Autobiography Of A Newspaper In Marathi वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्र फार आधीच्या काळापासून वाचले जात आहे आजच्या आधुनिक युगात जरी वर्तमानपत्राचे वाचन कमी झाले असले तरी वर्तमानपत्राचे वाचनाला खूप महत्त्व आहे.
वृत्तपत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A Newspaper In Marathi
नमस्कार मित्रांनो ,ओळखलं का मला? नाही ना, अहो! तुमची दिवसाची सुरुवात ही माझ्यापासूनच होते. अहो, मी एक वृत्तपत्र बोलत आहे. आज मला तुमच्याशी बरेच काही बोलायचे आहे. माझे मन मोकळे करायचे आहे. माझा जन्म जवळपास दीडशे वर्षांपूर्वी झाला आहे. तेव्हापासून लोक मला वाचत आहे.
माझा जन्म झाला तो म्हणजे लोकशिक्षणासाठी ! महाराष्ट्राच्या भूमीत मी खऱ्या अर्थाने जन्म घेतला जेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र काढले.ते म्हणजे ‘दर्पण’. तेव्हा दर्पण या नावाने माझे नामकरण झाले.
दर्पण म्हणजे आरसा. दर्पण हे नाव ठेवण्याचे एक कारण होते कारण ,मी समाजाचे सत्य रूप दाखवणारा एक आरसाच होतो. समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ‘केसरी व मराठा’ ही वृत्तपत्रे काढली.
त्या वृत्तपत्रा नुसार त्यांनी जनतेपर्यंत आपले विचार पोचवले. म्हणूनच मी या देशासाठी व समाजासाठी महत्त्वाचे योगदान बजावतो असे मला वाटते. तसेच आगरकरांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. त्यामध्ये त्यांनी समाजाची सुधारणा करण्यासाठी समाजातील दोष दाखवून देण्याचे कार्य केले. माझ्यात लिहिल्या जाणाऱ्या अग्रलेखा मधून लोकजागृती होते.
आज वर्तमानपत्रात सर्व जगभराच्या बातम्या वाचायला मिळतात. सर्व जगातील चालू घडामोडी आपल्याला समजतात. प्रत्येक घटनेमागे ची सत्यता पडताळून त्याचा पाठपुरावा करून पत्रकार छापत असतात व त्या बातम्या तुम्ही सर्वजण आनंदाने वाचतात.
आजही वाचक डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवतात. काही लोकांची तर सुरुवात ही माझ्यापासूनच होते .त्यांना चहा घेताना वृत्तपत्र वाचायची सवय असते .त्यांनी वृत्तपत्रे वाचली नाही तर ,त्यांना काहीतरी चुकल्यासारखे वाटते .माझ्यामुळे तुम्हाला स्थानिक बातम्या मिळतातच तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातल्या ही बातम्या मिळतात.
माझ्याच विविध प्रकारच्या जाहिराती छापून येतात. जसे की कोणाला नोकर पाहिजे, वधूवरांच्या जाहिरातीही छापल्या जातात व लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. तसेच नोकरीच्या जाहिराती ही माझ्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचल्या जातात. नवीन तरुण पिढीला कुठे नोकरीची संधी आहे हे माझ्या मार्फतच कळले जाते.
वृत्तपत्रांमध्ये प्रत्येक पुरवणी ही वेगळी असते. क्रीडा पुरवणी ज्याच्यात खेळाचे मार्गदर्शन व जगभरातील खेळाची माहिती तुम्हाला मिळते. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासा विषयक माहिती व मार्गदर्शन हेही माझ्या द्वारे दिले जाते .
यासाठी स्वतंत्र एक पुरवणी असते. दर रविवारी येणाऱ्या बाल मित्र सारख्या सदरासाठी लहान मुलेही खूप उत्सुक असतात ती माझी आतुरतेने वाट पाहतात. तसेच मी रोज सर्वांना त्यांचे राशिभविष्य सुद्धा सांगतो. तसेच माझ्या द्वारे लोकांना तिथि ,सूर्योदय ,चंद्रोदय अशा पंचांगाची माहिती ही माझ्या द्वारे पोहोचवली जाते .
तसेच बॉलीवुड व राजकीय इत्यादी संबंधित बातम्या पोचवण्याचे कामही मी करतो. जेव्हा मला तयार केले जाते तेव्हा सर्वात प्रथम पत्रकार बातम्या शोधून गोळा करतात व संगणकाच्या द्वारे टाईप करून व्यवस्थित अशी प्रत बनवली जाते यानंतर मला मशीन मध्ये छापले जाते व वेगवेगळ्या ठिकाणी त्या प्रति पाठवल्या जातात.
बारा ते सोळा पानांचे वर्तमानपत्र तयार झाले की , नंतर वर्तमानपत्रे वाटणारी लोक मला तुमच्या घरा पर्यंत पोहोचवतात. निरनिराळ्या शहरात निरनिराळ्या ठिकाणी माझा प्रवास होतो .या प्रवासात मला खूप आनंद मिळतो.
जेव्हा लोक माझा उपयोग करतात तेव्हा मला दुसऱ्यांच्या कामी येत आहोत याचे सुख मिळते. परंतु आजच्या या आधुनिक इंटरनेटच्या युगात सर्व लोक इंटरनेटवर माहिती प्राप्त करतात. त्यामुळे माझ्या मागणीत आता घट होत चाललेली आहे. त्याचे मला जास्त वाईट वाटते! माझी जागा या माध्यमांनी घेतल्यामुळे माझे अस्तित्व धोक्यात आले आहे .
असे मला वाटते !पण ज्या लोकांना वाचनाची आवड आहे. ती लोक अजूनही माझे वाचन करायला उत्सुक असतात .याचा मला अभिमान आहे ! पण एक मात्र मला तुम्हाला सांगायचे आहे की मी या इंटरनेट माध्यम पेक्षा कमी खर्चिक व सोयीस्कर आहे हे खरे! परंतु लोकांच्या गरजेनुसार बदलत्या काळानुसार मी माझ्या स्वरूपातही बदल केलेला आहे.
वेगवेगळ्या मोबाईल ॲपमधून तुम्हाला हवे तेव्हा मी तुमच्या भेटीस येऊ शकतो. माझ्या रंगरूपात जरी बदल झाला तरीही आत्मा मात्र तोच आहे, बर का ! वाचकांच्या गरजेनुसार मी जरी बदललो तरीही वर्तमानपत्राची घडी हातात घेऊन गरमागरम चहाचे सुरके मारणारा वाचकवर्ग अजूनही टिकून आहे. नाही का? माझे अस्तित्व टिकवण्यासाठी आजही मी समर्थपणे प्रत्येक गोष्टीला सामोरे जात आहे ही माझ्यासाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.