लांडगा प्राण्याची संपूर्ण माहिती Wolf Information In Marathi

Wolf Information In Marathi लांडगा हा पाळीव कुत्र्याचा पूर्वज आहे. यांच्यामध्ये खूप मोठी सामाजिक संरचना आढळते. हे एक दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव सुद्धा देऊ शकतात. चेहऱ्याच्या विशिष्ट भावानुसार हे एक दुसऱ्यांबरोबर बोलूसुद्धा शकतात. लांडगा हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. अन्नसाखळीच्या शीर्षस्थानी एक अंतिम शिकारी आहे. तो संधीसाधू आहे.

Wolf Information In Marathi

लांडगा प्राण्याची संपूर्ण माहिती Wolf Information In Marathi

सर्वात सोपा आणि असुरक्षित प्राणी पकडण्याचा प्रयत्न करतो. लांडगा हा सस्तन प्राणी कॅनडी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव ‘कॅनिस लुपस’ आहे. भारतात आढळणाऱ्या लांडग्याचे शास्त्रीय नाव कॅनिस ल्युपस पॉ लीपीस असे आहे. कॅनिस नायजर हि लहान व लाल जाती मूळची अमेरिकेच्या टॅक्सेस व फ्लोरिडा राज्यातील आहे .कॅनडी कुलात लांडगे ,कोल्हे, खेकडा आणि कुत्र्यांचा (रानटी व पाळीव) समावेश होतो.

पाळीव कुत्र्याचे काही प्रकार वगळले तर लांडगा या कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे.यांचा प्रसार युरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर ,मध्य व नेऋत्य आशियात झालेला आहे. हा तिबेट, लडाख ,काश्मीर यांच्या सीमावर्ती भागात व खुद्द भारतात आढळतात . कोरड्या, उघड्या, मैदानी प्रदेशात यांचे वास्तव्य असते. लांडगे अरण्यात सुद्धा राहतात.

लांडगा या प्राण्याचे वर्णन

लांडगा दिसायला कुत्र्यासारखा असतो लांडग्याला चार पाय, दोन डोळे ,दोन कान आणि एक झुपकेदार शेपूट असते. त्यांच्या तोंडाचा आकार निमुळता असतो. लांडग्याचे शरीर सुधारण्यासाठी बांधले गेले आहेत. ज्यात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आदर्श वैशिष्ट्ये आहे. त्यांच्या अरुंद छाती व शक्तिशाली पाठ आणि पाय त्यांच्या कार्यक्षम हालचालींना मदत करतात.

त्यांचे वजन आणि आकार जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बदलू शकतात. लांडग्याची लांबी 90 ते 105 सेंटीमीटर, शेपूट 35 ते 40 सेंटीमीटर असते. लांडग्याची सर्वसाधारणपणे खांद्यापर्यंत ची उंची 0.5 ते 0.9 मीटर म्हणजेच 25 ते 38 इंचापर्यंत असते. त्यांचे वजन 20 ते 60 किलो ग्रॅम पर्यंत असते. लांडगे 10 किलोमीटर प्रतितास वेगाने पडण्यास सक्षम असतात.

पाठलाग करताना ते 65 किलोमीटर प्रतितास वेगाने पोहोचतात. हिमालयातील लांडगे मोठी असतात .त्यांच्या रंगात बदल दिसून येतात .भारताच्या मैदानी प्रदेशातील लांडगा भुरकट तांबूस ते फिकट तपकिरी रंगाचा असून त्याच्या छातीचा व पोटाचा रंग पांढरा किंवा फिकट असतो. त्यांच्या अंगावर लहान मोठे काळे ठिपके असतात. खांद्यावर गडद रंगातील ‘V’अशा आकाराची खून अडते.

जबडा लांब असून सुळे तीक्ष्ण असतात. शरीरापेक्षा पाय फिकट रंगाचे असून पोटाकडचा भाग पूर्णपणे पांढरा असतो. तिबेट ,लडाख आणि हिमालयाच्या उतरणी वरील लांडग्याचा रंग कधीकधी काळसर असतो. हिवाळ्यात यांचा रंग करडा किंवा तकतकीत पिवळा असून अंगावर काळे व पांढरे अथवा काळे व पिवळे लांब केस असतात. उत्तर सायबीरिया आणि कॅनडामधील लांडगे जवळ जवळ पांढरे असतात .

लांडगा या प्राण्याचे खाद्य

लांडगा हा पूर्णतः हा मांसाहारी प्राणी आहे. शेळी, घोडा, बैल, हरिण ,बकरी ,तसेच सशाचे कोवळे मास तो आवडीने खातो. लांडगा हा कळपाने राहतो व रात्रीच्या वेळी शिकारीला बाहेर पडतो. शेळी व मेंढी यांचा कळप दिसला की त्यात घुसायचे व त्यांना जंगलात नेऊन त्यांच्यावर यथेच्छ ताव मारायचा ही त्यांच्या शिकारीची पद्धत असते. लांडगा हा चपळ आणि खादाड प्राणी आहे.

लोकवस्तीत जाऊन लहान मुले सुद्धा तो पळवून नेतो. कधीकधी भुकेपोटी लांडगे एकमेकांचा प्राणही घेतात. भुकेलेला लांडगा वाटेल त्या प्राण्यांवर (माणसांवरही) क्रुरपणे हल्ला करतो व तो मरणाची वाट न पाहता त्याचे लचके तोडून खातो .

लांडगा या प्राण्याच्या प्रजाती

जगामध्ये लांडग्याच्या जवळजवळ तीन प्रजाती आढळतात. ग्रे, रेड, आणि इथिओपीएन .लांडग्याची ग्रे ही सर्वात जास्त आढळणारी प्रजाती आहे .रेड गोल्फ हा नामशेष होत चालला आहे. लांडगा वाळवंट आणि वर्षावन सोडला तर सर्वत्र आढळतो.

सर्वात लहान लांडगे मध्य-पूर्व मध्ये आढळतात. त्यांचे वन वजन 30 किलोग्राम असते. सर्वात मोठे लांडगे कॅनडा, अलास्का आणि सेवियर संघ असे आढळतात. त्यांचे वजन 175 पौंड असते ते 6 ते 8 वर्ष जिवंत राहतात .पण यांच्या जीवन काळात अनेक विविधता पहावयास मिळतात .

लांडगा हा प्राणी कोठे राहतो?

लांडगा या प्राण्याला गटामध्ये राहायला खूप आवडते. त्यामुळे तो आपला एक गट तयार करुन गटांमध्ये राहतात .लांडगा जंगलांमध्ये राहतो . जंगलामध्ये त्याचा एक प्रदेश ठरलेला असतो आणि बहुतेक ते विश्रांती गुहेमध्ये घेतात . लांडगा हा समूहामध्ये राहतो त्यांच्या समूहाला पॅक म्हणतात.

एका पॅक मध्ये दोन किंवा तीन लांडगे असतात. लांडगा हा समुहाने मिळून शिकार करतो. लांडग्याचा शिकार करण्याची यशस्वी दर खूप कमी असल्यामुळे तो फक्त 10 पैकी 1 शिकार करू शकतो. लांडगा नेहमी आपल्या क्षेत्रांमध्ये राहून शिकार करतो. लांडगा आहाराच्या शोधात दररोज 10 ते 30 मैल फिरतो.

संतती

लांडग्या मध्ये नर-मादी आयुष्यभर सोबत राहतात. त्यांचा प्रजननाचा काळ पावसाळा संपत असताना सुरू होतो. विणीच्या हंगामाच्या वेळी नर लांडगे ओरडतात आणि मादी लांडग्याला आकर्षित करतात. लांडगे वर्षातून एकदा प्रजनन करतात .गर्भवती काळ 60 ते 63 दिवसांचा असून पिल्ले डिसेंबरमध्ये जन्मतात. एकावेळी तीन ते नऊ पिल्ले जन्माला येतात.

जन्माच्या वेळी पिलांचे डोळे बंद असून ते 14 दिवसांनंतर उघडले जातात. पिल्लांच्या जन्माच्या वेळेस अंदाजे 1 पौंड वजन असते. ते जन्मानंतर पाहू किंवा ऐकू शकत नाही. लांडगे यांच्या पिल्लांना 10 ते 12 दिवसांनी दिसू लागते आणि तीन आठवड्यानंतर ते ऐकण्याची क्षमता विकसित करतात. नर मादी दोघे मिळून पिल्लांची काळजी घेतात. तीन वर्षात पिलांची पूर्ण वाढ होते. लांडग्यांच्या पिल्लासाठी मृत्यू दर 5% जास्त असू शकतो. नैसर्गिक अधिवासात लांडगा बारा ते पंधरा वर्ष जगतो .

