वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती Washim Information In Marathi

Washim Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण वाशिम या जिल्ह्याबद्दल माहिती बघणार आहोत. मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वाशिम जिल्ह्याला इसवी सन पूर्व तीनशे पासून सातवाहन या घराण्याची सत्ता होती.

Washim Information In Marathi

वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती Washim Information In Marathi

वत्स ऋषींची तपोभूमी असा देखील वाशिम चा उल्लेख केला जातो, म्हणूनच की काय वाशीमला प्राचीन नाव वत्सगुल्म असे होते. कालांतराने येथे प्रथम चालुक्य आणि त्याच्यानंतर यादव यांची सत्ता आली.

निजाम कालावधीत येथे निजाम राज्याची टांकसाळ असल्याने इतिहासात वाशिम जिल्ह्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. इंग्रज राजवटीत वऱ्हाड हा मुलुख म्हणजेच ठिकाण ताब्यात घेतल्यानंतर इंग्रजांनी वाशिम हे जिल्ह्याचे ठिकाण केले.

इंग्रज राजवटीत जिल्ह्याचे ठिकाण असणाऱ्या वाशीमला स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजेच 1905 चा पुनर्रचनेत अकोला जिल्ह्यात समाविष्ट केले गेले. म्हणजेच वाशिम जिल्ह्याला अकोला समजले जाऊ लागले. मात्र तदनंतर 1 जुलै 1998 मध्ये अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम आणि अकोला या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती झाली.

भौगोलिक दृष्ट्या विचार करता वाशीम या जिल्ह्यास अमरावती, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, आणि अकोला या पाच जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. तर क्षेत्रफळाचा विचार करता हा जिल्हा 5196 चौरस किलोमीटर इतका विस्तीर्ण आहे.

या जिल्ह्यामध्ये कारंजा, मानोरा, मंगळुरपीर, मालेगाव, रिसोड व वाशिम इत्यादी सहा तालुक्यांचा समावेश होतो. जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार वाशिम जिल्ह्यातील लोकसंख्या तब्बल 12 लाख 97 हजार 160 इतकी आहे.

भौगोलिक स्थानाचा विचार करता मराठवाडा या प्रादेशिक विभागात व औरंगाबाद या प्रशासकीय विभागात वाशिम जिल्हा वसलेला आहे.

विविधतेने समृद्ध अशा या वाशिम जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या तसेच शेतांना ओलावा देणाऱ्या पैनगंगा, कास, बेंबळा, अरुणावती, काटेपूर्णा आणि आरान या व अशा लहान मोठ्या नद्या वाहतात.

जिल्ह्याचा पाणीप्रश्‍न मिटवणारे एकबुर्जी धरण, मदन धरण, डॉल धरण, सोनल धरण आणि वाटोळे जलाशय इत्यादी या जिल्ह्यात आहेत. तलावांचा विचार केला तर या जिल्ह्यात धानोरा, उमरी, गणेश पुर, सावरगाव, कळंबा, रिसोड, चिखली व बोरगाव इत्यादी तलावे आहेत.

वाशिम जिल्ह्यातील हवामान हे पिकांसाठी बर्‍यापैकी पोषक मानले जाते. उन्हाळ्यात येथे उष्ण व कोरडे तर, हिवाळ्यात थंड हवामान असते. याच मुळे वाशीम जिल्ह्यात गहू, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, ऊस, कापूस आणि हळद इत्यादी महत्त्वाची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.

डोंगरी भागात व पठारी भागात मध्यम प्रतीची मृदा आढळत असली तरीही, उर्वरित भागात आपणास काळी व सुपीक मृदा आढळून येते.

शेतीने समृद्ध असणाऱ्या वाशीम जिल्ह्यात शिक्षणाबद्दल ही खूप मोठ्या प्रमाणावर जागरुकता बघावयास मिळते. येथे उच्चप्रतीची शाळा व महाविद्यालये आहेत.

काही नावे घ्यायची ठरली तर शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज वाशिम, विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज वाशिम, वैष्णवी पॉलीटेक्निक, इत्यादी नामांकित संस्था तसेच इतरही शैक्षणिक संकुले, क्रीडा संकुले, महाविद्यालय, शिक्षण नगरी इत्यादीने वाशिम च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे रिसोड कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर देखील आहे. अर्थात क्षेत्र कुठलेही घ्या वाशिम मध्ये प्रत्येक प्रकारच्या शिक्षणाच्या सोय हमखास बघावयास मिळतात.

सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारे वाशीमकर धार्मिक उपासनेच्या बाबतीतही मागे पडताना दिसत नाहीत. येथे विविध धार्मिक स्थळे भाविक व पर्यटकांची आकर्षण केंद्र बनलेले आहेत. त्यातील काही खालीलप्रमाणे,

कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती मंदिर:

वाशिम जिल्हा पासून अगदी 70 किलोमीटर अंतरावर कारंजी नगरी बसलेली आहे. श्री नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या करंज्या नगरीला करंज ऋषींच्या पदस्पर्शाने पावनत्व प्राप्त झाले आहे.

रिसोड येथील श्री आप्पा स्वामी यांचे मंदिर

हे रिसोड या शहराच्या पश्चिम दिशेला वसलेले आहे. याच ठिकाणी महाराज यांची संजीवन समाधी देखील आहे.रिसोड मधील श्री पिंगलाक्षी देवी मंदिर हे वाशिम शहरापासून अगदी जवळ म्हणजेच फक्त 44 किलोमीटर अंतरावर आहे.

येथे श्री पिंगलाक्षी देवी यांचे मंदिर हे तळ्याच्या काठावर वसलेले असून, अगदीच आकर्षक व रेखीव आहे. येथील खासियत म्हणजे भक्तांच्या नवसाला पावणारी ही देवी तांदूळ स्वरूपात आहे. या देवीच्या मंदिराला भाविक भक्तगण मोठ्या संख्येने भेट देतात.

रिसोड येथीलच श्री संत अमरदास बाबा मंदिर हे देखील वाशिम ला भेट देणाऱ्या लोकांची श्रद्धास्थान आहे. येथील श्री अमरदास बाबा, ज्यांनी जवळपास पन्नास वर्षे निरंतर साधना-आराधना केलेली आहे, असे हे बाबा योगी असून त्यांना शिवाचे स्वरूप मानले जाते.

बाबांच्या भक्तांनी सन 1958 मध्ये बाबांचे भव्य दिव्य मंदिर उभारले आहे. येथील खासियत म्हणजे येथे दररोज भाविक भक्त गणांसाठी अन्नदान केले जाते.

मानोरा ची श्रीक्षेत्र पोहरादेवी मंदिर

बंजारा समाजाचे पवित्र स्थान समजले जाणाऱ्या मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी मंदिर हे फार प्रसिद्ध आहे. याला बंजारा समाजाची काशी म्हणून देखील ओळखले जाते.

याच ठिकाणी जगद्गुरु श्री संत सेवालाल महाराज यांनी समाधी घेतलेली आहे, तसेच बाबुलाल महाराज यांनीदेखील समाधी घेतलेली आहे.

हिवरा येथील नवसाचा असलेला गणपती अर्थात श्री गणपती मंदिर हे गणपती बाप्पा आणि पार्वती माता यांचे एकमेव असे एकत्रित मंदिर आहे.

श्री मधमेश्वर मंदिर

वाशिम जिल्ह्याचा  विचार केला आणि मधमेश्वर मंदिराला विसरले, असे होऊच शकत नाही. या ठिकाणी पुराण काळात एक वेधशाळा होती व वेदांग या ज्योतिषाकरिता श्रीलंके पासून मेरू पर्वतापर्यंत एक काल्पनिक रेषा आखलेली होती, अशी अख्यायिका सांगितली जाते.

आणि याच रेषेच्या अगदीच मध्यावर ऋषी यांनी मधमेश्वर यांची स्थापना केली. मोगली आक्रमणात नष्ट झालेले मात्र त्यावेळेसचे खूप मोठी शिवालय त्या ठिकाणी होते.

काहीच वर्षापूर्वी उत्खननात येथे मोठ्या प्रमाणावर नक्षीकाम केलेले शिल्प सापडले असून, सन 1961 साली या ठिकाणी मधमेश्वर ची स्थापना पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे.

वाशिम चे श्री बालाजी मंदिर

22 ऑगस्ट 1783 मध्ये भोसले घराण्याचे सरदार, सर सेनापती, दिवाण भवानी काळू यांनी वाशिम करांचे ग्रामदैवत असणाऱ्या बालाजी या देवाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्ती भावाने केली. वाशिम जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळे विचारात घेतली तर, कारंजा येथील काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध असणारे सोहळ हे अभयारण्य व काटेपूर्णा अभयारण्य महत्त्वाचे मानले जाते.

वाशिम जिल्ह्यातील उद्योगधंद्यांचा विचार करताना वाशिम जिल्ह्यातील इतरही गोष्टींचा विचार करणे प्रमुख्याने येतेच. वाशीम जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे पीक समजले जाते. अर्थातच कापूस प्रक्रिया आधारित उद्योग येथे असणे सहाजिकच आहे.

वाशीम जिल्ह्यात हातमागावरील कापड विणण्याचा व्यवसाय हा अनादी काळापासून चालत आलेला आहे. वाशीम येथील मंगळुरपीर या तालुक्यात याद्वारे सूत कातण्याची व त्यापासून खादीचे कापड विणण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. याच बरोबर येथे लाकडा पासून बनविलेले खेळणे, नायलॉन धागा पासून बनवणारे दोर, कातडी वस्तू बनवणे, रेशीम निर्मिती करणे, डाळीच्या मिल्स, तेल घाणी इत्यादी छोटे उद्योग देखील चालतात.

या बरोबरीनेच गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरणे, विविध रसायन पासून रासायनिक खते बनविणे, इत्यादी उद्योग केले जातात. जिनिंग व प्रेसिंग हे तर या जिल्ह्यातील जवळजवळ प्रत्येकच तालुक्यात केले जाते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

वैयक्तिक संगणक म्हणजे काय ?
रॅम म्हणजे काय?
संगणकाचे उपयोग
संगणक म्हणजे काय
सुपर कॉम्प्युटर काय आहे

Leave a Comment