Dog Information In Marathi सर्व प्राण्यांमध्ये कुत्रा या प्राण्याला सर्वात इनामदार प्राणी म्हणून ओळखला जातो. तो सर्वांना हवा हवासा आणि आवडणारा हा प्राणी आहे .कुत्रा या प्राण्याचे शास्त्रीय नाव कॅनिस लुपस फॅमिलियारीस असे आहे. त्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी व गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तसेच घराचे रक्षण करण्यासाठी केला जातो.
कुत्रा प्राण्याची संपूर्ण माहिती Dog Information In Marathi
एका संशोधनात मध्ये आढळून आलेले आहे की कुत्रा पाळणे हे माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असते ती माणसाच्या मनावरचे ओझे कमी करण्यास मदत करते. म्हणजेच कुत्रा पाळल्याने माणसाच्या मानसिक तणाव कमी होतो म्हणून कुत्र्याला ‘थेरपी डॉग’ म्हणतात. आपल्या घराच्या सभोवताली एखादा अज्ञात माणूस जरी दिसला तरी तो भुंकून गुरकून आपल्या मालकाला जागे करतो.
उत्पत्ती
कुत्र्याची उत्पत्ती ही बहुथा लांडग्यापासून झाली असावी. कारण लांडगा व कुत्रा यांची शारीरिक रचना संपूर्णपणे एक सारखी असते. याचे आकारमान आणि दातांची ठेवण ही कुत्र्याची मिळतीजुळती असते. त्यामुळे कुत्रा हा लांडग्याचा वंशज मानला जातो.
इतिहास
कुत्रा हा प्राचीन काळापासून मनुष्याच्या सान्निध्यात राहिलेला प्राणी आहे. अन्नासाठी कुत्रा हा माणसाच्या सानिध्यात राहतो. स्वर्गात जाताना युधिष्टरा बरोबर एक कुत्रा होता. यावरून कुत्र्याचा इमानी पणा सांगितला जातो. इंद्राची ही सरमा नावाची कुत्री प्रख्यात होती. रायगडावर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. कुत्रा हा काही कारणाने पवित्र मानला गेला होता परंतु श्री दत्तगुरूंच्या सानिध्यात कुत्र्याला स्थान देण्यात आले आहे.
कुत्र्याची शारीरिक रचना व वैशिष्ट्ये
कुत्र्याला चार पाय, दोन डोळे, 2 मोठे व तिक्ष्ण कान ,तिक्ष्ण नाक, असते. तीक्ष्ण नाक आणि कान असल्यामुळेच कुत्र्यांना वास घेण्याची व एकण्याची क्षमता अतिशय उत्तम असते. कुत्र्याला धारदार दात असतात. परंतु ते विषारी असतात. त्यांच्या पुढील पायाला पाच तर मागील पायाला 4 नखे असतात .काही कुत्र्यांना त्यापेक्षा जास्त नक्की असू शकतात. जास्त नखे असणारी कुत्रे ही चतुर असे समजले जाते.
कुत्रा हा असा प्राणी आहे जो 24 मीटर अंतरावरील आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो. त्यांची वास घेण्याची क्षमता ही उत्तम असते. तो ताशी 19 मैल पळू शकतो. त्याचप्रमाणे तो चांगल्या प्रकारे पाण्यात पोहू शकतो.
कुत्र्याचा आहार
कुत्रा हा सर्व प्रकारचे अन्न खातो.,मांस,मासे ,दूध व इतर कोणतेही पदार्थ तो खातो. ते मांसाहारी व शाकाहारी असे दोन्ही प्रकारचे अन्न ग्रहण करतात. तसेच आजच्या युगामध्ये बऱ्याच कंपन्या कुत्र्यांचे खाद्य तयार करतात .उदाहरणार्थ पेडिग्री, रॉयल ,कॅनिन अशा बऱ्याच प्रकारचे उत्पादन कंपन्या घेतात व आजकालची पिढी हेच अन्न आपल्या कुत्र्यांना खाऊ घालतात.
कुत्र्यांचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात केला जातो
कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र असल्यामुळे तो माणसांना वेगवेगळ्या क्षेत्रात मदत करतो. कुत्र्याची वास घेण्याची ऐकण्याची आणि पळण्याची क्षमता या चांगल्या गुणांचा वापर माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात करून घेतो. काही कुत्रे आंधळ्या तसेच आजारी ,जखमी व्यक्तींना मार्गदर्शन करतात. तसे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. काही कुत्र्यांचा वापर हा थेरेपी डॉग म्हणून केला जातो.
माणसाचा मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी रक्तदाब किंवा हृदयरोग आदींनी पीडित असणाऱ्या लोकांना या थेरपी डॉग चा उपयोग केला जातो. तसेच कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना कुत्र्यांचा वापर होतो .तसेच अभिनय क्षेत्रांमध्येही व त्यांचा वापर केला जातो.
कुत्र्यांच्या जाती
● विदेशी कुत्र्यांच्या विविध जाती
जगभरात 400 अधिक जाती आहेत. त्यामधील काही लोकप्रिय आहेत. तर काही नामशेष झाल्या आहेत .डॉबरमॅन, लॅब्रेडोर, जर्मन शेफर्ड ,बुल डॉग, गोल्डन रिट्रीव्हर ,पोमेरेनियन या काही प्रसिद्ध कुत्र्याच्या जाती आहेत.
1 ) लॅब्रेडोर
लॅब्रेडोर ही एक मधील प्रसिद्ध जात आहे. ही एक प्रेमळ, कार्यक्षम ,शांत ,बुद्धिमान व सगळ्यांना भुरळ पाडणारी अशी जात आहे. हा कुत्रा आकाराने मोठा असतो . त्याचे आयुष्य १० ते१५ वर्ष असते. लॅब्रेडोर हा कुत्रा थेरपी डॉग म्हणून वापरला जातो. त्याचा वापर खेळांमध्ये व शिकारीसाठी ही केला जातो.
2) डॉबरमॅन
डॉबरमॅन ही एक जर्मन कुत्र्याची जात आहे. हा कुत्रा घराची राखण चांगल्या प्रकारे करू शकतो. हा कुत्रा आज्ञाधारक, हुशार व बुद्धिमान असा आहे. या कुत्र्याची वाढ ही कमी वेगाने होते. पहिले तीन-चार वर्ष हे कुत्र्याच्या पिलासारखेच सारखेच दिसते. या कुत्र्यांना प्रशिक्षण देणे खूप सोपे असते कारण ते पटकन शिकतात. या कुत्र्यांचे आयुष्य 10 ते 13 वर्ष इतके असते.
3)जर्मन शेफर्ड
जर्मन शेफर्ड या कुत्र्याची उत्पत्ती ही जर्मन मध्ये झाली आहे .या जातीचे कुत्रे आकाराने खूप मोठे व आक्रमक असतात .हे कुत्रे खूप शूर, दक्ष, हुशार असतात .त्यांना रोज व्यायामाची गरज असते. त्यांचे आयुष्य 10 ते 13 वर्ष इतके असते.
4) गोल्डन रिट्रीवर
गोल्डन रिट्रीवर ही अमेरिकेतील एक लोकप्रिय जात आहे. हे कुत्रे हुशार ,बुद्धिमान आणि सहनशील वृत्तीचे असतात .या कुत्र्यांचा वापर पाठलाग करण्यासाठी, शिकार करण्यासाठी व थेरपी डॉग म्हणूनही करतात .हा कुत्रा क्रीडापटू म्हणूनही आपले कार्य बजावतो.
5) बुलडॉग
हा कुत्रा शक्तिशाली ,विनम्र, दयाळू असतो . बुलडॉग चा वापर बुलबायटिंग नावाच्या रक्तरंजित खेळामध्ये भाग घेण्यासाठी केला जातो. याचे आयुष्य 8 ते13 वर्ष असते.
6) रॉट व्हीलर
रॉटविलर हा हुशार उत्साही न घाबरणारा एक चांगला संरक्षण असा कुत्रा असतो. या कुत्र्यांना रोटी किंवा रोट या नावानेही बोलवले जाते. या कुत्र्याचे आयुष्य 8 ते 11 इतके असते व ते आकाराने सुद्धा खूप मोठी असतात.
7) पग
पग ही जात खूप जुनी चायनीज जात आहे. ही कुत्र्याची खूप लोकप्रिय जात आहे. या जातीचे कुत्रे खेळाडू वृत्तीचे आणि माणसांमध्ये लगेच मिसळणारे असतात. ही कुत्री आकाराने लहान असतात पण त्यांच्या तोंडाचा आकार मोठा असतो. हे जास्त आक्रमक नसतात ते चांगले फॅमिली डॉग बनू शकतात. त्यांचा त्यांना रोज व्यायामाची गरज असते जर त्यांचा व्यायाम नियमित झाला नाही तर त्यांचे वजन वाढते. त्यांचे आयुष्य 8 ते 15 वर्ष इतके असते .
● भारतीय कुत्र्यांच्या जाती
1) वाघ्या
वाघ्या हा मिश्र जातीचा कुत्रा आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा कुत्रा होता. जेव्हा शिवाजी महाराजांचे निधन झाले तेव्हा त्याने शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी घेऊन आपले ही आयुष्य शिवाजी महाराजांसोबत संपवले. म्हणून वाघ्याला स्वामीनिष्ठ कुत्रा म्हणून ओळखले जाते .रायगड किल्ल्यावर वाघ्या कुत्र्याची समाधी सुद्धा आहे. हा एकनिष्ट ,प्रामाणिक आणि चांगला साथीदार होता. वाघ्या कुत्र्याचे अस्तित्व आपल्याला कुठेही आढळत नाही.
2) राजापलयम
या नावावरून समजते की ही एक तामिळनाडूमधील जात आहे. या कुत्र्यांना पोलीगर शिकारी म्हणूनही ओळखले जाते. या कुत्र्याला तामिळनाडूतील राजापलयम या शहराचे नाव दिले आहे. ही कुत्रे आकाराने मोठे असतात .त्यांचे आयुष्य ९ ते १० वर्ष असते .हा कुत्रा पांढराशुभ्र, गुलाबी नाक, लांब पाय असे या कुत्र्याचे वर्णन आहे.
3) इंडियन माउंटन डॉग
हिमालयाच्या परिसरात आढळणारा कुत्रा आहे. हा तेथील हवामानाच्या गरजेनुसार केसाळ आणि ताकदवान असतो. हिमाचल प्रदेश ,काश्मीर , उत्तराखंड या भागात संरक्षणासाठी श्वान पाळला जातो .
4) कन्नी
कुत्र्याचे या जातीचे मूळ स्थान तामिळनाडू असून मालकाशी अत्यंत इनामदार राहणारी आणि घरात पटकन मिसळुन जाणारी प्रजाती म्हणून या कुत्र्याची ओळख आहे. ही सर्वसाधारणपणे काळ्या या रंगात आढळतात.
5) कोंबई
ही दक्षिण भारतात आढळणारी प्रजाती आहे. या जातीचा कुत्रा शेताच्या राखणीसाठी पाळला जातो. उंचीला कमी पण ताकद वान अशी प्रजाती आहे.
कुत्र्यांच्या भारतीय प्रजातींचे वैशिष्ट
भारताच्या भौगोलिक विविधतेमुळे तेथील हवामान ,खाणे, पिणे,जीवन शैली स्वीकारून या कुत्र्याच्या जाती देशभरातील विविध भागात पसरले आहेत. भारतीय कुत्र्यांच्या प्रजातींची प्रतिकारशक्ती अधिक असते. आणि त्यांच्या गरजा ही तुलनेने कमी असतात .भारतीय कुत्रीही तेथील होणारे बदल लवकर स्वीकारतात. स्थानिक गरजांनुसार त्यांची गुणवैशिष्ट्ये निर्माण झालेली असल्याने देशाच्या सीमा सुरक्षा दल यांकडून राजपलयम किंवा हिमालयाच्या परिसरातील स्थानिक शासन प्रजातींचा अधिक वापर केला जातो.
कुत्र्यांना होणारे रोग
कुत्र्यांना रेबीज ,हार्टवर्म पार्वोव्हारस, इयर माईट्स असे रोग होतात. रेबीज हा कुत्रा जर माणसाला चावला तर रेबीज हा रोग माणसांनाही होतो. हा रोग मेंदूवर आणि पाठीच्या कण्यावर प्रभाव करतो.
कुत्र्या बद्दल काही तथ्य
- जर कुत्रा भुंकत असेल तर तो आक्रमक असतो .
- जर तो शेपूट हलवत असेल तर तो मैत्रीपूर्ण असतो.
- जर कुत्र्याने आपली शेपूट आणि कान सरळ केली असेल तर तो सतर्क असतो.
- जर कुत्र्याने जीभ बाहेर लटकत ठेवली असेल तर तो खूप आनंदी असतो.
- तुम्हाला वाटत असेल तर तो आपले प्रेम व्यक्त करत असतो. कुत्र्याने आपली शेपूट आपल्या पाठी मागच्या दोन पायांच्या मध्ये घेतले असेल आणि त्याची मान खाली असेल तर तो घाबरलेला असतो.
- कुत्र्याने जीभ बाहेर काढली असेल आणि त्याचे कान पाठीमागे असतील तर तू कुत्रा डिप्रेशनमध्ये असतो. अंतराळामध्ये जाणारे सर्वात पहिली कुत्री लायका नावाची होती. रशियाने सर्वात पहिले सजीव म्हणून या कुत्रीला पाठवले होते .
- वास घेण्यासोबतच कुत्र्याची ऐकण्याची क्षमता माणसांच्या क्षमतेपेक्षा पाच पटीने जास्त असते.
- चायना मध्ये कुत्र्यांचे मीट फेस्टिवल भरवली जाते चायना मध्ये कुत्र्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे डिशेश बनवले जातात.