सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Solapur District Information In Marathi

By Wiki Mitra

Updated On:

Follow Us
Solapur District Information In Marathi

Solapur District Information In Marathi भारत सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश मिळवलेला सोलापूर जिल्हा ओळखला जातो. नमस्कार मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत .

Solapur District Information In Marathi

सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Solapur District Information In Marathi

सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा सोलापूर. प्राचीन काळी सोननालागी सोनालापूर आणि सोलापूर या नावाने देखील ओळखला जात होता.

औद्योगिक केंद्र म्हणून ख्याती मिळवलेल्या या जिल्ह्यात सूती वस्त्र सोलापुरी चादरी खूप प्रसिद्ध आहेत. या शहराला कापड गिरण्यांचे शहर म्हणून देखील प्रसिद्धी मिळालेली आहे. विडी आणि सिगारेट उद्योगात या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. स्वातंत्र्यमिळाल्यानंतर येथील लोक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक होते.

परंतु महादेव लिंगाडे नामक कन्नड लिंगायत साहित्यिक महिलेने सोलापूरला कर्नाटकाशी जोडण्याकरिता आंदोलन देखील केलेली इतिहासात नमूद आहे.

पण या वादामुळे सरकारने महाजन आयोगाची स्थापना केली होती, या आयोगाने सोलापूरला कर्नाटकची जोडण्या  संदर्भातील अहवाल शासना समोर मांडला परंतु शासनाने तो अहवाल स्वीकारला नाही सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून ते अजूनही न्यायालयात रखडलेले आहे.

मराठी भाषिकांपेक्षा  देखील जास्त प्रमाणात या ठिकाणी तेलगू आणि कन्नड भाषिक लोक जास्त पहावयास मिळतात .

येथील सिद्धेश्वर मंदिरामुळे देखील या जिल्ह्याला एक आगळं वेगळं नाव प्राप्त झालेलं दिसून येतं. दुरवरून भाविक याठिकाणी दर्शनाकरिता येत असतात.

सोलापूर जिल्ह्यामध्ये आज देखील एका मुस्लिम किल्ल्याचे भग्नावशेष आपल्याला पहावयास मिळतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुके असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत उत्तर सोलापूर ,दक्षिण सोलापूर ,अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा ,पंढरपूर ,सांगोला, माळशिरस ,मोहोळ ,माढा ,करमाळा, सोलापूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 63 लाख 17 हजार 756 इतकी असून त्याचे एकूण क्षेत्रफळ 14 895 स्क्वेअर किलोमीटर इतके आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकूण 1144 गावे असून एकूण अकरा तालुके आहेत. सोलापूर जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण हे दोन टक्के आहे. एक हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्याही 935 असून सोलापूर मधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 ,52, 204 361 ,465 ,150 हे राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत.

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर तर पूर्वेला उस्मानाबाद दक्षिणेला सांगली विजापूर तर पश्चिमेला सातारा जिल्हा असून व पुणे हा पश्चिमेला असणारा प्रमुख जिल्हा आहे.

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच सोलापूर या शहराने तीन दिवसाचे स्वातंत्र्य उपभोगले आहे. ते 1930 साली 9 10 11 मे ला.

मल्लप्पा धनशेट्टी ,जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसन सारडा या स्वातंत्र्यवीरांना इंग्रजांनी सोलापुरात फाशी दिली होती, त्यामुळे या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते.

अवघ्या महाराष्ट्राची माऊली असलेले पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी याच जिल्ह्यात असून या जिल्ह्याला संतांची भूमी देखील म्हटले जाते .

पंढरपूरला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिणेकडच्या राज्यातील भाविकही लाभलेले आहेत .

अनेक दक्षिणेकडील लोक देखील विठ्ठलाची भावभक्तीने पूजा करतात. तेलगू कन्नड आणि मराठी अशा तिन्ही भाषा बोलणारे नागरिक या जिल्ह्यात गुण्यागोविंदाने नांदताना आपल्याला दिसतात. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनाकरिता अनेक लांब लांब ठिकाणाहून भाविक येत असतात.

याशिवाय येथील शिवगंगा मातेचे मंदिर त्याच्या कळसा मुळे फार प्रसिद्ध असून या मंदिराचा कळस 100 तोळे सोन्या पासून बनवलेला असून, या मंदिराचा दरवाजा 80 किलो चांदी पासून बनवलेला असल्याचे सांगण्यात येते.

सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी साजरी होणारी सिद्धेश्वराची यात्रा भाविकांसाठी यात्रेचे खूप मोठे आकर्षण आहे.या जिल्ह्यात सोलापूर चादरी खूप प्रसिद्ध आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थ स्थळे:

पंढरपूर, पंढरीचा विठोबा व त्याचे वारकरी यांचे असलेले अतूट नाते हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या जगात प्रसिद्ध आहे .जात वंश लिंग यापलीकडेही भगवंताला भेटण्याकरिता लांबून लांबून वारकरी पायी वारी करून आषाढी वारीला विठुरायाच्या दर्शनाला येत असतात. अलौकिक दृश्य असणारा हा वारीचा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला  लाखो भावी पंढरीला येत असतात.

यात आता परदेशी भाविकांची देखील गणना होत असते. आषाढी वारीसाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी तासन्तास लोक रांगेत उभे राहतात. आषाढी आणि कार्तिकी अशा दोन उत्सवां साठी पंढरपुरात प्रचंड बहुसंख्येने भाविक जमा होतात. चंद्रभागेच्या तीरावर वसलेले हे मंदिर खूपच प्राचीन असून अगदी गरीबातला गरीब व श्रीमंतातला श्रीमंत याठिकाणी एक समान मानला जातो.

या पंढरपूर शहरात अजून एका महान व्यक्तीचे मंदिर आहे ते म्हणजे शेगावच्या  गजानन महाराजांचे मंदिर. या ठिकाणी निवासा करिता अतिशय चांगली व  योग्य अशी सोय आहे. त्यामुळे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर भाविक या ठिकाणी देखील दर्शनाकरिता येतात .

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे ठिकाण रेल्वे बस आणि खाजगी वाहनाने   जोडलेले असून ते सोलापूर पासून अवघ्या दीड तासाच्या अंतरावर आहे.

गाणगापूर :

नृसिंहवाडी येथील नृसिंह सरस्वती अवतारातील गाणगापूर ठिकाण अत्यंत पवित्र व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असून ,सोलापूर पासून ते साधारणतः तीन तासाच्या अंतरावर म्हणजेच 110 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी अनेक दत्तभक्त दर्शनाकरिता येत असतात .

येथील भिमा अमरजा संगमावर स्नान करून दुपारच्या वेळेस पाच घरी भिक्षा मागावी आणि सायंकाळी दत्तगुरुंच्या पादुकांचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. असे केल्याने दत्तगुरूंची कृपादृष्टी प्राप्त होते अशी भाविकांची भोळीभाबडी श्रद्धा आहे. दत्त गुरु या ठिकाणी नृसिंह स्वरूपात अस्तित्वात असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. भीमा अमरजा अशा पवित्र नद्यांचा या ठिकाणी संगम होतो.

अक्कलकोट :

सोलापूर पासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले अक्कलकोट हे ठिकाण स्वामी समर्थांचे सर्वदूर प्रसिद्ध असलेले श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या अगदी लगत हे गाव भावीकांकरिता अत्यंत पवित्र मानले जाते.

एकदा एका भक्ताने समर्थांना त्यांच्याविषयी विचारले तेव्हा समर्थांनी सांगितले की ते औदुंबराच्या वृक्षातून जन्मलेले आहेत. आणि एकदा असे सांगितले की त्यांचे नाव नुर्सिंहभान असून श्रीशैलम जवळील कर्दळीवनातून ते आले आहेत.

आजही कर्दळीवनाची यात्रा अनेक भक्त भाविक करतात त्या ठिकाणी स्वामी समर्थांचे स्थान पहावयास मिळते. संपूर्ण भारतामध्ये भ्रमंती केल्यानंतर श्री स्वामी समर्थ शेवटी अक्कलकोट याठिकाणी आले अशी ख्याती  आहे .त्यामुळे हे ठिकाण अत्यंत पवित्र आणि जागरूक असून भाविक या ठिकाणी दर्शनाकरिता येत असतात.

सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर नगरीचे ग्रामदैवत असून या मंदिराची निर्मिती योगी श्री सिद्धरामेश्वर यांनी केलेली आहे अशी ख्याती आहे .

जवळजवळ 68 शिवलिंगांची त्यांनी स्थापना केली होती. सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर फार प्राचीन मंदिर म्हणून ओळखले जाते. अनेक शिवलिंगांचे दर्शन या ठिकाणी भाविक घेतात .

श्री गणेशाची मूर्ती देखील या ठिकाणी असून तेथील मूर्तींवर आणि मंदिरावर कर्नाटकी स्थापत्यकलेचा प्रभाव असल्याचे आपल्याला दिसून येते. श्री शिव सिद्धरामेश्वर यांची समाधीदेखील या ठिकाणी असून तेथील शिवपिंडीवर सदैव जलाभिषेक सुरू असतो. या मंदिराच्या सभोवताली सिद्धेश्वर तलाव देखील आहे.

हे  मंदिर सदैव पाण्याने वेढलेले असते या मंदिरातून सोलापूरचा किल्ला दृष्टीस पडतो.

या मंदिराची सिद्धेश्वराची यात्रा खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक भाविक दर्शनाकरता येत असतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये नानज ते माळढोक अभयारण्य, बार्शीचे हेमाडपंती स्थापत्य शैलीतील भगवान विष्णूंचे मंदिर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल या ठिकाणी भीम आणि सीना नदीचा संगम झालेला पहावयास मिळतो .

या संगमावर हरिहरेश्वर आणि संगमेश्वर अशी महादेवाची मंदिरे आपल्याला आकर्षित करतात.

करमाळा येथे प्रसिद्ध भुईकोट किल्ला खूप प्रेक्षणीय स्थळ आहे. सोलापूर मधल्या कंबर तलावा जवळ असलेले महात्मा गांधी प्राणी संग्रहालय यासारखी बरीच ठिकाणं आपल्याला सोलापुरात पहावयास मिळतात. महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्ह्यात असून तरीही सोलापूर पासून ती अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान 445 मिलिमीटर आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमान आहे .

जिल्ह्याच्या उत्तर ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा असून तसेच पश्र्चिम व नैर्ऋत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत .जिल्ह्याचा इतर भाग सपाट पठारी असून या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे.

काही भागात उन्हाळ्यात कमाल तापमान 40 ते 50 अंश सेल्सिअस पर्यंत जाते . जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे 290 किलोमीटर आहे .

भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते .नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग कुडल येथे होतो .जिल्ह्यातून सीना, नीरा ,भोगावती, हरणी, बोटी, मान या छोट्या मोठ्या नद्या वाहतात. सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधले आहे .

धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील पश्‍चिम व मध्य भागात सुलभतेने पाणीपुरवठा झालेला पहावयास मिळतो.

1 890 मध्ये बांधून  पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे म्हटले जाते.

शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प असून या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो पक्षी आढळून येतात. भीमा सीना जोड कालवा यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ झालेला पहावयास मिळतो.

भीमा सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा असून उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. त्याच बरोबर जिल्ह्यात सहा मध्यम पाणी प्रकल्प असून उत्तर सोलापूर तालुक्यात एकरुखे तलाव आहे. याचाही फायदा आजूबाजूच्या भागातील लोकांना होतो.

सोलापूर हा जिल्हा ज्वारीचे कोठार म्हणून देखील ओळखला जातो. भारतीय डाळिंब जगात प्रसिद्ध असले तरीही सोलापूरच्या मातीत पिकलेल्या डाळिंबांना सोलापूर डाळिंब असा विशेष भौगोलिक निर्देशांक मिळाल्याने ,सोलापूरची डाळिंबे आंतरराष्ट्रीय बाजारात वेगळाच भाव मिळवत आहेत.

सोलापूरच्या डाळिंबांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली असून त्यामुळे मोठी निर्यात होत आहे. सोलापूर शहरात म्हशी पाळण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे.

कसब्यातील वीरशैव व गवळी समाजाच्या वतीने दिवाळीमध्ये याचे आयोजन दरवर्षी केले जात असते. भास्कर घराण्याच्या म्हशीला यावेळी पहिला मान असतो. म्हशी पाळण्याचा

कार्यक्रम  सोलापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध असून माळशिरस तालुक्यातील अकलूज या गावात खूप मोठा घोडा बाजार भरला जातो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

सोलापूर जिल्ह्यात काय प्रसिद्ध आहे?

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर (महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध) व अक्कलकोटसारखी सुप्रसिद्ध देवस्थाने आहेत. बार्शी तील भगवंत मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या चादरी विशेष लोकप्रिय आहेत. स्वातंत्र्य-प्राप्तीच्या आधी सोलापूर शहराने तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले आहे.

सोलापुरात कोणती भाषा बोलली जाते?

सोलापूर हे कन्नड, मराठी आणि तेलुगू भाषांच्या बहु-सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे त्रि-भाषिक मिश्रण असलेले शहर आहे. बहुतेक लोक मराठी संस्कृती आणि परंपरा पाळतात.

सोलापूरला सोलापूर का म्हणतात?

‘सोलापूर’ हा शब्द ‘सोला’ म्हणजे सोळा आणि ‘पूर’ म्हणजे गाव असा दोन शब्दांपासून बनला आहे असे मानले जाते .

सोलापूरचा इतिहास काय आहे?

1956 मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इ स वी सन 1960 मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून विकसित झाला. स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे.

सोलापूर रात्री सुरक्षित आहे का?

सोलापूर हे सहसा भेट देण्याचे सुरक्षित ठिकाण असले तरी सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सोलापूरला भेट देताना लक्षात ठेवण्याच्या काही सुरक्षितता टिप्स खाली दिल्या आहेत: रात्री एकटे फिरणे टाळा . जास्त पैसे घेऊन जाणे किंवा महागडे दागिने घालणे टाळा.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment