खेकडा प्राण्याची संपूर्ण माहिती Crab Information In Marathi

Crab Information In Marathi नमस्कार बांधवांनो, जसे आपण रोज एका प्राण्याची माहिती पाहतो तसेच आपण आज एका विचित्र समजल्या जाणाऱ्या प्राण्याची माहिती पाहणार आहोत तो म्हणजे खेकडा अर्थात त्याला इंग्रजीत crab(क्रॅब) असे म्हणतात. शाकाहारी लोकांसाठी हा एक विचित्र प्राणी असला तरी मांसाहारी खास करून मासे प्रेमींसाठी खेकडा ही एक मेजवानी असते. चला तर मी आपण जाणून घेऊयात खेकड्याबद्दल!!!!

Crab Information In Marathi

खेकडा प्राण्याची संपूर्ण माहिती Crab Information In Marathi

खेकडा माहिती :

खेकड्याच्या जवळजवळ ४५०० रंगीबेरंगी प्रजाती  आढळून येतात. त्यांच्या रंगाचा उपयोग हा आजूबाजूच्या वातावरणाशी मिळतेजुळते होण्यासाठी करतात जेणेकरून त्यांचा समुद्री प्राण्यांपासून, पक्षी, तसेच माशांपासून बचाव होतो.

काही प्रजाती कळपामध्ये राहतात तर काही एकट्या राहणे पसंद करतात.समुद्रकिनाऱ्यावर वाळूवर, दगडाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा आयुष्य घालवतो.

 • खेकडा त्याच्या कल्ल्याने श्वास घेतो म्हणून तो पाण्याच्या जवळ राहतो
 • त्याचे डोळे गोगलगायीसारखे दांडीसारखे असतात ,आणि खेकडा हा वाकडा चालतो व पोहतो.
 • खेकडे एकमेकांशी त्यांचे पाय आणि नांगी आपटून ड्रम किंवा टाळ्यासारखा आवाज करून संवाद साधतात.
 • खेकडे हे शाकाहारी तसेच मांसाहारी असल्यामुळे ,ते सूक्ष्म समुद्री वनस्पती, शेवाळं ,किंवा समुद्री बारीक किडे वगैरे खाऊन उदरनिर्वाह करतात.
 • जीवनक्रम
 • खेकडा साधारणपणे ३ ते ४ वर्षे जगतो.
 • खेकड्याचे काटेरी टणक कवच “काइटिन” या पदार्थाने बनलेले असते. आणि त्याच्या आत्तमध्ये खेकड्याचे मुलायम अवयव झाकलेले असतात.
 • ह्या कवच व मुलायम अवयवांमध्ये खूप पौष्टिकत्व रोगप्रतिकारक शक्ती असलेले घटक असतात त्यामुळे खेकडा खायला पौष्टिक मानला जातो.
 • त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील लोकांचा खेकडा हा उपयुक्त स्वादिष्ट व पौष्टिक मांसाहार मानला जातो.
 • कर्करोगाच्या उपचारात आहार म्हणून खेकडा उपयुक्त ठरतो.

तसेच खेकडयाची शेती हा समुद्रकिनाऱ्याजवळील लोकांचा एक प्रमुख व्यवसायदेखील आहे.

शास्त्रीय दृष्ट्या खेकड्याची रचना :

खेकड्याचे संपूर्ण शरीर टणक कवचाने झाकलेले असते ज्याला “एक्झोस्केलेटन” असे म्हणतात.डोके व शरीर जुळलेले असते ज्याला “कॅरापेस” असे शास्त्रीय भाषेत म्हणतात.खेकड्याला सांधे व जोड असलेले ४ पायांचे जोड असतात जे चालण्यासाठी वापरले जाते.पाचवी जोडी म्हणजे नांगी असते जी संरक्षणासाठी वापरतात.खेकड्याचे तोंड म्हणजे एक किचकट संरचना असते ज्यामध्ये अनेक हलणारे भाग  दिसुन येतात.ते आपल्या अँटीनाचा वापर आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी करतात.

खेकड्याची जीवन संरचना

नर-मादी खेकड्यांचे मिलन झाल्यानंतर मादी खेकडा अंडी टाकण्यास सुरवात करते. साधारणपणे १-३ कोटी अंडी टाकली जातात. मादी ही अनेक दिवस आपल्या पोटामध्ये अंडी साठवून ठेवू शकते. बऱ्याच प्रजातींमध्ये दोन आठवडे पर्यंत मादी अंड्यांचे पोषण करताना दिसते.अंड्यांच्या पिवळ्या पुंजक्याचा रंग चॉकलेटी झाला की अंडे फुटायला सुरवात होते. अंड्याची पूर्ण वाढ झाल्याचे कळल्यावर अळ्यांच्या रूपात मादी त्यांना पाण्यामध्ये सोडते.त्यांना झिया अळ्या असे म्हणतात.

सहसा भरती-ओहोटीची वेळ बघून त्यांना पाण्यात सोडले जाते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर त्या अळ्या तरंगत फिरत जातात व वाढतात. त्या छोटे समुद्रीकिडे व वनस्पती खाऊन उदरनिर्वाह करतात.

समुद्र किनारी दिसणारा एक विचित्र असा प्राणी  जो वाळूवर, दगडांच्या खाचखळग्यांमध्ये बसलेला असतो. दहा पायाचा असणारा जीव पण आडवा चालणारा आणि ज्याला काटेरी कडक कवच असते, कात्रीसारख्या  पुढे नांग्या असतात. समुद्राची लाट आली की तो पटकन पाण्याखाली जातो व जमिनीवरपण सहज फिरत असतो. त्याला बोली भाषेत “खेकडा” म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव आहे “ब्रॅकीयुरा”! खेकडा हा पाठीचा कणा नसलेल्या (इन्व्हर्टिब्रेट) प्राण्यांच्या जातीच्या क्रस्टेशिअन फॅमिलीमध्ये मोडणारा प्राणी आहे.

प्रत्येक प्रजातीच्या झिया अळ्यांच्या रूपाचा कालावधी निश्चित व वेगवेगळा असतो. ही अवस्था साधारणपणे ४० दिवसाची असते.अळ्या ४ ते ५ वेळा आपले कवच टाकतात व त्यांचे मोठ्या अळ्यांमध्ये सारखे रूपांतर होत जाते. मोठ्या अळ्यांना मेगॅलोप असे म्हणतात तर सर्वात  शेवटी मेगॅलोपचे छोट्या खेकड्यात रूपांतर होते.छोटे खेकडेसुद्धा अनेकवेळा कवच टाकतात, जोपर्यंत टणक कवच येतनाही. जुने कवच टाकून नवीन कवच येईपर्यंत खेकडा अतिशय मुलायम असतो आणि तो कानाकोपऱ्यात लपून बसतो जेणेकरुन शिकारी पासून त्याचे संरक्षण होईल.

नवीन कवच तयार करत तो वाढतो व सर्वात शेवटी पूर्ण मोठ्या प्रौढ खेकड्यात रूपांतर होते.ही अवस्था साधारणपणे १२ ते १८ महिन्यांची असते.पूर्व अमेरिकेच्या किनाऱ्यावर अंगावर पट्ट्या असलेला खेकडा पाहायला मिळतो. तो किडे तसेच सूक्ष्म वनस्पतीसुद्धा खातो.इंग्लंडच्या किनाऱ्यावर खाण्यायोग्य खेकडा पाण्याच्या पातळीपेक्षा १०० मीटर खाली आढळून येतात अशी माहिती आहे.पॅसिफिक महासागरात दोन प्रकारचे खेकडे पाहायला मिळतात, एक तपकिरी व एक निळा खेकडा. हे खेकडे आपला रंग बदलून आपले संरक्षण करू शकतात.

अलास्का व उत्तर पॅसिफिक मध्येदेखील रेड किंग क्रॅब (लाल मोठा खेकडा) आढळून येतो जो तेथील लोकांचा अन्नाचा एक प्रमुख पर्याय मानला जातो.काही खेकडे तर जमिनीवर राहणारे पण असतात. त्यापैकी काही प्रजननासाठी समुद्रात जातात. तर काही जात नाहीत.

 • कॅरिबियन देशात तर समुद्रात परत जाणाऱ्या खेकड्यांचा एक विशेष अनुभव सांगितला जातो.
 • हजारो-करोडो खेकडे संपूर्ण रस्ते, बागा, जंगले व्याप्त करून एखाद्या सैन्य तुकडीप्रमाणे समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात.ही एक पर्वणीच असते.
 • कोकोनट क्रॅब (नारळ खेकडा) हा एक प्रकारचा खेकडा मांजरीच्या आकाराएवढा असतो जो नारळसुद्धा खाऊ शकतो. म्हणून त्याचे तसे नाव असे पडले आहे.
 • खेकड्यांच्या विविध प्रकारांमुळे मानवाला ते एक आकर्षणाचा विषय बनलाआहे.
 • माणसाने एका राशिग्रह समूहाला “वृश्चिक” राशी असे नाव दिलं आहे.

अन्नपुरवठा

 • खेकड्यांना दररोज फेकून दिलेले मासे, खारे पाणशिंपले अथवा कुक्कुटपालनातला कचरा खायला दिला जातो. खेकड्याच्या वजनाच्या सुमारे 5 ते 8 टक्के वजनाचे अन्न त्याला दिले जाते.मात्र  जर तुम्ही खेकडा पालन करत असाल आणि दिवसातून दोनदा खायला देत असाल तर अन्नाचा जास्त भाग संध्याकाळी द्या.
 • बाजारातील जोरदार मागणीमुळे निर्यात बाजारांत चिखल्या खेकडा अत्‍यंत लोकप्रिय झाला आहे.
 • व्यावसायिक स्तरावर जर विचार केला तर  ह्या खेकड्याची जोपासना करण्याचे प्रमाण हे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्ट्यांवर जास्त दिसून येते.
 • चिखल्या खेकड्याचे प्रकार

स्काइला (Scylla) जातीचा हा खेकडा मुख्यतः किनारपट्टया, नद्यांची मुखे व (बॅकवॉटर) मध्ये सापडतो.

मोठी प्रजाती

मोठ्या प्रजातीला स्थानिक लोक `हिरवा चिखल्या खेकडा’ म्हणून संबोधतात.तो 22 सें.मी. रुंदीपर्यंत वाढतो.ह्या खेकड्याच्या पायांवर तसेच कवचावर नक्षी असल्यामुळे तो सहज ओळखता येतात.

लहान प्रजाती

लहान प्रजातीच्या खेकड्यांना `लालनांग्या’ असे संबोधतात. तो 12.7 सें.मी. रुंदीपर्यंत वाढतो व त्याचे वजन 1.2 किलोपर्यंत असते.ह्याच्या अंगावर  नक्षी नसते व ते जमिनीतील बिळात राहणे पसंद करतात.दोन्ही जातींच्या खेकड्यांना देशी-परदेशी मासळीबाजारांत मोठी मागणी आहे.

 • खेकडा जोपासनेच्या पद्धती
 • चिखल्या खेकड्याची शेती करण्याच्या (मड क्रॅब फार्मिंग) च्या दोन पद्धती आहेत.
 • ग्रोआउट कल्चर

कमी वयाचे खेकडे, 5 ते 6 महिन्यांत, आपणांस हवे असणाऱ्या आकारा इतके वाढतात.ग्रो-आउट पद्धत साधारणतः तलावांत राबविली जाते. येथे खारफुटीचे जंगल (मॅन्ग्रूव्ह) असलेच पाहिजे असे काही नाही.तलाव साधारणतः 0.5 ते 2.0 हेक्टर आकाराचा असतो व तेथे भरतीचे पाणी येण्या-जाण्याची  सोय असते.लहान तलावाला कुंपण घालावे .ह्यामध्ये 10 ते 100 ग्रॅम वजनाचे जंगली खेकडे पकडून वाढवले जातात.जोपासनेचा  काळ सुमारे 3 ते 9 महिने असतो.प्रति चौरस मीटरमध्ये 1 ते 3 खेकडे वाढवता येतात. त्यांना वरचे अन्न दिले जाते.उपलब्‍ध असलेल्‍या इतर स्‍थानिक पदार्थांबरोबर बहुतेक फेकून दिलेले मासेच आहार म्‍हणून देण्‍यात येतात.

खेकड्यांच्या वाढीवर व आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच त्यांना दिल्या जाणार्‍या अन्नाचे प्रमाण ठरवण्यासाठी नियमितपणे नमुने घेतले जातात (सँपलिंग).तिसर्‍या महिन्यानंतर खेकडे काही प्रमाणात बाजारात पाठवता येतात . ह्याचा आणखी एक फायदा म्हणजे मोठ्या व लहान खेकड्यांमधील भांडणाचे प्रमाण कमी होते व बाकीचे खेकडे व्यवस्थित वाढतात.

कवचजोपासना (फॅटनिंग)

काही आठवडे मऊ पाठीच्‍या खेकड्यांची जोपासना करण्‍यात येते, ज्यामध्ये त्यांचे कवच (एक्झोस्केलेटन) टणक होते. मऊ खेकड्यांपेक्षा टणक खेकड्यांना तिप्पट वा चौपट  किंमत मिळू शकते.

तलावांतील कवचजोपासना (फॅटनिंग)

भरतीच्या पाण्याने भरणार्‍या लहान तलावांतही फॅटनिंग प्रक्रिया करता येते.ह्या ठिकाणी 1 ते 1.5 मीटर खोल पाणी ठेवतात. तलावाचा आकार 0.025 ते 0.2 हेक्टर असतो.ह्याआधी तलावातले पाणी काढून तळ उन्हात कोरडा केला जातो व योग्य प्रमाणात चुनखडी टाकली जाते.तलावाच्या भिंती व बंधारे व्यवस्थित आहेत की नाही हे पहावे लागते.गटाराची  तोंडे नीट बंद करावी कारण हे खेकडे त्यांतून पळून जाण्यात पटाईत असतात.पाणी आत येण्याच्या जागेवर बांबूच्या चटया लावाव्या.

ह्या तलावांना बांबू व जाळीचे कुंपण घालतात. ह्या कुंपणाची वरची बाजू तलावाकडे आत झुकलेली असते त्यामुळे खेकडे त्यावर चढून पळून जाऊ शकत नाहीत.

स्थानिक कोळी व व्यापार्‍यांकडून घेतलेले मऊ खेकडे शक्यतो सकाळच्या वेळी तलावात सोडले जातात. खेकड्यांच्या आकाराप्रमाणे त्यांची संख्या दर चौरस मीटरमध्ये 0.5 ते 2 इतकी ठेवली जाते.

550 ग्रॅम व त्यापेक्षा अधिक वजनाच्या खेकड्यांना बाजारात मोठी मागणी असते त्यामुळे शक्यतो असेच खेकडे बाळगावे. मात्र अशा प्रत्येक खेकड्याला 1 चौरसमीटर जागा आवश्यक असते.पाणखेकड्यांची उपलब्धता आणि तलावाच्या ठिकाणानुसार एका तलावात 6 ते 8 वेळा फॅटनिंगची क्रिया करता येते.

 • तलाव मोठा असल्यास त्यात योग्य आकाराचे छोटे भाग करून प्रत्येक भागात विशिष्ट आकाराचे खेकडे जोपासावे, ह्याने त्यांचे संगोपन आणि काढणी सोपी होते.
 • जोपासणीच्या दोन हंगामांत बराच कालावधी असल्यास एका आकाराचे खेकडे एका विभागात ठेवता येतील.
 • नर खेकड्यांकडून होणारे हल्ले कमी करण्यासाठी ह्या विभागांमध्ये लिंगानुसार वर्गवारी करून खेकडे ठेवणेही फायदेशीर ठरते.
 • तसेच त्यांच्या आपसातील मारामार्‍या कमी होण्यासाठी फरशा, जुने टायर्स किंवा वेताच्या टोपल्या तलावात टाकून ठेवल्या तर त्यांमध्ये लहान खेकडे आसरा घेऊ शकतात.
 • खेकडे जोपासणीचेतलावातील पाण्याचे आगम (इनलेट)
 • मजबूत बनवण्यासाठी बांबूचा वापर करावा.कोकण आणि अनेक ठिकाणी खेकडा हा आवर्जून खाल्ला जातो. खेकड्याचे सूप, कालवण, सुके हे फारच प्रसिद्ध आहे. ताटात खेकडा वाढलेला असला आणि अन्य कोणताही मासा असला तरी खेकड्यापुढे हे सगळे फिके पडतात.
 • खेकडे हे समुद्र आणि नदी दोन्हीमध्ये मिळतात.
 • खेकड्याची शेती ही अनेक ठिकाणी केली जाते. भारतातील खेकडे हे अनेक देशांमध्ये निर्यातदेखील केले जातात.
 • समुद्रातील खेकडा लाल रंगाचा असतो. तर खाडी किंवा शेतामध्ये मिळणारा खेकडा काळ्या रंगाचा असतो.
 • खेकड्यांना कुर्ल्या, चिंबोऱ्या या नावांनी देखील ओळखले जाते. खेकड्यांमध्ये प्रोटीन, पोटॅशिअम, सोडीअम,व्हिटॅमिनC, कॅल्शिअम, व्हिटॅमिन B6  असे आवश्यक घटक असतात.
 • त्याचा फायदा शरीराला होतो.

धन्यवाद!!!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment