Tripura Information In Marathi त्रिपुरा (बांग्ला: ত্রিপুরা) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे.[१] याच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोराम ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे.
त्रिपुरा राज्याची संपूर्ण माहिती Tripura Information In Marathi
आगरताळा हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे. तांदूळ, डाळ, ताग, कापूस ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत. राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे. गोमती व खोवाई या येथील प्रमुख नद्या आहेत.
येथे त्रिपुरी वंशाचे लोक देखील आढळतात. बंगालीसोबत ककबरक ही येथील एक अधिकृत भाषा आहे. मणिपुरी ही देखील त्रिपुरामधील एक प्रमुख भाषा आहे.क्षेत्रफळ १०,४७६ चौ. किमी. लोकसंख्या १५,५६,३४२ (१९७१). विस्तार २२° ५६′ उ. ते २४° ३२′ उ. आणि १९° १०′ पू. ते ९२° २२′ पू. यांदरम्यान.त्रिपुरा राज्याची राजधानी ही अगरतला आहे.
इतिहास
परंपरागत समजुतीप्रमाणे चंद्रवंशीय ययातिपुत्र द्रुह्यूचा मुलगा बभ्रु याला कपिलमुनींनी या किरात देशाचा राज्याभिषेक केला. त्या वंशाचा पंधरावा राजा ‘प्रसेन’ दशरथाच्या अश्वमेघ यज्ञाला गेला होता. त्याचा वंशज ‘दैत्य’ हा अश्वत्थाम्याकडून धनुर्विद्या शिकला, तर नंतरचा ‘त्रिपूर’ याचे नाव राज्याला मिळाले. त्याचा पुत्र ‘त्रिलोचन’ युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात हजर होता व त्यानेच राजवंशाच्या चौदा कुलदेवतांची स्थापना केली.
हा पुराणाख्यायिकांचा भाग सोडल्यास तेराव्या शतकात गौरच्या सुलतानाने त्रिपुरच्या परागंदा रत्न फा राजाला गादी परत मिळविण्यास मदत करून ‘माणिक्य’ ही वंशपरंपरागत पदवी दिली, असा इतिहासातला पहिला उल्लेख आहे. इतिहासकाळातही राज्याचा विस्तार सुंदरबनपासून ब्रह्मदेशापर्यंत व सागरापासून कामरूपपर्यंत होता.
तेराव्या, चौदाव्या आणि सतराव्या शतकांत त्रिपुरावर मुसलमानांचे हल्ले झाले. सोळाव्या शतकातल्या पराक्रमी विजयमाणिक्य राजाने शेजारच्या इस्लामी राज्यावर मात करून त्याचा बराच प्रदेश जिंकला होता.
अठराव्या शतकात मात्र मोगलांनी त्रिपुराचा मैदानी भाग आपल्या साम्राज्याला जोडला. डोंगरभागात तेवढे राज्य सुखरूप राहिले. १७६५ मध्ये बंगालची दिवाणी मिळाल्यावर इंग्रजांनी त्रिपुराशी राजनैतिक संबंध जोडला व क्रमशः तेथील राजा आपल्या तंत्राने चालेल अशी व्यवस्था केली.
संस्थान खंडणी देत नव्हते; पण आजुबाजूच्या राज्यांशी संपर्क ठेवण्याचे स्वातंत्र्य त्याला उरले नाही. अठराव्या शतकाअखेर वीरचंद्र या राजाने प्रागतिक धोरण सुरू केले. १८७९ मध्ये गुलामीची व १८८८ मध्ये सतीची पद्धत त्याने बंद केली. तो साहित्य–कलांचा भोक्ता होता व रवींद्रनाथ टागोरांशी त्याचा परिचय होता.
१९१९ पर्यंत मध्यवर्ती ब्रिटिश सत्तेला व नंतर १९३६ पर्यंत ईस्टर्न स्टेट्स एजन्सीला अंकित असलेले त्रिपुरा राज्य १९४९ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले. प्रथम ‘पार्ट सी’ राज्याचा त्याचा दर्जा १९५७ च्या राज्यपुनर्रचनेत बदलून तो केंद्रशासित प्रदेश झाला. १९६३ मध्ये त्याला विधिमंडळ व राज्यांतर्गत शासनाधिकार प्राप्त झाले. २१ जानेवारी १९७२ रोजी त्रिपुराला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
क्षेत्रफळ व लोकसंख्या:
क्षेत्रफळ 10,496 चौरस किमी असून राजधानी अगरतळा हे शहर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 3,671,032 इतकी आहे. उत्तरपूर्व राज्य म्हणून या राज्याची ओळख आहे.
21 जानेवारी 1972 ला या राज्याची स्थापना झाली.त्रिपुराचा संस्कृत अर्थ तीन शहरे असा होतो. राज्याची साक्षरता 87.75 टक्के इतकी आहे. राज्यात चार जिल्हे समाविष्ट आहेत. विस्तार 22° 56′ उ. ते 24° 32′ उ. आणि 19° 10′ पू. ते 92° 22′ पू. यांदरम्यान असून हे उत्तर, पश्चिम व दक्षिणेकडून बांगला देशाने वेढलेले असून फक्त ईशान्येस भारतातील आसाम व मिझोराम राज्ये आहेत.
भूवर्णन
या बव्हंशी डोंगराळ प्रदेशाच्या पूर्व भागात ४ दक्षिणोत्तर नदीखोरी आणि पश्चिम भागात पश्चिमेकडे उतरत जाणारा मैदानी भाग आहे. सर्वांत पूर्वेकडचे धर्मनगर खोरे पूर्वेच्या ६०० ते ९०० मी. उंचीच्या जमराई व पश्चिमेच्या ३०० ते ७५० मी. उंचीच्या सखन (साखोन) या डोंगररांगांच्या दरम्यान वाहणाऱ्या उत्तरवाहिनी देव, जूरी नद्यांचे आहे. उत्तरेत त्याचे रूपांतर उर्मिल सपाटीत होते व तेथे सधन शेती व दाट वस्ती असून, जूरी नदीकाठचा धर्मनगर हा बाजाराचा गाव आहे
या खोऱ्याच्या पश्चिमेस कैलाशहर खोरे १९ किमी. रूंदीचे असून ते सबंध दक्षिणोत्तर गेले आहे. त्याच्या पश्चिमेस लांगतराई डोंगररांगेत सर्वोच्च शिखर ४५७ मी. आहे. या खोऱ्यात मनू नदी व तिच्या उपनद्या आहेत.
खोऱ्याचा दक्षिण भाग विच्छिन्न व वनाच्छादित, तर उत्तर भाग खुला व थोड्या दलदलीचा आहे व त्यात भातशेती आढळते. मनू नदीच्या उजव्या तीरावरचे कैलाशहर बाजाराचा गाव आहे. याच्या पश्चिमेच्या कमलपूर खोऱ्यातून उत्तरेकडे धालाई नदी वाहते. तिच्या पश्चिमेकडील अथारमुर रांगेची सर्वाधिक उंची ४४६ मी. पर्यंत आहे.
या खोऱ्याचा दक्षिणेकडील भाग वनाच्छादित असून बाकीच्या भागात जंगलतोड झाली आहे. भात हे मुख्य पीक आहे. बाजाराचा गाव कमलपूर धालाईच्या डाव्या तीरावर आहे. चौथ्या व सर्वांत पश्चिमेकडच्या खोवई खोऱ्यात लोकवस्ती दाट आहे.
खोऱ्याच्या पश्चिमेची देवतामुरा रांग २५० मी. पर्यंत उंचीची आहे. उत्तरवाहिनी खोवईच्या उजव्या तीरावर खोवई गाव आहे. सर्व उत्तरवाहिनी नद्या राज्याबाहेर सुरमेला मिळतात.
राज्याच्या दक्षिणार्धातील सोनामुरा, उदयपूर, अमरपूर, बेलोनिया व साब्रूम या पाच उपविभागांत वाहणाऱ्या अनेक नद्यांपैकी सर्वांत मोठ्या गुमतीला बरेच दक्षिणवाही नालेओढे मिळतात व ती डोंगररांगा तोडून खोल दरीतून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत राधाकिशोरपूरजवळ सपाट प्रदेशात उतरते व शेवटी मेघनेला मिळते.
त्रिपुराचा हा भाग जास्त खुला असून, यात शासकीय ठाण्याच्या गावांखेरीज खेडीही बरीच आहेत. सर्वांत विस्तीर्ण सपाट भूमी देवतामुरा डोंगररांगेच्या पश्चिमेस आहे. तिच्यावर सधन शेती व संपन्न खेडी असून, हाओरा नदीच्या उभय तीरांवर समुद्रसपाटीपासून अवघ्या १३ मी. उंचीवर अगरतला राजधानी वसली आहे.
राज्यातील सखल भागात अनेक लहानमोठी तळी आहेत. त्यांपैकी मोठे रूद्रसागर सरोवर अगरतलापासून ५३ किमी. आहे.
प्रमुख नद्या :
त्रिपुरा राज्यात धालाइ, फेनी, गोमती, खोबाई हाओरा, जुरी, कहोवाइ, लोंगाइ, मनू, मुहुरी, सुमली या नद्या त्रिपुरातून वाहतात. राज्याच्या दक्षिणार्धातील सोनामुरा, उदयपूर, अमरपूर, बेलोनिया व साब्रूम या पाच उपविभागांत वाहणाऱ्या अनेक नद्यांपैकी सर्वांत मोठ्या गुमतीला बरेच दक्षिणवाही नाले ओढे मिळतात व ती डोंगररांगा तोडून खोल दरीतून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत राधाकिशोरपूरजवळ सपाट प्रदेशात उतरते व शेवटी मेघनेला मिळते. तर डोंगराच्या त्रिपुरा रांगांचा पर्वत लक्ष वेधून घेतो.
मृदा :
नदीखोऱ्यातल्या गाळाच्या प्रदेशातील मृदा सुपीक आहे. अन्यत्र जंगल जाळून फिरती शेती करणाऱ्या गिरिजनांच्या झुमिआ पद्धतीमुळे कुजलेल्या पाल्यापाचोळ्याची उणीव असून मृदा निकस आहेत. कमी डोंगरउतारावरही मृदा भुसभुशीत असल्याने पाणी धरून ठेवीत नाहीत. पावसाने त्यातील खनिजे धुपून जातात आणि नायट्रेट, फॉस्फेट, पोटॅश व सेंद्रीय द्रव्यांच्या अभावी मृदा अम्लिक झाल्या आहेत.
हवामान :
त्रिपूरा राज्याचे सर्वसाधारण तपमान २०° ते ३०° से. असून हवामान समशीतोष्ण व आरोग्यपोषक आहे. वार्षिक पर्जन्य एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत १९० सेमी. आढळतो.
भाषा :
त्रिपुरा राज्याच्या कोकबरोक आणि बंगाली या अधिकृत भाषा आहेत. परंतु या व्यतिरिक्त इतर भाषा देखील येथे बोलल्या जातात लोक अधिकृत कामांसाठी इंग्रजी भाषेचा उपयोग करतात. राज्याच्यातील बंगाली लोकांच्या वर्चस्वामुळे बंगाली हि सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.
राज्यातल्या सु. ३ लाख लोकांची त्रिपुरी अथवा मृंग भाषा असून ती बोडो भाषासमूहांपैकी काचारी व गारोसारखी एक उपभाषा आहे. गिरिप्रदेशातल्या विविध जमाती आपापल्या वेगळ्या भाषा बोलतात. या प्रदेशात स्थलांतरितांची बहुसंख्या होऊन बंगाली ही सर्वांत जास्त लोकांची भाषा ठरण्याचा संभव आहे. अगरतल्याहून ९ बंगाली दैनिके प्रसिद्ध होतात.
त्रिपुरा राज्यातील शेती :
शेतीसंलग्न उद्योगधंदे आणि पशुपालन हाच त्रिपुरावासीयांचा प्राथमिक उदरनिर्वाहाचा मार्ग आहे. अननस, भात आणि फणस ही मुख्य पिके, याशिवाय रबर, चहा ही नगदी पिके आहेत.
येथील अननस हे पीक इतर राज्यांत लागवड केल्या जाणाऱ्या अननसापेक्षा काही बाबतीत खास आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. वनाच्छादित भाग दक्षिणेकडील डोंगराळ भागात असून शेती विशेषतः उत्तरेकडील व पश्चिमेकडील मैदानी भागात होते. गाळाची जमीन व भरपूर पाऊस यांमुळे भात हे येथे मुख्य पीक आहे.
लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या ८३% जमीन भाताखाली आहे. झुमिआ’ शेतीपद्धतीने वनसंपत्तीचे व भूमीचे होणारे अपरिमित नुकसान आवरणे, हिरव्या व रासायनिक खतांचा पुरवठा करणे, अधिक जमीन शेतीयोग्य करणे, नलिका कूप व इतर सिंचनयोजनांनी रब्बी व खरीप दोन्ही पिके शक्य करणे, चहामळ्यांना, अननस, मोसंबी व लिचीच्या फळबागांना आणि ताग लागवडीला प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढवणे, राज्यातल्या अनेक नद्या–तळ्यांतून मत्स्यसंवर्धन करून पूरक अन्नाची भरपूर तरतूद करणे असा अनेकविध कार्यक्रम यशस्वी करण्याचे प्रयत्न राज्य निकराने करीत आहे. तसेच त्रिपुरा राज्यात तांदूळ ताग घायपात कापूस मोहरी बटाटा ऊस चहा व तंबाखू अशी ही पिके घेतली जातात.
संगीत व नृत्य :
आणि नृत्य हे कोणत्याही संस्कृतीचे महत्त्वाचे भाग आहेत. येथे सुमुई नावाचे एक वाद्य वापरले जाते, जे बासुरीसारखे दिसते. इथले लोक खाम वापरतात ज्याला ढोल देखील म्हणतात. सारिंडा आणि चोंगप्रांग यांसारखे वाद्य संगीत आणि नृत्य दरम्यान लोक वापरतात. इथल्या लोकांची स्वतःची वेगळी परंपरा आहे आणि ते ती त्यांच्या गाण्यांद्वारे, नृत्याद्वारे जतन करण्याचा प्रयत्न करतात.
विवाह, धार्मिक विधी आणि सणांच्या वेळी ते गाणी आणि नृत्याद्वारे त्यांचा आनंद व्यक्त करतात. त्रिपुरी लोकांचे गरिया नृत्य हे एक प्रकारचे धार्मिक नृत्य आहे. रिंग लोकांचे होजगिरी नृत्य खूप प्रसिद्ध आहे आणि त्या नृत्यात मुली मडक्यावरती नाचतात. या राज्यात अनेक प्रक्चे नृत्य पहायला मिळतात, जसे कि त्रिपुरी लोकांचे लेबंग नृत्य, चमका लोकांचे बिझू नृत्य, गारो लोकांचे वांगला नृत्य, हलम कुकी लोकांचे हैहक नृत्य आणि मोग लोकांचे ओवा नृत्य.
त्रिपुरातील सण व उत्सव :
त्रिपुरा राज्यामध्ये तिर्थमुखला आणि उनाकोटी येथील मकर संक्रांत, होली उत्सव, उनाकोटीची अशोक अष्टमी, ब्रम्हपूरचा सण, मोहनपूरचा राश सण, बोटेरस, मंसामंगल सण, केर व खुर्ची सण, सरद सण, जामपूरीतील ख्रिसमस, बुद्धपौर्णिमा सुद्धा साजरी करण्यात येते.
मुख्य अन्न
त्रिपुरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांमध्ये पोड पिठा, मुई बोरोक, गुडोक, चुआक इत्यादींचा समावेश होतो. त्रिपुरा पाककृतीमध्ये तांदूळ, डाळी, भाज्या, मांस, चटणी आणि स्थानिक औषधी वनस्पतींचा समावेश केला जातो. राज्यातील बहुतांश लोक मांसाहारी आहेत. मासे हे त्रिपुराचे मुख्य अन्न आहे.
ई बोरोक,कोसोई,गुडोक,मुया बाई,मुया अवंद्रू,चुआक,भांगुई,पाच फिरों तरकारी,चिरे डोई आम,पोडा पिठा.
त्रिपुरा राज्यातील पोशाख :
त्रिपुरातील पुरुषांचा पारंपारिक पोशाख एक टॉवेल आहे, ज्याला रिकुटू गचा म्हणून ओळखले जाते. कुबाई हा एक प्रकारचा शर्ट आहे. पुरुष कुकूबरोबर रिकुटू गचा घालतात. उन्हाळ्यात तीव्र उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी त्रिपुरा पुरुष डोक्यावर फेटा किंवा पगडी घालतात.
येथेही पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असलेले लोक, विशेषत: तरुण पिढी जीन्स, पायजमा, शर्ट आणि टी-शर्ट आणि विविध प्रकारचे आधुनिक जीवनशैलीचे पोशाख घालण्यास उत्सुक आहेत. त्रिपुरातील महिलांच्या कपड्यांबद्दल सांगायचे तर, त्रिपुरातील महिलांचा पोशाख हा एका मोठ्या कपड्यासारखा असतो, जो स्त्रिया कंबरेपासून पायापर्यंत किंवा गुडघ्यापर्यंत गुंडाळतात. हे कापड सुंदर हँड आर्ट एम्ब्रॉयडरीने सजवलेले आहे. ज्याला खाकलू म्हणतात.
उद्योग :
१९७१ च्या शिरगणतीत ४,३२,४६३ कामकऱ्यांपैकी ७४,०७५ स्त्रिया होत्या. २,३५,२९२ शेतकरी ८६,३४० शेतमजूर खाणी–पशुपालन–वनोद्योग–मच्छीमारी कामांत ९,५७० लहानमोठ्या कारखान्यांतून १५,२२९ वाहतूक व दळणवळण इ. ६,१९४ बांधकामात ३,१३८ व्यापारवाणिज्यात २४, ४३७ व इतर नोकरीधंद्यांत ५२,२६३ कामगार होते. हातमाग विणकाम, टोपल्या विणणे, रेशीम पैदास असे कुटिरोद्योग असून, लघुउद्योगांत लाकूड कापण्याच्या गिरण्या, विटांचे कारखाने व फळे डबाबंद करणे यांचा समावेश होतो.
शासनाने १५ हजार चात्यांची सूतगिरणी, प्लायवुडचा कारखाना, वन व कृषी उद्योगांसाठी केंद्रे अशा योजना हाती घेतल्या आहेत तसेच कागद व ताग गिरणी उभारली जात आहे. सहकारक्षेत्रात १ राज्यसहकारी व १ भूतारण बँक, सेवा व बहु–उद्देशी यांच्या प्रत्येकी १७८ सोसायट्या, ६७ विणकर सोसायट्या आणि भिन्न भिन्न व्यावसायिक, शेती, खरेदीविक्री ग्राहक, अशांच्या एकूण सु. २५० संस्था आहेत.
१९६८-६९ च्या अर्थसंकल्पात राज्याची अपेक्षित आवक १२·७६ कोटी रु. असून खर्चाचा अंदाज १४·३७ कोटी रु. होता. पुरेशा शक्तिसाधनांच्या अभावी राज्यात मोठे उद्योगधंदे नाहीत, उदयपूर व अरूंधतीनगर येथे औद्योगिक वसाहती असून त्यांत लोहारकाम व सुतारकाम हे मुख्य व्यवसाय आढळतात.
अगरतला, अंबासा, खोवई, धर्मनगर, कैलाशहर, उदयपूर, बोगाफा या ठिकाणी २८६ किवॉ. क्षमतेची ७ डीझेलनिर्मित वीज उत्पादन केंद्रे असून ५५ गावांना वीज पुरवठा होतो. राज्याचे मे १९७५ मध्ये वीज उत्पादन ५,१५० किवॉ. होते. गुमती जलविद्युत् प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. राज्यातील ३,५९९ किमी. रस्त्यांपैकी १,२४९ किमी. पक्के झाले आहेत. आसाम–अगरतला महामार्ग हा देशाच्या मुख्य भूमीशी या प्रदेशाला जोडणारा एकमेव मर्मपथ आहे.
लोहमार्गाने धर्मनगर हे एकच ठिकाण आसाममधील कलकालिघाट स्थानकास जोडलेले आहे. प्रदेशातील बहुतेक नद्यांतून पावसाळ्यात ४ टनी व उन्हाळ्यात २ टनी नावा वावरू शकतात. दळणवळणाच्या अडचणींमुळे विमान वाहतुकीला इकडे फार महत्त्व असून अगरतला येथील विमानतळाखेरीज अन्यत्र ३ धावपट्ट्या आहेत. त्रिपुरा राज्यात २६२ डाकघरे, १७ तारकचेऱ्या व ७ दूरध्वनीकेंद्रे आहेत.
त्रिपुरा राज्यातील पर्यटन स्थळ :
त्रिपुरा हे राज्य पर्यटकांसाठी अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे तर आपण जाणून घेऊया त्रिपुरा मधील काही पर्यटन स्थळ.
उजवंत पॅलेस :
उजवंत पॅलेस त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे आहे. हे शहराच्या मध्यभागी वसलेले असून एक किलोमीटरच्या त्रिज्येत पसरलेले आहे. त्याची पायाभरणी महाराजा राधा किशोर माणिक बहादूर यांनी 1899 -1901दरम्यान केली होती. सध्या राज्यात विधानसभा आहे.
कुंज भवन :
कुंज भवन 1917 मध्ये महाराजा बिरेंद्र किशोर माणिक बहादूर यांनी बांधले होते. रवींद्रनाथ टागोर 1926 मध्ये आगरतळाला गेले तेव्हा ते कुंज भवनात राहिले. हे सध्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान म्हणून वापरले जाते.
जगन्नाथ मंदिर त्रिपुरा :
हे मंदिर स्थापत्यकलेचा अतुलनीय नमुना आहे. ते पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक आगरतळ्यात येतात.
राज्य संग्रहालय
या संग्रहालयात आगरतळ्याच्या प्राचीन इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित दुर्मिळ वस्तू अगदी जवळून पाहता येतील. त्रिपुरा पर्यटनाच्या सहलीला येणारे बहुतेक पर्यटक येथे नक्कीच येतात.
ब्रह्मकुंड :
आगरतळ्यापासून उत्तरेस 45 किमी अंतरावर ब्रह्मकुंड आहे. येथे दरवर्षी मार्च, एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात जत्रा भरते.
कमला सागर तलाव :
कमलासागर हा अतिशय सुंदर तलाव आहे. येथील एका टेकडीवर काली मातेचे मंदिर आहे. जिथे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात जत्रा भरवली जाते.
त्रिपुरा सुंदरी मंदिर :
हे मंदिर त्रिपुरा पर्यटनातील त्रिपुराचे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. हिंदू धर्मात त्रिपुरा सुंदरीला खूप महत्त्व मानले जाते. 51 शक्तीपीठांपैकी एक असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे. देवी सतीच्या शरीराचा उजवा पाय येथे पडला होता असे मानले जाते.
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- हत्ती विषयी संपूर्ण माहिती
- वाघाची संपूर्ण माहिती
- बैलाची संपूर्ण माहिती
- उंटाची संपूर्ण माहिती
- म्हैस बद्दल संपूर्ण माहिती
FAQ
त्रिपुरा राज्याची राजधानी काय आहे?
आगरताळा
त्रिपुराचे कपडे काय आहेत?
रिसा छातीचा भाग झाकतो आणि रिकुटू शरीराच्या वरच्या अर्ध्या भागाला झाकतो.
त्रिपुरामध्ये किती भाषा बोलल्या जातात?
त्रिपुराची अधिकृत भाषा बंगाली, इंग्रजी आणि कोकबोरोक आहे.
त्रिपुरा मुख्य अन्न काय आहे?
त्रिपुरा पाककृतीचे मुख्य अन्न तांदूळ आहे, जे बर्याचदा मांस, मासे आणि भाज्यांच्या विविध पदार्थांसह दिले जाते. मासे, भाज्या आणि विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आणि मसाल्यांसारख्या स्थानिक स्रोतांच्या वापरासाठी पाककृती ओळखली जाते.
त्रिपुरामध्ये किती जमाती आहेत?
त्रिपुरामध्ये १९ विविध आदिवासी समुदायांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. हे समुदाय आहेत – त्रिपुरा/त्रिपुरी, रियांग, जमातिया, नोआटिया, उचाई, चकमा, मोग, लुशाई, कुकी, हलम, मुंडा, कौर, ओरंग, संताल, भील, भुतिया, चैमल, गारो, खासिया आणि लेपचा.