शेळी प्राण्याची संपूर्ण माहिती  Goat Information In Marathi

Goat Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण शेळी या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. या लेखात आपण शेळी या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे, शेळी कुठे राहतात, ते वास्तव्य कसे करतात, त्यांचे प्रकार किती आहेत?

Goat Information In Marathi

शेळी प्राण्याची संपूर्ण माहिती  Goat Information In Marathi

शेळी दूध देणारा एक सस्तन प्राणी आहे समखुरी गणाच्या बोव्हिडी कुळातील पोकळ शिंगाच्या व रवंथ करणार्‍या प्राण्यांपैकी एक आहे. शेळीचे शास्त्रीय नाव ‘कँप्रा हिकर्स’ असे आहे .शेळ्यांची 45 ते 50 टक्के लोकसंख्या प्रामुख्याने आशियात आढळते आणि सर्वाधिक संख्या चीनमध्ये आणि त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये देखील शेळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. शेळी ही रुमिनेंटसची एक प्रजाती आहे.

शेळी बद्दल प्राथमिक माहिती

शेळीला गरीबाची गाय म्हटले जाते .शेळी एक पाळीव प्राणी आहे. ती दूध व मांस यासाठी पाळली जाते. याशिवाय तिच्यापासून फायबर, लेदर, खत आणि केस हे उपलब्ध होते. जगात शेळ्या घरगुती आणि जंगली स्वरूपात आढळतात.

जगातील पाळीव शेळ्या दक्षिण, पश्चिम आशिया आणि पूर्व यूरोपच्या जंगली शेळ्यांचे वंशज आहेत .आज जगात सुमारे ३०० जाती आढळतात .भारतात शेळ्यांच्या सुमारे २० जाती आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मध्ये 2011 मध्ये जगात 924 दशलक्ष पेक्षा जास्त शेळ्या होत्या. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन केले जाते .

शेळी ही शरीराने काटक व मजबूत असते. शेळी शेतकऱ्यांना व शेतमजुरांना अतिशय उपयुक्त असते. शेतमजुरांच्या उत्पन्नात भर घालणारी शेळी ही एक वरदान ठरलेली आहे. काही ठिकाणी शेळ्यांचे बंदिस्त पालन केले जाते.

त्याला बंदिस्त शेळीपालन असे म्हटले जाते. शेती पाळणा ला प्रोत्साहन मिळावे आणि जास्तीत जास्त उत्पादन व्हावे व शेती पालकाचे जीवन समृद्ध व्हावे म्हणून सरकार द्वारे शेती पाळण्यासाठी कर्ज, अनुदान तसेच प्रोत्साहन दिले जाते.

शेळीच्या जाती

शेळी नराला बोकड असे म्हणतात. शेळी एका वेळी २ ते ३ पिल्लांना जन्म देते. शेळीचे दूध हे अतिशय आरोग्यदायी मानले जाते .शेळीचे वजन त्यांच्या प्र जातीनुसार बदलत बदलते काही शेळ्यांचे वजन 20 ते 25 किलो पर्यंत असते तर काही शाळा 110 ते 120 किलो व त्याहूनही जास्त वजनाच्या असतात.

शेळी चे वर्णन

शेळीला चार पाय आणि एक शेपूट आहे. जी वर उंचावलेली असते. तसेच शेळीला दोन लांब कान आहेत. शेळीच्या डोक्यावर दोन शिंगे असतात पण काही शेळ्यांना तेही नसतात. शेळी चा रंग पांढरा, काळा, तपकिरी आणि लाल असतो.

शेळीचा आहार

शेळी ही जवळजवळ कोणत्याही प्रकारचे गवत, धान्य ,तण, झाडाची साल खातात .हे खनिज साठ्यातील क्षरांसह  हे पूरक आहेत .शेळी ही जी मिळेल ती वनस्पती खात असतात. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की ते झुडपे झाडे आणि जमिनीच्या वरच्या इतर वनस्पती देखील खातात.

शेळीचे वर्तन

शेळीमध्ये उंच पर्वत आणि जवळच्या उभ्या पृष्ठभागावर चढण्याची क्षमता असते. पर्वतीय शहरात 13 हजार फूट पेक्षा जास्त उंचीवर राहू शकतात. शेळी या प्राण्याचे सडपातळ शरीर जे संतुलन प्रदान करते आणि जे नियमित पृष्ठभाग पकडू शकतात. आणि स्नायूंची रचना या सर्व गोष्टीमुळे शेळीला न पडता उंच भागात चढण्यास मदत करतात.

शेळीचे उपयोग

काही ठिकाणी शेळीच्या शिंगा पासून शोभेच्या अनेक वस्तू बनवल्या जातात .तसेच काही डोंगराळ प्रदेशात शेळी ओझे वाहण्यासाठी उपयोगी पडते.

एक शेळी सर्वसाधारणपणे 12 ते 14 वर्षे जगते शेळी पासून तयार होणाऱ्या बोकडांना बाजारामध्ये चांगली मागणी असते. शेळी पासून तयार होणारे बोकड वजनावर विकली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होतो .सुशिक्षित बेरोजगारांना हा व्यवसाय भरघोस उत्पन्न मिळवून देणारा ठरला आहे.

प्रजनन क्षमता

शेळी ही 15 ते 18 महिन्याच्या वयात गर्भधारणा करते. सहा ते सात महिन्यात ती बाळाला जन्म देते. साधारणपणे एक शेळी एकावेळी दोन ते तीन पिल्लांना जन्म देते .शेळ्यांमध्ये विन कालावधी सुमारे 30 तास असतो .

कळपातील शेळ्यांमध्ये गर्भधारणेचा सरासरी कालावधी 150 दिवस असतो. शेळीचे आयुष्य दहा ते बारा वर्ष आहे. शेळीचे उत्पादन क्षमता त्यांच्या आयुष्याच्या चार ते सहा वर्षाच्या वयात जास्तीत जास्त असते.

शेळीची निवासव्यवस्था

शेळ्या साध्या, कोरड्या, आणि स्वच्छ बंदिस्त असाव्यात. शेळ्यांसाठी घर किंवा शेड बांधणे अत्यंत महत्त्वाचे असते. भरपूर लोक मोठ्या प्रमाणात शेती पालन व्यवसाय करतात. जर शेळ्यांना इतर प्राण्यांसोबत ठेवले असता त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो .

म्हणून शेती पालन व्यवसाय करणाऱ्यांनी शेळ्यांना राहण्यासाठी स्वतंत्र शेड बांधणे गरजेचे आहे. शेळ्यांचे राहण्याचे ठिकाण जमिनीपासून दोन-तीन फूट वर असावे कारण ओल्या जमिनीमुळे शेळ्यांमध्ये रोग होतो.

उंदीर, माशी इत्यादी कीटक शेळ्यांच्या जवळ अजिबात नसावेत. आपण शेळीचे घर जेथे करणार आहे ते नेहमी  पूर्व/ पश्चिम दिशेने बांधले पाहिजे जेणेकरून हवा सहज खेळती राहील.

शेती शेळी पालन उद्योग आणि समस्या

शेळीला नेहमी  गरीबाची गाय असे म्हटले जाते. कारण शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन केले जाते. शेतकऱ्यांना शेळीपालनाचे प्रोत्साहन मिळावे आणि जास्तीत जास्त उत्पादन व्हावे व त्यांचे जीवन समृद्ध व्हावे म्हणून सरकार द्वारे शेळीपालनासाठी कर्ज अनुदान, तसेच प्रोत्साहन दिले जाते.

तसेच शासकीय आणि खाजगी संस्थांद्वारे शेळीपालना वर प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. प्रशिक्षण केंद्रात शेळीपालन कसे करावे व कसे राबवावे याचे शिक्षण शेतकऱ्याला दिले जाते.

शेळी पालन करण्यासाठी खर्च खूप कमी येतो पण या शेळीपालन उद्योगातही काही समस्या आहेत त्या पुढील प्रमाणे पावसाळ्यात शेळीची काळजी घेणे सर्वात कठीण असते कारण शेळी ओल्या जागेत बसल्यामुळे तिला रोग देखील जास्त होतात. शेळीचे दूध जरी पौष्टिक असले तरी त्यातील दुर्गंधीमुळे कोणीही ते विकत घेऊ शकत नाही म्हणून त्याला काही मूल्य नाही.

शेळ्यांचे प्रकार

 १) सुरती

सुरती शेळ्या भारतामध्ये दुधासाठी खूप प्रसिद्ध जात आहे. या जातीच्या शेळ्या जास्त प्रमाणात आणि चांगल्या प्रतीचे दूध देतात त्यामुळे त्यांना चांगला फायदा होतो. ही शेळ्यांची जात मूळची गुजरात मधून येणारी जात आहे.

या प्रकारांमध्ये मादा शेळ्या या नर शेळ्या पेक्षा आकाराने मोठ्या असतात. सुरती शेळ्या शक्यतो पांढ-या रंगाच्या असतात. त्यांचे शरीर जड असते. त्यांचे नाक लहान उंच आहे. कान वाढलेले आहेत. शेपूट कुरळे आहे आणि शेपटीचे केस जाड आणि ताठ असतात. त्यांच्या शरीराचे केस जाड आणि लहान आहेत.

२) जमनापरी

जमनापरी शेळी भारतातील लोकप्रिय शेळी आहे.जी शेळी पालनामध्ये असते. या प्रकारच्या शेळ्या दिसायला खूप सुंदर असतात आणि या शेळीचा उपयोग दूध काढण्यासाठी केला जातो.

या जातीच्या शेळ्या उत्तर प्रदेशांमध्ये जास्त आढळतात.

३) शिरोही

या प्रकारच्या शेळी या मूळच्या राजस्थानी असून या शेळीचा उपयोग उत्तर प्रदेश मध्ये शक्यतो त्यांच्या मांसासाठी केला जातो. या शेळी उष्णतेसाठी खूप प्रतिरोधक असतात.

या जातीच्या शेळ्या पिल्लांना वर्षातून दोन वेळा जन्म देतात आणि त्या एका वेळी एक किंवा दोन पिलांना जन्म देतात.

४) मालाबरी

या प्रकारची जात वेगवेगळ्या दुसऱ्या जाती एकत्र करून विकसित झालेली शेळी आहेत.

या प्रकारच्या शेळ्या लवकर परिपक्वता दाखवतात आणि आठ ते दहा महिन्याच्या गर्भवती होतात.

५) गड्डी

हे हिमाचल प्रदेशाच्या कांग्रा कुल्लू खोऱ्यात आढळते. यांचे कान 8.6 सेंटिमीटर लांब असतात .शिंगे खूप तीक्ष्ण असतात .हे वाहतूक म्हणून देखील वापरले जातात. ते एका वेळेस एक किंवा दोन मुलांना जन्म देतात.

६) बीटल

बीटल जातीच्या शेळ्या प्रामुख्याने पंजाब प्रांतातील गुरुदासपूर जिल्ह्यातील बटाला उपविभागात आढळतात. या जातीच्या शेळ्या पंजाबला लागून असलेल्या पाकिस्तानच्या भागातही उपलब्ध आहेत. त्यांच्या शरीरावर तपकिरी रंगाचे पांढरे पांढरे डाग किंवा काळ्या रंगावर पांढरे पांढरे डाग डाग असतात.

७) बार्बारी

ही जात प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळते. या जातीचे नर आणि मादीला प्रथम पूजारिनी भारतात आणले. आता ते आग्रा ,मथुरा आणि उत्तर प्रदेशच्या लगतच्या भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

विदेशी शेळ्यांच्या प्रमुख जाती

१) अल्पाईन

ही जात स्वित्झर्लंडमधील आहे. दूध उत्पादनासाठी योग्य आहे. या जातीच्या शेळ्या त्यांच्या घरी रोज सरासरी तीन ते चार किलो दूध देतात.

२) अँगलोनुव्हिएन

हे बर्‍याचदा युरोपच्या वेगवेगळ्या देशांमध्ये आढळतात. हे मास आणि दूध या दोन्ही साठी उपयुक्त आहेत. त्यांची दूध उत्पादन क्षमता प्रतिदिन दोन तीन   लिटर आहे .

३) सान

सान ही सिझरलँड ची शेळी आहे. त्यांची उत्पादन क्षमता इतर सर्व जाती पेक्षा जास्त आहे. हे आपल्या घरांमध्ये रोज सरासरी तीन ते चार किलो दूध देतात.

४) तोनेनवर्ग

तोनेनवर्ग हा सिझरलँड मधील एक जात आहे. त्यांच्या नर आणि मादीला शिंगे नसतात. हे दररोज सरासरी तीन किलो दूध देतात. संकरित जातीच्या शेळ्या रोगांना कमी संवेदनशील असतात.

आणि त्यांचे मांस देखील चवदार असते क्रॉस ब्रीड शेळ्या आणि त्यांचे वजन सहा महिन्यात 25 किलो असते.

बकरी बद्दल काही तथ्ये

  1. शेळी हा घरगुती पाळीव प्राणी आहे.
  2. जो प्रामुख्याने दुधासाठी पाळला जातो .
  3. बकरीचे दूध पौष्टिक असल्यामुळे ते मुलांसाठी फायदेशीर असते.
  4. त्यांच्या दुधात चरबी खूप कमी असल्यामुळे ते पचायला सोपे जाते.
  5. शेळीच्या वासराला कोकरु म्हणतात.
  6. शेळीचे आयुष्य दहा ते पंधरा वर्षे असते .
  7. भारतातील ग्रामीण भागात शेळी पालन पालन केले जाते त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.
  8. शेळीची जन्माला आलेली पिल्ले काही मिनिटातच चालायला आणि ओरडायला लागतात.
  9. नर शेळी आणि मादी शेळीला दाढी असते
  10. शेळ्या कुत्र्याप्रमाणे मानवांनी सुरुवातीच्या काळात पाळलेल्या पहिल्या प्राण्यांपैकी एक आहे.
  11. मानव गेल्या नऊ हजार वर्षापासून मांस आणि दुधासाठी शेळ्या पालन पाळत आहे.
  12. काश्मिरी शेळी काश्मिरी लोकर आणि अंगोरा शेळी मोहेर तयार करते.
  13. एका वर्षात एक काश्मिरी शेळी 1 एलबी काश्मिरी लोकर तयार करते, तर अंगोरा शेळी तीन ते चार एलबी लोकर तयार करते.

ही माहिती आपणास आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment