अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Ahmednagar Information In Marathi

Ahmednagar Information In Marathi अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असुन क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही हा जिल्हा खुप मोठाआहे.भूतकाळातील इतिहासाचा प्रतिध्वनी करणारा जिल्हा आहेत. अहमदनगर येथील अहमदनगर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व आहे.

Ahmednagar Information In Marathi

अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Ahmednagar Information In Marathi

अहमदनगर किल्ल्यावर स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी आपल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना ताब्यात घेण्यात आले होते. येथेच पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान ताब्यात घेण्यात आले होते आणि याच किल्ल्यावर त्यांनी “डिस्कवरी ऑफ इंडिया” हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले.

आज अहमदनगर सर्वात प्रगत जिल्हा असून तेथे मोठे उद्योग व लघु उद्योग आहेत.

अहमदनगर जिल्ह्याची स्थापना

अहमदनगर जिल्ह्याचे नाव संस्थापक अहमद शाह निजाम शाह यांच्या नावावरून आले आहे. अहमदनगर या जिल्ह्याची स्थापना 28 मे 1940 या दिवशी झाली. पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतातील बहामनी राजवटीत फुटल्याने त्याचा एक भाग असलेल्या अहमद निजामशहा याने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले.

त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहागीर खान त्यांच्यावर चालून आला नगर जवळील भिंगार येथे तुंबळ युद्ध झाले व त्यात जहागीर खानचा पराभव झाला. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी भिंगार जवळच भुईकोट किल्ला उभारला व नगर हे शहर स्थापन झाले. तो दिवस म्हणजे 28 मे 1490 हाच दिवस नगर या जिल्ह्याचा स्थापना दिन मानला जातो.

मलिक अहमद याने इ.स.1494 मध्ये बसविलेले व निजामशहाचे राजधानी चे शहर पुढे त्याच्या नावाने अहमदनगर शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. पुणे महसूल विभागात असलेला अहमदनगर जिल्हा फेब्रुवारी 1981 पासून नाशिक या नवीन महसूल विभागात समाविष्ट करण्यात आला. सुलताना चांदबिबी व तिचा पराक्रम इथल्या मातीतच घडला .

तसेच 1942 चले जाव चळवळीत सहभागी पंडित जवाहरलाल नेहरू ,सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबरोबर अन्य राष्ट्रीय नेत्यांना येथील किल्ल्यात स्थानबद्ध केले होते. उत्कृष्ट हवामान असलेले हे शहर आता बदलत्या काळानुसार अत्याधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे.

अहमदनगर जिल्ह्याचा भूगोल

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,०४८ चौ.कि.मी. असून महाराष्ट्रातील एकुण क्षेत्रफळापैकी ५.६% क्षेत्रफळ अहमदनगर जिल्ह्याने व्यापलेले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत.

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरीश्चंद्राच्या डोंंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे गोदावरी नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा घोड, भीमा व सीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.

गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.

राजकीय संरचना

अहमदनगर जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ असून 12 विधानसभा मतदारसंघ आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत .

ते पुढील प्रमाणे :अहमदनगर, पाथर्डी, पारनेर, अकोले ,कर्जत ,शेवगाव कोपरगाव, राहुरी ,संगमनेर, जामखेड, राहता, श्रीगोंदे, श्रीरामपूर ,नेवासे. तसेच 14 पंचायत समित्या, 1316 ग्रामपंचायती, 1 महानगरपालिका,10 नगरपालिका,5 नगरपंचायत व 1कटकमंडळ आहे.

अहमदनगर जिल्ह्याची लोकसंख्या :-

२०११ च्या जनगणनेनुसार अहमदनगरची लोकसंख्या ४५,४३,०८० होती. त्यापैकी पुरुष  ६३% आणि महिला ३७% आहेत. अहमदनगरचा साक्षरता दर सरासरी ८०.२२% आहे.घनता 266,लिंग गुणोत्तर 939 आहे.पोलिस स्टेशन 30 आहेत.

हवामान

अहमदनगर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात  कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस ते किमान 1.7 अंश सेल्सिअस आहे.तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या  विषमता आढळते.

जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.सरासरी वार्षिक पर्जन्य-600 mm असतो.जिल्यातील सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात पडतो कारण तिथे असणारे कळसुबाई शिखर व हरिशचंद्र गड. शहरांच्या बऱ्याच भागात उन्हाळा व कोरडेपणा चा अनुभव दक्षिण-पश्चिम मान्सून हंगामात वगळता सर्व वर्षभर राहतो.

मार्च ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा काळ हा उन्हाळा असतो. त्यानंतर दक्षिण पश्चिम मान्सून हंगाम सप्टेंबर अखेरपर्यंत राहतो. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो .प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.

वने आणि माती

जिल्ह्यात पानझडी व दक्षिणेकडील भागात शुष्क वने आढळतात.

नदीकाठी सुपीक मृदा व डोंगर उतारावर काळी व चुनखडी मृदा आढळते.

पिके

जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू ,हरभरा, कांदा ,ऊस इत्यादी पिके घेतली जातात. कृषी उत्पन्न बाजार समिती फुलांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध असून पेरू उत्पादनात प्रथम आहे. ज्वारी हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते .बाजरी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा अहमदनगर आहे.

ऊस हे देखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे श्रीरामपूर हे मोसंबी साठी प्रसिद्ध असून तेथे मोसंबी संशोधन केंद्र आहे .राज्यातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा म्हणून अहमदनगर ओळखला जातो. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढत आहे .जिल्ह्यातील शेवंतीची फुलेही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी आहे.

उद्योगधंदे अहमदनगर जिल्ह्याची अर्थव्यवस्था :-

अहमदनगर मध्ये अनेक लघु व मोठ्या उद्योगआहेत. छोट्या उद्योगांमध्ये अशा उद्योगांचा समावेश आहे.औषधी वनस्पती गोळा करणे, बिडी गुंडाळणे, गूळ बनविणे इ.

मोठ्या प्रमाणात उद्योग ‘आयुर्वेदिक’ औषध तयार करण्याचे काम करत आहेत. अहमदनगरमधील अन्य मोठ्या प्रमाणात उद्योग मोपेड आणि टीव्ही सेट्स तयार करतात. इंजिन आणि पंप सेट तयार करणे, औषधी कारखाने, साखर कारखाने असे मोठे उद्योग आहेत. अहमदनगर येथेही सूत गिरण्या, जिनिंग आणि प्रेसिंग उद्योग आहेत.

प्रवरानगर येथे 1950 साली महाराष्ट्रातील पहिला साखर सहकारी साखर कारखाना उभारला गेला. सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून अहमदनगर ओळखला जातो. साखर उत्पादनात अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे.तसेच दूध उत्पादनात सुद्धा अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे.

तसेच कृषी व शैक्षणिक दृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरी येथे स्थापन झालेले महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते.

या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले भंडारदरा धरण, राहुरी जवळ बारागाव नांदूर येथील मुळा धरण हे जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प आहेत.

प्रमुख धार्मिक स्थळे

अहमदनगर जिल्ह्यामधील पर्यटन आणि तीर्थस्थळे पुढीलप्रमाणे:

शिर्डी

साईबाबांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी ज्याठिकाणी जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाकरता येत असतात. फक्त भारतातूनच नव्हे तर सर्व जगभरातून लोक ही साईंच्या दर्शनासाठी शिर्डीला येत असतात.

शनिशिंगणापूर

शनिदेवाचे मोठे तीर्थस्थान शनिशिंगणापूर अहमदनगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात असून शिर्डी पासून शनिशिंगणापूर चे अंतर साधारण 73 किलोमीटर एवढे आहे. अहमदनगर पासून शनिशिंगणापूर चे अंतर 40 किलोमीटर एवढे आहे. तेथेही भाविक मोठ्या संख्येने येतात.

सिद्धटेक

अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक या जिल्ह्यात असून यामुळे या जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून भव्य असे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या वेळेस दहा दिवस या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी होते.

नेवासे

नेवासे हे अहमदनगर जिल्ह्यातील गाव मोहिनीराज मंदिराकरता आणि संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाकरता ओळखले जाते. नेवासे या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.

देवगड येथील श्री दत्त मंदिर

तिन मुखी श्री दत्तात्रयाची अतिशय विलोभनीय मूर्ती या ठिकाणी आहे. श्री किशनगिरी महाराजांनी स्थापित केलेले देवगड येथील श्री दत्त मंदिर शनी शिंगणापूर येथून 41 किलोमीटर आणि नेवासे येथून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर असून अतिशय शांत आणि प्रसिद्ध हे स्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात.

भंडारदरा

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये नैसर्गिक आणि प्राकृतिक सौंदर्याने नटलेला भंडारदरा हे पर्यटनाकरता एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी मोठे धबधबे ,तलाव ,ट्रेकिंगची आवड असणाऱ्या करता उंच टेकड्या, हिरवळ असा निसर्गप्रेमींना आकर्षित न स्थळ मानले गेले आहे.

खनिज संपत्ती

खनिज संपत्ती अहमदनगर  बॉक्साईट व अँसबेस्टॉस ही खनिजांचे साठे आहेत.

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment