औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती Aurangabad Information In Marathi

Aurangabad Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत.जो जिल्हा भारतातील एकमेव जिल्हा आहे, ज्यात दोन जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तू आहेत. अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी तो जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा. महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून याची ओळख आहे.

Aurangabad Information In Marathi

औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती Aurangabad Information In Marathi

औरंगाबाद हा जिल्हा पैठणी साड्या साठी प्रसिद्ध आहे.औरंगाबाद हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे. पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी, तसेच दौलताबाद किंवा देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी, आधुनिक औरंगाबादच्या हद्दीत स्थित आहेत.महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे.

ते मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब (इ.स. १६५९ – इ.स. १७०७) ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून त्याच्या मृत्यूनंतर ठेवले गेले असावे. जुने नाव खडकी होते. हे शहर संभाजीनगर नावाने ही ओळखले जाते. औरंगाबादला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत आहे. औरंगाबाद हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे.

हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्हा एक ऐतिहासिक जिल्हा असुन चारही बाजुंनी ऐतिहासीक स्मारकांनी वेढलेला आहे.

या शहरात जगभरात प्रसिध्द असलेल्या अजिंठा ऐलोरा गुफा देखील आहेत,  या गुफा युनेस्कोच्या दृष्टीकोनातुन वैश्विक ठेवा आहे.औरंगाबाद जिल्हयाच्या पश्चिम दिशेला नाशिक उत्तरेला जळगांव पुर्वेकडे जालना आणि दक्षिणेकडे अहमदनगर जिल्हा आहे. हा मराठवाडयातील एक महत्वाचा जिल्हा आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचा इतिहास

औरंगाबाद हे शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे औरंगाबाद मानले जाते आहे. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी व विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये या गावाचा राजतलक किंवा राजतडाग म्हणूनही उल्लेख आढळतो. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या यादवांचे राज्य होते.

काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहपूर ठेवले होते.

१६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी/फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला. १६४४ मध्ये तो आग्ऱ्याला परत गेला. त्यानंतर १६८१ मध्ये औरंगजेब मुघल बादशाह असताना पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेब इथेच राहिला. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद या छोट्याशा गावात औरंगजेबाची कबर आहे.

औरंगाबाद जिल्ह्याची स्थापना

हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणानंतर मराठवाड्यासह औरंगाबाद शहर ही भाषिक आधारावर महाराष्ट्राशी जोडण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १ मे, १९६०ला झाली. त्या दिवशीपासून औरंगाबाद महाराष्ट्राचा भाग बनले.

औरंगाबाद जिल्ह्याचा भूगोल

क्षेत्र

औरंगाबाद जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १०,१०० चौ.कि.मी आहे, त्यापैकी १४१.१ चौ. कि.मी. शहरी क्षेत्र आणि ९९,५८७ चौ. कि.मी. ग्रामीण क्षेत्र आहे.

भौगोलिकदृष्ट्या औरंगाबाद उत्तर अक्षांश १९°५३’४७” – पूर्व रेखांश ७५°२३’५४” याठिकाणी वसलेले आहे. हे शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगरांनी वेढलेले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे असा जमिनीचा उतार आढळून येतो. अनेक लहानलहान टेकड्यांवर शहर वसलेले आहे. त्यामुळे शहरातून अनेक नाले वाहतात. ते दक्षिण- नैर्ऋत्येस वाहात जातात. शहराच्या उत्तरेस डोंगररांग आहे. दक्षिणेसही डोंगर आहेत.

औरंगाबाद हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. औरंगाबाद शहरातील ५२ दरवाजे व खिडक्या प्रसिद्ध आहेत. औरंगाबादला जागतिक महत्त्व आहे. औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. औरंगाबादला राजतडाग, खडकी , फतेहपूर म्हणून सुद्धा ओळखले जाते.

औरंगाबाद शहरातील दरवाजे पुढील प्रमाणे आहेत. भडकल गेट, मकई गेट, दिल्ली गेट, रोशन गेट, पैठण गेट, रंगीन दरवाजा, कटकट गेट, जाफर गेट, बारापुला गेट, नौबत गेट, हाथी गेट, नूर गेट इ. आहेत. सध्या काही दरवाजे हे इतिहास जमा झाले आहेत. एकूण ५२ पैकी २१ दरवाजे व १ खिडकी अजून इतिहास जमा झाले नाहीत. औरंगाबादचे विशेष असे की या शहराला ५२ दरवाजे, ५२ खिडक्या आणि ५२ पुरे (बेगमपुरा, उस्मानपुरा इ.) होते.

संभाजीनगर नामांतर

शिवसेना प्रमुख स्वर्गिय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी ईच्छा व्यक्त केली होती. आणि त्यांनी या शहराला संभाजीनगर नाव दिलेलेच आहे. पण ते सरकारी स्तरावर कार्यवाहीत आले नाही. विभागीय आयुक्तांकडे नामांतराबाबतचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे असे दिसून् येते.पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या कडून अधिकृत लेटरहेडवरच आता संभाजीनगरचा अधिकृतपणे उल्लेख केला जात आहे. मात्र संभाजी नगर असे नामांतर करण्याला काँग्रेस पक्षाने विरोध केल्याचे दिसून येते.

औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके

या जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत.

औरंगाबाद,सिल्लोड,गंगापुर,पैठण,कन्नड,वैजापुर,फुलंब्री,खुलताबाद,सोयेगांव

औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या

औरंगाबाद जिल्ह्याची  लोकसंख्या 37,01,282 इतकी आहे

औरंगाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,100 वर्ग कि.मी. असून,जिल्ह्याचा साक्षरता  दर 15% आहे .गुणोत्तर प्रमाण 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 924.

औरंगाबाद जिल्ह्याची भाषा

येथील मराठी ही मुख्य बोलीभाषा असुन हिंदी, इंग्रजी, आणि उर्दु देखील बोलल्या जाते.

औरंगाबाद जिल्ह्याचे हवामान

औरंगाबाद चे वार्षिक तापमान 9 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान असते.

औरंगाबादमध्ये पावसाळी हंगाम जून ते सप्टेंबर- आणि ऑक्टोबर ते फेब्रुवारी-हिवाळी हंगाम आणि मार्च ते मे उन्हाळी हंगामापासून सुरू होतो. औरंगाबाद जिल्ह्याचे सरासरी पाऊस पडणे ७३४ मिमी आणि किमान तापमान ५.६ डी.सी. आहे. कमाल तापमान ४५.९ डीसी आहे. पडत असलेल्या पावसाने पैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो. साधारणपणे 9.0 ते 693 मिलिमीटर /पावसाचे प्रमाण असते.

वन

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण वनक्षेत्र १३५.७५  चौ.कि.मी. आहे. महाराष्ट्राशी तुलना करता औरंगाबादचे जंगल क्षेत्र ९.०३ % आहे.

पर्वत

तीन पर्वत म्हणजे

१) अँटूर – त्याची उंची ८२६ मीटर आहे. २) सटाऊन – ५५२ मीटर

३) अब्बासगड – ६७१ मीटर आणि अजिंठा ५७८ मीटर दक्षिण भागाची सरासरी उंची ६०० ते ६७० मीटर्स आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील मृदा पिके

औरंगाबाद जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपाची काळी मृदा आहे जिच्या मध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक आढळून येते.

जिल्ह्यातील प्रमुख पीके

कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.

जिल्ह्यातील प्रमुख नद्या

औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी, तापी, पूर्णा या नद्या आहेत.औरंगाबाद जिल्हयातील मुख्य नदी ’गोदावरी’ ही आहे.

सर्वात मोठे धरण नाथसागर असुन हे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले विशाल जलाशय आहे, नाशिक ला पाऊस पडल्यास औरंगाबाद करांच्या पाण्याचा प्रश्न या धरणामुळे सुटतो.

औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योग धंदे

जिल्हयात बजाज ऑटो लिमीटेड, व्हिडीयोकॉन इंडस्ट्रीज, स्कोडा ऑटो, सीमेंस लिमीटेड, क्रोम्पटन ग्रीव्हज लिमीटेड, धुत ट्रांसमिशन प्रा. लिमीटेड, यांसारखेमी पंतप्रधान झालो तर… मराठी निबंध मोठे उद्योग या ठिकाणी आहेत.

औरंगाबाद जिल्ह्याचे औद्योगिक क्षेत्र मोठया प्रमाणात विस्तारले असल्याने देखील या जिल्हयाचा विकास चांगल्या तऱ्हेने होत आहे.

येथील एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) बरीच मोठी असून येथे स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, घरातील वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, बिअर आणि व्हिस्की, चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादेतील प्रमुख उत्पादने होत.

निर्लेप, लुपिन लॅबोरेटरी, ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड, गरवारे पॉलिस्टर्स, औरंगाबाद सिल्क मिल्स, केविल सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रकल्प आहेत. शिवाय अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमूहांचे कारखाने औरंगाबादेत आहेत. अनेक नवीन उद्योग उभे राहत आहेत. ही एमआयडीसी पुणे रस्त्यावर आहे.

गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारताच्या व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो.

कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रिकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबादच्या जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले.

हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅंडर्ड सिल्क मिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादेमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरू झाल्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात जास्त भेट दिली जाणारी ठिकाणे

पद्मपानी चित्रकला अजिंठा लेणी

महाराष्ट्रातील अजिंठा लेणी, भारतातील ३१ रॉक-कट लेणी गी स्मारके आहेत जी ईसापूर्व २ शतकातील आहेत. लेण्यांमध्ये चित्रे आणि शिल्प यांचा समावेश आहे जे बौद्ध धार्मिक कला (जे जातक कथांचे चित्रण करतात) तसेच श्रीलंकेतील सिगिरिया चित्रांची आठवण करून देणारी भित्तिचित्रे आहेत.

बीबी का मकबरा:

शहरापासून सुमारे ३ किमी अंतरावर औरंगजेबाची पत्नी राबिया-उद-दुर्रानी हीचे दफन स्थान आहे त्याला बीबी का मकबरा असे म्हणतात. हे आग्रा येथील ताजचे अनुकरण आहे आणि त्याच्या तत्सम रचनेमुळे ते दख्खनचा मिनी ताज म्हणून प्रसिद्ध आहे.

एलोरा लेणी:

एलोरा हे पुरातत्व स्थळ आहे, औरंगाबाद शहरापासून ३० किमी (१९ मैल) दूर राष्ट्रकूट शासकांनी बांधले आहे. स्मारक लेण्यांसाठी सुप्रसिद्ध, एलोरा जागतिक वारसा स्थळ आहे. एलोरा भारतीय रॉक-कट आर्किटेक्चरचे प्रतीक आहे. ३४ “लेणी”, प्रत्यक्षात चरनंद्री टेकड्यांमधून वरुन खोदलेली रचना, बौद्ध, हिंदू आणि जैन रॉक-कट मंदिरे आणि मठ ५ ते १० व्या शतकात बांधली गेली.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, वेरूळ:

एलोरा लेण्यांपासून एक किलोमीटर लांब चालणे, १८ व्या शतकातील महाराष्ट्रातील भगवान शंकराच्या पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर, त्याच्या अभ्यागतांकडून खूप महत्त्व प्राप्त करते.

दौलताबाद:

दौलताबाद, म्हणजे “समृद्धीचे शहर”, औरंगाबादच्या वायव्येस सुमारे १६ किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातील १४ व्या शतकातील किल्ले शहर आहे. हे ठिकाण एकेकाळी देवगिरी म्हणून ओळखले जात असे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

औरंगाबाद मध्ये काय प्रसिद्ध आहे?

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय याच जिल्ह्यात आहेत. हा भारताचा एकमेव असा जिल्हा आहे, की ज्यात २ जगप्रसिद्ध जागतिक वारसास्थळ (अजिंठा लेणी व वेरूळ लेणी) आहेत.

औरंगाबाद विभागात एकूण किती जिल्हे आहेत?

त्यात बीड, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद (आता धाराशिव) जिल्ह्यांचा समावेश होतो. औरंगाबाद विभागातील 8 जिल्ह्यांमध्ये एकूण 76 तालुके आहेत. औरंगाबाद विभागाचे एकूण क्षेत्रफळ 64,813 चौ. कि.

औरंगाबादला संभाजी नगर का म्हणतात?

छत्रपती संभाजी हे मराठा राजा छत्रपती शिवाजी यांचे पुत्र होते आणि तत्कालीन मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांची हत्या केली होती . 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात नाव बदलण्याची मागणी वाढली.

औरंगाबादला भेट देण्यासारखे आहे का?

मुघल सम्राट औरंगजेबाच्या नावावरून, औरंगाबाद हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि सर्वाधिक मागणी असलेले पर्यटन स्थळ आहे.

औरंगाबाद महिलांसाठी सुरक्षित आहे का?

औरंगाबाद हे शहर महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आहे . 

Leave a Comment