Bulbul Bird Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण बुलबुल या पक्षाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. बुलबुल हा पक्षी पिकानोनॅटीडी कुळातील असून या पक्ष्यांच्या जगभरामध्ये 9 हजार ते 10 हजार प्रकारच्या प्रजाती आहेत. हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा मोठा आणि साळुंकी पेक्षा लहान असतो.
बुलबुल पक्षाची संपूर्ण माहिती Bulbul Bird Information In Marathi
बुलबुल पक्ष्याची रचना
बारीक शरीर, लांब शेपूट, आणि विशेष म्हणजे या पक्षाच्या डोक्यावर टोपी घातल्यासारखे दिसणारे केस असतात. या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी दिसायला एकसारखे असतात. त्यामुळे नर आणि मादी ओळखणे अवघड असते. बुलबुल पक्षाला चांगल्याप्रकारे गाता येते. पण मादी बुलबुल गाऊ शकत नाही. बुलबुल बहुतेक उष्णकटिबंधीय पक्षी आहेत. त्यामुळे मुख्य प्रजाती आशिया खंडामध्ये आणि आफ्रिकेमध्येआढळतात .
बुलबुल या पक्षांच्या प्रजातींचा रंग बहुथा काळा किंवा राखाडी असतो. त्याची लांबी सुमारे २० सेंटीमीटर पर्यंत असते. त्याच्या डोक्याचा आणि गळ्याभोवतीचा भाग तपकिरी काळा रंगाचा असू शकतो. त्याच्या शरीराच्या पिसांचा रंग फिकट तपकिरी असतो. बुलबुल या पक्षाची चोच काळी असते आणि त्याचे डोके सुद्धा काळे रंगाचे असते. त्याची शेपूट तपकिरी रंगाची असते .सर्वसाधारणपणे बुलबुल या पक्ष्यांचा प्रजनन काळ जून ते सप्टेंबर हा असतो. निरनिराळ्या प्रदेशांमध्ये तो पुढे-मागे होऊ शकतो.
बुलबुल पक्षी कोठे राहतात?
बुलबुल हे पक्षी उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये राहतात. हे पक्षी जास्तीत जास्त मानव वस्ती मध्ये राहणे पसंत करतात. आपले घरटे दाड झुडपांमध्ये बनवतात. वाळलेल्या गवतापासून आपले घरटे बनवतो. पक्षांच्या घरट्यांचा आकार गोल व मोठ्या वाटीसारखा असतो. बुलबुल पक्षी तळ्यांमध्ये राहणे पसंत करतात.
बुलबुल मधील मादी ही एका वेळेस दोन किंवा तीन अंडी घालू शकते. तिच्या अंड्यांचा रंग फिकट गुलाबी असतो. एका वर्षामध्ये बुलबुल मादी दोनदा अंडी घालू शकते. बुलबुल हा पक्षी आपले अंडे 14 दिवसांच्या आत उबवतो. पिल्लांना भरवणे, अंडी उबवणे, पिल्लांना उडवायला शिकवणे, चारा भरवणे हे नर आणि मादी दोघे मिळून करतात.
बुलबुल या पक्षाचे खाद्य
प्रामुख्याने हा पक्षी झाडावरची फळे, छोटे कीटक, व मध हे बुलबुला चे मुख्य अन्न आहे.
बुलबुल पक्षाचा प्रजाती
भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुलबुल पक्षी आढळतात .हे पक्षी रेन फॉरेस्ट हिमालय आणि शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतामध्ये जवळ-जवळ 17 प्रकारचे बुलबुल पक्षी राहतात. त्यामधील काही पक्षी खाली सविस्तरपणे सांगितले आहेत.
1. रेड वेंटेड बुलबुल-
रेड वेंटेड बुलबुल पक्षाची सर्वात सामान्य जात आहे , भारतामध्ये ही जात मोठ्या प्रमाणात आढळते. बुलबुल हा पक्षी पेसारीनेजच्या कुळातील पक्षी असून तो श्रीलंका,बर्मा,सामोआ, फिजी, टोंगा आणि हवाई या देशातही आढळतात. या पक्ष्यांच्या डोक्यावर काळ्या रंगाचे केस असतात .जे टोपी सारखे दिसतात. काळा रंग डोक्यापासून मानेपर्यंत असून मानेखाली राखाडी आणि काळा रंग मिक्स असतो .शेपूट लांब आणि काळ्या रंगाची असते.
२. हिमालय बुलबुल-
हिमालय बुलबुल या पक्षाला पांढरे गाल असणारा बुलबुल या नावानेही ओळखले जाते. हिमालय बुलबुल ही एक भारतामध्ये आढळणारी ही सर्वात सुंदर प्रजाती आहे. हा पक्षी शक्यतो हिमालयामध्ये आढळतो. ह्या बुलबुल पक्षाची लांबी 17 ते 18 सेंटिमीटर असते या पक्षाचे सरासरी वजन 30 ग्रॅम असते.
३.ब्लॅक क्रेस्टेड बुलबुल-
ब्लॅक क्रेस्टेड बुलबुल हा पक्षी भारतामध्ये आढळतो. हे पक्षी जंगलामध्ये किंवा घनदाट झाडी मध्ये राहणे पसंत करतात .त्याची लांबी 19 सेंटिमीटर असते. या पक्षाचे डोके आणि मान काळया रंगाचे असते .आणि माने खालील सर्व भाग पिवळ्या रंगाचा असतो .
४. वाईट इयर्ड बुलबुल-
पांढरे कान असलेला बुलबुल हा पांढरे गाल असलेला बुलबुल म्हणूनही ओळखला जातो.या बुलबुल पक्षाचे हिमालयन बुलबुल या पक्षांशी खूप साम्य आहे. या पक्षाची चोच आणि मानेपर्यंत काळा रंग असतो .पण त्याचे गाल पांढऱ्या रंगाचे असतात आणि या पक्ष्याचे पंख राखाडी रंगाचे असतात. या पक्षाची शेपूट काळ्या रंगाची असते. आणि शेपटीच्या खालील भाग पिवळ्या रंगाचा असतो.
५. येल्लो थ्रोटेड बुलबुल-
येल्लो थ्रोटेड बुलबुल हा पक्षी दक्षिण भारतातील स्थानिक आहे. हा पक्षी आदिवासी डोंगराळ जंगले, पश्चिम घाट व पूर्व घाटाचे खडकाळ भागांमध्ये दिसून येतात. या पक्षाचा डोक्यापासून मानेपर्यंत चा रंग पिवळा आहे. पंख आणि शेपूट राखाडी रंगाची आहे.शेपटीचा खालील भाग पिवळ्या रंगाचा आहे.चोच लहान आणि काळ्या रंगाची आहे.
६. फ्लेम थ्रोटेड बुलबुल-
फ्लेम थ्रोटेड बुलबुल या पक्षाच्या डोक्यापासूनचा मानेपर्यंत चा रंग काळ्या रंगाचा असतो. आणि मानेच्या खालील सर्व भाग पिवळ्या रंगाचा असतो. तसेच या पक्षाचा गळ्या कडील भाग नारंगी रंगाचा असतो. आणि गळा नारंगी असल्यामुळे या पक्षांना फ्लेम थ्रोटेड बुलबुल म्हणतात. हे पक्षी भारतामध्ये पश्चिम घाटाच्या जंगलांमध्ये आढळतात. फ्लेम थ्रोटेड पक्षाची लांबी 18 सेंटिमीटर असते.
७. व्हाईट ब्रोव्ड बुलबुल-
व्हाईट ब्रोव्ड बुलबुल हा पक्षी भारतामध्ये दक्षिणेकडे दाट वस्ती असलेल्या ठिकाणी आणि श्रीलंकेत आढळतात. हा पक्षी मध्यम आकाराचा असून या पक्षाची लांबी 8 सेंटिमीटर आहे .या पक्षाचा वरील भाग राखाडी रंगाचा व खालील भाग पांढ-या रंगाचा असतो. या पक्षाच्या भुवया पांढरा असल्यामुळे व्हाईट ब्रोव्ड बुलबुलअसे म्हणतात.
बुलबुल पक्षाविषयी अधिक माहिती-
- मादा बुलबुल पक्षी एका वेळी दोन ते तीन अंडी घालू शकते.
- बुलबुल पक्षांची अंडी 14 दिवसांमध्ये उबवली जातात.
- भारतामध्ये गुलदम बुलबुल ही जात सर्वात प्रसिद्ध जात आहे.
- बुलबुल हा पक्षी 200 वेगवेगळ्या सुरांमध्ये गाऊ शकतो.
- बुलबुल पक्षी हा इराणचा राष्ट्रीय पक्षी आहे .
- बुलबुल या पक्षाचा प्रजनन काळ जून ते सप्टेंबर असतो.
- लाल मिश्याच्या असलेल्या बुलबुल पक्ष्याला रेड व्हिसकर्ड बुलबुल म्हणतात.
आपण बुलबुल पक्षी पाळू शकतो का?
ते खरोखरच खूप आकर्षक पाळीवप्राणी बनतात. आणि आशियातील काही भागांमध्ये पोपटाप्रमाणे त्यांना पाळले जाते. आणि त्यांच्याशी तसेच वागले जाते. बऱ्याच सॉफ्टबिल्सरच्या विपरीत रेड व्हेंटेड बुलबुल मोठ्या इंडोर पिंजऱ्यात चांगले काम करतात परंतु त्यांचा आकार आणि उच्च पातळीवरील क्रियाकलाप पाहता ते खरोखरच बाहेरच्या किंवा इंडोर एव्हीयरीमध्ये स्वतः येतात.
आपल्या घरातील बागेत बुलबुल पक्षी कसे आकर्षित करावे?
आपल्या सुंदर पक्षी आपल्या छोट्या बागेत यायचा असेल तर यासाठी आपण बागेत मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे आणि बागेत दाट झाडे आणि उंच झाडे असल्यास त्याभोवती फळांचे काही तुकडे ठेवावे. त्याचे आगमन संभाव्यता आणखी वाढते .
बुलबुल पक्षी नर आहे की मादी हे तुम्ही कसे सांगू शकता?
नर आणि मादी दोन्ही पक्षी पिसारा मध्ये सारखे असतात. तर तरुण पक्षी राखाडी काळा मुकुट असलेले निस्तेज असतात. रेड व्हिस्केरेड बुलबुल मनुश्यानभोवती भितीदायक नसतात. झुडुपाच्या वर किंवा पॉवर लाईन वर ठळकपणे दिसतात