हरिन प्राण्याची संपूर्ण माहिती Deer Information In Marathi

Deer Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा प्राण्यांची माहिती पाहणार आहोत जो अतिशय गरीब, आखीवरेखीव, बांधेसूद, डोळ्यांतील नजरेत पाहिल्यावर दिसणारी करुणा, निरागसपणा असा वर्णन असलेला प्राणी म्हणजे हरीण. आपण ज्याला ओळखतो तो हरिण म्हणजे सोनेरी रंगाचा आणि अंगभर पांढरे ठिपके असलेला नाजूक असा हरिण. आज ह्याच हरणा बद्दल आपण थोडी माहिती पाहणार आहोत.

Deer Information In Marathi

हरिन प्राण्याची संपूर्ण माहिती Deer Information In Marathi

हरणा बद्दल प्राथमिक माहिती

त्यांचे अस्तित्व हा जैविक साखळी मध्ये फार महत्त्वाचा दुवा आहे .याचे शास्त्रीय नाव अँटिलोप सर्व्हिकॅप्रा असे आहे. ते भारतीय हरीण म्हणूनही ओळखले जाते. त्याला युरोपीयांनी पहिल्यांदा हरिण हे नाव दिले. हरीण हे घनदाट जंगलात किंवा अरण्यात दिसून येतात. हरिन जगातील सर्व खंडांमध्ये आढळून येतो.

तो दरवर्षी आपली शिंगे टाकतो आणि त्याजागी नवीन शिंगे येतात. नवीन हरणाला शिंगे जन्मानंतर दोन वर्षानंतर विकसित होऊ लागतात. अंटार्टिका सोडले तर सर्व खंडांवर हरीण पाहायला मिळतात. नर हरणाला Buck म्हणतात. परंतु आकाराने मोठ्या असणार्‍या नरांना Stages म्हणतात. माता हरिणाला Doe किंवा Hind म्हणतात. एका युवा हरणाला Fawn म्हणतात.

हरणाची सर्वात मोठी प्रजाती आयरिश विशालकाय हिरण ही आहे. दक्षिणी पुडु ही हरिनाची सर्वात लहान प्रजाती आहे. हरीण प्राण्याची फक्त एक प्रजाती रेनडिअर पाळीव आहे. हरीण हे पहिल्यांदा युरोपमध्ये दक्षिणेकडील भागात आढळले आणि नंतर ते पूर्व आशियातील आणि आफ्रिकेतील दक्षिण भागात पसरले.

मध्य मायोसीन काळातील प्राचीन हरिणाचे जीवाष्म फ्रान्समध्ये आढळले. हरिण हा प्रगत  समखुरी प्राणी आहे. हा प्राणी चपळ परंतु स्वभावाने भित्रा असतो. दिसायला छान असून लहान मुलांना फार आवडतो. हरणाला “सारंग मृग” असेही म्हणतात. पुराणात हरणाच्या अनेक कथा आहेत.

हरणाची शारीरिक रचना

हरणांच्या जातीनुसार त्यांचे रूप, रंग दिसायला वेगळे असतात. सामान्यतः आपण ज्याला हरीण म्हणून ओळखतो. ते हरीण म्हणजे सोनेरी पिवळ्या रंगाचे अंगभर पांढरे ठिपके असलेले असते. हे हरीण शेळी, बकरी पेक्षा उंचीने थोडेसे मोठे असते. त्याचा रंग सोनेरी ,पिवळा, लालसर असतो.

हरनाचे रंग  निसर्गाशी मिळते जुळते असतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात रंग अधिक गडद तर उन्हाळ्यात तो फिका पडतो. तोंड निमुळते असते. दोन उभे कान असून ते लंबाकृती असतात. तर शेपटी लहान असते. चार पाय असून ते काटकुळे असतात. डोळे सर्वात मोठे ते मात्र सुंदर असतात. मादीला शिंगे नसतात. तर नराला शिंगे असतात. शिंगांना फाटे फुटतात ,काहींची शिंगे गळून पडतात.

आहार

हरीण हा शाकाहारी प्राणी आहे.  तो कवळे लुसलुशीत गवत, कोवळा झाडपाला, शेतातील पिकांची पाने ,शेंगा ही खातात. हरिण सहसा पचण्यास योग्य अशी कवळी पाने, गवत ,फळ बुरशी आणि लायसेन्स निवडतात.