संस्कृतीच्या उदयापासुन मानव, त्यांचे पाळीव प्राण्यांचे कळप आणि मोठे शिकारी प्राणी यांना लांडगा हा धोकादायक ठरला आहे. त्यामुळे त्यांनी चाकू, बंदुक, सापळे व विष यांसारख्या मिळेल त्या हत्याराने लांडग्यांची बेसुमार हत्या करण्यात आली आहे. अठराव्या शतकापर्यंत ग्रेट ब्रिटन मधली लांडगे नष्ट करण्यात आले आहे.

आता पश्चिम व दक्षिण यूरोपात ते निर्वंश किंवा दुर्मिळ झाले आहेत. हीच परिस्थिती अमेरिका व दक्षिण कॅनडामध्ये ही आहे. तथापि तुरळक ठिकाणी ते आढळून येतात .उत्तरेकडे ते अजूनही आढळतात. त्यांची कातडी माणूस पोषाखासाठी वापरतआहे. तसेच दुष्काळी परिस्थितीत त्यांचे मांसअन्न म्हणून खात आहे .त्यामुळे लांडग्याची जात ही आता नामशेष होत चालली आहे.

लांडग्या विषयी काही अनोखे तथ्य

 1. लांडग्याला दोन प्रकारची केस असतात ते म्हणजे गार्ड आणि अंडरकोट. लांडगे यांचे केस वसंत ऋतु आणि उन्हाळ्यात गळतात.
 2. लांडगे कुत्र्यासारखे चांगले दक्ष किंवा रखवालदार असू शकत नाहीत कारण त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती ही अनोळखी लोकांना घाबरण्याची असते. त्यामुळे ते अनोळखी लोकांना घाबरतात आणि गुरगुरण्या ऐवजी ते त्यांना पाहून लपतात.
 3. लांडगे लांब अंतरावरून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी रडतात ते त्या सदस्यांना शोधण्यासाठी ,प्रदेशाची रक्षण करण्यासाठी सुद्धा रडतात.
 4. लांडग्यांना बेचाळीस दात असतात वरच्या जबड्यात वीस दात असतात आणि खालच्या जबड्यात बावीस दात असतात.
 5. लांडगा दोन आठवडे उपाशी राहू शकतो.
 6. 13 ऑगस्ट हा जागतिक लांडगा दिन म्हणून पाळला जातो.
 7. लांडगा मंगोलिया मध्ये नशिबाचे प्रतिक आहे. मंगोलिया मध्ये लांडगा पुरुषांसाठी विशेषतः भाग्यवान प्रतीक आहे.
 8. दरवर्षी जगामध्ये 6000 ते 7000 लांडग्यांना त्यांच्या कातडी साठी मारले जाते.
 9. जपानच्या शब्द कोशामध्ये लांडगा या शब्दाचा अर्थ आहे महान देव.
 10. 1934 मध्ये जर्मनी लांडग्यांना संरक्षण देणारा पहिला देश बनला होता.
 11. लांडगा हा रात्रीचार प्राणी आहे. तो दिवसा झोपतो आणि संध्याकाळी शिकार करतो. परंतु पावसाळ्यामध्ये लांडगा दिवसा आपल्याला आढळून येतो.
 12. सध्या ज्ञात असलेली सर्वात मोठी प्रजाती म्हणजे तपकिरी लांडगा.
 13. बायबल मध्ये लांडग्यांचा 13 वेळा उल्लेख करण्यात आला आहे .
 14. हिटलरला लांडग्या बद्दल खूप आकर्षण होते .
 15. जपानमधील धान्य शेतकरी एकेकाळी लांडग्याची पूजा करायचे.
 16. तुर्क लोकांना लांडग्यांचा खुप आदर आहे .
 17. फिनलंडमध्ये लांडग्याकडे विनाश आणि उजाडपणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.
 18. लांडगे यांचे सर्वात जुने चित्र दक्षिण युरोपच्या गुहांमध्ये आढळते.
 19. लांडग्याची श्रवणशक्ती माणसांपेक्षा वीस पटीने चांगली असते. हा जंगलामधील सहा मैल दूर अंतरावरील आवाज सुद्धा सहज ऐकू शकतो.
 20. लांडगा आपल्या पंजावर चालतो त्यामुळे त्याला लवकर थांबण्यास आणि लगेच मागे वळण्यात सहज शक्य होते.
 21. लांडग्याची शेपूट सरळ असते कुत्र्याप्रमाणे त्यांचे शेपूट वळलेली नसते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment