Flamingo Bird Information In Marathi नमस्कार मित्रांनो विकीमित्र या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहेत, आज आपण इथे फ्लेमिंगो या पक्षाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. फ्लेमिंगो हा पक्षी कसा दिसतो आणि काय खातो इत्यादी माहिती इथे जाणून घेणार आहोत.
फ्लेमिंगो पक्षाची संपूर्ण माहिती Flamingo Bird Information In Marathi
फ्लेमिंगो हा एक पक्षी असून त्याला मराठीमध्ये रोहित पक्षी असे म्हटले जाते. हा एक पाणपक्षी असून जो पाणी असणाऱ्या ठिकाणी राहणे जास्तकरून पसंत करतो.रोहित पक्षी हे खूप मोठे पक्षी असून ते त्यांच्या लांब गळ्यासाठी व काठी सारख्या पायांसाठी व गुलाबी किंवा लालसर पंख या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत .इंटिग्रेटेड टॅक्सोनोमिक इन्फॉर्मेशन सिस्टमच्या मते रोहित या पक्षाच्या सहा जाती असून त्या खूप प्रसिद्ध आहेत.
रोहित पक्षाच्या सहा प्रजाती खालील प्रमाणे आहेत-
१. लेसर फ्लेमिंगो
२. चीलियन फ्लेमिंगो
३. ग्रेटर फ्लेमिंगो
४.अँडियन फ्लेमिंगो
५.जेम्स किंवा पुना फ्लेमिंगो
६.अमेरिकन किंवा कॅरिबियन फ्लेमिंगो फ्लेमिंगो
फ्लेमिंगो पक्षाचे वास्तव्य व वर्णन
हे पक्षी भारतामध्ये पुणे येथील उजनी जलाशय किंवा औरंगाबाद येथील जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. हे पक्षी दिसायला खूप उंच फिकट गुलाबी पांढरा किंवा लालसर पंख असलेले पक्षी असून लांब आणि काठी सारखे दिसणारे साधारण गुलाबी शेड असणारे पाय, कठीण आणि मजबूत गुलाबी काळ्या रंगाची चोच आणि लांब मान या सगळ्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे हा पक्षी खूप सुंदर आणि दिसायला आकर्षक दिसतो.
रोहित पक्षाबद्दल प्राथमिक माहिती-
- या पक्षाला रोहित पक्षी, फ्लेमिंगो, किंवा समुद्र पक्षी असे नाव आहे.
- या पक्षाचे कूळ-फोएनिकोप्टेरिड,
- या पक्षाचे शास्त्रीय नाव-फोएनिकोप्टेरस रोसअस असे आहे.
- या पक्षाचा रंग पांढरा गुलाबी किंवा लालसर असतो.
- या पक्षाची उंची 1.2 ते 1.5 मीटर इतकी असते .
- या पक्षाचे वजन 3.5 किलो इतके असते.
फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवास
फ्लेमिंगो पक्षी हे पाण पक्षी असून हे पाणी असलेल्या ठिकाणी जास्त करून आढळतात. हे पक्षी शक्यतो सरोवर किंवा तलावाच्या आसपास राहणे पसंत करतात. बहुतेक पक्षी एका ठिकाणी आपले वास्तव्य करत नाहीत कारण त्यांच्या प्रजनन क्षेत्रात हवामान किंवा पाण्याच्या पातळीत सतत होणाऱ्या बदलांमुळे हे पक्षी स्थलांतरित होत राहतात . त्यामुळे हे स्थलांतरित होणाऱ्या गटांमध्ये मोडले जातात .
फ्लेमिंगो पक्षाचा आहार
फ्लेमिंगो पक्षी सर्वभक्षक असून मांसाहारी पक्षी आहे व हा पक्षी गिधडाहून मोठे असले तरी ते लारवा, सूक्ष्मजीव, लहान कीटक, आणि आळ्या, निळे-हिरवे शेवाळ लाल एकपेशीय वनस्पती, मोलस्क, क्रसटेशियन्स किंवा लहान मासे खातात . हे पक्षी दिसायला इतके विशाल असले तरी त्यांची शिकार ही कीटक स्वरुपातच असते .
फ्लेमिंगो पक्षाचे प्रकार
प्रस्तावनेमध्ये मध्ये पाहिल्याप्रमाणे इंटिग्रेटेड टॅक्सोनोमिक इन्फॉर्मेशन सिस्टीम अनुसार या पक्षाच्या प्रजाती आपण वर पाहिल्या आहेत. आता या सर्व प्रजातींची आपण सविस्तर पणे माहिती घेऊयात .
१.ग्रेटर फ्लेमिंगो
हा फ्लेमिंगो पक्षी दक्षिण युरोप ,पश्चिम आशिया, दक्षिण आशिया, आफ्रिका या ठिकाणी आढळतात . खूपच लांब *कोट मान* मोठे विचित्र बिल आणि खूप लांब गुलाबी रंगाचे पाय असून या पक्षाचा पांढराशुभ्र रंग व त्यात थोडासा फिकट गुलाबी रंग मिसळलेला असतो. या पक्षाची उंची 36 ते 50 इंच असून त्याचे वजन 3.5 किलो इतके असते. ग्रेटर फ्लेमिंगो हे पक्षी कॉलनी या नावाच्या गटात मोडतात.
२.लेसर फ्लेमिंगो
हे फ्लेमिंगो पक्षाची जात सर्वात लहान प्रजाती मानली जाते . या पक्षांचा गुलाबी पांढरा पिसारा, असून काळी टीप असलेले गडद लाल चोच असते, पिवळसर केशरी डोळे, लालसर तपकिरी त्वचा, प्राथमिक व दुय्यम उड्डाण पंख हे काळ्या रंगाचे असून, लाल आवरण आणि लांब गुलाबी पाय असतात. एक पिछाडी चे बोट या पक्षांमध्ये दिसून येते ज्याला हॅलकस म्हणून ओळखले जाते.
नर आणि मादा लेसर फ्लेमिंगो दिसायला एकसारखे असल्यामुळे त्यात फरक करणे कठीण जाते. परंतु नर हा पक्षी थोडा मोठा असतो. हे पक्षी मुख्यतः एकपेशीय वनस्पती, क्रस्टेशियन्स या प्रकारचा आहार घेऊन आपला उदरनिर्वाह करतात . दक्षिण आफ्रिका, दक्षिण आशियातील ग्रेट रिफ्ट व्हॅली मध्ये, पूर्व आफ्रिका येथे हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
३.चिलीयन फ्लेमिंगो
या प्रकारच्या फ्लेमिंगो पक्षाला लाल पंख असलेले आवरण दिसून येते, त्याचबरोबर गुलाबी पिसारा असून या पक्षाचे पाय लांब काठी सारखे असतात. आणि ते राखाडी रंगाचे असून या पायाला मध्यभागी गुलाबी रंग दिसून येतो. या पक्षाची उंची 110 ते 130 सेंटीमीटर इतकी असून . हे पक्षी दक्षिण अमेरिका, पेरू ,दक्षिण पूर्व ब्राझील, बोलिव्हिया, अर्जेंटिना आणि चिली या देशांमध्ये आढळून येतात.
४.अँडियन फ्लेमिंगो
या प्रकारच्या फ्लेमिंगो पक्षाचा रंग फिकट गुलाबी असून वरचा भाग हा गडद रंगाचा असतो .यासह प्राथमिक उड्डाण पंख हे काळ्या रंगाचे असतात. या प्रकारच्या पक्षाला फिकट गुलाबी व पिवळसर रंगाची चोच असून निमुळते टोक असते.
या पक्षाचे डोळे गडद लाल तपकिरी असून नर आणि मादा दिसायला एकसारखे असल्यामुळे ओळखणे कठीण जाते .परंतु नर फ्लेमिंगो पक्षी हा आकाराने मादीपेक्षा थोडा मोठा असतो. या प्रकारच्या फ्लेमिंगो पक्षाला एक पेशीय वनस्पती,डायटॉम्स या प्रकारचा आहार घेणे पसंत आहे. दक्षिण पेरू, उत्तर चिली ,उत्तर पश्चिम अर्जेंटिना येथे हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात .
५.अमेरिकन फ्लेमिंगो
या प्रकारच्या पक्षामध्ये गुलाबी रंगाचा पिसारा असून प्राथमिक व दुय्यम उड्डाण पंख काळ्या रंगाचे असतात ,त्याचबरोबर गुलाबी रंगाचे पाय ,चोचीचे टोक हे काळ्या रंगाचे असते. या पक्षाची उंची 120 ते 140 सेंटीमीटर असून या पक्षांना कीटक ,एकपेशीय वनस्पती, आणि कोळंबी यासारखा आहार पसंत आहे .
६.जेम्स फ्लेमिंगो
जेम्स फ्लेमिंगो या पक्षाची मान आणि मागील बाजूस काळ्या रंगाच्या पट्ट्या दिसून येतात. फिकट गुलाबी रंगाचा पिसारा व डोळ्याभोवती चमकदार लाल त्वचा असून काळ्या रंगाचे नमुळते टोक असलेली पिवळ्या रंगाची चमकदार चोच आणि लाल पाय यामुळे हे पक्षी इतर प्रजातींमध्ये वेगळे दिसून येतात . या पक्षाची उंची 90 ते 92 सेंटीमीटर इतकी असून .या जातीचे पक्षी बोलिविया ,दक्षिण पेरू ,उत्तर चीली, उत्तर-पश्चिम अर्जेंटीनामध्ये हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात .
रोहित पक्षाबद्दल विशेष माहिती
- हे पक्षी लहान कळपात राहत नाहीत तर त्या ऐवजी दहा लाख किंवा त्याहून अधिक जास्त गटांचे कळप असलेल्या ठिकाणी वास्तव्य करतात.
- जर लहान कळप असेल तर त्या कळपाची संख्या दोन डझन इतकी असते.
- ग्रेटर फ्लेमिंगो इतर प्रजातींपैकी सर्वात व्यापक आणि सर्वात मोठा पक्षी आहे .
- या पक्षाची जन्माला आलेली पिल्ले राखाडी रंगाची असतात.
- हा शब्द स्पॅनिश आणि लॅटिन शब्दापासून तयार झाला असून याचा अर्थ आग असा आहे.
- जंगली फ्लेमिंगो पक्षाचे आयुष्य वीस ते तीस वर्ष असते जर त्यांना कैदेत ठेवले किंवा पाळले तर ते पन्नास वर्षाहून अधिक जगू शकतात.