Ghagra River Information In Marathi नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना?… आज आपण भारताची पवित्र नदी गंगा या नदीची प्रमुख उपनद्या पैकी एकच असणारी घागरा या उपनदी बद्दल माहिती घेणार आहोत. घागरा नदी विविध उप-नावांनी देखील प्रसिद्ध आहे. त्यातील घोगरा, घागरा, शरयू आणि देहवा ही तिची काही प्रमुख उपनावे. चीनमध्ये असणाऱ्या तिबेट येथील राक्षसताल नावाच्या सरोवराजवळ ही नदी उगम पावते. चीनमधून नेपाळ मध्ये प्रवेश करताना तिचे नाव कर्नाली असे होते. पुढे जाऊन उत्तर प्रदेश मध्ये गीरवा आणि कौरीआल ह्या दोन प्रवाहांपासून एकत्र होऊन तिचे नाव घागरा असे होते.
घागरा नदीची संपूर्ण माहिती Ghagra River Information In Marathi
घागरा नदीचे वैशिष्ट्य म्हणजे या नदीचे एकाहून अधिक प्रवाह वाहतात. तसेच तिच्या पात्रात असंख्य वाळूचे दांडे बघावयास मिळतात. गंगा व हिमालय यामध्ये पसरणाऱ्या अवध मैदानावरील ही प्रमुख नदी संबोधली जाते. या नदीच्या काठावर पवित्र असे प्रभू श्रीरामांचे शहर आयोध्या हे आहे.
घागरा नदी राहा, शारदा, राप्ती आणि छोटी गंडक या नद्या येऊन तयार होते. बिहारच्या छपरा या ठिकाणी गंगेला मिळण्यापूर्वी ही नदी अयोध्यासह फैजाबाद, तांडा, बरहज इत्यादी शहरांच्या काठावरून वाहते. या नदी परिक्षेत्रात अर्थात खोऱ्याच्या भागात कुपनलिका मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे येथील शेती समृद्ध झालेली आहे. अयोध्येच्या पुढे या नदीतून जल वाहतूक देखील केली जाते.
घागरा नदी चा उगम
घागरा नदी, दक्षिण तिबेट च्या क्षेत्रात म्हणजेच चीन देशात राक्षस ताल सरोवर आहे, येथील उच्च हिमालयाच्या ठिकाणी उगम पावते. उगमाच्या ठिकाणी या नदीला कर्नाली या नावाने संबोधले जाते. पुढे ही नदी चीनमधून नेपाळमध्ये येथे व आग्नेयेकडे वाहते. शिवालिक या पर्वतरांगेच्या दक्षिण दिशेकडून घागरा नदी दोन प्रवाहांमध्ये विभागली जाते.
पुढे जाऊन हेच दोन प्रवाह भारतीय पर्वतांच्या दक्षिण दिशेला पुन्हा एकत्र येतात, आणि या ठिकाणी या नदीला घागरा हे नाव प्राप्त होते. पुढे उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमधून हि नदी अग्नेय दिशेला वाहत जाऊन 600 मैल म्हणजेच 730 किमी अंतराच्या प्रवासानंतर ही नदी छपरा या ठिकाणी गंगेला जाऊन मिळते.
घागरा नदीच्या प्रमुख उपनद्या
मित्रांनो कोणतीही छोटी किंवा मोठी नदी असो, तिची निर्मिती छोटे छोटे उपप्रवाह आणि उपनद्या यांपासूनच होत असते. याच प्रमाणे घागरा नदी जरी गंगेची उपनदी असली तरीही घागरेला देखील अनेक उपनद्या आहेत. यामध्ये कुवाना, छोटी गंडक आणि राप्ती या नद्या प्रमुख आहेत. या सर्व उपनद्या पर्वतीय भागात उगम पावतात. आणि उत्तर दिशेने वाहून घागरा नदी ला सामील होतात. घागरा नदी ने प्रचंड प्रमाणात जलोढ मैदानांचे निर्माण केलेले आहे
जलोढ मैदाने म्हणजे, हिमालयीन नद्या वाहताना उतारामुळे आणि तीव्र वेगामुळे आपल्यासोबत गाळ वाहून आणतात, मात्र पुढे जाऊन नदी प्रवाह मंद झाल्यामुळे हा गाळ हिमालयाच्या पायथ्याशी अर्थातच शिवालिक रांगेच्या पायथ्याशी साचतो. आणि त्यापासून विस्कळीत प्रकारच्या गाळांच्या टेकड्याची अथवा मैदानाची निर्मिती होते. त्यामुळे घागरा नदीच्या परिक्षेत्रात शेती उत्तम केली जाते.
घागरा नदी चे आंतरराष्ट्रीय महत्त्व
आपण वर पाहिल्याप्रमाणे घागरा नदी फक्त भारतातूनच न वाहता भारतासह उगम स्थळाचा चीन या देशातून आणि नेपाळ या देशातून देखील वाहते. म्हणून या नदीला आंतरराष्ट्रीय महत्त्व देखील प्राप्त आहे.