राहण्याचे ठिकाण

हरिण हा कळपाने राहणारा प्राणी आहे.हरिण पर्वतीय क्षेत्रापासून ते उष्ण आणि बर्फाळ प्रदेशात सुद्धा राहू शकतो खुरटी जंगले, माळरान, गवताळ कुरणे किंवा मोठ्या झाडाखाली हरणांचे वास्तव्य असते. जगातील अनेक ठिकाणी हरणे सापडतात. तसेच घनदाट अरण्य, जंगलं ,वाळवंटी प्रदेश, दलदलीचा प्रदेश ,मैदानी प्रदेश व पर्वताच्या उतरणीवर सुद्धा दिसून येतात. आफ्रिका येथे मोठ्या प्रमाणावर हरीण आढळून येतात. तसेच दक्षिण आशियात सर्वत्र त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे.

पुनरुत्पादन

हरणीचा प्रजनन काळ फेब्रुवारी ते मार्च मध्ये असतो. हरणांचा  गर्भधारणा कालावधी 180 ते 240 दिवसांचा असतो. मादीला एक किंवा दोन पिल्ले होतात. आई बरोबर चालण्याइतके सक्षम होई पर्यंत ते पिल्लू मादी जवळ राहते .मादी व त्याचे पिल्लू जवळ जवळ एक वर्ष एकत्र राहतात. हरणाचे पिल्ले जन्मल्यानंतर दहा मिनिटांमध्ये उभी राहू शकतात. आणि 7 तासानंतर चालू शकतात.

हरणांचे प्रकार

हरिणाचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक सारंग हरीण (Cervidae) आणि दुसरे कुरंग हरीण

(Antelope)

सारंग हरीण

सारंग हरिण उर्फ़ सारंगाद्य कुळ, यात सांबर, चितळ, कस्तुरी मृग, बाराशिंगा, भेकर, थामिन, रेनडियर, मूस, काश्मिरी हंगूल, भुंकरे सारंग, पारा हरीण (Hog Deer) तसेच पिसोरी इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांची दरवर्षी जुनी शिंगे गळून जातात व नवीन शिंगे उगवतात.

सारंग हरणे ही बहुतांशी अमेरिका अशिया व युरोप खंडात आढळून येतात. अफ्रिकेत प्राण्याचे अस्तित्व प्रचंड असले तरी तिथे सारंग हरणे नाहीत. सारंग हरणे ही मुख्यत्वे दाट ते घनदाट जंगलात आढळतात. शुष्क व वाळवंटी प्रदेशात त्यांचा वावर आता दिसत नाही.सारंग हरीण हा सस्तन कुळातील प्राणी आहे.

यातील प्राण्यांच्या पायांना मुख्यत्वे विभाजित खूर असतात अथवा दोन टाचा असतात. हरणांची दोन मुख्य उपकुळे आहेत. सारंग व कुरंग ही दोन्ही हरणे दिसावयास सारखी असली तरी दोन्हीमध्ये मूलभूत फरक आहे. मुख्य फरक हा शिंगामध्ये असतो.

शिंगे

सारंग हरणांची शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. शिंगे ही फक्त नरांना असतात. माद्यांना नसतात. नरांची ही शिंगे भरीव असतात व त्यांना अनेक टोके असतात. पुढे एक टोक असते व मागील बाजूस आणखी टोके असतात. मागील बाजूच्या टोकांची संख्या दोन किंवा अधिक टोकांची संख्या असते. सांबर व चितळांमध्ये पुढे एक व मागे दोन अशी तीन टोके असतात. बाराशिंगाला मागील बाजूस सहा ते आठ टोके असतात.

ही शिंगे वर्षातून एकदा गळून पडतात व पुन्हा उगवतात. शिंगाची वाढ होत असताना त्यावर मखमलीचे आवरण असते. त्यामध्ये रक्तवाहिन्याचे जाळे असते. या काळात हरणे इतर नरांशी संघर्ष टाळतात. शिंगाची पूर्ण वाढ झाल्यावर मखमलीचे आवरण वाळून जाते व पोपडे पडतात. या काळात नर हरणे झाडांवर व दगडांवर आपली शिंगे घासून ही पोपडे काढून टाकतात व वीणीच्या हंगामासाठी तयार होतात.

वीणीच्या हंगामात नर हरणे इतर हरणांशी संघर्ष करण्यात उत्सुक असतात. एकमेकांशी शिंगे अडकवून नर एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करतात. अंतिम विजयी नर हा मादीचा अधिपती होतो. असे नाही की सर्वच नरांना शिंगे असतात. काहींना नसतात अशी हरणे साहजिकच मादीच्या कळपावर हक्क सांगण्यास असमर्थ असतात. परंतु काही

शिंगरहित नरही वेगळे डावपेच वापरून इतर नरांना आव्हान देत असतात

कुरंग हरीण

कुरंग हरीण हे गवयाद्य कुळातील उप कुळ आहे. यात काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा, पिसूरी हरीण, इंफाळा हरीण तसेच ग्रे ऱ्हिबॉक हरीण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.

हरीण, हा एक शाकाहारी सस्तन प्राणी एक आहे. हरणांच्या प्रत्येक पायाला सम संख्येत खुर असतात, त्यामुळे हरणांचा समावेश युग्मखुरी या गणात झाला आहे. जगातील विविध प्रांतातील वातावरणानुसार आणि हवामानानुसार हरणात विविध आकार आणि रंगसंगती आढळते. हरिण हे सहसा घनदाट अरण्य, वाळवंट, मैदानी जंगले व पर्वतरांगा वर दिसून येतात.

बहुतेक सर्व नर हरणांना शिंगे असतात. अपवादात्मक जातींच्या माद्यांना शिंगे असतात. परंतु माद्यांची शिंगे नरांच्या शिंगापेक्षा लहान आणि नाजूक असतात. हरिण हा प्राणी सहसा कळपाने राहतो. नर व माद्याचे कळप वेगवेगळे असून मिलन काळात ते एकत्र येतातकुरंग हरणांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शिंगे.

ही शिंगे सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा पूर्णतः वेगळी असतात. ती पोकळ असून हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतात. ही शिंगे कधीही गळून पडत नाहीत. या शिंगाला एकच टोक असते. शिंगाचे आकारमान सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा बरेच लहान असते. मात्र, प्रत्येक जातीच्या हरणाच्या शिंगांचे आकारमान ठरावीकच असते. नरांची शिंगे मोठी असतात; माद्यांनाही बहुधा शिंगे असतात.

महाराष्ट्रात आढळणारे हिरण

काळवीट हे हरीण प्रामुख्याने भारतात आढळून येते. हे हरिणांच्या कुरंग कुळातील प्रमुख हरीण आहे. नर काळवीट हा काळ्या रंगाचा असून मादी ही भुऱ्या रंगाची असते. नरांना प्रामुख्याने शिंगे असतात. माद्यांना शिंगे नसतात.काळविटाचा वावर मुख्यत्वे भारतातील शुष्क प्रदेशातील ओसाड माळरानांवर आहे.

महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे काळविटांचे अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी दौंड इंदापूर, शिरुर, बारामती तालुक्यात व तसेच अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यामध्ये ही हरणे दिसतात. सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या आंध्रप्रदेशात, व लगतच्या कर्नाटकात, राजस्थानातन व मध्यप्रदेशातही काळविटे बऱ्याच प्रमाणात दिसून येतात.

हरणा बद्दल काही वैशिष्ट्ये

  • जगभरामध्ये हरणाच्या 60 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. आफ्रिकेमध्ये आढळणारे हरीण एकमेव असे हरिण आहे ज्याची जात Barbary Red Deer आहे.
  • हरणाचे आयुष्य हे 10 ते 25 वर्षे असते
  • हरणाला रात्री पाहण्याची क्षमता खूप चांगली असते.
  • हरणाची वास घेण्याची व ऐकण्याची क्षमता खूप तीव्र असते.
  • हरीण या प्राण्याच्या शरीरामध्ये पित्ताशय नसतो.
  • हरिन खूप चांगल्या प्रकारे पोहू शकतो.
  • हरणाची शिंगे खूप वेगाने वाढतात.
  • उत्तर अमेरिकेत सर्व सस्तन प्राण्यांमध्ये हरिण हा मानवांसाठी सर्व मोठा धोका मानला जातो. हरिण दहा फूट उंचीपर्यंत उडी मारू शकतो.
  • हिवाळ्यात अन्न उपलब्ध नसल्यामुळे ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हरिण कमी सक्रिय असतात.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment