Krishna River Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण कृष्णा या नदीची माहिती पाहणार आहोत .कृष्णा नदी दक्षिण भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यात पसरले आहे तसेच ही नदी या राज्यांसाठी सिंचनाचे प्रमुख स्त्रोत आहे. कृष्णा नदी ही गंगा, गोदावरी व ब्रह्मपुत्रा नंतर पाण्याची आवक क्षमता व नदीपात्र क्षेत्रात चौथ्या क्रमांकाची नदी आहे.
कृष्णा नदीची संपूर्ण माहिती Krishna River Information In Marathi
उत्तरेस बालाघाट दक्षिणेस व पूर्वेस पूर्वघाट पश्चिम पश्चिम घाट पाहण्यास मिळतो. सातारा जिल्ह्यातील जोर गावाजवळ पश्चिम घाटात कृष्णा नदी 1,337 मी.उंचीवरून वाहत आहे.बंगालच्या उपसागरात तिच्या उगमापासून नदीची लांबी 1400 किलोमीटर आहे. कृष्णा नदीचे 76 % खोरे हे कृषी उत्पादन क्षेत्र आहे .
कृष्णा नदीच्या किनारपट्टीवर सुमारे 120 किलोमीटर लांबीचा डेल्टा सुद्धा पाहण्यास मिळतो. पुढे हा डेल्टा गोदावरी नदीच्या डेल्टा मध्ये 120 किलोमीटर पुढे समुद्रात विलीन होतो .कृष्णा नदीला “कृष्णवेनी” असे देखील म्हणतात. कृष्णा नदीला एक मोठा खूप सुपीक डेल्टा आहे जो ईशान्य दिशेला गोदावरी नदीच्या दिशेने सुरू झाला आहे.
ते जलवाहतूक नसून कृष्णा नदीला सिंचनासाठी पाणी मिळते. विजयवाडा येथील धरण, कालवे यांच्या साह्याने त्यामधील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यास मदत होते .मान्सूनच्या पावसाने मिळणाऱ्या पाण्यामुळे नदीची पाणीपातळी वर्षभर चढ-उतार होते त्यामुळे सिंचनासाठी त्याची उपयुक्तता मर्यादित होते.
कृष्णा नदीचा उगम
कृष्णा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर जवळील समुद्रसपाटीपासून 1,220 मीटर उंचीवर झालेला आहे. या ठिकाणी पश्चिम वाहिनी नदी सावित्री ,गायत्री व पूर्ववाहिनी कोयना व वेण्णा अशा एकूण पाच नद्यांचा उगम झालेला आहे. कृष्णा नदीचा उगम पश्चिमेकडून पूर्वेकडे नंतर सामान्यतः सांगली मार्गे कर्नाटक राज्य सीमेकडे दक्षिण पूर्व दिशेने जाताना दिसतो.
लांबी
कृष्णा नदी उगम स्थळ महाबळेश्वर पासून 1401 किलोमीटर अंतर वाहत जाते व आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम येथे ही नदी व बंगालच्या उपसागरास मिळते. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 282 किलो मीटर एवढी आहे. म्हणजेच 22 टक्के लांबी आहे.
क्षेत्रफळ कृष्णा खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ 2,59,000 चौरस किलोमीटर असून त्यापैकी केवळ 11 % म्हणजे सुमारे 28.700 चौरस किलोमीटर क्षेत्र महाराष्ट्रात आहे.
राजकीय क्षेत्र
कृष्णा नदी सातारा व सांगली या दोन प्रमुख जिल्ह्यातून वाहत जाते व नंतर कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग यात समाविष्ट करते. कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्यातुन वाहत जाते. तसेच कृष्णा खोरे यांच्या महाराष्ट्रातील भागाचा उल्लेख “अप्पर कृष्णा” म्हणून देखील केला जातो.
कृष्णा नदीचे भौगोलिक क्षेत्र हे शंभू महादेव डोंगर रांगा च्या दक्षिणेकडे व सह्याद्री रांगांमध्ये चिकोडी ,पन्हाळा व ज्योतिबा या डोंगरा दरम्यान बंदिस्त स्वरूपात वाहत असते.
कृष्णा नदीच्या उपनद्या
डाव्या बाजूने उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या येरळा व भीमा असून उजव्या बाजूने दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या वेण्णा, कोयना, वारणा ,पंचगंगा (कुंभी ,कासारी, भोगावती, तुळशी, सरस्वती या नद्या मिळून तयार होणारी पंचगंगा होय) दूधगंगा, वेदगंगा इत्यादी.
१)येरळा:-
ही नदी कृष्णेची उपनदी असून उत्तरेकडून येऊन मिळते सातारा जिल्ह्यातील मस्कोबाच्या डोंगररांगेत येरळा नदी चा उगम होतो. येरळा नदीची एकूण लांबी जवळपास 125 किलो मीटर एवढी आहे.
कोरेगाव व खटाव तालुक्यातील वाहत येऊन ती कृष्णेला मिळते. खटाव तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेले वडूज हे शहर येरळा नदीकाठी वसलेले आहे. नदी कृष्णेला सांगली जिल्ह्यात येऊन मिळते.
२) भीमा नदी:-
कृष्णेला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर रायचूरनजीक कर्नाटक राज्यात उत्तरेकडून जाऊन मिळते.
३) वेण्णा:-
ही नदी कृष्णा नदीची उजव्या तीरावरची उपनदी असून वेण्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झालेला आहे. या नदीची एकूण लांबी 64 किलो मीटर असून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर ,जावळी व सातारा या तीन तालुक्यातील प्रवास करते.
नदीवर लिंगमळा नावाचा धबधबा आहे .जावली तालुक्याचे मुख्य ठिकाण मेढे वेण्णा नदीकाठी वसलेले आहे. पुढे वेण्णा नदी कृष्णेला माहूली नजीक जाऊन मिळते.
४)कोयना:-
हि नदी कृष्णाची उजव्या तीरावर ची प्रमुख उपनदी आहे .कोयना नदीचा उगम सह्याद्री पर्वत रांगेत महाबळेश्वर येथे एल्फिस्टन पॉईंट जवळ झालेला आहे.
कोयना नदीची एकूण लांबी 119 किलोमीटर असून ती मुख्य सह्याद्रीची रांग व बामनोली डोंगऱ्या मधून महाबळेश्वर ,पाटण व कराड तालुक्यातील सुरुवातीला दक्षिणेकडे व पूर्वेकडे वाहत जाऊन कृष्णेला उजव्या तीराने येऊन मिळते.
कोयना नदीवर पाटण तालुक्यात खूप मोठे जलाशय “शिवसागर” या नावाने ओळखले जाते .कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखतात. पुढे कृष्णा-कोयना यांचा संगम कऱ्हाड येथे होतो.
५)वारणा नदी :-
ही कोयना नदीची उजव्या तीरावर ची उपनदी आहे. वारणा नदीचा उगम सह्याद्री पर्वत रांगेत प्रचीत गड भागात जिल्हा सांगली येथे झालेला आहे. वारणा नदीवर चांदोली जलाशय आहे. सांगली जिल्ह्यात हरिपूर येथे वारणा नदी कृष्णेला जाऊन मिळते.
६)पंचगंगा
ही नदी कृष्णाची उजव्या तीरावरची प्रमुख नदी आहे. पंचगंगा नदीच्या उगमाची पार्श्वभूमी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा डोंगररांगेत भोगावती नदी उगम पावते व पुढे चिखली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे कुंभी ,कासारी व तुळशी या तिच्या उपनद्या येऊन मिळतात.
पुढे भोगावती, तुळशी ,कासारी, कुंभी व गुप्त सरस्वती यांचा एकत्रित प्रवाह प्रयाग या ठिकाणापासून पंचगंगा नावाने ओळखला जातो .पंचगंगेची एकूण लांबी 83 किलोमीटर आहे.
महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर तसेच इचलकरंजी हे शहरे पंचगंगा नदीवर वसलेली आहेत. पन्हाळा गगनबावडा व कोल्हापूर तालुक्यातून पंचगंगा नदी वाहते. पंचगंगेचा मूळ प्रवाह असलेल्या भोगावती नदीवर छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेले राधानगरी (लक्ष्मी सागर) हे जलाशय आहे. पंचगंगा नदी नृसिंहवाडी येथे कृष्णेला जाऊन मिळते.
७)दूधगंगा
ही नदी कृष्णा नदीची उपनदी असून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून वाहत जाते. दुधगंगा नदीचा उगम स्थान सह्याद्री पर्वतरांगेत भोलाकार येथे झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी ,कागल व शिरोळ या तालुक्यातून प्रवास करते.
पुढे कर्नाटक व महाराष्ट्र राज्याचे सीमेवरून वाहत जाऊन कर्नाटक राज्यात प्रवेश करते.शेवटी बेळगाव जिल्ह्यात धनवड जवळ कृष्णा नदीला उजव्या बाजूला जाऊन मिळते .
८)वेदगंगा:-
ही नदी दूधगंगा नदी ची उपनदी आहे. गंगेचा उगम सह्याद्री पर्वतरांगेत हनुमंते घाट परिसरात भुदरगड डोंगर रांगेच्या उतारावर 900 मीटर उंचावर झालेला आहे.
वेदगंगा नदी ची एकूण लांबी 66 किलोमीटर असून चिकोरी डोंगर व दक्षिण दूधगंगा डोंगर रांगांमध्ये वेद गंगेचा प्रवास होतो. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी तालुक्यातून वाहत जाऊन वेदगंगा नदी पुढे दुधगंगेला उजव्या बाजूने मिळते.
९)घटप्रभा नदी:-
ही कृष्णाची प्रमुख उपनदी असून महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांत वाहते. घटप्रभा नदी चा उगम हा सह्याद्री पर्वतरांगेत पारपोली चौकुल गावाजवळ तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे झालेला आहे .
घटप्रभा नदी ची एकूण लांबी 283 किलोमीटर एवढि असून महाराष्ट्रातील 60 किलोमीटर सांगता येईल .घटप्रभा नदी ने 8829 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापलेले आहे. ही नदी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याची नैसर्गिक सीमा सुद्धा निश्चित करते. हिरण्यकेशी ताम्रपर्णी या घटप्रभा नदीच्या उपनद्या आहेत. घटप्रभेचा प्रवास कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातुन होतो पुढे ती कर्नाटक राज्यात विजापूर जिल्ह्यात कृष्णा नदीला उजव्या बाजूने घटप्रभा जाऊन मिळते.
कृष्णा नदी खोऱ्यातील काठावरील शहरे
कृष्णा नदीच्या काठावर सांगली, कराड ,वाई ,औदुंबर ,नरसोबाची वाडी ही शहरे वसलेली आहेत. दूधगंगा या नदीच्या काठावर कागल ,गंगा नदीच्या काठावर फलटण ,माणगंगा नदीच्या काठावर दहिवडी, पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर, इचलकरंजी, पुरंदवड, भोगावती नदीच्या काठावर राधानगरी, हिरण्यकेशी नदीच्या काठावर गडहिंग्लज,येरळा नदीच्या काठावर वडूज (खटाव) व वेण्णा नदीच्या काठावर मेढे (जवळी)ही गावे वसलेली आहेत .
कृष्णा नदी खोऱ्यातील धरणे
कृष्णा नदीवरील धोम( वाई ),वेण्णा -सातारा (काण्हेर),भोगावती -राधानगरी (कोल्हापूर) वारणा -चांदोली (कोल्हापूर), तुळशी – तुळशी (कोल्हापूर ),कोयना – कोयना, येरळा – येरवंडी डॅम (सातारा), तिल्लारी – तिल्लारी (कोल्हापूर ),दूधगंगा – कळम्मावाडी (कोल्हापूर)