Fox Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण कोल्हा या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. या लेखात आपण कांगारू या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे, कांगारू कुठे राहतात, ते वास्तव्य कसे करतात, त्यांचे प्रकार किती आहेत? ….ज्याला आपण धूर्त आणि हुशार प्राणी म्हणून संबोधतो. आपण लहानपणी धूर्त कोल्हा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. अशा त्या धूर्त कोल्ह्याची आपण आज माहिती पाहणार आहोत.
कोल्हा प्राण्याची संपूर्ण माहिती Fox Information In Marathi
कोल्हा याचे शास्त्रीय नाव कॅनिस ऑरियस असे आहे कोल्हे हे भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगलादेश या देशात आढळतात. तो भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळतो. अंटार्टिका वगळता कोल्हा जगभरामध्ये सर्व सर्वत्र आढळतो. उत्तर भारतातील कोल्हे सर्वसाधारणपणे मोठे असतात. कोल्याला इंग्रजीमध्ये Fox म्हणतात तर मादी कोल्ह्याला Vixen असे म्हणतात. तर त्यांच्या पिल्लांना Pups,Kits,Cub असे म्हणतात.
कोल्ह्याची प्राथमिक माहिती
भारतीय कोल्ह्याची उंची 38 ते 43 सेंटीमीटर असते.शरीराची लांबी 60 ते 75 सेंटिमीटर ,शेपूट 20 ते 27 सेंटिमीटर ,वजन 8 ते 11 किलोग्राम असते .उत्तर भारतातील कोल्हे सर्वसाधारणपणे मोठे असतात. कोल्ह्याचे लांडग्याशी बरेच साधर्म्य असले तरी लांडगा जास्त उमदा दिसतो .कोल्हा हा कॅनडी कुळामधील प्राणी आहे .
कोल्हा निशाचर प्राणी आहे म्हणून तो रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो .कोल्ह्याची उंची व लांबी त्याच्या प्रजातींवर अवलंबून असते .कोल्हा कुत्र्यासारखा दिसतो .कोल्हा हा मांजरी पेक्षा मोठा व कुत्र्यापेक्षा लहान असा प्राणी आहे .कोल्ह्याच्या वीस ते पंचवीस प्रजाती आहेत .
मोठ्या प्रजातीचे नाव रेडफॉक्स आहे. हा कोल्हा जंगलात शेतात राहतो त्याचे वजन सुमारे 2 किलो ग्रॅम ते 15 किलो ग्रॅम आहे तर उंची 30 ते 50 सेंटिमीटर आणि लांबी 40 ते 90 सेंटिमीटर आहे. तसेच कोल्ह्याच्या लहान प्रजातीचे नाव फेंस फॉक्स असे आहे .
त्याचे वजन 2 ते 3 किलो ग्रॅम पर्यंत असते. तर उंची वीस सेंटीमीटर असून लांबी 25 ते 40 सेंटिमीटर असते .कोल्ह्याचे आयुष्य हे 10 ते 15 वर्ष असते .कोल्हा जरी कुत्र्यासारखा दिसत असला तरी त्याचे तोंड कुत्र्यापेक्षा बारीक असते.
कोल्ह्याचे वर्णन आणि आकार
कोल्हा हा एक सस्तन प्राणी आहे. कोल्ह्याला चार पाय, दोन डोळे ,दोन कान ,कोल्ह्याचं तोंड कुत्र्यासारखे असते.शेपूट केसाळ व झुपकेदार असते .कोल्ह्याचे कान नेहमी उभे असतात .कोल्ह्याचा रंग पिवळसर ,भुरकट, पिंगट अशा प्रकारे असतो .
उत्तर आफ्रिकेत आणि पूर्व आफ्रिकेत आढळणाऱ्या कोल्ह्याची पाठ काळी असते .तसेच हिमालयातील कोल्ह्याचा रंग जास्त पिवळसर असतो व इतरत्र आढळणाऱ्या कोल्ह्याचा रंग लालसर तांबूस असतो. त्यांच्या कानांवर व पायांवर गडद पिवळा काळपट रंग असतो .
तोंडात वळले सुळे छोटे दात असतात. त्याच्या शरीरावर बारीक तांबूस लालसर केस असतात .मोठी पावले आणि पायातील जुळलेली हाडे यांच्या साह्याने कोल्हा हा 16 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतो. खोल्यांच्या चार पायांना नख्या असतात.
कोल्ह्याचा आहार
कोल्हा प्राणी शाकाहारी तसेच मांसाहारी अन्न खातो. म्हणजेच कोल्हा हा सर्वभक्षी प्राणी आहे. तो मास ,वनस्पती या अशा दोन्ही प्रकारचे अन्न खातो.
तो दिवसांमध्ये जवळजवळ एक किलोग्रॅम अन्न खातो. त्याच्या आहारात पक्ष्यांची अंडी, मासे, ससे ,कोंबडी ,उंदीर या प्रकारचे लहान प्राणी असतात. तसेच रात्रीच्या वेळी शेतात घुसून तो ऊस ,काकडी ,मका ,हरभरा ,शेंगा खातो.
तसेच तो रात्रीच्या वेळेस गावात, वस्तीत शिरून कोंबड्या व मेंढ्या यांचीही शिकार करतो. कोल्हा छोट्या समूहात राहणे पसंत करत असला तरी तो नेहमी एकटा शिकार करतो.
कोल्ह्याचे निवासस्थान
त्याला एकटे राहणे पसंत असते. परंतु तो कधी कधी कळपांमध्ये देखील आढळतो .कोल्हा वनक्षेत्रात ,पर्वतावर, गवतात, किंवा मैदानी भागात रहातो. तसेच तो मोठी बिळे अथवा मोठ्या झाडांच्या डोली मध्येही राहतो .
कोल्ह्याची विशेषता
कोल्ह्याची नजर ही तीक्ष्ण असते. तो 40 प्रकारे आवाज काढू शकतो. तो 72 तास वेगाने धावतो. जंगलात असताना तो तीन वर्षे जगतो व प्राणी संग्रहयात दहा वर्ष कोल्हा जगू शकतो. तो दिवसा मोठ्या प्राण्यांपासून लपून राहतो व रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतो.
कोल्हा याला संस्कृत मध्ये जंबुक असे म्हणतात. कोल्ह्याच्या गटाला स्कल्फ किंवा लिश असे म्हणतात. हा प्राणी कुई कुई असा आवाज काढतो म्हणून त्याला ‘कोल्हे – कुई’ असे म्हणतात. कोल्ह्याची वास घेण्याची क्षमता खूप वेगवान आहे.
प्रजनन काळ
कोल्ह्यांच्या प्रजननाचा काळ फेब्रुवारी ते मार्च च्या आसपास असतो .मादी कोल्हा एका वेळी चार ते पाच पिल्लांना जन्म देते. कोल्ह्याचा गर्भकाळ 53 दिवस असतो. मादी कोल्हा जमिनीत खड्डा करून त्यात आपली पिल्ले ठेवते. कोल्ह्याची पिल्ले जन्माच्यावेळी आंधळी असतात. जन्मानंतर नऊ दिवसांपर्यंत डोळे उघडत नाही .कोल्ह्याचे पिल्लू सात महिन्याचे होईपर्यंत आपल्या मादी बरोबर राहते आणि नर कोल्हा हा अन्न आणून देण्याचे काम करतो.
कोल्ह्याच्या जाती
कोल्ह्यांचे 37 पेक्षा जास्त प्रकार आहेत .त्यापैकी 12 प्रजाती या खऱ्या मांडल्या जातात. त्या पुढील प्रमाणे
१) लाल कोल्हा
लाल कोल्हा ही सर्वात जास्त पसरलेली जात आहे. ते जवळजवळ उत्तर प्रदेशात आढळते. तसेच मध्य अमेरिका, आफ्रिका आणि आशिया च्या काही भागांमध्ये तसेच दक्षिणेकडील काही भागात देखील आढळतात .लाल कोल्हे लहान प्राणी ,वनस्पती, फळे आणि काही कीटकांना खातात.
२) आर्कटीक कोल्हा (उलप्स)
हा कोल्हा जगाच्या आर्कटिक प्रदेशात आढळतो. यामध्ये युरेशिया, उत्तर अमेरिका, आइसलँड आणि ग्रीनलँड यांचा समावेश आहे. हा कोल्हा एकटा राहणे पसंत करतात.
३) ब्लॅनफोर्ड कोल्हा
ब्लॅनफोर्ड कोल्हा हा वाळवंटातील कोल्हा आहे. जो इस्रायल तसेच अफगाणिस्थान आणि इतर मध्यपूर्व देशांमध्ये आढळतो. ब्लॅनफोर्ड कोल्हे अशा प्रदेशांमध्ये राहतात ज्यात भरपूर खडक आहेत. ते मोठी असल्याने फेनेक कोल्ह्याच्या आकारासारखे आहेत.
४) फिकट कोल्हा
फिकट कोल्हा हा वाळवंटातील कोल्ह्यांपैकी एक आहे. हा कोल्हा सुदान आणि सोमालिया सारख्या आफ्रिकेच्या उत्तर भागात आढळतो. या प्रकारचे कोल्हे आफ्रिकेमध्ये गवताळ प्रदेशात राहतात.
५) तिबेटी कोल्हा
तिबेटी कोल्हा भारत चीन आणि तिबेट मधील वाळवंटातील कोल्हा आहे. ते अत्यंत उंच टेकडी असणाऱ्या ठिकाणी राहणे पसंत करतात. त्याचबरोबर ते मोठ्या खडकांखाली किंवा खडकांच्या बाजूने त्यांच्या गुहा खोदतात.
हे कोल्हे काही वेगळ्या रंगाचे असतात. ते कधी काळी असतात तर कधी लाल रंगाचे असतात तर कधी पिवळ्या रंगाचे असतात.
६) बॅगाल कोल्हा
बॅगाल कोल्हा ज्याला भारतीय कोल्हा असेही म्हटले जाते. या प्रकारचा कोल्हा भारत, नेपाळ आणि पाकिस्तान मध्ये देखील आढळतात .ते गवताळ प्रदेश आणि काटेरी झाडी झुडपे आणि अर्ध वाळवंट असलेल्या प्रदेशांमध्ये राहतात. ते त्यांचे भुयार भूमिगत दोन ते तीन फूट खोल बांधतात.
कोल्हा प्राण्याविषयी काही अनोखी तथ्य
फेनेक कोल्हा हा वाळवंट भागात राहणारा कोल्हा आहे. कारण या प्रकारच्या कोरलेला वालुकामय भागात राहणे आवडते.कोल्हे जमीन खोदून आपली राहण्याची जागा तयार करतात .
कोल्ह्याची शिकार करण्याची पद्धत ही मांजरी सारखीच असते. तो प्रथम पाठलाग करतो आणि नंतर उडी मारून त्यांची शिकार करतो.
कोल्हा एक तज्ञ शिकारी आहे.तो दिवसापेक्षा रात्री जास्त शिकार करतो कारण कोल्याची पाहण्याची क्षमता दिवसापेक्षा रात्री जास्त असते.कोल्ह्याला जास्त जेवण साठवून ठेवण्याची सवय असते.
निशाचर असून भक्ष्य मिळविण्याकरिता रात्री बाहेर पडतो. शेळ्यामेंढ्यांची करडे वगैरे लहान सस्तन प्राण्यांवर तो हल्ला करतो. कोंबड्यांना याच्यापासून फार मोठा धोका असतो. तो जनावरांची मढीदेखील खातो. वाघ, सिंह यांच्या शिकारीतले उरलेले मांस हा खातो.
सिंहाला आपल्या भक्ष्याजवळ तरस, गिधाडे वगैरे आलेली खपत नाहीत पण कोल्हा आलेला चालतो. उसाच्या पिकाचे कोल्ह्यामुळे बरेच नुकसान होते. ढगाळ थंड हवा असली तर कोल्हा दिवसादेखील बाहेर पडतो. उष्मा फार असल्यास पाणी पिण्यास तो दुपारी बाहेर पडतो.
कोल्हे एक एकटे किंवा दोन-तीन एके ठिकाणी असतात. कोल्ह्यांच्या ओरडण्याला कोल्हेकुई म्हणतात. संध्याकाळी किंवा पहाटे बरेच कोल्हे एकदम ओरडतात. कोल्ह्याच्या शेपटीखालच्या गंधग्रंथीतून वाहणाऱ्या स्रावामुळे त्याच्या अंगाला उग्र दर्प यतो.
हा मांजरी पेक्षा मोठा आणि कुत्र्या पेक्षा लहान आहे. यांच्या मधील सर्वात मोठी कोल्हयाची प्रजातीरेड फॉक्स आहे. हा जंगलात, शेतात राहतो. कोल्ह्याच्या एकूण २० ते २५ प्रजाती आहेत. कोळ्याचे दात तीक्ष्ण असतात.
कोल्हा धूर्त, लबाड तसेच चतुर आणि आतिशय चपळ प्राणी आहे. त्याची नजर खूप तीक्ष्ण असते.तसेच तो दिवसा लपून राहतो आणि रात्री शिकार करण्यासाठी बाहेर पडतो. हा ४० ते ४५ किलोमीटर तासाला पळू शकतो.
कोल्हा हा साधारण २ ते ३ वर्ष जगू शकता . कोल्हा हा दर ३० ते ३५ मीटर दूरचा आवाज आईकू शकतो.हा प्राणी ‘कुँई कुँई’ असा आवाज काढतो, त्याला ‘कोल्हे-कुँई’ असे म्हणतात.एका कोल्ह्याने आवाज काढला तर त्याच्या मागोमाग सगळे कोल्हे ओरडतात. हा प्राणी कळप किंवा टोळ्या करून राहतो.
दिवसा झाडाझुडपात निवांत झोपतो आणि रात्र झाली की हा शिकारीच्या शोधात बाहेर पडतो.कोल्ह्याच्या मादीला कोल्हीण म्हणतात. ही जमिनीत खड्डा तयार करून त्यात एका वेळी तीन ते चार पिलांना जन्म देते. त्यांचे पालनपोषण करते.
कोल्ह्याला संस्कृतमध्ये ‘जंबूक’ असे म्हणतात. कोल्हा हा प्राणी श्रीलंका, भारत, दक्षिण-पूर्व युरोप व आशिया येथेही आढळतो.
ही माहिती आपणास आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा.