घोरपड प्राण्याची संपूर्ण माहिती Ghorpad Information In Marath

Ghorpad Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण घोरपड या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. या लेखात आज आपण अशा प्राण्याची माहिती पाहणार आहोत,जी म्हणजे घोरपड जिला आपण शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळखतो.त्यांच्या गोष्टी ऐकताना बऱ्याच वेळा तिचा  उल्लेख झाला आहे. गडावर जाण्यासाठी घोरपडीचा उपयोग करायचे. चला तर, त्या प्राण्यांविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया .

Ghorpad Information In Marath

घोरपड प्राण्याची संपूर्ण माहिती Ghorpad Information In Marath

घोरपडीची प्राथमिक माहिती

सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वर्गाच्या स्क्वॅमॅता गणातील लॅसर्टीलिया या उपगणाच्या व्हॅरॅनिडी कुलातील सरड्यासारखा दिसणारा पण त्याच्यापेक्षा पुष्कळच मोठा प्राणी.

दक्षिण आशियात आढळणारा मॉनिटर सरड्याचा एक विशाल प्रकार आहे. पाल, सरडा, घोयरा यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी घोरपडीचे नाते जवळचे आहे. घोरपडीला इंग्रजीत ‘मॉनिटर लिझार्ड’ असेच म्हणतात.

व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस (बेंगॉल मॉनिटर) ही घोरपडीची जात भारतात जवळजवळ सर्वत्र आढळते. भारतापेक्षा दक्षिण अमेरिका व वेस्ट इंडीज या ठिकाणी हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतो. घोरपडीची लांबी सु. १–४ मी. असून काहींचे वजन ९० किग्रॅ. पेक्षा अधिक असते.

घोरपड उष्ण हवामान असलेल्या दक्षिण आशिया, आफ्रिका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, भारत इ. देशांत आढळतात. त्या सामान्यतः नद्या, ओढे यांच्या काठच्या ओलाव्याच्या ठिकाणी राहतात. घोरपडीच्या सुमारे २७–३० जाती असून त्यांतील पुढील चार भारतात आढळतात.

व्हॅरॅनस मॉनिटर  ही भारतात जवळजवळ सगळीकडे आढळणारी जाती आहे. व्हॅ. बेंगॉलेन्सिस  ही जाती बंगालमध्ये आढळते व्हॅ. सॉल्व्हेटॉर  ही जाती हिमालयात १,८०० मी. उंचीवर आणि गारो टेकड्यांतील नद्यांतही आढळते. ही पाण्यात राहणारी असून हिच्या कातड्यास फार किंमत येते. व्हॅ. फ्लॅव्हिसेन्स  ही पिवळसर घोरपड पंजाब व पश्चिम बंगालमध्ये आढळते.

घोरपडीच्या इतर देशात आढळणाऱ्या काही जाती प्रसिद्ध आहेत

व्हॅरॅनस ग्रीसियस  ही उत्तर आफ्रिका आणि अरबस्थानच्या वाळवंटी प्रदेशात राहणारी असून फिक्कट करड्या पिवळसर रंगाची असते. ही बरीच लहान असून तिची लांबी सुमारे 1 मी. असते.

डच ईस्ट इंडीजमधील कोमोडो बेटात आढळणारी व्हॅ. कोमोडोएन्सिस  ही जाती सगळ्यांत मोठी असून तिची लांबी 4 मी. व वजन ११० किग्रॅ. असते. व्हॅ. साल्व्हेटॉर  ही जाती भारताखेरीज श्रीलंका आणि मलेशियात आढळते. ही घोरपड व्हॅ. कोमोडोएन्सिसच्या खालोखाल मोठी असते.

व्हॅ. निलोटिकस  ही नाईल नदीच्या किनाऱ्याने आढळणारी घोरपड 2 मी. पर्यंत लांब असून काळसर रंगाची असते व तिच्या अंगावर पिवळे ठिपके असतात.  घोरपड या प्राण्यात नार व मादी असते.परंतु मराठीत घोरपड हा शब्द स्त्रीलिंगी स्वरूपातच वापरला जातो.

घोरपडीचे वर्णन

घोरपडीला उष्ण व ओलाव्याचे हवा लागते.त्यामुळे हा प्राणी उष्ण कटिबंधातील नदी नाल्यांच्या आसपास आढळतो.घोरपड ही जास्तीत जास्त5 फुटापर्यंत असून वजन 100 किलोपर्यंत असते.

घोरपडीचे डोके धडाला एका मानल्याने जोडलेले असून शरीरावर बाह्य त्वचा असते. काही घोरपडीची त्वचा कठीण व जाड असते. तिचे दात तीक्ष्ण असून पायाची बोटे मोठे असतात. हा प्राणी अत्यंत चपळ असतो.

घोरपडीच्या वरच्या बाजूचा रंग तपकिरी किंवा तपकिरी हिरवा असून, त्यात काळे ठिपके किंवा लहान लहान पट्टे असतात. खालच्या बाजूचा रंग पांढरट पिवळा असतो. वरची त्वचा जाड, खरखरीत असून तिच्यावर लहान गोलसर खवले असतात.

खालची त्वचा काहीशी गुळगुळीत आणि जाड असून तिच्यावर वर्त्मांसारखे (ढालींसारखे) मोठे चौकोनी खवले असतात व हनुवटीची त्वचा पातळ आणि मऊ असते. शरीर जाडजूड व भक्कम असते. भारतीय सामान्य घोरपडीच्या (व्हॅ. मॉनिटर ) धडाची (डोक्यासकट) लांबी ७५ सेंमी. असून शेपटीची १०० सेंमी. असते. नर मादीपेक्षा मोठा व शक्तिमान असतो.

मुस्कट निमुळते असून त्याच्या टोकाला तिरकस नाकपुड्या असतात. डोळे थोडे बाजूला असून त्यांना पापण्या नसतात. पायांवरील बोटे लांबट आणि मोठी असून त्यांच्या टोकांवर मजबूत नख्या असतात. शेपूट लांब, जाड व चपटि असते. स्वसंरक्षणाच्या वेळी घोरपड शेपटिचे जोरात तडाखे देऊ शकते. त्याचप्रमाणे पोहताना ती शेपटीचा उपयोग वल्ह्यासारखा करते.

घोरपडीचा उपयोग

घोरपड़ीपासून एक विशिष्ट प्रकारचे तेल बनवले जाते हे तेल सांधेदुखी वर लावल्यास सांधेदुखी पूर्णपणे बरी होते असा समज आहे. घोरपडीचे तेल वातविकारांवर उपयोगी पडते. अशा गैरसमजुतीतून घोरपडींची हत्या केली जाते.

घोरपडीची अंडी व मांस रुचकर असल्यामुळे त्याचा अन्न म्हणून उपयोग होतो.घोरपडीच्या कातड्याचे पट्टे, बॅगा वगैरे वस्तूही करतात.महाराष्‍ट्रातील दिमडी,ढोल या वाद्यासाठी घोरपडीचे कातडे वापरले जाते.

तानाजीच्या ऐतिहासिक घोरपडीचे नाव ‘यशवंती’ होते. मावळे तिच्या साहाय्याने सिंहगड चढले, असे म्हणतात.  कातळाला किंवा जमिनीला घट्ट चिकटून राहण्याचा गुण घोरपडीत असतो. घोरपड तिच्‍या नखांनी खडकसदृश्‍य कठिण भागास घट्ट धरून राहू शकते.

म्हणून पूर्वीच्‍या काळी किल्ल्यांवर, अथवा उंच भूस्‍तरांवर चढताना घोरपडीच्‍या कमरेस दोर बांधून तिचा चढण्यासाठी उपयोग करून घेत होते. एखाद्या बिळात किंवा कडेकपारीत लपलेली घोरपड पकडायला गेल्यावर ती आपल्या संरक्षणासाठी तिचे अंग फुगऊन मोठा आकार धारण करते आणी जोरात फुस्कारते.तेव्हा तिला तेथून ओढून बाहेर काढणे अतिशय कठीण असते. तिच्या ह्या गुणधर्मामुळे घोरपडीला ‘चिकटा’ असेही म्हणतात.

घोरपडीचा आधिवास

घोरपडी जंगलात किंवा उघड्या कोरड्या मैदानातही आढळतात. तसेच डोंगराच्या कडेकपारीत झाडांवर आढळतात.

घोरपडीचा आहार

घोरपड मांसभक्षक असून पक्षी व त्यांची अंडी, उंदीर, सरडे, साप, मासे, कवचधारी प्राणी, लहानमोठे कीटक यांवर ती उपजीविका करते. तिची जीभ लांब व टोकाशी दुभागलेली असल्यामुळे  ती किडे टिपून खाते. कधीकधी ती कुजके मांसही खाते.

प्रजनन काळ

मादी जुलै ते सप्टेंबर या काळात बिळात किंवा वाळवीच्या वारूळात अंडी घालते. अंडी सुमारे २५–३० असतात. अंडी घालून झाल्यावर मादी पालापाचोळ्याने बीळ बंद करून निघून जाते.

बिळातील उष्ण तापमानाने ती उबतात. व्हॅ. निलोटिकस  या ईजिप्तमध्ये नाईल नदीच्या परिसरात आढळणाऱ्या घोरपडीची अंडी उबण्यास सुमारे दहा महिने लागतात.

घोरपड हा सरपटणार्‍या प्राण्यांपैकी  एक पाल सरडा यांच्या प्रवर्गातील प्राणी आहे, तर घोरपड हे सापाप्रमाणे आपली कातडी सोडत असते.

घोरपड अंगाने तशी जाड कातडीची असते या प्राण्याला उष्ण आणि ओलसर हवा मानवते, त्यामुळे हा प्राणी नदी-नाल्यांच्या परिसरात राहतो .

घोरपडी ने शेपूट मारल्यास पुरुष नपुंसक होतो असा गैरसमज आहेत. घोरपड हा सरपटणारा सरडा प्रजाती मधील संकटग्रस्त वन्यप्राण्यातून एक आहे .

अंधश्रद्धेमुळे घोरपड हा प्राणी वाढत्या शिकारीमुळे संकटग्रस्त झाला असून या प्राण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. घोरपडीच्या चरबीपासून एक प्रकारचे तेल बनवता येते हे तेल सांधेदुखी बरे करण्यास मदत करते.

घोरपडीचे तेल वात विकारांवर उपयोगी पडते हा केवळ गैरसमज आहे .त्यामुळे असे म्हणतात की घोरपड ने शेवटी मारल्यास ती व्यक्ती नपुंसक होते

घोरपड शेपटी का मारते?

घोरपड शेपटी का मारते हे तुम्हाला माहीत आहे का???

तिला जर कोणी डिवचले किंवा तिच्यावर हल्ला होणार आहे असे तिला वाटल्यास ती मागचे दोन्ही पाय वर करून आपली शेपटी आपल्या शत्रूवर मारत असते.

का मारते तर आपल्या शत्रूपासून संरक्षण करण्याकरता पण आपल्या समाजात जुन्या आणि कालबाह्य झालेल्या काही गोष्टी आहेत .

घोरपड हा सरडा प्रजातीचा एक सरपटणारा प्राणी असला तरी तिचे वजन हे जास्तीत जास्त 100 किलोपर्यंत तर उंची जवळपास पाच फुटांपर्यंत वाढू शकते, पण भारतात एवढी महाकाय घोरपड मिळणे दुर्मिळ आहेत .

जमिनीमध्ये विशिष्ट खोलीच्या अंतरात बीळ करून राहते.घोरपड भक्ष्याच्या शोधात बाहेर पडते. चार पायावर कमरेला जोर देऊन घोरपड धावते.घोरपड हा वन्यजीवन मधील संकटग्रस्त प्राणी असून घोरपडीला मारणे हे कायद्याने गुन्हा आहे .

असे दिसून आल्यास तुम्हाला 3 वर्ष कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते .त्यामुळे घोरपड या प्राण्याविषयी पसरणाऱ्या गैरसमज हे केवळ अंधश्रद्धा आहे. बचावासाठी चावा घेणे अथवा आपल्या मजबूत शेपटीने हल्ल्याचा प्रतिकार करणे हा या प्राण्याचा गुणधर्म आहे.

मास खाल्ल्याने काही होत नाही तर शेपटाच्या मारा पासून नपुंसकता येऊ शकते हा केवळ अंधश्रद्ध आणि बालिश गैरसमज आहे.

ही माहिती आपणास आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा.

धन्यवाद!!!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment