो अशा प्राण्याविषयी म्हणजेच मांजरी विषयी माहिती पाहणार आहोत. प्राचीन ईजिप्शियन लोकांनी चार हजार वर्षापूर्वी मांजरी पाळल्या. ईजिप्शियन माउ ही जगातील सर्वात जुनी मांजराची जात मानली जाऊ शकते. असा अंदाज आहे त्यांचे पूर्वज चार हजार वर्षापूर्वी प्राचीन इजिप्तमध्ये निर्माण झाले असावे.
मांजर ही जगातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राणी आहे. लहान मुले किंवा मोठी माणसे आवडीने तिला “मनीमाऊ” असेही म्हणतात . मांजर पाळण्यामध्ये ईजिप्शियन लोक जगात सर्वात पुढे होते पण नुकत्याच भूमध्य प्रदेशातील सोयप्रसमध्ये झालेल्या शोधात जगातील पहिली पाळीव मांजर 9500 वर्षे जुनी असल्याचे उघड झाले आहे.
मांजरी विषयी प्राथमिक माहिती
मांजर ही जन्मतः पासून भांडखोर वृत्तीची असते. मांजर हा प्राणी केवळ आजच्या युगातच लोकप्रिय नाही तर हा प्राणी वर्षानुवर्ष लोकांचा आवडता पाळीव प्राणी आहे. मांजर ही फेलिडे कुळातील आहे. मान दिला इंग्रजीमध्ये कॅट म्हणतात. मांजराच्या पिल्लाला किटन म्हणतात मांजर हा प्राणी असा आहे जो सर्वत्र आढळतो.
बऱ्याच वेळेला मांजर काळ्या, तपकिरी किंवा पांढर्या रंगामध्ये पाहायला मिळते. मांजराला झोप ही खूप प्रिय आहे त्यामुळे ती दिवसभरामध्ये सुमारे 10 ते 11 तास विश्रांती घेते आणि रात्री देखील झोपते म्हणजेच मांजर दिवसा आणि रात्री एकूण 12 ते 16 तास झोप काढते.
माणसाच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात परंतु मांजराच्या शरीरात 280 हाडे असतात मांजर ही दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रिय पाळीव प्राणी ठरली आहे कारण 95 दशलक्ष मांजरीची मालकी अमेरिकेतील लोकांकडे होती. मांजर ही एक सामाजिक प्रजाती आहे. मांजर आपल्या उंचीच्या तीन पट उंचीवर उडी मारून सुरक्षित अवस्थेत परत जमिनीवर येते. मांजराच्या समूहाला Clowder म्हणतात. ग्रामीण भागामध्ये मांजराच्या नर जातिला बोका असे म्हणतात. जास्त करून पांढऱ्या रंगाचे मांजर पाळण्यात लोकांना खूप आवडते.
मांजराची शरीर रचना
मांजराच्या शरीराची रचना इतर प्राण्यांसारखे असते. मांजराला चार पाय ,दोन डोळे, दोन छोटे कान, एक तोंड आणि एक शेपूट असते. बऱ्याच वेळा मांजर ही काळ्या, तपकिरी किंवा पांढरा रंगांमध्ये पाहायला मिळते. मांजराचे डोळे एकदम तेजस्वी असतात. तिचा चेहरा दिसायला वाघासारखा असतो.
मांजरीचे डोळे इतके तीक्ष्ण असतात की त्यांना रात्री देखील अगदी स्पष्ट दिसू शकते. मांजरांना 29 दात असतात तर मांजरांच्या पिल्लांना एकूण 26 दात असतात. हे दात काही प्रमाणात विषारी देखील असतात .मांजरीचे पंजे खूप तीक्ष्ण असतात व त्याला नखे असतात.
त्यांचा वापर ती शिकार करण्यासाठी करते. मांजरीचे दोन्ही कान इतके तीक्ष्ण असतात की ते अगदी कमी आवाज ऐकू शकतात. मांजरीच्या तोंडाच्या दोन्ही बाजूंना असतात जे खूप छान दिसतात मांजरीच्या शरीरावर लहान लहान मऊ केस असतात.
मांजराचे शरीर मऊ केसांनी झाकलेले असते. मांजराचे शरीर उबदार असते. मांजरीच्या पायाच्या खालच्या भागावर लेदर असते हे लेदर खूप जाड असते त्यामुळे ती चालते तेव्हा आवाज होत नाही. मांजराचे नाक छोटे आणि लालसर असते .अंधारामध्ये माणसाचे डोळे चमकतात. अंधारामध्ये सुद्धा मांजर सर्वकाही पाहू शकते. मांजर रंगाला व्यवस्थित प्रकारे पाहू शकत नाही, त्याला गवत लाल रंगाचे दिसते.
मांजराचा जबडा डाव्या आणि उजव्या बाजूला फिरू शकत नाही त्यामुळे मांजर अन्नाचा मोठा तुकडा खाऊ शकत नाही. मांजराच्या पाठीमागच्या पायांमध्ये चार पंजे असतात. मांजराच्या दोन्ही कानांमध्ये मिळून बत्तीस मासपेशी असतात. मांजर आपल्या दोन्ही कानाला दोन वेगवेगळ्या दिशेमध्ये फिरवू शकते. मांजराच्या शेपटीमध्ये त्याच्या शरीरातील एकूण हाडांमधील दहा टक्के भाग असतो. मांजर आपले अन्न चावत नाही परंतु ती न चावता गिळते आणि पचन सुद्धा करू शकते. मांजर 30 मैल प्रतितास या वेगाने धावू शकते.
मांजरीचा आहार
मांजर हे शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे अन्न खाऊ शकते म्हणजे ती सर्वभक्षी प्राणी आहे मांजराला विशेष करून उंदीर खायला खूप आवडते.
मांजरी बद्दल तथ्ये
जगातील सर्वात महागडी कॉफी इंडोनेशियातल्या एक प्रकारच्या वन्य जातीतल्या मांजरीच्या ‘शी’ पासून बनवली जाते. या कॉफीसाठी प्रत्येकी ५०० ग्रॅमसाठी १०० ते ६०० डॉलर (६८०० ते ४०८०० भारतीय रुपये) किंमत मोजावी लागते.
दर वर्षी ४० हजार मांजरीना आशियाई देशांमध्ये खाऊन फस्त केली जातं.मांजर जवळ जवळ १०० प्रकारचे आवाज काढू शकते तर कुत्रा फक्त १० प्रकारचे आवाज काढू शकतो.
असं म्हणतात की मांजर पाळण्यामध्ये इजिप्शियन लोक जगात सर्वात पुढं होते. पण नुकत्याच भूमध्य प्रदेशातील सायप्रसमध्ये झालेल्या शोधात जगातील पहिली पाळीव मांजर ९५०० वर्ष जुनी असल्याचे उघड झालं आहे.
‘फेलिसिटी’ नावाची फ्रेंच मांजर अवकाशात जाणारी पहिली मांजर होती. संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी १९६३ साली फेलिसिटीला अवकाशात पाठवले होते.
हिंदू शास्त्राप्रमाणे कोणत्याही व्यक्तीच्या हातून जर मांजराची हत्या झाली तर त्याला काशीला जाऊन सोन्याची मांजर घडवून त्याचे दान करावे लागते. असे म्हटले जाते कीजर काळ्या मांजरीने तुमचा
रस्ता ओलांडला तर ते चांगले मानले जात नाही. मांजरीने आधी रस्ता ओलांडला तर लोक आणि कार पुढे जाण्यास नकार देतात. जेव्हा ती काळी मांजर असते तेव्हा ते अधिक वाईट मानले जाते. वाईट शगुन दुर करण्यासाठी प्रवासी थुंकतात आणि नुकसान पूर्ववत करण्यासाठी वाहनचालक विंड शील्डच्या उजव्या बाजूला लहान क्रॉस करतात. काही जण वाट पाहत असतात जेणेकरुन ते वाचले जातील तर काहींना आता ‘रस्ता ओलांडणाऱ्या मांजरीचा शाप’ सहन करावा लागतो.
मांजराच्या चेहऱ्यावर आणि शेपटाच्या भागात विशिष्ठ प्रकारचे गंध सोडणाऱ्या ग्रंथी असतात. त्या मार्फत मांजर आपली जागा निश्चित करते.
प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत पाळीव मांजराच्या मृत्यूनंतर त्याचा रीतसर दफनविधी करण्याची प्रथा होती. मांजराच्या शरीराचे ‘ममी’ मध्ये रुपांतर करण्यात येत असे.
‘हॅमलेट’ सर्वात जास्त प्रवास करणारी मांजर होती. हॅमलेट एका विमानाच्या पॅनलमध्ये आढळली होती. जेव्हा तिची सुटका करण्यात अली तोपर्यंत तिने ६ लाख किलोमीटरचा प्रवास केला होता.
युरोप आणि उत्तर अमेरिका भागात काळी मांजर अशुभ मानली जाते तर ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया भागात काळी मांजर चांगल्या नशिबाचं लक्षण समजली जाते.
मांजर १ ते ९ पिल्लांना जन्म देऊ शकते. आजतागायत सर्वात जास्त १९ पिल्लांना जन्म देण्याचा रेकॉर्ड आहे. यातली फक्त १५ मांजरं पुढे जिवंत राहिली.
मराठीत पुरुष मांजराला बोका म्हणतात आणि मांजरीला (स्त्री) भाटी म्हणतात.