याचमुळे वेगवेगळ्या भागांमध्ये या नदीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. हि नदी जरी चीनमध्ये उगम पावत असली तरी भारतातल्या गंगा या प्रमुख नदीला ही येऊन मिळत असल्यामुळे या नदीला भारताच्या भौगोलिक अभ्यासात अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे.
घागरा नदी चा प्रवाह
चीन मधून उगम पावल्यानंतर हि नदी नेपाळ मध्ये येते व तेथून भारतात प्रवेश करते. भारतात हि नदी उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतून प्रवेश करते. पुढे ही नदी सीतापुर, अयोध्या, फैजाबाद, गोंडा आणि बहराइच इत्यादी जिल्हे समृद्ध करत वाहते. अयोध्या शहरामध्ये घागरा आणि शरयू या नद्यांचा मिलाप होतो. पुढे काही अंतर वाहिल्यानंतर ही नदी गोरखपुर मध्ये पोहोचते, जिथे या नदीला गंडक आणि राप्ती या दोन नद्या मिळतात. पुढे बिहारमध्ये जाऊन ही नदी छपरा या ठिकाणाजवळ गंगा नदीमध्ये स्वतःला मिसळून देते.
घागरा नदी ची लांबी
कोणत्याही नदीचा अभ्यास करताना उगमाबरोबरच नदीचा लांबीचा देखील उल्लेख प्रामुख्याने होतो. घागरा या नदीची संपूर्ण लांबी 1080 किलोमीटर इतकी आहे. या नदीच्या एकूण पाणलोट क्षेत्रापैकी म्हणजेच 127950 चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी तब्बल 45 टक्के भाग हा भारतातील आहे.
ही नदी दोन प्रवाहांपासून निर्माण झालेली आहे हे आपण पाहिले. त्यातील पूर्व बाजूचा प्रवाह शिखा या नावाने तर पश्चिम बाजूचा प्रवाह कर्नाली या नावाने ओळखला जातो. भारतात जवळपास ही नदी या दोन प्रवाहांच्या मिलनानंतर 970 किलोमीटर/600 मैल वाहत जाऊन गंगेला जाऊन मिळते.
घागरा नदी बद्दल महत्वाची माहिती
मित्रांनो अलीकडेच म्हणजे जानेवारी 2020 मध्ये उत्तर प्रदेश शासनाने घागरा या नदीच्या नावात बदल करून तिचे नाव सरयू असे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास येथील राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. हा प्रस्ताव पुढे केंद्रातल्या सरकारकडे मंजुरीकरिता पाठवण्यात येणार आला आहे.
आत्ता आपणास प्रश्न पडला असेल की, उत्तर प्रदेश सरकारने मंजुरी दिली असतानाही केंद्राच्या परवानगीची गरज का भासत आहे. तर याचे कारण म्हणजे कुठलीही नदी पर्वत किंवा इतर नैसर्गिक साधन संपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती असते, अर्थातच यावर सदर राज्याबरोबरच संपूर्ण राष्ट्राचा ही हक्क असतो. याकरिता अशाप्रकारच्या नाम बदलासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज असते.
घागरा नदी बद्दल इतर रोचक माहिती
मित्रांनो कुठलीही नदी पूलांशिवाय अधुरीच, त्याला आपली घागरा नदी तरी कशी अपवाद असेल. तर घागरा नदी वर कर्नाली ब्रिज आणि एल्गिन ब्रिज नावाचे दोन पूल आहेत. महत्वाचे म्हणजे यातील एका पुलावर सन 2018 मध्ये तडे गेले होते.
या नदीवर चहलारी घाट नावाचा देखील पूल आहे 2017 मध्ये बांधून पूर्ण झालेला हा पूल बांधण्याची सुरुवात मात्र 2006 मध्ये झाली होती आणि हा पूल 5 फेब्रुवारी 2017 रोजी सामान्य दळणवळण वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
ही नदी समुद्रसपाटीपासून तब्बल 12999 फूट अर्थातच 3962 मीटर इतक्या उंचीवरून वाहते. घागरा या नदीकाठावरील बाराबंकी आणि बहराइच या जिल्ह्यांच्या वस्तीच्या प्रदेशाला गांजर प्रदेश म्हणून देखील संबोधले जाते. हा प्रदेश आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेल्या प्रदेश म्हणून समजला जातो.
ही नदी हिमालयीन असल्यामुळे या नदीला हिम वितळून मिळणाऱ्या पाण्याचा अधिक वाटा असला तरीही नदीच्या जल विज्ञानावर दक्षिण आशियाई मान्सून या पावसाचा मोठा परिणाम होतो.
मित्रांनो आशा आहे की आपल्याला घागरा नदी बद्दल पुरेपूर आणि उत्तम अशी माहिती मिळालेली असेल. आपणास ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच पुढील लेख कोणत्या विषयावर असावा याबाबतही नक्की सांगा.