Cheetah Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण चित्ता या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. या लेखात आपण चित्ता या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे, चित्ता कुठे राहतात, ते वास्तव्य कसे करतात, त्यांचे प्रकार किती आहेत ? आपण अशा प्राण्यांची माहिती पाहणार आहोत ज्याला जगभरात वेगाचे प्रतीक मानले जाते तो म्हणजे ‘चित्ता’ .हा फेलिडी कुळातील प्राणी असून त्याला शास्त्रीय भाषेमध्येऑसिनोकिक्स जुबेट्स असे म्हटले जाते. हा प्रामुख्याने आफ्रिका खंडामध्ये आढळणारा प्राणी आहे.
चित्ता प्राण्याची संपूर्ण माहिती Cheetah Information In Marathi
चित्ता या प्राण्याची प्राथमिक माहिती
जलद वेगाने धावणारा प्राणी म्हणून चित्ता या प्राण्याची ओळख आहे. कोणत्याही गतिशील वस्तूला किंवा यंत्राला चित्त्याची उपमा दिली जाते. सर्वसाधारणपणे तो मानवाच्या किमान तिप्पट गतीने धावू शकतो. चित्ता हा प्राणी ताशी 90 ते 110 किलोमीटर वेगाने धावू शकतो. चित्ता हा मांजरकुळातील एक सस्तन प्राणी आहे.
हा प्राणी प्राचीन काळापासून आपल्या पृथ्वीवर वास्तव्य करीत आहे. चित्ता या प्राण्याचा जास्तीत जास्त वेग 110 किलोमीटर पर ताशी ते 120 किलोमीटर पर तासाच्या दरम्यान असतो .चित्ता या प्राण्याची लांबी 1.1 मीटर ते 1.4 मीटर असते .तर त्याचे वजन 34 ते 54 किलो असते. त्याची सरासरी उंची 32 इंच आहे.
हा प्राणी घनदाट वनांमध्ये किंवा गवताळ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. भारतामध्ये वायव्य दिशेला असलेल्या खिंडीमधून तो भारतामध्ये आला असे मानले जाते. भारतामध्ये उत्तर आणि मध्य भारतातील सपाट प्रदेश आणि टेकडीजवळ चित्ता या प्राण्याचे पाहिले स्थान आहे नंतर तो दक्षिण कर्नाटका पर्यंत पोहोचला असे काही प्राणी संशोधकांचे म्हणणे आहे.
सध्या चित्ता या प्राण्याची संख्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी भारतामध्ये आणि युरेशिया मध्ये चित्ता हा प्राणी खूप मोठ्या प्रमाणावर आढळत असे पण आता दिवसेंदिवस या प्राण्याची संख्या कमी होत चाललेली आहे. आता चित्ता हे फक्त आफ्रिकेमध्ये गवताळ प्रदेशातच आढळतात. भारतामध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणात चिता या प्राण्याचा वावर होता आणि शेवटचा जंगली चित्ता 1951 च्या दरम्यान आंध्रप्रदेश मध्ये दिसला होता. त्यानंतर तो भारताच्या कोणत्याही जंगलांमध्ये आढळला नाही.
चित्ता हा प्राणी कोठे राहतो
चित्ता गवताळ प्रदेशात किंवा झुडुपात राहणे पसंत करतो. तो उष्ण वातावरणामध्ये आणि वळवंटामध्ये देखील राहू शकतो. चित्ता हा प्राणी झाडावर ही राहू शकतो.
चित्ता या प्राण्याची शरीररचना
चित्ता हा सडपातळ व चपळ असतो. चित्ता हा प्राणी साधारणपणे सहा-सात फूट लांबीचा असतो. त्याचा रंग पिवळसर लाल असतो. अंगावर काळे भरीव ठिपके असतात. चित्त्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान व एक शेपटी असते. चित्त्याचे डोके लहान असते. डोळे खूप मोठे असून त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या वर्तुळाकार असतात.
त्याची त्वचा खडबडीत व रंगाने पिवळी असते. चित्त्याच्या शरीरावर भरीव काळे ठिपके असतात परंतु त्याच्या पोटावर आणि पायावर असे भरीव काळे ठिपके आढळत नाहीत. त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली अश्रुसारख्या दिसणाऱ्या रेषा असतात. त्याचे शरीर हे लांबसडक असते.
त्याची छाती रुंद तर कंबर बारीक असते. पोटाकडील भाग फिक्कट असतो त्याची नखे काहीशी वाकडी असतात म्हणून भक्ष्याचा पाठलाग करताना ते आपली दिशा बदलण्यासाठी उघड्या नखांचा चित्त्याला अतिशय उपयोग होतो. पाय लवचिक आणि डोके लहान आणि वाटोळे असल्यासारखे असते.
चित्ता या प्राण्याचे खाद्य
चित्ता हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. हरिण, शेळी, लांडगा व माकड या प्राण्यांचे मांस चित्त्याला आवडते. विशेष करून ससा आणि शहामृग यांची शिकार जास्त करून चित्ता याला आवडते.चित्ता हा सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या वेळी शिकार करतो. तो कितीही वेगाने धावत असला तरी देखील तो त्याच्या शिकारीचा एक ते दीड मिनिट पाठलाग करतो आणि शिकार शक्य नसल्यास तो त्या शिकारीचा पाठलाग सोडून देतो. नर चित्ता हा बहुतेकदा एकटा शिकार करत नाही परंतु मादी चित्ता ही एकटी शिकार करते.
चित्ता आणि बिबट्या यातील फरक
चित्ता व बिबट्या यांच्या मधील फरक पुष्कळदा आपल्याला कळत नाही.दोनही प्राणी आपल्याला सारखे वाटतात परंतु त्यांच्यात फरक आहे.चित्ता बिबट्यापेक्षा सडपातळ असतो. चित्त्याच्या अंगावर भरीव आणि छोटे काळे ठिपके असतात, बिबट्यांचे ठिपके पुंजक्या-पुंजक्यात असून ते पोकळ असतात. बिबट्याची शरीरयष्टी ही भरभक्कम मांजरासारखी गुबगुबीत असते तर चित्याची कुत्र्याप्रमाणे लांब सडक जोरात पडण्यास सक्षम अशी असते. चित्ता बहुदा दिवसा शिकार करतो, बिबट्या रात्री शिकार करतो. चित्ता झाडावर चढत नाही, बिबट्या आपली शिकारसुद्धा झाडावर घेऊन जाऊ शकतो. चित्त्याला आपल्या नख्या पंजात ओढून घेता येत नाही. मात्र, बिबट्याच्या नख्या तीक्ष्ण व बाकदार असतात.
प्रजनन काळ
चित्त्यामध्ये नर मादीपेक्षा मोठा असतो. गर्भ-काळ ८४—९० दिवसांचा असून,मादीला एकावेळी २—४ पिले होतात. पिल्ले मोठी होऊन स्वतः एकटी राहण्यास सक्षम होईपर्यंत आईबरोबर राहतात. चित्त्याचे आयुष्य १०—१२ वर्षे असते. मात्र, प्राणी संग्रहयात तो २० वर्षे जगू शकतो.
चित्ता या प्राण्याचे संवर्धन
चित्ता या प्राण्याच्या कातड्याला बाजारात खूप मोठी मागणी असल्यामुळे या प्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. या प्राण्यांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या आलिशान वस्तू बनवल्या जातात व त्या उच्च किमतीमध्ये बाजारात विकल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या प्राण्यांची शिकार केली जाते.
भारतामध्ये चित्ता हा प्राणी 1940 पासून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारतामध्ये पुन्हा एकदा चित्ता हा प्राणी आयात करून त्याला संरक्षण देऊन त्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे चित्ता हा प्राणी नामशेष होण्याच्या आधी त्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
चित्ता हा प्राणी नामशेष होण्यापासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो?
बिग कॅट पब्लिक सेफ्टी ऍक्ट सारख्या चित्त्याच्या संरक्षणासाठी बनवलेल्या कायद्यांचे समर्थन केले पाहिजे.
चित्ता संवर्धन निधी सारख्या संवर्धन संस्थांच्या कार्यास समर्थन दिले पाहिजे.
चित्ता या प्राण्यांचे प्रकार
चित्ता या प्राण्याचे सुद्धा प्रकार आहेत त्यामध्ये आशिया चित्ता, तांझानिया चित्ता, वायव्य आफ्रिकन चित्ता ,दक्षिण आफ्रिका चित्ता ,सुदान चित्ता आणि पांढरा चित्ता यांसारखी त्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला आढळून येतात. तसेच भारतामध्ये आणि युरेशीयामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये चित्ता आढळून येत होता. परंतु आता त्यांची संख्या कमी झालेली दिसत आहे.
1) एशियाटिक चित्ता
प्रामुख्याने हा चित्ता भारत ,इराण आणि पाकिस्तान मध्ये आढळता.सध्या हे चित्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारत सरकार या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा चित्ता प्रामुख्याने फिकट पिवळसर आणि बदामी रंगाचा असून त्यांच्या अंगावर काळे ठिपके आहेत.त्यांचे वजन 143 किलो 45 किलोग्रॅम आहे. त्यांची उंची 31 ते 32 इंच आहे. त्यांची लांबी 52 असून त्यांची शेपटी 30 इंच आहे.
2) टांझानियम चित्ता
टांझानियन चित्त्याला केनियन चित्ता असेही म्हटले जाते. हे चित्ते टांझानिया सोमालिया आणि केनिया या देशांमध्ये आढळतात. हे गवताळ प्रदेशात राहणे पसंत करतात. दक्षिण आफ्रिकेच्या चित्त्याची लोकसंख्या टांझानिया चित्त्यांपेक्षा कमी होती.
3) वायव्य आफ्रिकन
वायव्य आफ्रिकन चित्ता हा प्रामुख्याने वायव्य आफ्रिकेमध्ये आढळणारा प्राणी आहे. सध्या ही प्रजाती सर्वात धोकादायक आहे. हा चित्ता पांढरा रंगाचा असून त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे ठिपके असतात तर त्याच्या पायावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात .वायव्य आफ्रिकन चित्याला स्नेहल किंवा सहारान चित्ता या नावाने देखील ओळखले जाते.
4) सुदान चित्ता
सुदान चित्त्याला मध्य आफ्रिकन चित्ता किंवा सोनाली चित्ता असे देखील म्हटले जाते. हा चित्ता आफ्रिकेमध्ये गवताळ भागात किंवा वाळवंटामध्ये आढळतो. सुदाम चित्ते हे जवळ जवळ टांझानिया चित्ता सारखेच दिसतात.
5) किंग चित्ता
किंग चित्ता हा सर्वसामान्यपणे आफ्रिकेमध्ये आढळणारा प्राणी आहे. या प्राण्यांची संख्या सुद्धा खुप कमी होण्याच्या मार्गावर आहे. या प्राण्याच्या अंगावर काळे ठिपके आणि पट्टे असतात. ते इतरांपेक्षा वेगळे असतात. त्यांचे वजन 88 ते 89 किलो असते. हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे त्याला दिवसाला सात ते आठ किलो मांस लागते .हा सर्वसामान्य चित्ता पेक्षा मोठा असतो.
6) पांढरा चित्ता
पांढरा चित्ता हा 1608 मध्ये सापडला होता. आता हा चित्ता नामशेष झाला आहे. हा चित्ता सर्वात वेगवान चित्ता होता असा निष्कर्ष काढला जातो.
चित्ता या प्राण्याविषयी काही तथ्य
- चित्त्याचे पाय लांब आणि पातळ असतात त्यामुळे तो वेगाने धावू शकतो.
- त्याची दृष्टी माणसांपेक्षा 50% चांगली आहे हा प्राणी तीन मैल अंतरावर ही काहीही जवळून पाहू शकतो .
- धावत असताना अचानक वेग कमी करणे ही देखील चित्त्याची खासियत आहे .
- चित्ता हा वाघाप्रमाणे डरकाळी फोडू शकत नाही तो मांजरीप्रमाणे आवाज काढतो.
- या प्राण्याला धोका जाणवतो तेव्हा तो आपले पाय जमिनीवर मारतो .
- चित्ता एका मिनिटांमध्ये दीडशे वेळा श्वास घेतो आणि सोडतो.
- चित्ता शिकार केलेल्या प्राण्यांची चामडी आणि हाडे खात नाही.
- चिता या प्राण्याला पाण्याची आवश्यकता नसते त्याने केलेली शिकार खाल्ल्यानंतर त्याला त्यातून पाणी मिळते.