Bhima River Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण भीमा नदीची माहिती पाहणार आहोत भीमा नदी ही भारतातील पश्चिम आणि दक्षिण भागातील एक प्रमुख नदी आहे महाराष्ट्रातील प्रमुख पूर्ववाहिनी नद्या पैकी दोन नंबरची नदी असून ही कृष्णेची उपनदी असली तरी भीम आहे कृष्णा नदीला महाराष्ट्रात जाऊन मिळत नाही त्यामुळे भीमेचा स्वतंत्र अभ्यास केला जातो.
भीमा नदीची संपूर्ण माहिती Bhima River Information In Marathi
महाराष्ट्रात भीमा नदीची लांबी कृष्ण यापेक्षा अधिक आहे व खोऱ्याचे क्षेत्रफळ सुद्धा मोठे आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा असे म्हणतातचंद्रभागा नदी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून वाहणारी नदी आहे.
ही भीमा नदीच आहे. भीमा पंढरपुराजवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. ही चंद्रभागा, अमरावती जिल्ह्यातली चंद्रभागा, हिमाचल प्रदेशातील चंद्रभागा आणि ओरिसातील चंद्रभागा या वेगळ्या नद्या आहेत.
पंढरपूरमधून चंद्रभागा नदी पुढे सुस्ते, पळूज, पठाण गावाजवळून सोलापूर जिल्ह्यात जाते. सुस्ते गावातील शेतकरी शेती करता चंद्रभागेच्या पाण्याचा वापर करतात. सुस्ते गावातील देवी अंबाबाईचे मंदिर चंद्रभागेच्या तटावर आहे.
उगम
भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वत रांगात महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग पैकी एक असणारे भीमाशंकर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी झालेला आहे खंडाळा या ठिकाणाहून उत्तरेला चाळीस किलोमीटर अंतरावर ती उगम पावते व पहिल्या आठ किलोमीटरच्या अंतरामध्ये नदी एकदम खाली कोसळते आणि 200 मीटर उंची प्रदेशावरून वाहू लागते.
सुरुवातीलाच ती पूर्वेकडे वाहते व नंतर आग्नेयीकडे वाहू लागते अतिशय खडकाळ आणि अरुंद दरीत मधून सुमारे 55 ते 60 किलोमीटर वाहत येऊन भीमा नदी मैदानात प्रवेश करते समुद्रसपाटीपासून 975 मीटर उंचीवर हे उगमस्थान आहे .
सुरुवातीस नदीचा प्रवाह पुर्वेस असतो व नंतर तो अग्नेस होतो त्यानंतर भीमा नदी ही जामनेर खोऱ्याच्या अतिशय खडकाळ व अरुंद दरीतून सुमारे 50 ते 55 किलोमीटर वाहत जाऊन तिला भामा इंद्रायणी आणि वेळ नदी येऊन मिळाल्यावर प्रवाह ईशान्य कडे वळतो काही अंतर गेल्यानंतर हा प्रवाह दक्षिणेकडे वाहू लागतो व रांजण गावाजवळ उजव्या बाजूने मुळा-मुठा या नद्या येऊन मिळतात नंतर ती अग्नेस वळते व नागमोडी वळणाने वीस ते बावीस किलोमीटर गेल्यावर भीमा व भोर्गड नदीचा संगम होतो.
दीला डाव्या किनाऱ्यापासून कुकडी व मीना या नद्या मिळतात पुढे टेंभुर्णी जवळ उजव्या किनार्याने तालुक्यातून वाहत येणारी नीरा नदी येऊन मिळते यादी करा व नीरा नद्यांचा संगम होतो पंढरपुरात भीमा नदी वाहत आल्यानंतर तिला मान नदी येऊन मिळते
लांबी
नदी उगमापासून आग्नेय दिशेने 861ब किलोमीटरचा प्रवास करून कर्नाटकात रायचूर जवळ कुरुगुड्डी येथे कृष्णेला डाव्याबाजूने जाऊन मिळते जेव्हा ती हा प्रवास करते तेव्हा महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यांतूनही वाहत येते भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किलोमीटर आहे
क्षेत्रफळ भीमा नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्र 77 हजार चौरस किलोमीटर असून त्यातील सुमारे 60 टक्के म्हणजेच 46 हजार 184 चौरस किलोमीटर क्षेत्र महाराष्ट्रात आहे गोदावरी नदीच्या खालोखाल महाराष्ट्रात कृष्णा नदीचे खोरे आहे परंतु कृष्णा नदीची उपनदी भीमा हिने महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापलेला आहे .
भीमा नदी कृष्णेला महाराष्ट्राच्या बाहेर मिळत असल्याने भीमा नदीचा स्वतंत्रपणे विचार करण्यात येतो भीमा नदी पुणे व सोलापूर या दोन प्रमुख जिल्ह्यातून वाहत जाते तसेच अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग सातारा सांगली या जिल्ह्याचा उत्तर भाग व बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्याच्या काही भागातील भीमा नदी खोरे प्रवाह विस्तारलेला आहे .
सह्याद्री पर्वतात उगम पावून पूर्व व आग्नेय दिशेस उत्तरेकडून हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व दक्षिणेकडून शंभू महादेव डोंगर रांगा या दरम्यान वाहत जाते व तेथेच तिच्या उपनद्या तिला येऊन मिळतात.
भीमा नदीचा प्रवाह मार्ग व उपनद्या
भीमा नदीस उजव्या किना-याने म्हणजे दक्षिणेकडून भामा, इंद्रायणी, मुळा ,मुठा ,निरा व माण या नद्या मिळतात. तर डाव्या किना-याने म्हणजेच उत्तरेकडून वेळ ,घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.
उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या
घोड नदी ही भीमा नदीची अग्नेय वाहिनी नदी असून ती सह्याद्री पर्वत रांगेत पुणे जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर गावडेवाडी तालुका जुन्नर येथे उगम पावते. नदीची लांबी 170 किलोमीटर असून हि नदी काही ठिकाणी पुणे, अहमदनगर जिल्ह्याची सीमा निश्चित करते व मीना व कुकडी या घोड नदीच्या उपनद्या असून त्या तिला उत्तरेकडून येऊन मिळतात. घोड नदीवर आंबेगाव तालुक्यात डिंबे धरण असून ,शिरूर तालुक्यात चिंचणी येथे कुकडी प्रकल्पांतर्गत धरण आहे .
श्रीगोंदा तालुक्यातील सांगली दुमाला या गावाजवळ घोड नदी उत्तरेकडून भीमा नदीला येऊन मिळते. सीना नदी ही भीमाची उत्तरेकडून येऊन मिळणारी उपनदी आहे. या नदीचा उगम हरिश्चंद्र डोंगर रांगेत झालेला असून ही नदी अहमदनगर व सोलापूर या दोन जिल्ह्यातुन 300 किलोमीटर वाहते.
सीना नदीच्या काठावर अहमदनगर हे जिल्ह्याचे शहर वसलेले आहे. सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला डाव्या बाजूने भोगावती नदी येवून मिळते व पुढे दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना नदी भीमेला कुंडल नजीक येऊन मिळते.
उजव्या बाजूने दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या
भामा ही भिमाची दक्षिणेकडून येऊन मिळणारी उपनदी आहे. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगेत भीमाशंकरच्या दक्षिण बाजूला झालेला आहे. ही नदी 53 किलोमीटर वाहणारी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व खेड तालुक्यातुन प्रवास करत पुढे पिंपळगाव नजीक भीमेला उजव्या तीरानी येऊन मिळते. इंद्रायणी नदी भीमा नदीची दक्षिणेकडून येऊन मिळणारी उपनदी आहे .
हिचा उगम सह्याद्री पर्वतरांगेत लोणावळा नजीक कुरवंडे घाटात झाला आहे. तिची लांबी 93 किलोमीटर असून तिच्या काठावर पवित्र धार्मिक स्थळे देहू व आळंदी हे वसलेले आहेत .पुणे जिल्ह्यातील खेड व हवेली या दोन तालुक्यातून इंद्रायणी प्रवास करते .
ठाकूरवाडी, वळवण, शिरवळ इत्यादी प्रकल्प इंद्रायणी नदी वर आहेत. पुढे तुलापुर हवेली नजीक उजव्या तीराने जाऊन भीमा नदीला मिळते .मुळा नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगेत तालुका वेल्हे जिल्हा पुणे येथे होतो. मुळा नदी मुळशी हवेली तालुक्यातून वाहत जाते व पुढे पुणे शहरातील मुठा नदीला येऊन मिळते .
नदीचा उगम सह्याद्री पर्वत रांगेत तोरणा नजीक होतो. पुढे हवेली तालुक्यातून वाहत जाऊन पुणे शहरातील मुळे नदीला मिळते .या दोन्ही नद्या दापोली गावाजवळ एकत्रित येतात आणि येथून यांचा संयुक्त प्रवास पुढे मुळा व मुठा या नावाने ओळखला जातो.
या मुळा-मुठा नदीवर सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर असणारे पुणे शहर वसलेले आहे. मुठेच्या उपनद्या अंबी व मोशी या नद्यांवर अनुक्रमे पानशेत व वरसगाव हे प्रकल्प आहेत. मुळा नदीवर खडकवासला धरण आहे. तसेच पवना नदीवर पवना हे धरण आहे तर मुळा नदीवर मुळशी धरण आहे .
पुढे मुळा व मुठा या नद्यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव सांडस तालुका शिरूर येथे भीमा नदीला दक्षिणेकडून जाऊन मिळतो. नीरा ही भीमा नदीची उपनदी असून या नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगेच्या उपशाखा शिरगाव तालुका भोर येथे झालेला आहे.ही पूर्व वाहिनी नदी असून या नदीची लांबी 209 किलोमीटर आहे.
पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा निश्चित करते. नीरा नदी पुणे जिल्ह्यातील भोर ,पुरंदर व बारामती तालुक्यातून वाहत जाते व तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यातही वाहते. नीरा नदीची उपनदी वेळवंडी नदीवर भाटघर धरण हे भोर गावाजवळ आहे.
तसेच निरेची दुसरी डाव्या तीरावर ची उपनदी कऱ्हा या नदीच्या काठावर जेजुरी व मोरगाव ही धार्मिक ठिकाणे असून करा नदी डाव्या बाजूने बारामतीजवळ नीरेला मिळते. नीरा नदीवर नीरादेवधर हे धरण असून ही पुढे भीमा नदीला दक्षिणेकडून नीरा नरसिंगपूर येथे जाऊन मिळते .मान नदी ही दक्षिणेकडून वाहणारी उपनदी आहे.
नदीचा उगम सोनाबाई डोंगराच्या जवळ जिल्हा सातारा येथे होतो. या नदीची एकूण लांबी 154 किलोमीटर असून या नदीचा प्रवाह मान तालुका व सांगली जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून सांगोला तालुक्यात प्रवेश करून पुढे भीमानदी उजव्या बाजूने उंचेवन येथे येऊन मिळते.
भीमा नदीकाठची मंदिरे
- सोरबाबा मंदीर तरटगांव भोसे ,
- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकराचे मंदिर
- सिद्धटेक येथील अष्टविनायकांपैकी एक असलेले गणपतीचे मंदिर
- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर
- कर्नाटकातल्या गाणगापूरचे दत्त मंदिर. हे गुलबर्गा जिल्ह्यात आहे.
- श्री क्षेत्र घटर्गी भागम्मा, घटर्गी, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक
- श्री क्षेत्र रासंगी बलभीमसेना मंदिर, जिवरगी तालुका, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक
- श्री क्षेत्र हेरूर, (हुलकांतेश्वर मंदिर)
- श्री क्षेत्र माचनूर सिद्धेश्वर मंदिर आहे हे मंदिर जुन्या काळातील आहे.
- श्री क्षेत्र सन्नती येथे श्री चंद्रलापरमेश्वरी देवी मंदिर हे अती प्राचीन मंदिर भीमा नदीच्या तीरावर आहे. गुलबर्गा जिल्हा.
भीमा नदीकाठची गावे
तरटगांव (भोसे),दौंड, कोरेगांव भीमा , निमगाव-दावडी,शेलपिंपळगाव, पंढरपूर, राजगुरुनगर, अरळी.